Third-party premium has changed from 1st June. Renew now
कार इन्शुरन्समधील आयडीव्ही बद्दल सविस्तर जाणून घ्या:
आयडीव्ही चा अर्थ काय आहे?
इन्शुरन्सच्या संदर्भात काही अटी व नियम समजण्यास कठीण असतात. म्हणूनच सोप्या शब्दात या संज्ञा समजवण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो, अशी एक संज्ञा आयडीव्ही. यातील आयडीव्ही म्हणजे इन्शुर्ड डिक्लेर्ड व्हॅल्यू. थोडक्यात हे 'इन्शुरन्स काढलेले घोषित मूल्य' असते.
कार इन्शुरन्स आयडीव्ही म्हणजे काय?
कार इन्शुरन्स आयडीव्ही (इन्शुर्ड डिक्लेर्ड व्हॅल्यू) म्हणजे तुमच्या कारच्या बाजार मूल्याची माहिती. आणखीन सोप्या शब्दांत, आजच्या बाजारात तुमच्या कारची किंमत काय आहे हे पाहायचे झाल्यास आयडीव्ही पहावा. कार इन्शुरन्समधला हा आयडीव्ही तुमच्या इन्शुरन्स कंपनीला मदत करतो, म्हणजेच यामुळे इन्शुरन्स कंपनीला दाव्याची रक्कम व इन्शुरन्सची योग्य प्रीमियम किंमत निर्धारित करण्यास देखील मदत करते.
आयडीव्ही महत्त्वाचे का आहे?
आयडीव्ही हे एकार्थाने कार इन्शुरन्समधील सर्वात महत्त्वाचे घटक आहे. तुमचा आयडीव्ही तुमच्या वाहनाचा प्रीमियम ठरवतो. आयडीव्ही आणि तुमचा प्रीमियम यांच्यात थेट संबंध आहे. जर आयडीव्ही जास्त असेल तर देय प्रीमियम जास्त असेल. मात्र , याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या वाहनाचा आयडीव्ही कमी करून सांगावा कारण असे केल्यास दुर्घटनेच्या वेळी आपलेच अधिक नुकसान आहे.
आयडीव्ही कॅल्क्युलेटर- तुमच्या कारसाठी आयडीव्ही ची मोजणी करा
आयडीव्ही कॅल्क्युलेटर हे सर्वात महत्त्वाचे इन्शुरन्स कॅल्क्युलेटर साधनांपैकी एक आहे. कारण ते एखाद्याला त्यांच्या कारचे बाजारमूल्य व तुमच्या कार इन्शुरन्ससाठी तुम्ही किती प्रीमियम भरला पाहिजे हे निर्धारित करण्यातही मदत करते. यासह दुर्घटनांच्या वेळी किंवा दुर्दैवाने आपली गाडी चोरी झाल्यास किंवा दुरुस्ती पलीकडे खराब झाल्यास इन्शुरन्स कंपनीने आपल्याला किती रक्कमेची नुकसान भरपाई द्यायला हवी हे ठरवण्यास देखील मदत करते.
तुमच्या कारसाठी लागू होणाऱ्या डेप्रिसिएशन दरांबद्दल अधिक जाणून घ
कार किती जुनी आहे? | डेप्रिसिएशन % |
---|---|
6 महिने आणि त्यापेक्षा कमी | 5% |
6 महिने ते 1 वर्ष | 15% |
1 वर्ष ते 2 वर्षे | 20% |
2 वर्षे ते 3 वर्षे | 30% |
3 वर्षे ते 4 वर्षे | 40% |
4 वर्षे ते 5 वर्षे | 50% |
उदाहरणार्थ: जर तुमची कार 6 महिन्यांपेक्षा कमी जुनी असेल आणि तिची सध्याची शोरूम किंमत रु. 100 असेल तर, त्याची कमी होणारी किमंत केवळ मूळ टक्क्यांच्या 5% असेल, याचा अर्थ असा की खरेदी केल्यानंतर तुमचा आयडीव्ही कमी होऊन 95 इतका होईल - तसेच जर कार 6 महिन्यांपेक्षा जास्त परंतु 1 वर्षापेक्षा कमी जुनी असेल तर आयडीव्ही 85 रुपये, 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 2 वर्षांपेक्षा कमी जुनी असल्यास रु. 80 , 2 वर्षांपेक्षा जास्त परंतु 3 वर्षांपेक्षा कमी जुनी असल्यास रु. 70 आणि असेच - 5 वर्ष जुनी असल्यास 50% कमी दरात म्हणजेच 50 रुपये इतक्या रक्कमेची असेल.
तुमची कार 5 वर्षांपेक्षा जुनी असल्यास, आयडीव्ही कारच्या स्थितीवर - निर्माता, मॉडेल आणि त्याच्या स्पेअर पार्ट्सची उपलब्धता यावर अवलंबून असते.
पुनर्विक्रीच्या वेळी, तुमचा आयडीव्ही तुमच्या कारच्या बाजार मूल्याचे सूचक आहे. मात्र , जर तुम्ही तुमची कार खरोखरच चांगली ठेवली असेल तर तुमचा आयडीव्ही तुम्हाला जे काही ऑफर करेल त्यापेक्षा जास्त किंमत ठेवण्याची सूट असते. दिवसाच्या शेवटी, आपण आपल्या कारवर किती प्रेम केले यावरच आपल्याला कारकडून मिळणारा परतावा अवलंबून आहे.
तुमच्या कारचा आयडीव्ही निर्धारित करण्यात मदत करणारे घटक कोणते आहेत?
- कार किती जुनी आहे? : आयडीव्ही तुमच्या कारचे बाजार मूल्य दर्शवत असल्याने, योग्य आयडीव्ही निश्चित करण्यात मदत करण्यासाठी तुमची कार खर्डी करून किती वर्ष झाली हे माहित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमची कार जितकी जुनी असेल तितकी तिची आयडीव्ही कमी असेल.
- उत्पादक वाहनाचा मेक & मॉडेल: तुमच्या कारचा मेक & मॉडेल थेट तुमच्या आयडीव्ही वर प्रभावित होतो. उदाहरणार्थ; लॅम्बोर्गिनी वेनेनसारख्या कारमध्ये त्याच्या मेक & मॉडेलमधील फरकामुळे स्टन मार्टिन वन पेक्षा जास्त आयडीव्ही असेल.
- शहर नोंदणी तपशील: तुमच्या कार नोंदणीचे तपशील तुमच्या नोंदणी प्रमाणपत्रावर उपलब्ध आहेत. तसेच, तुमची कार जिथे नोंदणीकृत आहे त्या शहराचा इन्शुरन्स घोषित मूल्यावर परिणाम होतो. मेट्रो शहराच्या तुलनेत तुमच्या कारचा आयडीव्ही टायर-II शहरात कमी असू शकतो.
स्टँडर्ड डेप्रिसिएशन (भारतीय मोटर टॅरिफनुसार): तुमच्या कारचे मूल्य तुम्ही शोरूममधून बाहेर काढल्यापासून घसरते- आणि प्रत्येक वर्षी तिच्या डेप्रिसिएशनची टक्केवारी वाढते. याचाही शेवटी तुमच्या आयडीव्ही वर परिणाम होतो. कार खरेदी पासून त्याचे दर कसे कमी होत जातात हे समजून घेण्यासाठी खालील घटक तपासून पहा:
आयडीव्ही चा तुमच्या कार इन्शुरन्स प्रीमियमवर कसा परिणाम होतो?
आयडीव्ही आणि तुमचा कार इन्शुरन्स प्रीमियम एकमेकांवर अवलंबून आहे. याचा अर्थ, तुमचा आयडीव्ही जितका जास्त असेल तितका तुमचा कार इन्शुरन्स प्रीमियम जास्त असेल - आणि तुमच्या वाहनाचे वय आणि आयडीव्ही जसजसे घसरत जाईल, तसा तुमचा प्रीमियम देखील कमी होतो.
तसेच, तुम्ही तुमची कार विकण्याचा निर्णय घेता, उच्च आयडीव्ही म्हणजे तुम्हाला त्याची जास्त किंमत मिळेल. गाडीचा वापर, मागील कार इन्शुरन्सदाव्यांचा अनुभव इत्यादी इतर घटकांमुळे किंमत देखील प्रभावित होऊ शकते.
जेव्हा तुम्ही तुमच्या कारसाठी योग्य कार इन्शुरन्स पॉलिसी निवडत असाल, तेव्हा फक्त प्रीमियमच नव्हे तर ऑफर केल्या जाणार्या आयडीव्ही ची सुद्धा नोंद घ्या.
कमी प्रीमियम ऑफर करणारी कंपनी तुम्हाला आकर्षित करू शकते परंतु ऑफरवरील आयडीव्ही कमी असल्यामुळे हे मूल्य कमी असू शकते. तुमच्या कारचे दुरुस्ती पलीकडे अधिक नुकसान झाल्यास, जास्त आयडीव्ही मुळे जास्त भरपाई मिळते.
आयडीव्ही कमी/अधिक असण्याचे फायदे?
उच्च आयडीव्ही: उच्च आयडीव्ही म्हणजे उच्च प्रीमियम परंतु तुमची इन्शुरन्स असलेली कार हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास त्याची तुम्हाला जास्त भरपाई मिळते.
कमी आयडीव्ही: कमी आयडीव्ही म्हणजे कमी प्रीमियम परंतु प्रीमियमवरील ही मोजकी बचत ती कार हरवल्यास किंवा चोरीला गेल्यावर तुमच्यासाठी मोठे नुकसान होऊ शकते.
कार इन्शुरन्समध्ये आयडीव्ही चे महत्त्व
तुमचा आयडीव्ही हे तुमच्या कारचे बाजार मूल्य आहे आणि त्यामुळे तुमच्या कार इन्शुरन्सच्या प्रीमियमवर थेट परिणाम होतो.
तुमच्या कारचा आयडीव्ही देखील जोखीम पातळी ठरवते. तुमच्या कारचा आयडीव्ही जितका जास्त असेल तितका जोखीम जास्त असेल आणि परिणामी, जास्त प्रीमियमची मागणी होईल.
क्लेमदरम्यान, तुमच्या कारच्या मूल्यावर आधारित भरपाई दिली जाते. शेवटी, ते दुरुस्ती किंवा बदली खर्च यावर आधारित असेल. त्यामुळे, तुमच्या कार इन्शुरन्स मधील हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे जेणेकरून गरजेच्या वेळी तुम्हाला नुकसान आणि दाव्यासाठी योग्य प्रमाणात भरपाई मिळेल.
जर तुमची कार चोरीला गेली असेल किंवा दुरूस्तीच्या पलीकडे खराब झाली असेल, तर तुमच्या नुकसानीसाठी तुम्हाला मिळणारी भरपाई तुमच्या आयडीव्ही प्रमाणेच असेल. त्यामुळे, तुमच्या कारच्या मूळ मूल्यानुसार तुमचा आयडीव्ही योग्य असल्याची खात्री करा.
मी पाच वर्षांचा असल्याप्रमाणे समजावून सांगा
आयडीव्ही च्या माध्यमातून आम्ही इन्शुरन्स समजून घेणे इतके सहज करत आहोत, आता 5 वर्षांच्या मुलांनाही ते समजू शकेल.
तुमच्याकडे महागडे घड्याळ आहे. एक दिवस, तुम्ही ते विकले तर तुम्हाला किती पैसे मिळतील हे शोधण्याचे तुम्ही ठरवा. तुम्ही ते घड्याळ बनवणाऱ्याकडे घेऊन जा. घड्याळ बनवणारा तुमचे घड्याळ पाहतो आणि ते काच, धातू, चामडे आणि स्क्रूचे बनलेले असल्याने, तो प्रथम त्या सामग्रीची किंमत जोडतो. त्यानंतर तो तुम्हाला घड्याळ किती जुने आहे असे विचारतो आणि तुम्ही त्याला 5 वर्षे जुने असल्याचे सांगता. तो तसाच लिहून ठेवतो. या सगळ्याच्या आधारे तो तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमचे घड्याळ विकले तर तुम्हाला रु. 500 मिळू शकतील, याचा अर्थ आपल्या घड्याळाचा आयडीव्ही 500 रुपये इतका आहे!
कार इन्शुरन्समधील आयडीव्ही बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
नवीन कारचा आयडीव्ही काय असतो?
तुमच्या नवीन कारचे आयडीव्ही हे त्याचे इनव्हॉइस मूल्य असेल. पण जर तुम्ही आधीच कार वापरणे सुरू केले असेल तर त्याच्यात डेप्रिसिएशन येते.
शोरूमच्या बाहेर कारचा आयडीव्ही काय आहे?
जर तुम्ही आधीच तुमची कार वापरण्यास सुरुवात केली असेल, म्हणजे ती शोरूममधून बाहेर काढली असेल, तर तुमच्या कारचे आयडीव्ही हे तुमच्या कारचे मूळ मूल्य असेल. तसेच प्रत्येक वर्षी त्यावर लागू होणारे डेप्रिसिएशन दर बदलत जाईल.
5 वर्षे जुन्या कारसाठी आयडीव्ही काय आहे?
भारतीय मोटर टॅरिफच्या स्टॅंडर्ड दरांनुसार, 5 वर्षांहून अधिक काळ असलेल्या कारचे योग्य आयडीव्ही निश्चित करण्यासाठी किमान 50% डेप्रिसिएशन लागू होईल.
उच्च आयडीव्ही ची निवड करणे कितीपत चांगले?
तुमच्याकडे असलेल्या कारच्या प्रकारावर आणि ती कोणत्या स्थितीत आहे यावर आयडीव्ही अवलंबून असते. उच्च आयडीव्ही जास्त जुन्या नसलेल्या कारसाठी योग्य आहे. लक्षात ठेवा, आयडीव्ही जितका जास्त असेल तितका प्रीमियम तुम्ही दरवर्षी भरता.
एखाद्याने कमी आयडीव्ही घोषित केल्यास काय होईल?
काहीवेळा, कमी आयडीव्ही घोषित करून लोकांना कमी प्रीमियमचे आमिष दाखवले जाते. मात्र , एक लक्षात ठेवा की तुमचा प्रीमियम स्वस्त असला तरी, क्लेम्सदरम्यान तुमची भरपाई देखील कमी असेल आणि तुमच्या कारसाठी ती पुरेशी नसेल. त्यामुळे, आमचा सल्ला हा उच्च किंवा कमी आयडीव्ही साठी नाही तर योग्य आयडीव्ही जाणून घेणे हाच आहे.