Third-party premium has changed from 1st June. Renew now
टू व्हीलर इन्शुरन्सची तुलना का करायची?
जेव्हा आपल्याला नवीन शर्ट हवा असतो, तेव्हा तुम्ही फॅशन स्टोअरमध्ये जाऊन कोणताही शर्ट विकत घेता का ? नाही, हे अगदी स्पष्ट आहे! तुम्ही उपलब्ध सगळे शर्ट्स बघाल, त्यांची तुलना कराल, एक निवडाल, ट्रायल रूममध्ये जाल आणि ते आपल्यावर चांगले दिसते की नाही आणि फिटिंग आहे की नाही हे तपासाल.
आणि पेमेंट काऊंटरवर जाण्यापूर्वी तुम्ही शर्ट व्यवस्थित आहे की नाही हे तपासाल आणि नंतर पेमेंट कराल. आपण बाईक इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी असेच केले पाहिजे, उपलब्ध पर्याय तपासले पाहिजेत आणि जी तुम्हाला सर्वात जास्त अनुकूल आहे अशा पॉलिसीची निवड केली पाहिजे कारण पॉलिसीसाठी पैसे दिल्यानंतर प्रतिकूल अटी शोधण्यात काहीही अर्थ नाही.
जर तुम्हाला नंतर एखादी स्वस्त पॉलिसी सापडली आणि जी तुमच्या गरजांप्रमाणे अधिक योग्य असेल तर तुम्हाला दु:ख वाटेल. त्यामुळे तुम्ही खरेदी करण्यापूर्वी एकापेक्षा जास्त बाईक इन्शुरन्स पॉलिसी तपासणे आणि तुलना करणे आवश्यक आहे.
तुम्ही बाईक इन्शुरन्सची तुलना का करावी ?
तुम्ही इन्शुरन्स कंपन्यांची तुलना करू शकता आणि त्यांच्या विश्वासार्हतेच्या आधारे क्रमवारी लावू शकता. तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया शोधू शकता आणि कोणत्या कंपन्या त्यांच्या सेवेमध्ये चांगल्या आहेत आणि क्लेम सेटल करण्यासाठी चांगल्या आहेत हे जाणून घेऊ शकता. अशा प्रकारे इन्शुरन्स कंपनी शोधणे सोपे होईल.
जेव्हा तुम्हाला स्वत:च्या पॉलिसीची समज येते, तेव्हा तुम्हाला कोणत्याही तज्ज्ञावर किंवा इन्शुरन्स एजंटवर अवलंबून राहण्याची गरज नसते. जेव्हा तुम्हाला पॉलिसीमध्ये काय कव्हर्ड आहे आणि काय नाही याबद्दल सखोल माहिती दिली जाते, तेव्हा तुम्ही स्वतःहून निःपक्षपातीपणे निर्णय घेऊ शकता.तुम्ही असंख्य इन्शुरन्स कंपन्यांच्या पॉलिसींचा अभ्यास आणि तुलना केली तरच हे शक्य होऊ शकते.
योग्य संशोधन आणि विविध पॉलिसींची तुलना तुम्हाला टॉप इन्शुरन्स कंपन्यांच्या क्लेमच्या प्रक्रियेबद्दल कळवेल, तुम्ही उपस्थित करणार आहात असा वास्तविक क्लेम केल्यानंतर तुम्हाला काय कृती करावी लागेल याबद्दल कळेल. मग तुम्ही तुम्हाला सर्वात सुसंगत असणाऱ्या कंपनीची पॉलिसी विकत घेऊ शकता.
आपण भारतात उपलब्ध असलेल्या टॉप इन्शुरन्स कंपन्यांनी ऑफर केलेल्या डिल्स तपासू शकता. विविध कंपन्यांनी प्रदान केलेल्या कव्हरेजच्या तुलनेत प्रीमियम तपासणे तुम्हाला समंजस निर्णय घेण्यास आणि पैसे वाचविण्यास मदत करेल.
काही इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या काही बाईक इन्शुरन्स प्लॅन्सवर मोठ्या सवलती देत असतात, जे आपण संशोधन आणि तुलना करत नसाल तर तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला सवलतींचा फायदा घ्यायचा आहे ना !
ऑनलाइन बाईक इन्शुरन्सची तुलना करताना तुम्ही विचारात घ्यावे असे काही घटक
- कव्हरेज : थर्ड-पार्टी लायॅबिलिटी पॉलिसी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीतून तुमच्या बाईकसाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचे कव्हर हवे आहे याबद्दल तुम्ही पक्का निर्णय घ्या. भारतात थर्ड-पार्टी पॉलिसी अनिवार्य आहे आणि विमाधारकाला एखाद्या व्यक्तीच्या किंवा मालमत्तेच्या नुकसानावेळी ती कव्हर करते आणि प्रीमियम इंजिन क्षमतेवर आणि आयआरडीएआयद्वारे निर्धारित केलेल्या प्रीमियमवर अवलंबून आहे. तर कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीमध्ये स्वतःचे नुकसान आणि टी.पी लायॅबिलिटी या दोन्हींचा समावेश आहे. कमी प्रीमियमसह चांगला कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स ऑफर करणाऱ्या इन्शुरन्स कंपनीचा शोध घ्या .
- आयडीव्ही : इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यू (IDV) याचा सरळ अर्थ असा आहे की, आजचे तुमच्या बाईकचे बाजारमूल्य, डिप्रिसिएशन वजा करून. प्रीमियम वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी कंपनी आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करण्याचा पर्याय प्रदान करीत आहे की नाही हे तपासा. याबद्दल तुम्हाला कल्पना नसेल तर, कमी प्रीमियम किमतीसह तुम्हाला आकर्षित करण्यासाठी इन्शुरन्स कंपनीद्वारे तुमचा आयडीव्ही (IDV) कमी होण्याची शक्यता आहे. बाईक इन्शुरन्समध्ये आयडीव्ही(IDV) बद्दल अधिक जाणून घ्या.
- प्रीमियम : तुमच्या विचाराधीन असलेल्या ऑफर्सची तुलना करा आणि कमी प्रीमियमच्या तुलनेत सर्वाधिक कव्हरेज देणाऱ्या टू-व्हीलर इन्शुरन्सवर सेटल करा. मात्र लक्षात ठेवा की कमी प्रीमियम नेहमीच निवडण्यासाठी सर्वोत्तम नाही! त्यामुळे अटी पूर्णपणे वाचा आणि समजून घ्या.
- ॲड-ऑन्स : कव्हरेजची व्याप्ती वाढविण्यासाठी ॲड-ऑन्स अतिरिक्त खर्च करून कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स घेता येते. कोणती इन्शुरन्स कंपनी तुमच्या गरजेनुसार आणि बजेटला अनुकूल असे ॲड-ऑन प्रदान करते हे तपासा. इन्शुरन्स कंपन्या इंजिन संरक्षण, झिरो-डिप्रिसिएशन, रिटर्न टू इनव्हॉईस इत्यादी वेगवेगळे ॲड-ऑन प्रदान करतात. प्रो-टिप: तुम्हाला खरोखर गरज असेल तरच ॲड-ऑनसाठी पैसे द्या, अन्यथा यामुळे प्रीमियम विनाकारण वाढेल. बाईक इन्शुरन्समधील ॲड-ऑन कव्हरबद्दल अधिक जाणून घ्या.
- क्लेम प्रक्रिया आणि क्लेम सेटलमेंटचे प्रमाण : क्लेम प्रक्रिया सोपी आणि वेगवान आहे याची खात्री करा. हे एक डिजिटल जग आहे.त्यामुळे ऑनलाइन पेपरलेस क्लेम प्रक्रियेचा शोध करा. पॉलिसी होल्डरची एक मुख्य चिंता म्हणजे, त्यांचे क्लेम वेळेवर निकाली काढले जातील की नाही. कंपनीने निकाली काढलेल्या क्लेम्सच्या संख्येनुसार प्राप्त झालेल्या क्लेम्सची संख्या विभागून क्लेम सेटलमेंट रेशीओ (प्रमाण) मोजले जाते. त्यामुळे जितके जास्त प्रमाण असेल, तेवढे कंपनी अधिक विश्वासार्ह असते.
- ग्राहक सेवा उपलब्धता : एकदा प्रीमियम भरण्याची वचनबद्धता झाली की, काही इन्शुरन्स कंपन्या आत्मसंतुष्ट होतात असे होऊ शकते. आपण सगळे यातून जातो, आपण उत्साहाने एखादी गोष्ट विकत घेतो पण जेव्हा त्यात दोष निघतो आणि आपल्याला मदतीची गरज असते तेव्हा त्याकडे लक्ष दिले जात नाही. जेव्हा तुम्हाला ग्राहक सपोर्टची सर्वात जास्त गरज असते. इन्शुरन्स कंपन्यांच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे आणि चांगली ग्राहक सेवा (कस्टमर सर्व्हिस) उपलब्धता नेहमीच एक महत्त्वपूर्ण पैलू असते.
- दीर्घ मुदतीसाठी, कमी प्रीमियम असतो : इन्शुरन्स हे बऱ्याच जणांसाठी एक अवघड उत्पादन असू शकते ! त्यामुळे तुम्ही तुम्हाला मिळेत तितकी सवलत मिळवण्याचा प्रयत्न करा. एक वर्षाच्या पॉलिसीच्या तुलनेत दीर्घ कार्यकाळ निवडण्याने थोडी रक्कम माफी कमी होईल.
- गॅरेज नेटवर्क : देशभरातील गॅरेजचे व्यापक जाळे तुम्हाला काही गरज पडल्यास कॅशलेस सुविधांचा लाभ घेण्यास उपयुक्त ठरेल. तुमच्या ठिकाणाजवळ अशा अधिकृत गॅरेजचा शोध घेणे, दीर्घकाळ तुमच्या टू-व्हीलरचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे.
- अनुभवाविषयीची प्रतिक्रिया : तुम्ही खरेदी केलेल्या इतर उत्पादनांप्रमाणे इन्शुरन्स पॉलिसीसाठीदेखील आधीच वापरलेल्यांनी दिलेल्या अनुभाविषयीच्या प्रतिक्रिया ऑनलाइन तपासणे आवश्यक आहे. गुगल रिव्ह्यूज आणि फेसबुक रेटिंग तुम्हाला उत्पादनाची खरी कल्पना देतात आणि यामुळे तुमची निर्णय प्रक्रिया अधिक सोपी आणि योग्य होऊ शकते.
- काय कव्हर्ड नाही : इन्शुरन्स कंपन्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये समाविष्ट असलेल्या गोष्टी ठळकपणे प्रदर्शित करत असल्या, तरी कव्हर्ड नसलेल्या कोणत्या गोष्टी यात आहेत याची येथे थोडी चौकशी करणे महत्वाचे आहे. याचा विचार करा, क्लेम केल्यानंतर तुम्हाला काय हवे आहे ते नसणे म्हणजे एक धक्का लागण्यासारखे आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?
- डीडक्टिबल्स: व्हॉलंटरी आणि कम्पल्सरी डीडक्टिबल्स तुमच्या इन्शुरन्स संरक्षणाला सुरुवात होण्यापूर्वी विचारात घेतले जाते. ही मुळात तुमच्या क्लेमच्या रकमेतून कापली जाईल अशी रक्कम आहे. त्यामुळेच, इन्शुरन्स पॉलिसीवरील डीडक्टिबल्स जेवढे जास्त असतील, तेवढी कमी प्रीमियम रक्कम असेल आणि याउलट.
टू व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीची तुलना कशी करावी?
टू व्हीलर इन्शुरन्स ऑनलाइन तुलना करा | टू व्हीलर इन्शुरन्स ऑफलाइन तुलना करा |
---|---|
तुमच्या घरात बसून आरामात आपला लॅपटॉप उघडा. पॉलिसीजची तुलना करणाऱ्या वेबसाइट्सवर लॉग ऑन करा आणि तुम्हाला सगळे मिळेल. | तुमच्या क्षेत्रातील एका नामांकित, स्वतंत्र इन्शुरन्स एजंटला भेट द्या जो वाटाघाटीच्या रकमेवर तुमच्याशी योग्य पॉलिसीची दलाली करू शकतो. |
तुमच्या दुचाकीचा तपशील स्वतःहून भरा. गरज पडल्यास स्पेसिफिकेशन्स, आयडीव्ही (IDV), ॲड-ऑन यांचा समावेश करा. | एजंटला तुमच्या दुचाकीच्या सर्व तपशीलांसह मदत करा जेणेकरून तो तुम्हाला योग्य पॉलिसी प्रदान करण्यासाठी माहितीनुसार प्रक्रिया करू शकेल. |
नवीन युगातील फिन्टेक कंपन्या तुम्ही निर्दिष्ट केलेल्या तपशीलांनुसार पॉलिसी आणि दरांच्या टॅब्लेटेड याद्या तुम्हाला देतील. | दलाल आपले संशोधन केल्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांकडून वेगवेगळ्या किमतीविषयीची माहिती घेईल. |
ऑनलाइन बाईक इन्शुरन्सची तुलना करण्याचे फायदे
ऑनलाइन बाईक इन्शुरन्सची तुलना करण्याचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सोय हा आहे. तुमचे तपशील तयार ठेवून,तुम्ही ऑनलाइन विनामूल्य किमतीविषयीची माहिती मिळवू शकता आणि वेगवेगळ्या पॉलिसीजची तुलना करू शकता ज्यामुळे नक्कीच तुमचा थोडा मौल्यवान वेळ वाचेल.
ऑनलाइन बाईक इन्शुरन्सची तुलना करण्यासाठीची प्रक्रिया सोपी आहे. तुम्ही तुमचे संशोधन स्वत:च्या वेळात करू शकता. कारण ऑनलाइन इन्शुरन्सची तुलना केल्याने तुम्हाला तुमच्या विशिष्ट गरजांनुसार पॉलिसी निवडण्यास आणि ठरवण्यास करण्यास मदत होते.
जेव्हा पॉलिसी निवडण्याची वेळ येते तेव्हा तुमच्या सर्वांच्या वेगवेगळ्या गरजा असतात. प्रीमियम कॅल्क्युलेटरसारख्या साधनांमुळे, ऑनलाइन इन्शुरन्स तुलना केल्याने तुमच्यातील डीआयवाय (DIY) व्यक्ती जागृत होते! तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही रात्री 2 वाजताही तुमचा प्रीमियम कॅल्क्युलेट करू शकता!
ऑनलाइन बाईक इन्शुरन्सची तुलना केल्याने तुम्हाला मॅन्युअली इन्शुरन्स ब्रोकरला भेट देण्याच्या तुलनेत अधिक पर्याय मिळतील. योग्य कव्हरेज निवडणे अत्यंत महत्वाचे आहे आणि तुमच्या पॉलिसीसाठी वेगवेगळ्या ॲड-ऑनचे मिश्रण आणि जुळण्यांसाठी इंटरनेट हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
ऑनलाइन बाईक इन्शुरन्सची तुलना करताना लक्षात ठेवण्याची चेकलिस्ट
इन्शुरन्स कंपनीची विश्वासार्हता - बाजारात डझनभर इन्शुरन्स कंपन्या आहेत. इन्शुरन्स देणाऱ्या कंपनीची पार्श्वभूमी तपासण्यासाठी थोडा वेळ देणे आवश्यक आहे. तुम्ही कंपनीच्या क्लेमच्या सेटलमेंटचे प्रमाण शोधताना ऑनलाइन रिव्ह्यूज (अनुभवाविषयीच्या प्रतिक्रिया) पाहू शकता.
तुम्ही किती पे करणार आहात - इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर कव्हरेजसाठी तुम्ही देत असलेल्या रकमेच्या श्रेणीवर प्रकाश टाकेल. तुम्ही तपशील भरताना आणि बटण दाबत असताना, तुमची इन्शुरन्स प्रीमियम रक्कम पॉप अप होईल. ॲड-ऑनची किंमत पाहा आणि त्यात समाविष्ट असलेल्या वास्तविक जोखमींसह त्याची तुलना करा.
तुमच्या गरजांची स्पष्टता - पॉलिसी खरेदीदार म्हणून, बाईक इन्शुरन्स घेताना तुम्हाला कोणत्या प्रकारच्या ॲड-ऑनची आवश्यकता असेल हे जाणून घेणे हा तुमचा विशेषाधिकार आहे. तुमच्या सर्व गरजा भागविण्यासाठी, पुढे जाण्यापूर्वी स्पष्टता महत्वाची आहे आणि योग्य ॲड-ऑनसह परिपूर्ण पॉलिसी घेणे महत्वाचे आहे.
दोन्ही डीडक्टिबल्स - हा एक जुगार आहे, त्यामुळे नीट विचार करून कार्य करा. तुम्हाला कोणत्या जोखीम कव्हर करायच्या आहेत हे फक्त तुम्हाला माहीत आहे. कमी जोखीम कव्हर पर्यायांसाठी हायर व्हॉलंटरी डीडक्टिबल्स निवडणे तुमच्या प्रीमियमवरील भार कमी करेल.