Group Hospital Cash
-
- {{familyMember.multipleCount}} + {{coronaPolicyCtrl.isGhcFlow ? "Max " + coronaPolicyCtrl.maxChildCount + " kids" : "Max 4 kids"}}
- {{vlaue}}
कोरोना व्हायरस आणि वेक्टर- बोर्न या दोन्ही आजारांसाठी कव्हर करणे का महत्वाचे आहे?
कोव्हीड-१९ आणि वेक्टर - बोर्न डिसीझेसचा समावेश असलेल्या डिजीटच्या हेल्थ इन्शुरन्समध्ये काय चांगले आहे ?
या धोरणांतर्गत काय समाविष्ट आहे?
हे कव्हर त्यांच्या सँडबॉक्स रेग्युलेशन्सअंतर्गत नियामक, आय.आर.डी.ए.आय(IRDAI)कडे दाखल केले जाते. ग्रुप इन्शुरन्सच्या उद्देशाने ग्रुप स्थापन करणे; ४४२/आय.आर.डी.ए.आय/एच.एल.टी/जे.एन/जी.ओ.डी-एस.बी/२०१९-२० (442/IRDAI/HLT/GEN/GOD-SB/2019-20)
काय कव्हर्ड नाही?
आमचा पारदर्शकतेवर विश्वास आहे आणि शेवटच्या क्षणी आपल्याला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये अशी आमची इच्छा आहे. या पॉलिसीत काय कव्हर्ड नाही याविषयीची जी माहिती तुम्हाला असायला हवी ती इथे देण्यात आली आहे.
या पॉलिसीत कोणत्या वेक्टर-बोर्न डिसीझेसला कव्हर केले आहे?
मलेरिया
मलेरियाचा ताप प्रोटोझोअन - प्लास्मोडियममुळे मादी ॲनोफेल्स डासांद्वारे होतो. ज्यामुळे ताप, अशक्तपणा, थंडी, डोकेदुखी, उलट्या आणि कावीळ होते.
डेंग्यू
एडिस डास चावल्यामुळे पसरणाऱ्या विषाणूमुळे डेंग्यूचा ताप येतो ज्यामुळे ताप, तीव्र डोकेदुखी, उलट्या, त्वचेवर पुरळ आणि जीवघेणा अंतर्गत रक्तस्त्राव होतो.
झिका विषाणू
झिका विषाणू डासांच्या चाव्याद्वारे पसरतो ज्यामुळे ताप, पुरळ, स्नायू दुखणे आणि सांधेदुखी असे त्रास जाणवतात. गर्भवती स्त्रिया पोटातील मुलाला विषाणू हस्तांतरित करू शकतात ज्यामुळे मायक्रोसेफली आजार होतो.
फिलारियासिस
जेव्हा लिम्फॅक्टिक प्रणाली मायक्रोफिलेरिया पॅरासाईटद्वारे ब्लॉक केली जाते तेव्हा फिलारियासिस होतो. यामुळे अवयवांमध्ये कायमस्वरूपी बदल होतात.
काळा आजार
हा लीशमेनिया डोनोवनी नावाच्या पॅरासाईटच्या संसर्गामुळे व्हिसेरा (अंतर्गत अवयव, विशेषत: यकृत, प्लीहा, अस्थिमज्जा आणि लिम्फ नोड्स) चा एक जुनाट आणि संभाव्य घातक पॅरासिटिक आजार आहे.
चिकनगुनिया
चिकनगुनिया एडिस डासांच्या माध्यमातून पसरणाऱ्या विषाणूमुळे होतो. या आजारात ताप, अशक्तपणा आणि तीव्र सांधेदुखी होते.
जपानी एन्सेफेलाइटिस
विषाणूमुळे मेंदूला जळजळ झाल्यामुळे विमुखता, ताप, उलट्या, आकडी असा त्रास होतो आणि मृत्यू होतो.
या पॉलिसीबद्दल आपल्याला या गोष्टी माहित असायला हव्यात
या भयानक आजारांचे निदान होणे हृदय विदारक आहे. डिजीटला याची जाणीव आहे आणि त्यामुळे एक संरक्षण आम्ही ऑफर करतो जे आपल्याला ८ आजारांपैकी कोणत्याही आजारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यामुळे झालेल्या खर्चाची भरपाई करेल (कोव्हीड-१९ सह)
वेक्टर- बोर्न आजारांशी संबंधित क्लेम्सबद्दल
- जर आपल्याला निदान झाले आणि केवळ कोव्हीड-१९, डेंग्यू, मलेरिया, फिला रियासिस (आयुष्यात एकदाच पेयेबल), काळा आजार, चिकनगुनिया, जपानी एन्सेफेलाइटिस आणि झिका व्हायरससाठी रुग्णालयात दाखल केले गेले तर हॉस्पिटलायझेशन खर्च कव्हर केला जाईल.
कोव्हीड -१९ शी संबंधित दाव्यांबद्दल
- सरकारी, लष्करी किंवा सरकारी मान्यताप्राप्त रुग्णालयात क्वारंटाइन केल्यामुळे होणारा रुग्णालयात दाखल करण्याचा खर्चही कव्हर आहे.जर आपण रुग्ण म्हणून कोव्हीड-१९ ने ग्रस्त असाल आणि रुग्णालयात दाखल होणे हे केवळ पॉलिसी कालावधीत कोव्हीड-१९ मुळे असेल तर.
- कोव्हिड-१९ साठी रुग्णालयात दाखल करणे हे भारतातील सर्व रुग्णालयांसाठी लागू आहे. तथापि, भारतातील कोणत्याही आय.सी.एम.आर(ICMR) अधिकृत चाचणी केंद्रातून घेण्यात आलेल्या कोरोना व्हायरससाठी विमाधारकाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतरच दावे ग्राह्य धरले जातील.