हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एक फायदा तर आहेच, त्यासोबत मेडिकल आपत्कालीन परिस्थितीत रक्षणकर्ता म्हणून काम करणारी एक गरज आहे. हे मेडिकल संकटाच्या काळात आर्थिक मदत प्रदान करते आणि मेडिकल बिले भरते जी अन्यथा बचतीवर परिणाम करतात.
हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी बहुतेक मेडिकल परिस्थितींना संरक्षण प्रदान करतात, परंतु असे पण काही काही "अपवर्जन" आहेत ज्याबद्दल आपल्याला ठाऊक नसल्यास ते आपल्याला आश्चर्य चकित करू शकतात.
आपले महागडे दंत उपचाराला आपल्या हेल्थ प्रदात्याद्वारे संरक्षण दिले गलेले नाही असे नंतर लक्षात येण्याऐवजी, आपल्या हेल्थ पॉलिसीमधील सर्व अपवर्जन समजून घेणे आणि जाणून घेणे नेहमीच चांगले असते.
हेल्थ इन्शुरन्सच्या संदर्भात "अपवर्जन" काही प्रकारच्या मेडिकल स्थिती आहेत ज्यांना हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीद्वारे संरक्षण दिले जात नाही किंवा काही प्रकरणांमध्ये, विशिष्ट कालावधीनंतर त्यांना संरक्षण देण्यात येते.
अपवर्जनची संपूर्ण यादी वेगळ्या पॉलिसींना भिन्न असू शकते.
त्यापैकी काहींना एका ठराविक वेटिंग पिरीयडनंतर संरक्षण दिले जाऊ शकते, परंतु काही सामान्य स्थिती संपूर्ण उद्योगात हेल्थ इन्शुरन्सअंतर्गत कायमस्वरूपी वगळल्या जातात.
चला काही सर्वात सामान्य अपवर्जन पाहूयात:
पॉलिसी घेताना इनशूअर्ड कोणत्याही मेडिकल स्थितीने ग्रस्त असेल तर त्याला आधीपासून अस्तित्वात असलेले रोग म्हणतात. त्याला हेल्थ इन्शुरन्सअंतर्गत संरक्षण दिले जात नसते. तथापि, यापैकी काहींना विशिष्ट वेटिंग पिरीयडनंतर संरक्षण दिले जाऊ शकते.
मधुमेह, थायरॉईड, उच्च रक्तदाब इत्यादी या आधीपासून-अस्तित्वात असलेल्या आजारांची काही उदाहरणे आहेत.
मोतीबिंदू, हर्निया, मानसिक आजार व विकार, सांधे बदलणे, बॅरिॲट्रिक शस्त्रक्रिया इत्यादी अशा काही आजारांना हेल्थ इन्शुरन्समध्ये विशिष्ट वेटिंग पिरीयडनंतर संरक्षण दिले जाते.
बऱ्याच स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्समध्ये गर्भधारणा आणि बाळंतपणाला, म्हणजेच मॅटर्निटी खर्च, यांना संरक्षण देत नसतात आणि यांना सहसा इंडिविजुअल हेल्थ इन्शुरन्ससह ॲड-ऑन म्हणून घ्यावे लागते. तथापि, अशा प्रकरणांमध्ये सुद्धा सामान्यत: 1 - 2 वर्षांचा वेटिंग पिरीयड असतो.
त्याचप्रमाणे वंध्यत्व आणि गर्भपाताच्या प्रकरणांवरील उपचारांना बहुतेक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत संरक्षण दिले जात नाही.
डिजिटच्या हेल्थ इन्शुरन्ससह, आपल्याला त्याचे अतिरिक्त संरक्षण घेऊन मॅटर्निटीसाठी कव्हरेज, बाल फायदा, वंध्यत्व उपचार आणि मेडिकल दृष्ट्या आवश्यक समाप्तीसाठी कव्हरेजचा फायदा घेता येईल.
दिसण्यात सुधारकरण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरीसारख्या कोणत्याही प्रकारच्या कॉस्मेटिक उपचारांना हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत संरक्षण दिले जात नाही. हे असे असू शकते कारण कॉस्मेटिक उपचार मानवाचे जीवन टिकवून ठेवण्यासाठी गरजेचे नसतात आणि म्हणूनच त्यांना गरजेचे मानले जात नाही. तथापि, जेव्हा कॉस्मेटिक उपचार मेडिकल दृष्ट्या गरजेचे असतात आणि त्यासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याची गरज असते, जसे की अपघातानंतर, त्यांना सामान्यत: हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कव्हरेज दिले जाते.
कोणत्याही उपचार प्रक्रियेत त्यांचे महत्त्व नाकारता येत नसले तरी हेल्थ इन्शुरन्स प्लॅन सहसा निदान खर्चाला संरक्षण देत नाहीत.
तसेच, बहुतेक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींमध्ये ओपीडी उपचारांना संरक्षण नसते. तथापि, काही इन्शुरन्स कंपन्या पर्यायाने ओपीडी इन्शुरन्स प्लॅन्स प्रदान करतात ज्यात वरील दोन्ही परिस्थितींना, म्हणजे ओपीडी उपचार आणि निदान खर्च यांना मुख्यत: त्यांच्या नियमित हेल्थ प्लॅन्ससह घेतला जाऊ शकणारा ॲड-ऑन फायदा म्हणून संरक्षण दिले जाते.
धोकादायक किंवा साहसी खेळांमध्ये व्यावसायिक म्हणून सहभागी झाल्यामुळे आवश्यक असलेल्या कोणत्याही उपचाराशी संबंधित खर्चाला संरक्षण दिले जात नाही.
त्यामुळे पॅरा जंपिंग, रॉक क्लायम्बिंग, गिर्यारोहण, राफ्टिंग, मोटर रेसिंग, हॉर्स रेसिंग किंवा स्कुबा डायव्हिंग, हँड ग्लायडिंग, स्काय डायव्हिंग, डीप सी डायव्हिंग सारखे खेळ व्यावसायिकरित्या केल्यास अपवर्जन खाली येतात.
तथापि, आपण प्रशिक्षित व्यावसायिकांच्या देखरेखीखाली असलेल्या कोणत्याही मनोरंजक खेळासाठी अ-व्यावसायिक क्षमतेत भाग घेतल्यास आपल्याला संरक्षण दिले जाते.
हेल्थ इन्शुरन्समध्ये युद्धातील दुखापती, जाणूनबुजून किंवा स्वत:हून करून घेतलेल्या जखमा, आत्महत्येच्या प्रयत्नांमुळे झालेल्या जखमा आणि जन्मजात आजार असे काही कायमस्वरूपी अपवर्जन आहेत.