Third-party premium has changed from 1st June. Renew now
इन्श्युरन्ससंदर्भात एनसीबी (NCB) म्हणजे काय?
भारताततील फोर व्हीलर्सची संख्या वेगाने वाढत आहे. पण भारतात गाडी घ्यायची असेल तर त्याआधी तुम्हाला हे माहीत असायला हवे की मोटर व्हेहिकल्सचा इन्शुरन्स काढणे भारतामध्ये अनिवार्य आहे आणि गाडी घ्यायची असेल तर तुम्हाला इन्श्युरन्सही घ्यावाच लागेल. पण चांगली बातमी ही आहे की बहुतेक सर्व इन्श्युरन्स प्रोव्हायडर्स पॉलिसीधारकांना एनसीबीचा लाभ देतात.
पण भारतातल्या बहुतांश लोकांना एनसीबी म्हणजे काय हेच मुळात माहीत नसते. म्हणूनच या नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आम्ही आलो आहोत.
इन्श्युरन्ससंदर्भात एनसीबी (NCB)चा अर्थ काय?
एनसीबीचा अर्थ आहे नो क्लेम बोनस. हे दुसरे-तिसरे काही नसून कार इन्शुरन्स प्रोव्हायडर्स त्यांच्या ग्राहकांना पॉलिसीच्या वर्षात कोणताही क्लेम दाखल न केल्याबद्दल जे रिवॉर्ड देतात ते आहे. या रिवॉर्डद्वारे विमाधारकाला जेव्हा ते पुढच्या वर्षीसाठी त्यांच्या इन्शुरन्स पॉलिसीचे नूतनीकरण करतात तेव्हा इन्शुरन्सच्या प्रीमियमवर डिस्काउंट मिळते.
कार इन्श्युरन्सबाबत एनसीबी (NCB) ची कार्यपद्धती नेमकी काय आहे?
आपल्या चारी बाजूला महागाई वाढतच आहे. कार इन्श्युरन्सच्या बाबतीत मात्र तुम्हाला या खास बेनिफिटमुळे तुमचा कार इन्श्युरन्स प्रीमियम कमी करण्याचा पर्याय उपलब्ध होतो. ते कसं हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना?
हे खरं तर एखाद्या रिवॉर्ड सिस्टमसारखंच आहे. तुमच्या पॉलिसीच्या पहिल्या वर्षी तुम्ही कोणताही क्लेम केला नाही तर तुम्हाला 20% एनसीबी डिस्काउंट मिळून सुरुवात होते. त्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून प्रत्येक वर्षी कोणताही क्लेम न केल्यास तुम्हाला जास्तीचे 5 % डिस्काउंट मिळत राहते. अर्थातच सलग सहाव्या वर्षी 50 % इतकी रक्कम कमी होऊ शकते. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही जितके चांगले ड्रायव्हर असाल तितकं तुम्ही तुमच्या गाडीचं रक्षण कराल - आणि तितकच भविष्यात ते तुमच्या फायद्याचं ठरेल.
छोटे छोटे क्लेम करून नो क्लेम बोनस सोडून देणे शहाणपणाचं आहे का?
अजिबात नाही. एखादा लहानसा अॅक्सिडेंट किंवा किरकोळ टायर फुटण्यासाठी तुम्ही कार इन्श्युरन्सचा उपयोग करायचा विचार करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही तो खर्च स्वतःच करावा (अर्थातच ते शक्य असेल तर) आणि मग पूर्ण वर्षभर कोणताही क्लेम न करता त्यासाठी तुम्हाला कार इन्श्युरन्स रिन्युअलच्या वेळी नो क्लेम्स बोनस मिळवता येईल.
नो क्लेम बोनस कॅल्क्युलेटर
आता इन्श्युरन्सच्या बाबतीत एनसीबी पॉलिसी म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर पुढचा मोठा प्रश्न अर्थातच हा असतो की कार इन्श्युरन्ससाठी नो क्लेम बोनस किती असतो?
तुमच्या गाडीचा नो क्लेम बोनस किती असेल हे मोजणं काही तितकं कठीण नाही. बऱ्याचं इन्श्युरन्स कंपन्या तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरच नो क्लेम बोनस कॅल्क्युलेटरचा अॅक्सेस देतात. त्याच्या मदतीने तुम्ही नो क्लेम बोनस किती होईल ते मोजू शकता. सर्वसाधारणपणे तुमच्या पॉलिसीच्या दुसऱ्या वर्षापासून त्याची सुरुवात होते.
सध्याच्या पद्धतीप्रमाणे भारतामध्ये 20 % पासून एनसीबी सुरु होतो आणि सहाव्या वर्षी 50 % पर्यंत वाढू शकतो. सर्वसाधारणपणे कोणत्याही फोरव्हीलरसाठी नो क्लेम बोनस खाली दिल्याप्रमाणे मोजला जातो.
कार इन्श्युरन्ससाठी एनसीबी (NCB) कॅल्क्युलेशन
क्लेम न केलेली वर्षे | नो क्लेम बोनस |
---|---|
1 ल्या वर्षानंतर | 20% |
2 ऱ्या वर्षानंतर | 25% |
3 ऱ्या वर्षानंतर | 35% |
4 थ्या वर्षानंतर | 45% |
5 व्या वर्षानंतर | 50% |
कार इन्श्युरन्ससाठी एनसीबी (NCB) चे फायदे
1. तुम्हाला पॉझिटिव्ह रिवॉर्ड्स मिळतात : एनसीबी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चांगला आणि जबाबदार ड्रायव्हर आणि कार मालक असल्याबद्दल तुम्हाला मिळणारे रिवॉर्ड आहे.
2. त्याचा संबंध तुमच्या कारशी नाही तर तुमच्याशी आहे : एनसीबीचा संबंध तुमच्या कारशी नसतो तर एक व्यक्ती म्हणून तुमच्याशी असतो. म्हणजेच तुमची कार कोणती का असेना - जर तुम्ही एक्सपायरी डेटपूर्वी तुमची कार पॉलिसी रिन्यू करत असाल तर तुम्हाला तुमच्या कार इन्श्युरन्सवर नो क्लेम बोनस मिळत राहील.
3.कार इन्श्युरन्स प्रीमियमच्या रकमेत बचत करा : डिस्काउंट कुणाला आवडत नाही? नो क्लेम बोनसमुळे तुम्ही तुमच्या कार इन्श्युरन्स प्रीमियममध्ये किमान 20 टक्क्यांची बचत करू शकता.
4.सहज ट्रान्सफर करता येतो : तुम्ही कधी तुमची इन्श्युरन्स कंपनी किंवा कार बदलणार असाल तर अशावेळी एनसीबी ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अगदी साधी आणि सोपी आहे. तुम्हाला एकाच गोष्टीची खात्री करायला लागेल, ती म्हणजे तुमची चालू पॉलिसी एक्सपायर होण्यापूर्वी नवी पॉलिसी घ्यायला लागेल.
एनसीबी (NCB) बद्दल माहिती असायला हव्यात अश्या महत्त्वाच्या गोष्टी
एनसीबी कधी रद्द केला जातो?
हे सरळच आहे की एनसीबी अतिशय लाभदायक गोष्ट आहे. जोपर्यंत तुम्ही क्लेम करत नाही तोपर्यंत तुम्हाला एनसीबीचे कवच अखंड मिळत राहते. पण जर का पॉलिसी चालू असताना एखाद्या वर्षी तुम्हाला कोणत्याही कारणासाठी क्लेम करायला लागला तर त्याच्या पुढच्या वर्षापासून तुम्हाला पॉलिसीवर एनसीबीचा लाभ मिळणार नाही. त्यात लक्षात घेण्याजोगी बाब ही आहे की जर तुम्ही तुमची चालू इन्शुरन्स पॉलिसी एक्सपायरी होण्याच्या 90 दिवसांमध्ये रिन्यू केली नाही तर तुम्हाला नो क्लेम बोनस मिळणार नाही. म्हणूनच तुमची पॉलिसी वेळोवेळी रिन्यू करावी हे चांगले.
एनसीबी सर्टिफिकेट कसे मिळवावे?
एनसीबीबद्दल येणारा पुढचा प्रश्न म्हणजे एनसीबी सर्टिफिकेट कसे मिळेल? जेव्हा तुम्ही इन्श्युरन्स पॉलिसी घेता तेव्हाच पॉलिसीधारकाला एनसीबी सर्टिफिकेट दिले जाते. आता पॉलिसीच्या वर्षादरम्यान पॉलिसीधारक क्लेम करतो की नाही यावर पुढचे सगळे अवलंबून असते. क्लेम केल्यास त्याला पुढच्या वर्षी एनसीबीचा लाभ मिळणार नाही. परंतु पूर्ण वर्षभरात क्लेम न केल्यास तो एनसीबी मिळवायला पात्र होईल.
इन्श्युरन्ससंदर्भात प्रीव्हियस एनसीबी म्हणजे काय?
तुम्ही आत्तापर्यंत कोणताही क्लेम केला नसेल आणि वर्षाच्या मध्येच कधीतरी तुम्ही तुमची कार विकायची ठरवली किंवा दुसरी कार घ्यायची ठरवली तर काय होईल हे तुम्हाला माहीत आहे का?
तुम्ही एखाद्या डीलरकडून किंवा थर्ड पार्टीकडून जुनी कार घेतली आणि जर ती एनसीबीपात्र असेल तर तुम्ही नो क्लेम बोनस ट्रान्सफरसाठी अप्लाय करू शकता. अशावेळी तुम्हाला फक्त इन्श्युरन्स कंपनीला जुन्या गाडीच्या विक्रीबद्दल माहिती देउन एनसीबी तुमच्या नव्या गाडीला ट्रान्स्फर करण्यासाठी लिहून कळवावे लागेल.
जर तुम्ही डिजिटमार्फत नवी कार इन्श्युरन्स पॉलिसी घेत असाल तर तुम्हाला फक्त इतकेच करावे लागेल – तुमचा सध्याचे एनसीबी आणि तुमच्या पूर्वीच्या इन्श्युरन्स प्रोव्हायडरचे नाव आणि पॉलिसी नंबर याचा उल्लेख करायचा ( जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्याकडून नव्या कारसाठी पॉलिसी घेत असाल तर) आणि मग पुढचं सगळं काम आम्ही करू.
एनसीबी नव्या कार इन्श्युरन्सला ट्रान्स्फर करण्यासाठी काय करावे?
तुम्ही नवा कार इन्श्युरन्स ऑनलाइन घेत आहात, एजंटकडून घेत आहात की ऑफलाईन घेत आहात यावर हे अवलंबून असेल. तुम्ही तुमची नवी कार इन्श्युरन्स पॉलिसी ऑफलाईन किंवा एखाद्या एजंटकडून घेत असाल तर तुमचा नो क्लेम बोनस ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला तुमचे खरेदी-विक्रीचे अॅग्रिमेंट, 29 आणि 30 क्रमांकाचे फॉर्म्स आणि त्याबरोबर सध्याच्या इन्श्युरन्स कंपनीकडून एनसीबी ट्रान्सफर करण्यासाठी विनंतीपत्र या गोष्टी सदर कराव्या लागतील.
त्यानंतर संबंधित इन्श्युरर तुम्हाला एनसीबी सर्टिफिकेट देईल. ते तुम्ही तुमच्या नव्या कार इन्श्युरन्स कंपनीला सादर करायचे राहील. परंतु जर तुम्ही कार इन्श्युरन्स ऑनलाइन घेत असाल तर तुम्हाला यातले काहीच करायची गरज नाही. फक्त योग्य एनसीबी आणि जुन्या पॉलिसीचा नंबर आणि इन्श्युररचे नाव तुमच्या नव्या इन्शुरन्स कंपनीला डिक्लेअर करायचे आणि मग त्यानंतर पुढची सर्व प्रक्रिया तुमची नवी इन्श्युरन्स कंपनी पार पाडेल.
एनसीबी ट्रान्स्फरसाठी अवश्यक कागदपत्रे
या ॲप्लिकेशनसोबत तुम्हाला खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडावी लागतील :
जुन्या गाडीच्या विक्रीनंतर तुम्हाला मिळालेल्या डिलिव्हरी नोटची कॉपी
जुन्या गाडीची इन्शुरन्स पॉलिसी
गाडी खरेदी केल्यावर तुम्हाला मिळालेल्या बुकिंग फॉर्मची कॉपी
वरील कागदपत्रे रुजू केल्यानंतर नो क्लेम बोनस नव्या गाडीला ट्रान्सफर केला जाईल. लागू असलेल्या एनसीबी सर्टिफिकेटप्रमाणे ग्राहक नव्या गाडीच्या इन्शुरन्स प्रीमियमवर डिस्काउंट मिळवू शकतो.
इन्शुरन्समधील नो क्लेम बोनसबद्दल वारंवार विचारल्या जाणाऱ्या शंका
मला एकापेक्षा जास्त गाड्यांसाठी नो क्लेम बोनस मिळू शकेल का?
तुमचा नो क्लेम बोनस एका कारपुरताच मर्यादित असतो. अर्थातच जर तुम्ही तुमच्या वाढदिवसाला स्वतःसाठी दुसरी नवी कोरी कार घेतली तर तुम्हाला तिच्यासाठी वेगळा इन्श्युरन्स घ्यावा लागेल आणि क्लेम न करता त्या गाडीसाठी वेगळा एनसीबी उभा करता येईल.
मला नो क्लेम बोनस एका इन्श्युररकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर करता येईल का?
जर तुम्ही इन्श्युरन्स कंपनी बदलत असाल तर तुमचा नो क्लेम बोनस तुम्ही एका इन्श्युरन्स प्रोव्हायडरकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर करू शकता. तुम्ही पॉलिसी रिन्युअलच्या वेळीच नव्या इन्श्युररकडे ट्रान्सफर करत असाल तर तुम्हाला फक्त एनसीबीचा उल्लेख असणारे मागच्या वर्षीचे पॉलिसी डॉक्युमेंट किंवा रिन्युअल नोटिस दाखवावी लागेल. सरळ सोप्या शब्दात सांगायचं तर ऑनलाइन कार इन्श्युरन्स घेतल्यावर फक्त तुमच्या डिक्लेरेशनच्या आधारे तुमचा एनसीबी तुम्ही ट्रान्सफर करून घेऊ शकता - तुम्हाला मोठा खटाटोप करून नो क्लेम बोनस सर्टिफिकेट वगैरे मिळवण्याची जरूरच लागणार नाही.
थर्ड पार्टी कर इन्श्युरन्सवर नो क्लेम बोनस लागू होऊ शकतो का?
तुमच्या प्रीमियममधला साधारणपणे 15 ते 20 % भाग थर्ड पार्टी लायॅबिलिटीसाठी असतो आणि तो एनसीबीमध्ये अंतर्भूत होत नाही. तेच जर तुमच्याकडे फक्त थर्ड पार्टी इन्श्युरन्स असेल तर तुम्हाला एनसीबीचा लाभ मिळवता येणार नाही. एनसीबी मिळवण्यासाठी तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा ओन डॅमेज कार इन्श्युरन्स घ्यावा लागेल. इथे दिलाशाची गोष्ट ही आहे की थर्ड पार्टी क्लेममुळे तुमच्या एनसीबीवर कोणताही परिणाम होणार नाही. तुमचा नो क्लेम बोनस सांभाळून ठेवा आणि दरवर्षी कमी होत जाणाऱ्या प्रीमियमचा आनंद लुटा. त्याशिवाय दुसऱ्या एकाच गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल - ती म्हणजे ड्रायव्हिंग करताना सावधानी बाळगा. अपघात किती अचानक होऊ शकतात ते आपल्याला माहितीच आहे.
नो क्लेम बोनस हा एक अॅड-ऑन आहे का?
छे छे, नो क्लेम्स बोनस हा काही अॅड-ऑन नाही. तुम्ही ओन डॅमेज किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्श्युरन्स पॉलिसी घेतली तर तुम्ही नो क्लेम बोनस मिळण्यासाठी पात्र ठरता. मात्र जर तुम्हाला लागोपाठ अनेक वर्षे काही क्लेम न करता तुम्ही गोळा केलेला नो क्लेम्स बोनस सुरक्षित ठेवायचा असेल तर तुम्ही अॅड ऑन नो क्लेम बोनस प्रोटेक्शन खरेदी करू शकता.
कार इन्श्युरन्सवर कमाल किती नो क्लेम्स बोनस मिळू शकतो?
कार इन्श्युरन्सवर जास्तीत जास्त 50 % नो क्लेम बोनस मिळू शकतो. पहिल्या वर्षी काही क्लेम न केल्यास तुमचा एनसीबी 20% ने सुरू होतो आणि पाच वर्षे काही क्लेम न केल्यास वाढत वाढत 50 % इतका होऊ शकतो.
इन्श्युरन्स कंपन्या नो क्लेम्स बोनसची तपासणी आणि क्लेम हिस्टरीची पडताळणी करतात का?
सर्व इन्श्युरन्स कंपन्या तुम्ही कार खरेदी करताना दिलेले नो क्लेम बोनस आणि इतर तपशील बरोबर आहेत की नाहीत याची पडताळणी करतात. जर चुकीची माहिती दिली गेली असेल तर कंपनी तुम्हाला कार इन्श्युरन्स पॉलिसी ( आधीच इश्यू करण्यात आली असल्यास) इश्यू करणार नाही किंवा रद्द करून टाकेल.
तुम्ही ड्रायव्हिंग करणे बंद केल्यास नो क्लेम्स बोनस गमवावा लागेल का?
नाही, तुम्ही ड्रायव्हिंग करणे बंद केले तरीही तुमचा नो क्लेम्स बोनस तुम्हाला गमवावा लागणार नाही. पॉलिसीच्या वर्षादरम्यान तुम्ही क्लेम केला तर किंवा एक्सपायरी डेटपूर्वी पॉलिसी रिन्यू केली नाही तरच तुम्ही एनसीबी गमावू शकता.
एनसीबीचा कार प्रीमिअमवर एकूण काय परिणाम होतो?
तुमच्या पॉलिसीच्या पाहिल्या वर्षात तुम्ही काही क्लेम केला नाही तर तर तुमची कार इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू करताना तुम्हाला 20 % डिस्काउंट दिले जाईल. तुम्हाला फक्त एक्स्पायर होण्यापूर्वी तुमची पॉलिसी रिन्यू करण्याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर दर वर्षी तुम्ही क्लेम न केल्यास वाढत वाढत हे डिस्काउंट 20 % वरून 50% पर्यंत वाढू शकते.
एनसीबी कधीपर्यंत वैध असतो?
तुम्ही क्लेम करत नाही तोपर्यंत एनसीबी वैध असतो.
इन्श्युरन्स रद्द केल्यास तुम्हाला एनसीबी गमवावा लागेल काय?
होय, इन्श्युरन्स एक्सपायर होण्यापूर्वी पूर्णपणे रद्द केल्यास तुम्हाला एनसीबी गमवायला लागेल. पण तुम्हाला जर फक्त इन्श्युरर बदलायचा असेल तर पूर्णपणे कॅन्सल करण्यापेक्षा तुम्ही तुमचा एनसीबी डिक्लेअर करून किंवा तुमच्या सध्याच्या इन्श्युररकडून एनसीबी सर्टिफिकेट घेऊन ते तुमच्या नव्या इन्श्युररला देऊन तुम्ही तुमच्या सद्य एनसीबीचा लाभ चालू ठेवू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे तुमची एनसीबी तुमच्या कार किंवा तुमच्या इन्श्युररशी नाही तर व्यक्ती म्हणून तुमच्याशी संबंधित असतो.