टू व्हीलर इन्शुरन्सची तुलना का करायची?
जेव्हा आपल्याला नवीन शर्ट हवा असतो, तेव्हा तुम्ही फॅशन स्टोअरमध्ये जाऊन कोणताही शर्ट विकत घेता का ? नाही, हे अगदी स्पष्ट आहे! तुम्ही उपलब्ध सगळे शर्ट्स बघाल, त्यांची तुलना कराल, एक निवडाल, ट्रायल रूममध्ये जाल आणि ते आपल्यावर चांगले दिसते की नाही आणि फिटिंग आहे की नाही हे तपासाल.
आणि पेमेंट काऊंटरवर जाण्यापूर्वी तुम्ही शर्ट व्यवस्थित आहे की नाही हे तपासाल आणि नंतर पेमेंट कराल. आपण बाईक इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी असेच केले पाहिजे, उपलब्ध पर्याय तपासले पाहिजेत आणि जी तुम्हाला सर्वात जास्त अनुकूल आहे अशा पॉलिसीची निवड केली पाहिजे कारण पॉलिसीसाठी पैसे दिल्यानंतर प्रतिकूल अटी शोधण्यात काहीही अर्थ नाही.
जर तुम्हाला नंतर एखादी स्वस्त पॉलिसी सापडली आणि जी तुमच्या गरजांप्रमाणे अधिक योग्य असेल तर तुम्हाला दु:ख वाटेल. त्यामुळे तुम्ही खरेदी करण्यापूर्वी एकापेक्षा जास्त बाईक इन्शुरन्स पॉलिसी तपासणे आणि तुलना करणे आवश्यक आहे.
तुम्ही बाईक इन्शुरन्सची तुलना का करावी ?
ऑनलाइन बाईक इन्शुरन्सची तुलना करताना तुम्ही विचारात घ्यावे असे काही घटक
- कव्हरेज : थर्ड-पार्टी लायॅबिलिटी पॉलिसी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीतून तुमच्या बाईकसाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचे कव्हर हवे आहे याबद्दल तुम्ही पक्का निर्णय घ्या. भारतात थर्ड-पार्टी पॉलिसी अनिवार्य आहे आणि विमाधारकाला एखाद्या व्यक्तीच्या किंवा मालमत्तेच्या नुकसानावेळी ती कव्हर करते आणि प्रीमियम इंजिन क्षमतेवर आणि आयआरडीएआयद्वारे निर्धारित केलेल्या प्रीमियमवर अवलंबून आहे. तर कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीमध्ये स्वतःचे नुकसान आणि टी.पी लायॅबिलिटी या दोन्हींचा समावेश आहे. कमी प्रीमियमसह चांगला कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स ऑफर करणाऱ्या इन्शुरन्स कंपनीचा शोध घ्या .
- आयडीव्ही : इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यू (IDV) याचा सरळ अर्थ असा आहे की, आजचे तुमच्या बाईकचे बाजारमूल्य, डिप्रिसिएशन वजा करून. प्रीमियम वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी कंपनी आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करण्याचा पर्याय प्रदान करीत आहे की नाही हे तपासा. याबद्दल तुम्हाला कल्पना नसेल तर, कमी प्रीमियम किमतीसह तुम्हाला आकर्षित करण्यासाठी इन्शुरन्स कंपनीद्वारे तुमचा आयडीव्ही (IDV) कमी होण्याची शक्यता आहे. बाईक इन्शुरन्समध्ये आयडीव्ही(IDV) बद्दल अधिक जाणून घ्या.
- प्रीमियम : तुमच्या विचाराधीन असलेल्या ऑफर्सची तुलना करा आणि कमी प्रीमियमच्या तुलनेत सर्वाधिक कव्हरेज देणाऱ्या टू-व्हीलर इन्शुरन्सवर सेटल करा. मात्र लक्षात ठेवा की कमी प्रीमियम नेहमीच निवडण्यासाठी सर्वोत्तम नाही! त्यामुळे अटी पूर्णपणे वाचा आणि समजून घ्या.
- ॲड-ऑन्स : कव्हरेजची व्याप्ती वाढविण्यासाठी ॲड-ऑन्स अतिरिक्त खर्च करून कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स घेता येते. कोणती इन्शुरन्स कंपनी तुमच्या गरजेनुसार आणि बजेटला अनुकूल असे ॲड-ऑन प्रदान करते हे तपासा. इन्शुरन्स कंपन्या इंजिन संरक्षण, झिरो-डिप्रिसिएशन, रिटर्न टू इनव्हॉईस इत्यादी वेगवेगळे ॲड-ऑन प्रदान करतात. प्रो-टिप: तुम्हाला खरोखर गरज असेल तरच ॲड-ऑनसाठी पैसे द्या, अन्यथा यामुळे प्रीमियम विनाकारण वाढेल. बाईक इन्शुरन्समधील ॲड-ऑन कव्हरबद्दल अधिक जाणून घ्या.
- क्लेम प्रक्रिया आणि क्लेम सेटलमेंटचे प्रमाण : क्लेम प्रक्रिया सोपी आणि वेगवान आहे याची खात्री करा. हे एक डिजिटल जग आहे.त्यामुळे ऑनलाइन पेपरलेस क्लेम प्रक्रियेचा शोध करा. पॉलिसी होल्डरची एक मुख्य चिंता म्हणजे, त्यांचे क्लेम वेळेवर निकाली काढले जातील की नाही. कंपनीने निकाली काढलेल्या क्लेम्सच्या संख्येनुसार प्राप्त झालेल्या क्लेम्सची संख्या विभागून क्लेम सेटलमेंट रेशीओ (प्रमाण) मोजले जाते. त्यामुळे जितके जास्त प्रमाण असेल, तेवढे कंपनी अधिक विश्वासार्ह असते.
- ग्राहक सेवा उपलब्धता : एकदा प्रीमियम भरण्याची वचनबद्धता झाली की, काही इन्शुरन्स कंपन्या आत्मसंतुष्ट होतात असे होऊ शकते. आपण सगळे यातून जातो, आपण उत्साहाने एखादी गोष्ट विकत घेतो पण जेव्हा त्यात दोष निघतो आणि आपल्याला मदतीची गरज असते तेव्हा त्याकडे लक्ष दिले जात नाही. जेव्हा तुम्हाला ग्राहक सपोर्टची सर्वात जास्त गरज असते. इन्शुरन्स कंपन्यांच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे आणि चांगली ग्राहक सेवा (कस्टमर सर्व्हिस) उपलब्धता नेहमीच एक महत्त्वपूर्ण पैलू असते.
- दीर्घ मुदतीसाठी, कमी प्रीमियम असतो : इन्शुरन्स हे बऱ्याच जणांसाठी एक अवघड उत्पादन असू शकते ! त्यामुळे तुम्ही तुम्हाला मिळेत तितकी सवलत मिळवण्याचा प्रयत्न करा. एक वर्षाच्या पॉलिसीच्या तुलनेत दीर्घ कार्यकाळ निवडण्याने थोडी रक्कम माफी कमी होईल.
- गॅरेज नेटवर्क : देशभरातील गॅरेजचे व्यापक जाळे तुम्हाला काही गरज पडल्यास कॅशलेस सुविधांचा लाभ घेण्यास उपयुक्त ठरेल. तुमच्या ठिकाणाजवळ अशा अधिकृत गॅरेजचा शोध घेणे, दीर्घकाळ तुमच्या टू-व्हीलरचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे.
- अनुभवाविषयीची प्रतिक्रिया : तुम्ही खरेदी केलेल्या इतर उत्पादनांप्रमाणे इन्शुरन्स पॉलिसीसाठीदेखील आधीच वापरलेल्यांनी दिलेल्या अनुभाविषयीच्या प्रतिक्रिया ऑनलाइन तपासणे आवश्यक आहे. गुगल रिव्ह्यूज आणि फेसबुक रेटिंग तुम्हाला उत्पादनाची खरी कल्पना देतात आणि यामुळे तुमची निर्णय प्रक्रिया अधिक सोपी आणि योग्य होऊ शकते.
- काय कव्हर्ड नाही : इन्शुरन्स कंपन्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये समाविष्ट असलेल्या गोष्टी ठळकपणे प्रदर्शित करत असल्या, तरी कव्हर्ड नसलेल्या कोणत्या गोष्टी यात आहेत याची येथे थोडी चौकशी करणे महत्वाचे आहे. याचा विचार करा, क्लेम केल्यानंतर तुम्हाला काय हवे आहे ते नसणे म्हणजे एक धक्का लागण्यासारखे आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?
- डीडक्टिबल्स: व्हॉलंटरी आणि कम्पल्सरी डीडक्टिबल्स तुमच्या इन्शुरन्स संरक्षणाला सुरुवात होण्यापूर्वी विचारात घेतले जाते. ही मुळात तुमच्या क्लेमच्या रकमेतून कापली जाईल अशी रक्कम आहे. त्यामुळेच, इन्शुरन्स पॉलिसीवरील डीडक्टिबल्स जेवढे जास्त असतील, तेवढी कमी प्रीमियम रक्कम असेल आणि याउलट.
टू व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीची तुलना कशी करावी?
टू व्हीलर इन्शुरन्स ऑनलाइन तुलना करा |
टू व्हीलर इन्शुरन्स ऑफलाइन तुलना करा |
तुमच्या घरात बसून आरामात आपला लॅपटॉप उघडा. पॉलिसीजची तुलना करणाऱ्या वेबसाइट्सवर लॉग ऑन करा आणि तुम्हाला सगळे मिळेल. |
तुमच्या क्षेत्रातील एका नामांकित, स्वतंत्र इन्शुरन्स एजंटला भेट द्या जो वाटाघाटीच्या रकमेवर तुमच्याशी योग्य पॉलिसीची दलाली करू शकतो. |
तुमच्या दुचाकीचा तपशील स्वतःहून भरा. गरज पडल्यास स्पेसिफिकेशन्स, आयडीव्ही (IDV), ॲड-ऑन यांचा समावेश करा. |
एजंटला तुमच्या दुचाकीच्या सर्व तपशीलांसह मदत करा जेणेकरून तो तुम्हाला योग्य पॉलिसी प्रदान करण्यासाठी माहितीनुसार प्रक्रिया करू शकेल. |
नवीन युगातील फिन्टेक कंपन्या तुम्ही निर्दिष्ट केलेल्या तपशीलांनुसार पॉलिसी आणि दरांच्या टॅब्लेटेड याद्या तुम्हाला देतील. |
दलाल आपले संशोधन केल्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांकडून वेगवेगळ्या किमतीविषयीची माहिती घेईल. |