आयडीव्ही कॅल्क्युलेटर

digit car insurance
usp icon

6000+ Cashless

Network Garages

usp icon

Zero Paperwork

Required

usp icon

24*7 Claims

Support

Get Instant Policy in Minutes*

I agree to the  Terms & Conditions

Don’t have Reg num?
It's a brand new Car

कार इन्शुरन्समधील आयडीव्ही बद्दल सविस्तर जाणून घ्या:

आयडीव्ही कॅल्क्युलेटर- तुमच्या कारसाठी आयडीव्ही ची मोजणी करा

आयडीव्ही कॅल्क्युलेटर हे सर्वात महत्त्वाचे इन्शुरन्स कॅल्क्युलेटर साधनांपैकी एक आहे. कारण ते एखाद्याला त्यांच्या कारचे बाजारमूल्य व तुमच्या कार इन्शुरन्ससाठी तुम्ही किती प्रीमियम भरला पाहिजे हे निर्धारित करण्यातही मदत करते. यासह दुर्घटनांच्या वेळी किंवा दुर्दैवाने आपली गाडी चोरी झाल्यास किंवा दुरुस्ती पलीकडे खराब झाल्यास इन्शुरन्स कंपनीने आपल्याला किती रक्कमेची नुकसान भरपाई द्यायला हवी हे ठरवण्यास देखील मदत करते.

तुमच्या कारसाठी लागू होणाऱ्या डेप्रिसिएशन दरांबद्दल अधिक जाणून घ

कार किती जुनी आहे?

डेप्रिसिएशन %

6 महिने आणि त्यापेक्षा कमी

5%

6 महिने ते 1 वर्ष

15%

1 वर्ष ते 2 वर्षे

20%

2 वर्षे ते 3 वर्षे

30%

3 वर्षे ते 4 वर्षे

40%

4 वर्षे ते 5 वर्षे

50%

उदाहरणार्थ: जर तुमची कार 6 महिन्यांपेक्षा कमी जुनी असेल आणि तिची सध्याची शोरूम किंमत रु. 100  असेल तर, त्याची कमी होणारी किमंत केवळ मूळ टक्क्यांच्या 5% असेल, याचा अर्थ असा की खरेदी केल्यानंतर तुमचा आयडीव्ही कमी होऊन  95 इतका होईल - तसेच जर कार 6 महिन्यांपेक्षा जास्त परंतु 1 वर्षापेक्षा कमी जुनी असेल तर आयडीव्ही 85 रुपये, 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 2 वर्षांपेक्षा कमी जुनी असल्यास रु. 80 , 2 वर्षांपेक्षा जास्त परंतु 3 वर्षांपेक्षा कमी जुनी असल्यास रु. 70 आणि असेच - 5 वर्ष जुनी असल्यास 50% कमी दरात म्हणजेच 50 रुपये इतक्या रक्कमेची असेल.

तुमची कार 5 वर्षांपेक्षा जुनी असल्यास, आयडीव्ही कारच्या स्थितीवर - निर्माता, मॉडेल आणि त्याच्या स्पेअर पार्ट्सची उपलब्धता यावर अवलंबून असते.

पुनर्विक्रीच्या वेळी, तुमचा आयडीव्ही तुमच्या कारच्या बाजार मूल्याचे सूचक आहे. मात्र , जर तुम्ही तुमची कार खरोखरच चांगली ठेवली असेल  तर तुमचा आयडीव्ही तुम्हाला जे काही ऑफर करेल त्यापेक्षा जास्त किंमत ठेवण्याची सूट असते.  दिवसाच्या शेवटी, आपण आपल्या कारवर किती प्रेम केले यावरच आपल्याला कारकडून मिळणारा परतावा अवलंबून आहे.

तुमच्या कारचा आयडीव्ही निर्धारित करण्यात मदत करणारे घटक कोणते आहेत?

    • कार किती जुनी आहे? : आयडीव्ही तुमच्या कारचे बाजार मूल्य दर्शवत असल्याने, योग्य आयडीव्ही निश्चित करण्यात मदत करण्यासाठी तुमची कार खर्डी करून किती वर्ष झाली हे माहित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमची कार जितकी जुनी असेल तितकी तिची आयडीव्ही कमी असेल.
    • उत्पादक वाहनाचा मेक & मॉडेल: तुमच्या कारचा मेक & मॉडेल थेट तुमच्या आयडीव्ही वर प्रभावित होतो. उदाहरणार्थ; लॅम्बोर्गिनी वेनेनसारख्या कारमध्ये त्याच्या मेक & मॉडेलमधील फरकामुळे स्टन मार्टिन वन पेक्षा जास्त आयडीव्ही असेल.
    • शहर नोंदणी तपशील: तुमच्या कार नोंदणीचे तपशील तुमच्या नोंदणी प्रमाणपत्रावर उपलब्ध आहेत. तसेच, तुमची कार जिथे नोंदणीकृत आहे त्या शहराचा इन्शुरन्स घोषित मूल्यावर परिणाम होतो. मेट्रो शहराच्या तुलनेत तुमच्या कारचा आयडीव्ही टायर-II शहरात कमी असू शकतो.
    • स्टँडर्ड डेप्रिसिएशन (भारतीय मोटर टॅरिफनुसार): तुमच्या कारचे मूल्य तुम्ही शोरूममधून बाहेर काढल्यापासून घसरते- आणि प्रत्येक वर्षी तिच्या डेप्रिसिएशनची टक्केवारी वाढते. याचाही शेवटी तुमच्या आयडीव्ही वर परिणाम होतो. कार खरेदी पासून त्याचे दर कसे कमी होत जातात हे समजून घेण्यासाठी खालील घटक तपासून पहा:

आयडीव्ही चा तुमच्या कार इन्शुरन्स प्रीमियमवर कसा परिणाम होतो?

मी पाच वर्षांचा असल्याप्रमाणे समजावून सांगा

आयडीव्ही च्या माध्यमातून आम्ही इन्शुरन्स समजून घेणे इतके सहज करत आहोत, आता 5 वर्षांच्या मुलांनाही ते समजू शकेल.

तुमच्याकडे महागडे घड्याळ आहे. एक दिवस, तुम्ही ते विकले तर तुम्हाला किती पैसे मिळतील हे शोधण्याचे तुम्ही ठरवा. तुम्ही ते घड्याळ बनवणाऱ्याकडे घेऊन जा. घड्याळ बनवणारा तुमचे घड्याळ पाहतो आणि ते काच, धातू, चामडे आणि स्क्रूचे बनलेले असल्याने, तो प्रथम त्या सामग्रीची किंमत जोडतो. त्यानंतर तो तुम्हाला घड्याळ किती जुने आहे असे विचारतो आणि तुम्ही त्याला 5 वर्षे जुने असल्याचे सांगता. तो तसाच लिहून ठेवतो. या सगळ्याच्या आधारे तो तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमचे घड्याळ विकले तर तुम्हाला रु. 500 मिळू शकतील, याचा अर्थ आपल्या घड्याळाचा आयडीव्ही 500 रुपये इतका आहे!

कार इन्शुरन्समधील आयडीव्ही बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न