सपोर्ट
closeआमचा WhatsApp नंबर कॉलसाठी वापरला जाऊ शकत नाही. हा फक्त चॅट नंबर आहे.
हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अपघात, आजारपण किंवा दुखापतीमुळे होणाऱ्या वैद्यकीय खर्चासाठी कव्हरेज देते. एखादी व्यक्ती विशिष्ट कालावधीसाठी मासिक किंवा वार्षिक प्रीमियम पेमेंट विरूद्ध अशा पॉलिसीचा लाभ घेऊ शकते.
या काळात विमाधारकाला अपघात झाल्यास किंवा गंभीर आजाराचे निदान झाल्यास उपचाराच्या उद्देशाने होणारा खर्च विमा पुरवठादाराकडून केला जातो.
आपण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींसह विस्तारित केलेल्या अनेक ॲड-ऑन फायद्यांचा आनंद घेऊ शकता, ज्यांची पुढील विभागांमध्ये तपशीलवार चर्चा केली आहे.
परंतु, प्रथमतः,
ही आकडेवारी काय सूचित करते? संभाव्य वैद्यकीय जटिलता एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात विकसित होऊ शकतात आणि त्यावरील उपचारांसाठी संबंधित खर्चाचीही गरज निर्माण होऊ शकते.
2022 पर्यंत भारतातील आरोग्य सेवा बाजारपेठेचे मूल्य 372 अब्ज अमेरिकन डॉलर्स होईल,असा अंदाज आहे, जे देशात वैद्यकीय शुल्कात ज्या दराने वाढ होण्याची अपेक्षा आहे, त्याचे प्रतिबिंब आहे.
वाढत्या वैद्यकीय खर्चासह ही धक्कादायक आकडेवारी भारतातील हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींचे महत्त्व दर्शवते. ही पॉलिसी पॉलिसीधारकांनी केलेल्या नियतकालिक प्रीमियम पेमेंट दिल्याने आरोग्य सेवा खर्चाचे कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज ऑफर करतात.
महत्वाचे: भारतातील कोरोना व्हायरस इन्शुरन्स चे फायदे आणि तोटे याबद्दल अधिक जाणून घ्या
तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असणारी कोणतीही वैद्यकीय स्थिती स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्समध्ये कव्हर केली जाते. तथापि, जेव्हा इन्शुरन्स प्लॅन्सचा लाभ घेतला गेला नव्हता तेव्हा या रोगाचे निदान पूर्वीच झाले नसेल तरच क्लेमवर प्रक्रिया केली जाते.
खालील परिस्थितीत होणारा हॉस्पिटलायझेशन खर्च देखील प्रसिद्ध इन्शुरन्स कंपन्यांद्वारे वाढविला जातो:
हॉस्पिटलायझेशनपूर्वीचा खर्च जसे की निदान खर्च, आणि डॉक्टरांचे शुल्क इ. हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सद्वारे कव्हर केले जाऊ शकतात.
औषधे, नियमित तपासणी, इंजेक्शन्स इत्यादी डिस्चार्जनंतरच्या खर्चाची परतफेडही बहुतेक इन्शुरन्स कंपन्यांकडून केली जाते. त्याविरुद्ध कॉम्पेन्सेशन (भरपाईचा) निधी लमसम रक्कम म्हणून किंवा संबंधित बिले तयार करून काढला जाऊ शकतो.
हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींमध्ये आयसीयू बेड शुल्कदेखील समाविष्ट केले जाते. विमाधारक व्यक्ती खासगी खोलीत राहणे देखील निवडू शकते, ज्याचा खर्च संबंधित इन्शुरन्स कंपनीवर, इन्शुरन्स कंपनीच्या विवेकबुद्धीनुसार विशिष्ट रक्कम किंवा एकूण इन्शुरन्स रकमेपर्यंत बिल दिले जाऊ शकतो.
मानसिक आजारांवरील उपचारांसाठी योग्य वेळी रुग्णालयात दाखल होणे देखील अशा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत समाविष्ट केले जाते. भारतात आणि जागतिक स्तरावर मानसिक आरोग्याच्या समस्यांच्या वाढत्या दरामुळे, या सुविधेमुळे व्यक्तींना चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी व्यावसायिक मदत घेता येते.
केवळ विशिष्ट इन्शुरन्स कंपन्या व्यक्तींना त्यांच्या लठ्ठपणाच्या समस्येवर मात करण्यासाठीच्या उद्देशाने केलेल्या शस्त्रक्रियांसाठी केलेले सर्व खर्च उचलण्यास सहमत आहेत. लठ्ठपणामुळे अनेकदा व्यक्तींना हृदयाच्या समस्या, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे इतर संबंधित त्रास निर्माण होतात. हे दीर्घकाळापर्यंत व्यक्तींच्या सर्वांगीण कल्याणास प्रोत्साहित करते.
कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची अशी वैशिष्ट्ये एखाद्या व्यक्तीस भेडसावू शकणाऱ्या सर्व मोठ्या वैद्यकीय खर्चांची पूर्तता करण्यात उपयुक्त आहेत. थोड्या जास्त प्रीमियम शुल्कात, जास्त कव्हरेज सुविधेच्या रूपात अतिरिक्त लाभ प्रमुख संस्थांकडून दिले जातात.
रुग्णालयातील खोल्यांचे खोलीभाडे अशा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत समाविष्ट केले जाते, ज्यामुळे विमाधारक व्यक्तींना आरामात बरे होण्यास मदत होते. अशा प्रकरणांमध्ये वितरित केलेली एकूण रक्कम इन्शुरन्स कंपनीद्वारे आधीच निश्चित केली जाते.
डायलिसिस, मोतीबिंदू, टॉन्सिलेक्टॉमी इत्यादी रुग्णालयांमध्ये डेकेअर उपचारांसाठी होणारा खर्च बहुतेक हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्समध्ये समाविष्ट केला जातो.
प्रमाणित हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी झालेल्या कोणत्याही रुग्णवाहिकेच्या खर्चाचा समावेश आहे. याचा महत्त्वपूर्ण फायदा होतो कारण प्रीमियम रुग्णालये बऱ्याचदा वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारतात.
अशा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत, जर प्रत्येक वेळी वैद्यकीय परिस्थिती भिन्न असेल तर, आपण वर्षातून दोनदा सम इन्शुअर्ड (इन्शुरन्सच्या रकमेपर्यंतचे) क्लेम करू शकता.
प्रत्येक नो क्लेम वर्षासाठी, विमाधारक व्यक्तींना पुढील वर्षांमध्ये सवलत किंवा जास्त सम इन्शुअर्ड (अतिरिक्त खर्च न करता) वाढविली जाते, जी दरवर्षी देय असलेले प्रीमियम शुल्क कमी करण्यास किंवा त्यांचे विमा संरक्षण वाढविण्यास मदत करू शकते.
निर्धारित संस्थांद्वारे दररोज रोख भत्ता दिला जातो, ज्यामुळे व्यक्तींना रुग्णालयात दाखल होण्याच्या काळात वेतनाचे नुकसान भरून काढता येते.
नामांकित इन्शुरन्स कंपन्या विमाधारक व्यक्तीच्या उपचार प्रक्रियेदरम्यान तयार होणारी संपूर्ण वैद्यकीय बिले सम इन्शुअर्डपर्यंत कव्हर करतात. झिरो को-पेमेंट रुग्णाची आर्थिक जबाबदारी कमी करते, ज्यामुळे त्याला/तिला पूर्णपणे रिकव्हरीवर लक्ष केंद्रित करण्याची परवानगी मिळते.
याबद्दल अधिक जाणून घ्या
भारतात, उपचारांचा खर्च सामान्यत: वेगवेगळ्या शहरात वेगवेगळा असतो. विशेषत: दिल्ली, मुंबईसारख्या महानगरांमध्ये खूप जास्त असतो.
झोन अपग्रेडसह, आपण विविध शहरातील झोनमधील उपचारांसाठी उच्च आर्थिक कव्हरेज घेऊ शकता. शहराच्या वैद्यकीय खर्चानुसार झोनचे वर्गीकरण केले जाते. एखाद्या विशिष्ट प्रदेशात वैद्यकीय खर्च जितका जास्त असेल, तितका जास्त अशा वर्गीकरणात ठेवला जातो.
हे ॲड-ऑन आपल्याला थोड्या जास्त प्रीमियमसह भिन्न प्रदेश किंवा झोनमधील उपचार खर्चातील असमानता भरून काढण्यास मदत करते. परंतु नंतर आपल्याला यामुळे एकूण प्रीमियमवर 10% -20% ची बचत होते.
*सध्या, डिजिटवर, आमच्याकडे झोन अपग्रेड ॲड ऑन नाही. तथापि, आपण झोन बी मध्ये आधारित असल्यास आपल्याला प्रीमियमवर अतिरिक्त सूट मिळते. इतकंच नाही तर आमच्याकडे झोन-आधारित को-पेमेंट नाही.
होम हॉस्पिटलायझेशनसाठी केलेल्या सर्व खर्चासाठी कव्हरेज कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत कव्हर केले जाते. यामध्ये रुग्णाच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह उपचारासाठी देय असणारी औषधे, नर्सची फी, इंजेक्शन आदींचा समावेश आहे.
अवयवदानात जमा होणाऱ्या सर्व वैद्यकीय बिलांसाठी क्लेम करता येतात.
सर्व प्रमुख इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या विमा उत्पादनांवर वर नमूद केलेल्या तरतुदी कायम ठेवतात. असे असले तरी, विशिष्ट आजारांना जबाबदार धरण्यासाठी किंवा वेगवेगळ्या वयोगटांना सेवा देण्यासाठी विविध प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसी दिल्या जातात.
इन्डिव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी, जसे की त्याचे नाव सूचित करते की एकाच व्यक्तीच्या उपचाराचा खर्च कव्हर केला जातो. हे कव्हर स्वतःसाठी, आपल्या जोडीदारासह पालक आणि मुलांसाठी घेता येईल.
या प्लॅनमध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वैयक्तिक इन्शुरन्सची रक्कम मिळते. उदाहरणार्थ; जर आपल्या प्लॅनमध्ये इन्शुरन्सची रक्कम 10 लाख रुपये असेल, तर कुटुंबातील प्रत्येक सदस्य त्या पॉलिसीच्या कालावधीसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांपर्यंतचा वापर करु लागतो, म्हणजे जर आपण तीन सदस्यांसाठी इन्डिव्ह्युजअल ( वैयक्तिक प्लॅन) विकत घेत असाल, तर त्या तिघांसाठी सामूहिक इन्शुरन्स रक्कम 30 लाख रुपये असेल.
याचा अर्थ असा आहे की जर एकाच वेळी आपल्या कुटुंबातील सर्व/एकापेक्षा जास्त सदस्यांसह काही घडले तर ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी स्वतंत्र इन्शुरन्स रकमेमुळे त्या सर्वांना कव्हर करण्यासाठी पुरेशी असेल.
अशा प्लॅन्सअंतर्गत, एकाच पॉलिसीअंतर्गत सर्व व्यक्तींसाठी एकच इन्शुरन्स रक्कम उपलब्ध असते. ही संपूर्ण रक्कम अनुक्रमे एका व्यक्तीच्या उपचारांसाठी वितरीत केली जाऊ शकते, अशा परिस्थितीत दुसऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी नंतरचे कोणतेही क्लेम कव्हर केले जात नाहीत.
फॅमिली फ्लोटर प्लॅन्समध्ये ज्येष्ठ नागरिक पात्र नसतात, कारण त्यांच्या वैद्यकीय गरजा अधिक जटिल असतात.
फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्सबद्दल अधिक जाणून घ्या.
वृद्ध व्यक्तींच्या सर्व वैद्यकीय खर्चास अनुरूप असे प्लॅन्स केवळ 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाच मिळू शकतात. वृद्धापकाळामुळे विकसित होऊ शकणाऱ्या या विविध प्रकारच्या आजारांसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज वाढविण्यात आले आहे.
कंपन्या असे प्लॅन त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑफर करतात. प्रीमियम एम्प्लॉयर द्वारेच भरला जातो आणि त्यात अशी तरतूद आहे जी इन्शुरन्सची रक्कम पुन्हा भरण्याची खात्री देते. अशा प्रकारच्या ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी किफायतशीर असतात आणि कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवण्याची रणनीती म्हणून वितरित केल्या जातात.
तथापि, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जोपर्यंत आपण कंपनीत नोकरी करता तोपर्यंतच हे इन्शुरन्स कव्हर मिळू शकते. जर आपल्याला टर्मिनेट केले असेल किंवा कंपनीतील नोकरी सोडली असेल तर कव्हरचे फायदे मिळू शकत नाहीत.
गर्भधारणेदरम्यान होणारा सर्व पूर्व आणि प्रसूतीनंतरचा वैद्यकीय खर्च मॅटर्निटी इन्शुरन्स कव्हरमध्ये कव्हर केला जातो. नवजात अर्भकाच्या वैद्यकीय बिलांचा समावेश पहिल्या तीन महिन्यांसाठीही केला जातो. मात्र, असे प्लॅन्स दोन वर्षांच्या वेटिंग पिरियडसह येतात.
मॅटर्निटी इन्शुरन्सबद्दल अधिक जाणून घ्या.
बऱ्याचदा, हेल्थ इन्शुरन्स कव्हर घेताना आपण अंदाजित केलेल्या उपचारांचा खर्च कालांतराने वाढू शकतो, जरी आपल्या इन्शुुरन्सची रक्कम अपरिवर्तित राहिली तरीही.
अशा परिस्थितीत, आपण स्वतंत्र पॉलिसी खरेदी करण्याऐवजी आपल्या सध्याच्या कव्हरसाठी टॉप-अप घेणे निवडू शकता. ही टॉप-अप पॉलिसी एकूण इन्शुरन्सची रक्कम वाढविण्यात मदत करते जी आपण कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत वापरू शकता.
परंतु टॉप-अपचा लाभ घेण्यासाठी, आपल्याला प्रथम डिडक्टीबल रक्कम निवडणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर आपण रु. 50,000 च्या डिडक्टीबलसह रु. 3 लाख रुपयांच्या टॉप-अप प्लॅनसाठी गेलात तर.
मग क्लेमच्या वेळी आधी खिशातून हे 50 हजार रुपये आपल्याला द्यावे लागतील. एकदा का डिडक्टीबल रक्कम संपली की इन्शुरन्स कंपनी उर्वरित खर्च 3 लाखांपर्यंत उचलेल.
हे हेल्थ इन्शुरन्स प्लॅन एखाद्या व्यक्तीने त्यांच्या आयुष्यात केलेल्या सर्व आरोग्य सेवा खर्चांची पूर्तता करण्यासाठी घेतले जातात. हे लाईफ इन्शुरन्स प्लॅन्सपेक्षा लक्षणीयरित्या वेगळे आहेत, कारण दुसऱ्या प्रकारात विमाधारक व्यक्तीच्या जीवन किंवा मृत्यूवर आधारित आर्थिक संरक्षण प्रदान केले जाते.
भारतातील हेल्थ इन्शुरन्सच्या प्रकारांबद्दल तपशीलवार जाणून घ्या.
अकाली मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या आर्थिक गरजा सुरक्षित करणे हे लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे उद्दीष्ट असले तरी, हेल्थ इन्शुरन्स प्लॅन एखाद्या व्यक्तीस दर्जेदार आरोग्य सेवा आणि उपचार सुविधेमध्ये मदत करते.
फरकाचे मुद्दे |
हेल्थ इन्शुरन्स |
लाईफ इन्शुरन्स |
उद्देश |
विशिष्ट आजारांसह निदान झाल्यास उपचार आणि रिकव्हरीसाठी सर्व वैद्यकीय खर्च कव्हर करतो. |
अकाली मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबाला आर्थिक संरक्षण . |
देय रक्कम |
इन्शुरन्स रकमेपर्यंत. |
मृत्यूचा लाभ (विमाधारकाच्या प्रीमॅच्युरिटीची मुदत संपल्यानंतर) मॅच्युरिटीवर लमसम पे-आउट |
कर लाभ |
हेल्थ इन्शुरन्स कराचे फायदे ₹ 1 लाख पर्यंत. (आयकर कलम 80 डी) |
दरवर्षी 1.5 लाखापर्यंतचे कर लाभ (आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत) |
जर आपण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचा लाभ घेतलात तर आपण आयकर कायदा 1961 च्या कलम 80 डी अंतर्गत कराच्या फायद्याचा लाभ घेऊ शकता. खाली दिलेल्या तक्त्यात आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीवरील करसवलती खंडित झाल्याचे स्पष्ट केले आहे:
पात्रता |
सूट मर्यादा |
स्वत:साठी आणि कुटुंबासाठी (जोडीदार, अवलंबून मुले) |
₹25,000 पर्यंत |
स्वतःसाठी, कुटुंब + पालक (60 वर्षांपेक्षा कमी वयाचे) |
(₹25,000 + ₹25,000) = ₹50,000पर्यंत |
स्वत: साठी आणि कुटुंबासाठी (जेथे सर्वात मोठा सदस्य 60 वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे) + पालक (60 वर्षांपेक्षा जास्त) |
(₹25,000 + ₹50,000) = ₹75,000पर्यंत |
स्वत:साठी आणि कुटुंबासाठी (ज्येष्ठ सदस्याचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे) + पालक (वय 60 वर्षांपेक्षा जास्त) |
(₹50,000 + ₹50,000) = ₹1,00,000पर्यंत |
प्लॅन निवडण्यापूर्वी लोकांनी खालील पॅरामीटर्सचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे:
एखाद्या व्यक्तीचे वय आणि वैद्यकीय इतिहासानुसार इन्शुरन्स प्लानची निवड केली पाहिजे. तसेच, विमा प्रदात्याने वाढविलेले कव्हरेज फायदे, तसेच कोणतेही क्लेम करण्यापूर्वी प्रतीक्षा कालावधी पहा.
काळजीपूर्वक विश्लेषण करणे हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे, कारण तो क्लेमच्या रकमेच्या वितरणासाठी लागणारी पद्धत आणि वेळ प्रतिबिंबित करतो.
त्रास-मुक्त वितरण सुनिश्चित करण्यासाठी, आपली इन्शुरन्स कंपनी खालील अटींची पूर्तता करीत असल्याचे सुनिश्चित करा -
जास्त संख्येने नेटवर्क रुग्णालये उपचारासाठी आवश्यक असलेल्या कॅशलेस क्लेम ट्रान्सफरची खात्री करतात. उपचार प्रक्रिया सुलभ करून थर्ड-पार्टीच्या सहभागाच्या अडचणी कमी केल्या जातात.
प्रमुख इन्शुरन्स कंपन्यांकडे पॉलिसीधारकांच्या मोफत वार्षिक तपासणीची तरतूद आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या आरोग्याच्या परिस्थितीचा मागोवा घेता येईल.
अशी इन्शुरन्स कंपनी निवडा ज्यांच्या पॉलिसींमध्ये आजीवन नूतनीकरणाची तरतूद आहे. अशा सुविधेमुळे व्यक्तींना कोणत्याही अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यास मदत होते ज्यामुळे त्यांच्या आरोग्याची स्थिती बिघडू शकते.
आपण खालील पॉईंटर्स ठेवून आपल्या सर्व वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य अशी एक आदर्श हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी निवडू शकता. नाममात्र प्रीमियम शुल्क हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीद्वारे आपल्या आयुष्यात आर्थिक ओझे कमी करण्यास खूप काळापर्यंत मदत होऊ शकते.
बहुतेक लोक त्यांच्या आयुष्यातून एकदा हेल्थ इन्शुरन्सची निवड करतात आणि वेळोवेळी त्याचे नूतनीकरण करतात, म्हणून योग्य प्लॅन निवडणे महत्वाचे आहे.