कार इन्श्युरन्समधील एनसीबी (NCB)
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
भारताततील फोर व्हीलर्सची संख्या वेगाने वाढत आहे. पण भारतात गाडी घ्यायची असेल तर त्याआधी तुम्हाला हे माहीत असायला हवे की मोटर व्हेहिकल्सचा इन्शुरन्स काढणे भारतामध्ये अनिवार्य आहे आणि गाडी घ्यायची असेल तर तुम्हाला इन्श्युरन्सही घ्यावाच लागेल. पण चांगली बातमी ही आहे की बहुतेक सर्व इन्श्युरन्स प्रोव्हायडर्स पॉलिसीधारकांना एनसीबीचा लाभ देतात.
पण भारतातल्या बहुतांश लोकांना एनसीबी म्हणजे काय हेच मुळात माहीत नसते. म्हणूनच या नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आम्ही आलो आहोत.
एनसीबीचा अर्थ आहे नो क्लेम बोनस. हे दुसरे-तिसरे काही नसून कार इन्शुरन्स प्रोव्हायडर्स त्यांच्या ग्राहकांना पॉलिसीच्या वर्षात कोणताही क्लेम दाखल न केल्याबद्दल जे रिवॉर्ड देतात ते आहे. या रिवॉर्डद्वारे विमाधारकाला जेव्हा ते पुढच्या वर्षीसाठी त्यांच्या इन्शुरन्स पॉलिसीचे नूतनीकरण करतात तेव्हा इन्शुरन्सच्या प्रीमियमवर डिस्काउंट मिळते.
आपल्या चारी बाजूला महागाई वाढतच आहे. कार इन्श्युरन्सच्या बाबतीत मात्र तुम्हाला या खास बेनिफिटमुळे तुमचा कार इन्श्युरन्स प्रीमियम कमी करण्याचा पर्याय उपलब्ध होतो. ते कसं हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना?
हे खरं तर एखाद्या रिवॉर्ड सिस्टमसारखंच आहे. तुमच्या पॉलिसीच्या पहिल्या वर्षी तुम्ही कोणताही क्लेम केला नाही तर तुम्हाला 20% एनसीबी डिस्काउंट मिळून सुरुवात होते. त्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून प्रत्येक वर्षी कोणताही क्लेम न केल्यास तुम्हाला जास्तीचे 5 % डिस्काउंट मिळत राहते. अर्थातच सलग सहाव्या वर्षी 50 % इतकी रक्कम कमी होऊ शकते. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही जितके चांगले ड्रायव्हर असाल तितकं तुम्ही तुमच्या गाडीचं रक्षण कराल - आणि तितकच भविष्यात ते तुमच्या फायद्याचं ठरेल.
अजिबात नाही. एखादा लहानसा अॅक्सिडेंट किंवा किरकोळ टायर फुटण्यासाठी तुम्ही कार इन्श्युरन्सचा उपयोग करायचा विचार करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही तो खर्च स्वतःच करावा (अर्थातच ते शक्य असेल तर) आणि मग पूर्ण वर्षभर कोणताही क्लेम न करता त्यासाठी तुम्हाला कार इन्श्युरन्स रिन्युअलच्या वेळी नो क्लेम्स बोनस मिळवता येईल.
आता इन्श्युरन्सच्या बाबतीत एनसीबी पॉलिसी म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर पुढचा मोठा प्रश्न अर्थातच हा असतो की कार इन्श्युरन्ससाठी नो क्लेम बोनस किती असतो?
तुमच्या गाडीचा नो क्लेम बोनस किती असेल हे मोजणं काही तितकं कठीण नाही. बऱ्याचं इन्श्युरन्स कंपन्या तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरच नो क्लेम बोनस कॅल्क्युलेटरचा अॅक्सेस देतात. त्याच्या मदतीने तुम्ही नो क्लेम बोनस किती होईल ते मोजू शकता. सर्वसाधारणपणे तुमच्या पॉलिसीच्या दुसऱ्या वर्षापासून त्याची सुरुवात होते.
सध्याच्या पद्धतीप्रमाणे भारतामध्ये 20 % पासून एनसीबी सुरु होतो आणि सहाव्या वर्षी 50 % पर्यंत वाढू शकतो. सर्वसाधारणपणे कोणत्याही फोरव्हीलरसाठी नो क्लेम बोनस खाली दिल्याप्रमाणे मोजला जातो.
क्लेम न केलेली वर्षे |
नो क्लेम बोनस |
1 ल्या वर्षानंतर |
20% |
2 ऱ्या वर्षानंतर |
25% |
3 ऱ्या वर्षानंतर |
35% |
4 थ्या वर्षानंतर |
45% |
5 व्या वर्षानंतर |
50% |
1. तुम्हाला पॉझिटिव्ह रिवॉर्ड्स मिळतात : एनसीबी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चांगला आणि जबाबदार ड्रायव्हर आणि कार मालक असल्याबद्दल तुम्हाला मिळणारे रिवॉर्ड आहे.
2. त्याचा संबंध तुमच्या कारशी नाही तर तुमच्याशी आहे : एनसीबीचा संबंध तुमच्या कारशी नसतो तर एक व्यक्ती म्हणून तुमच्याशी असतो. म्हणजेच तुमची कार कोणती का असेना - जर तुम्ही एक्सपायरी डेटपूर्वी तुमची कार पॉलिसी रिन्यू करत असाल तर तुम्हाला तुमच्या कार इन्श्युरन्सवर नो क्लेम बोनस मिळत राहील.
3.कार इन्श्युरन्स प्रीमियमच्या रकमेत बचत करा : डिस्काउंट कुणाला आवडत नाही? नो क्लेम बोनसमुळे तुम्ही तुमच्या कार इन्श्युरन्स प्रीमियममध्ये किमान 20 टक्क्यांची बचत करू शकता.
4.सहज ट्रान्सफर करता येतो : तुम्ही कधी तुमची इन्श्युरन्स कंपनी किंवा कार बदलणार असाल तर अशावेळी एनसीबी ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अगदी साधी आणि सोपी आहे. तुम्हाला एकाच गोष्टीची खात्री करायला लागेल, ती म्हणजे तुमची चालू पॉलिसी एक्सपायर होण्यापूर्वी नवी पॉलिसी घ्यायला लागेल.
हे सरळच आहे की एनसीबी अतिशय लाभदायक गोष्ट आहे. जोपर्यंत तुम्ही क्लेम करत नाही तोपर्यंत तुम्हाला एनसीबीचे कवच अखंड मिळत राहते. पण जर का पॉलिसी चालू असताना एखाद्या वर्षी तुम्हाला कोणत्याही कारणासाठी क्लेम करायला लागला तर त्याच्या पुढच्या वर्षापासून तुम्हाला पॉलिसीवर एनसीबीचा लाभ मिळणार नाही. त्यात लक्षात घेण्याजोगी बाब ही आहे की जर तुम्ही तुमची चालू इन्शुरन्स पॉलिसी एक्सपायरी होण्याच्या 90 दिवसांमध्ये रिन्यू केली नाही तर तुम्हाला नो क्लेम बोनस मिळणार नाही. म्हणूनच तुमची पॉलिसी वेळोवेळी रिन्यू करावी हे चांगले.
एनसीबीबद्दल येणारा पुढचा प्रश्न म्हणजे एनसीबी सर्टिफिकेट कसे मिळेल? जेव्हा तुम्ही इन्श्युरन्स पॉलिसी घेता तेव्हाच पॉलिसीधारकाला एनसीबी सर्टिफिकेट दिले जाते. आता पॉलिसीच्या वर्षादरम्यान पॉलिसीधारक क्लेम करतो की नाही यावर पुढचे सगळे अवलंबून असते. क्लेम केल्यास त्याला पुढच्या वर्षी एनसीबीचा लाभ मिळणार नाही. परंतु पूर्ण वर्षभरात क्लेम न केल्यास तो एनसीबी मिळवायला पात्र होईल.
तुम्ही आत्तापर्यंत कोणताही क्लेम केला नसेल आणि वर्षाच्या मध्येच कधीतरी तुम्ही तुमची कार विकायची ठरवली किंवा दुसरी कार घ्यायची ठरवली तर काय होईल हे तुम्हाला माहीत आहे का?
तुम्ही एखाद्या डीलरकडून किंवा थर्ड पार्टीकडून जुनी कार घेतली आणि जर ती एनसीबीपात्र असेल तर तुम्ही नो क्लेम बोनस ट्रान्सफरसाठी अप्लाय करू शकता. अशावेळी तुम्हाला फक्त इन्श्युरन्स कंपनीला जुन्या गाडीच्या विक्रीबद्दल माहिती देउन एनसीबी तुमच्या नव्या गाडीला ट्रान्स्फर करण्यासाठी लिहून कळवावे लागेल.
जर तुम्ही डिजिटमार्फत नवी कार इन्श्युरन्स पॉलिसी घेत असाल तर तुम्हाला फक्त इतकेच करावे लागेल – तुमचा सध्याचे एनसीबी आणि तुमच्या पूर्वीच्या इन्श्युरन्स प्रोव्हायडरचे नाव आणि पॉलिसी नंबर याचा उल्लेख करायचा ( जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्याकडून नव्या कारसाठी पॉलिसी घेत असाल तर) आणि मग पुढचं सगळं काम आम्ही करू.
तुम्ही नवा कार इन्श्युरन्स ऑनलाइन घेत आहात, एजंटकडून घेत आहात की ऑफलाईन घेत आहात यावर हे अवलंबून असेल. तुम्ही तुमची नवी कार इन्श्युरन्स पॉलिसी ऑफलाईन किंवा एखाद्या एजंटकडून घेत असाल तर तुमचा नो क्लेम बोनस ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला तुमचे खरेदी-विक्रीचे अॅग्रिमेंट, 29 आणि 30 क्रमांकाचे फॉर्म्स आणि त्याबरोबर सध्याच्या इन्श्युरन्स कंपनीकडून एनसीबी ट्रान्सफर करण्यासाठी विनंतीपत्र या गोष्टी सदर कराव्या लागतील.
त्यानंतर संबंधित इन्श्युरर तुम्हाला एनसीबी सर्टिफिकेट देईल. ते तुम्ही तुमच्या नव्या कार इन्श्युरन्स कंपनीला सादर करायचे राहील. परंतु जर तुम्ही कार इन्श्युरन्स ऑनलाइन घेत असाल तर तुम्हाला यातले काहीच करायची गरज नाही. फक्त योग्य एनसीबी आणि जुन्या पॉलिसीचा नंबर आणि इन्श्युररचे नाव तुमच्या नव्या इन्शुरन्स कंपनीला डिक्लेअर करायचे आणि मग त्यानंतर पुढची सर्व प्रक्रिया तुमची नवी इन्श्युरन्स कंपनी पार पाडेल.
या ॲप्लिकेशनसोबत तुम्हाला खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडावी लागतील :
जुन्या गाडीच्या विक्रीनंतर तुम्हाला मिळालेल्या डिलिव्हरी नोटची कॉपी
जुन्या गाडीची इन्शुरन्स पॉलिसी
गाडी खरेदी केल्यावर तुम्हाला मिळालेल्या बुकिंग फॉर्मची कॉपी
वरील कागदपत्रे रुजू केल्यानंतर नो क्लेम बोनस नव्या गाडीला ट्रान्सफर केला जाईल. लागू असलेल्या एनसीबी सर्टिफिकेटप्रमाणे ग्राहक नव्या गाडीच्या इन्शुरन्स प्रीमियमवर डिस्काउंट मिळवू शकतो.