ग्रुप हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय?
ग्रुप हेल्थ इन्शुरन्स हा एक प्रकारचा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन आहे ज्यात एकाच संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या लोकांच्या गटासाठी कव्हर दिले जाते. हे बऱ्याचदा कर्मचाऱ्यांसाठी एक मौल्यवान लाभ म्हणून ऑफर केले जाते. कारण त्यासाठीचा प्रीमियम एम्प्लॉयर उचलतो. ग्रुप हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज काही प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिले जाऊ शकते. हा इन्शुरन्स प्लॅन कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स किंवा एम्प्लॉइज हेल्थ इन्शुरन्ससाठीही वापरला जातो.
तथापि, इन्डिव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्स प्लॅनच्या तुलनेत त्याची किंमत तुलनेने खूप कमी आहे आणि कर कपातीत एम्प्लॉयर्सचादेखील फायदा होतो, म्हणून ते एम्प्लॉयर्स आणि कर्मचारी दोघांसाठी फायदेशीर ठरते.
डिजिटमध्ये, आम्ही सर्व आजार आणि रोगांपासून आपल्या कर्मचाऱ्यांना कव्हर करण्यासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह एम्प्लॉइ हेल्थ इन्शुरन्स प्लॅन आणि आपल्या कर्मचाऱ्यांना गंभीर साथीच्या रोगाविरूद्ध कव्हर केले जाईल याची खात्री करण्यासाठी कोव्हिड-19 स्पेसिफिक ग्रुप कव्हर दोन्ही ऑफर करतो.
डिजिट हेल्थ प्लस पॉलिसी (रिव्हिजन) - GODHLGP21487V032021
ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसह आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे संरक्षण का करावे?
कर्मचारी रिटेन्शन वाढवते- लोक अशा नोकऱ्यांना महत्त्व देतात जिथे त्यांना सुरक्षितता जाणवते. ग्रुप हेल्थ इन्शुरन्स केवळ आपल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पुरेशी आर्थिक सुरक्षा तर देईलच, पण एकूणच समाधानाची अशी भावना उत्पन्न करेल की त्यांच्या मालकाला त्यांची काळजी आहे.
कोव्हिड-19 साथीच्या रोगाच्या वेळी आर्थिकदृष्ट्या त्यांना सुरक्षित करेल- साथीच्या रोगाच्या दरम्यान, अर्थव्यवस्थेतील अधोगती आणि सर्व क्षेत्रांमध्ये वाढती वेतन कपात पाहता आर्थिक सुरक्षा अत्यंत महत्वाची बनली आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना आपण आर्थिकदृष्ट्या आणि वैद्यकीयदृष्ट्या सुरक्षित आहे याची खात्री व्हावी म्हणून या विषाणूमुळे कराव्या लागू शकणाऱ्या उपचारापासून संरक्षण देणे इतके तर कमीत कमी तुम्ही करू शकता.
कर्मचाऱ्यांना प्रेरणा देऊन बळकट करा- आनंदी कर्मचारी आनंदी कार्यक्षेत्रे आणि यशस्वी कंपन्या बनवतात ! जितके सुरक्षित आणि समाधानी कर्मचाऱ्यांना वाटते, तितके ते अधिक आनंदी आणि प्रेरित असण्याची शक्यता आहे यात आश्चर्य नाही !
गंभीर आरोग्य परिस्थितीपासून त्यांना संरक्षण द्या- भारतात 61% पेक्षा जास्तवेळा रोग, हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यू जीवनशैलीशी संबंधित आजारपणामुळे होतात. इतर आजारांसह आपल्या कर्मचाऱ्यांचे यापासून संरक्षण करा; या समस्यांचे जेवढे लवकर निदान केले जाते, तेवढे लवकर त्यांच्यावर उपचार केले जाऊ शकतात आणि ते बरे होऊ शकतात.
त्यांना मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करा- अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक दबाव किंवा इतर व्यक्तिगत समस्यांमुळे तणावाचा त्रास होतो ज्यामुळे कामाच्या ठिकाणी त्यांची उत्पादक पातळी देखील कमी होऊ शकते. आमचा ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅन केवळ त्यांच्या बचतीचे रक्षणच करणार नाही तर योग्य पाठिंब्याने त्यांचे एकूण मानसिक आरोग्यदेखील चांगले ठेवेल.
डिजिटच्या ग्रुप हेल्थ इन्शुरन्समध्ये काय चांगले आहे?
डिजिटच्या ग्रुप हेल्थ इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते ?
काय कव्हर्ड नाही?
प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरचा वैद्यकीय खर्च, जोपर्यंत यामुळे कर्मचारी किंवा त्यांच्या जोडीदाराला रुग्णालयात दाखल केले जात नाही.
आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजाराच्या बाबतीत , जोपर्यंत प्रतीक्षा कालावधी संपला नाही, तोपर्यंत त्या रोगाचा किंवा आजाराचा क्लेम करता येत नाही. तथापि, जर आपण 50 हून अधिक सदस्यांना कव्हर करू इच्छितात, तर पी.ई.डी प्रतीक्षा कालावधी माफी होतो
आपल्या कर्मचाऱ्याला कोणत्याही परिस्थितीमुळे रुग्णालयात दाखल केले, जे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशी जुळत नाही.
जर आपण फक्त कोव्हीड कव्हर निवडत असाल, तर इन्शुरन्स असलेल्या व्यक्तीच्या कोरोना चाचणी सरकारी अधिकृत केंद्रातून केल्यावर रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असेल तरच या कव्हरच्या माध्यमातून उपचार घेता येतो.
कोव्हिड संबंधित क्लेम्ससाठी, प्रारंभिक प्रतीक्षा कालावधी 15 दिवसांचा आहे. ते पूर्ण होण्यापूर्वी केलेले क्लेम्स समाविष्ट केले जाऊ शकत नाहीत.
डिजिटच्या ग्रुप हेल्थ इन्शुरन्सचे मुख्य फायदे
प्रीमियम | प्रती कामगार ₹1302 पासून सुरुवात |
---|---|
कोपेमेंट | वयावर आधारित कोपेमेंट नाही |
कॅशलेस रुग्णालये | 16400+ कॅशलेस रुग्णालये भारतभर |
खरेदी आणि क्लेम्स प्रक्रिया | पेपरलेस प्रक्रिया, डिजिटल फ्रेंडली |
पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट | सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट |
कोरोना व्हायरसवर उपचार | ग्रुप हेल्थ इन्शुरन्स अंतर्गत समाविष्ट आणि स्वतंत्र ग्रुप कव्हर म्हणून देखील ऑफर केले जाते. |
क्लेम कसा करावा?
जेव्हा जेव्हा क्लेम केला जातो, तेव्हा आम्हाला कळवा ! आम्हाला 1800-258-4242 वर कॉल करा किंवा आम्हाला healthclaims@godigit.com इथे ईमेल करा
कॅशलेस क्लेमच्या बाबतीत, तुमच्या कर्मचाऱ्याने फक्त त्यांच्या आवडीचे नेटवर्क हॉस्पिटल निवडणे आणि त्यांचे ई-हेलथ कार्ड प्रदर्शित करणे आवश्यक आहे आणि आम्ही उर्वरित काळजी घेऊ. कर्मचारी अंदाजे वैद्यकीय खर्च देऊन 50% पर्यंत ॲडव्हान्स कॅश बेनिफिट निवडू शकतो.
जर एखाद्या कर्मचाऱ्याला आमच्या नेटवर्कचा भाग नसलेल्या रुग्णालयाची निवड करायची असेल, तर ते वैद्यकीय बिले, चाचणी अहवाल, सल्लामसलत सारांश इत्यादी आवश्यक कागदपत्र सबमिट करून रिएम्बर्समेंटचा पर्याय निवडू शकतात.
ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅन कसे कार्य करतो?
- एखादी कंपनी सामान्यत: त्यांच्या कर्मचाऱ्यांना ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅनसह कव्हर करण्यासाठी संबंधित हेल्थ इन्शुरन्स कंपनीची निवड करते, ज्याचा प्रीमियम सहसा संबंधित कंपनीद्वारेच दिला जातो आणि कर्मचाऱ्यांना हेल्थ केअर बेनिफिट म्हणून ऑफर केला जातो.
- कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घेतला जाणार असल्याने मूलभूत योजना आणि सम इन्शुअर्ड देखील सर्व कर्मचाऱ्यांसाठी समान आहे. तथापि, कर्मचारी आपला जोडीदार आणि मुले यांसारख्या त्याच्यावर अवलंबून असलेल्यांना इन्शुरन्समध्ये जोडण्याचा पर्याय निवडू शकतात आणि काही प्रकरणांमध्ये, अतिरिक्त प्रीमियम देयक देऊन त्यांच्या वरिष्ठ पालकांचाही समावेश करू शकतात.
कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप हेल्थ इन्शुरन्सचा उद्देश काय आहे?
असे मालक व्हा जे प्रत्यक्षात त्याच्या कामगारांची काळजी करतात. नावाप्रमाणेच, ग्रुप हेल्थ इन्शुरन्स ही एक प्रकारची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे जी अशा लोकांच्या गटाला समर्पित आहे, जे एका सामान्य छत्राखाली काम करतात.
सर्वात सामान्यत: तरुण स्टार्टअप्स आणि मोठ्या संस्था या दोन्हींच्या कर्मचाऱ्यांसाठी खरेदी केलेल्या, ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅनचा केवळ कर्मचाऱ्यांनाच फायदा होत नाही तर, आज लोक हेल्थ इन्शुरन्ससारख्या उपयुक्त लाभ देणाऱ्या कंपनीला अनुकूल असतील आणि त्यांच्या बरोबर कायम राहण्याची शक्यता आहे.
ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅन कोणी विकत घ्यावा?
सामान्यत: 10 किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य असलेल्या कोणत्याही संस्थेने आपल्या कर्मचाऱ्यांना हेल्थ इन्शुरन्ससह संरक्षण दिले पाहिजे. आपल्याला गरज आहे की नाही याची आपल्याला खात्री नसेल, तर आम्ही ते आपल्या ते पटवून देऊ.
जर तुम्ही आत्ताच स्वत:चा एक तरुण स्टार्टअप सुरू केला असेल आणि टीममध्ये किमान 15 सदस्य असतील, तर आपण ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅनसाठी साइन अप करू शकता जे केवळ आपल्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण करणार नाही तर तुम्हाला कर बचतीतही मदत करेल. जर तुम्हाला खर्चाची खूप काळजी वाटत असेल, तर काळजी करू नका – ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅन कंपनीच्या आर्थिक आणि कर्मचाऱ्यांच्या सामर्थ्यानुसार कस्टमाइज केले जातात.
तर, आपली कंपनी तरुण आहे परंतु काही काळापासून काम करत आहे. तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅनसह संरक्षण देण्यासाठी निवड करू शकता. हे केवळ तुमच्या कर्मचाऱ्यांचा आनंद आणि प्रेरणा वाढविण्यास मदत करणार नाही तर आपल्याला त्यांना जास्त काळ टिकवून ठेवण्यास मदत करेल.
एक मोठा आणि स्थापित स्टार्टअप्स, संस्था - कर्मचारी त्यांच्या पॅकेजचा एक भाग म्हणून हेल्थ इन्शुरन्ससारख्या फायद्याची अपेक्षा करतात. म्हणून, जर आपल्याकडे एक हजार किंवा त्याहून कमी सदस्य असलेली कंपनी असेल, तर आपण त्यांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटंबियांना कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स प्लॅनसह कव्हर केले पाहिजे. हे त्यांना केवळ सुरक्षिततेची भावना देणार नाही तर, आपल्या संस्थेची सद्भावनादेखील वाढवेल.
ग्रुप हेल्थ इन्शुरन्सचे फायदे
ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी लोकांच्या सगळ्या ग्रुपवर दिली जात असल्याने त्यासाठीचा प्रीमियम इतर हेल्थ इन्शुरन्सपेक्षा खूप स्वस्त आहे.
भारतीय आयकर विभागानुसार, कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स असलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफर करणाऱ्या कंपन्यांना काही कर बचतीचा फायदा होऊ शकतो!
आपल्या कर्मचाऱ्यांना मौल्यवान लाभ देणाऱ्या संस्था आनंदी कर्मचारी आणि आनंदी कामाचे वातावरण तयार करतात. यामुळे शेवटी लहान-मोठ्या कोणत्याही कंपनीसाठी चांगली सद्भावना निर्माण होते. शेवटी, प्रत्येकाला एक चांगली जुनी संस्था आवडते जी तिच्या लोकांची काळजी करते!
भारतात ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना (एम्प्लॉयर) कंपनीने किंवा कंपनीच्या मालकाने काय बघितले पाहिजे?
ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅनचा प्राथमिक उद्देश कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेचा लाभ प्रदान करणे हा आहे आणि त्याचा अर्थ असा होतो की हे फायदे असे असले पाहिजेत जे कर्मचाऱ्याला खरोखर मौल्यवान वाटतात. म्हणून, तुमच्या कर्मचार्यांसाठी ग्रुप हेल्थ इन्शुरन्स निवडताना ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅनमध्ये कोणत्या प्रकारचे फायदे दिले जातात ते सर्वांत प्राधान्य असले पाहिजे. उदाहरणार्थ: कोविड-19 महामारीचा भारतावर किती परिणाम झाला आहे हे लक्षात घेता, तुमचा ग्रुप हेल्थ इन्शुरन्स ते कव्हर करेल याची खात्री करा.
शेवटी पैशाला महत्त्व आहे! म्हणूनच, तुमच्या ग्रुप इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्सची किंमत तुमच्यासाठी किती असेल याचे मूल्यमापन करणे महत्वाचे आहे आणि लाभ मिळतोय की नाही हे तुम्हाला महत्वाचे वाटत असेल तर आंधळेपणाने स्वस्त प्रीमियमसाठी जाऊ नका, तर त्यासोबत येणाऱ्या फायद्यांसह ते तुलना करून पाहा.
जेव्हा आपल्याला ग्रुप हेल्थ इन्शुरन्स मिळतो, तेव्हा केवळ प्लॅनचे बेनिफिट्सच महत्वाचे असतात असे नाही, तर तुमची इन्शुरन्स कंपनी किती प्रभावी आणि जलद प्रतिसाद देणारी आहे हेदेखील महत्त्वाचे आहे. गरजेच्या वेळी, तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना संबंधित इन्शुरन्स कंपनीशी संवाद साधण्याचा आणि व्यवहार करण्याचा सुखद अनुभव आहे याची खात्री करू इच्छिता.अनेक वेळा विमा पुरवठादार थर्ड पार्टीचाही मध्यस्थ म्हणून वापर करतात. तसे असेल तर संबंधित थर्ड पार्टी प्रशासक पुरेसे चांगले आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी.
जेव्हा हेल्थ इन्शुरन्सचा प्रश्न येतो, तेव्हा सेवा जास्त महत्त्वाची असते. शेवटी, आपल्याला अशा विमाधारकाची आवश्यकता आहे जी हेल्थकेअर गोष्टींशी अत्यंत काळजी आणि संवेदनशीलतेने व्यवहार करेल. म्हणून, त्यांच्या ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लानचा निर्णय घेण्यापूर्वी नेहमीच वेगवेगळ्या विमा प्रदात्यांच्या सेवेचे मूल्यांकन आणि तुलना करा.
अपघात आणि आजार कुठेही होऊ शकतात ! त्यामुळे ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅन निवडताना विचार करण्यासारख्या गोष्टींपैकी एक म्हणजे तो संपूर्ण देशाला व्यापतो की नाही आणि तसे झाले तर देशभरात किती नेटवर्क रुग्णालये पसरली आहेत इत्यादी.
कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप हेल्थ इन्शुरन्सचे बेनिफिट्स
ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅन ऑफर करणाऱ्या बहुतेक कंपन्यांमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक फायद्याचा एक भाग आहे; म्हणजे तुम्ही त्याची निवड करा किंवा नका करू, जर तुमच्या कंपनीकडे ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅन असेल तर – तुम्ही स्वत: प्रीमियमसाठी पैसे न देता त्यात कव्हर केले जाल.
सामान्यत: जेव्हा आपल्याला वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा असेल, तेव्हा आपली इन्शुरन्स कंपनी बहुधा आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी जारी करण्यापूर्वी आणि पुष्टी करण्यापूर्वी प्री-मेडिकल टेस्ट (चाचण्या) घेईल. तथापि, ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅनच्या बाबतीत त्याची आवश्यकता नाही. कोणत्याही वैद्यकीय चाचण्या घेण्याची गरज नसताना आपली पॉलिसी लागू असेल.
वर नमूद केल्याप्रमाणे, बहुतेक एम्प्लॉयर्स सामान्यत: कंपनीने ऑफर केलेल्या आपल्या वार्षिक फायद्यांमध्ये आपली हेल्थ इन्शुरन्स प्लॅन समाविष्ट करतील. याचा अर्थ असा की, आपल्याला त्याच्या प्रीमियमसाठी पैसे द्यावे लागत नाहीत आणि आपली कंपनी आपल्यासाठी ते देते. तथापि, याबाबतीत एक कंपनी आणि दुसऱ्या कंपनी याांच्यात फरक असू शकतो. परंतु, आपला एम्प्लॉयर आपल्याला त्यासाठी शुल्क आकारत असल्यास, त्यासाठीचा प्रीमियम तुलनेने वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्सपेक्षा खूप कमी आहे.
आपला एम्प्लॉयरच संबंधित ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅनचा पर्याय निवडत असल्यामुळे, ते प्रामुख्याने थर्ड-पार्टी प्रशासक किंवा इन्शुरन्स कंपनीशी सर्व संवाद करतात. त्यामुळे सतत संवाद साधण्याचे आपले प्रयत्न कमी होतात आणि त्याऐवजी क्लेम प्रक्रिया सहसा आपल्यासाठी खूप सोपी होते.
इन्डिव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्सपेक्षा ग्रुप हेल्थ इन्शुरन्स वेगळा कसा आहे ?
इन्डिव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्स | ग्रुप हेल्थ इन्शुरन्स |
---|---|
या बाबतीत, प्रत्येक व्यक्ती आपापल्या इन्शुरन्स कंपनीशी थेट संपर्क साधते. | येथे, कंपनी संबंधित ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्रदात्यासोबत डायरेक्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. |
प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही वेळी त्यांची पॉलिसी रद्द करण्याचा अधिकार आहे. | ग्रुप हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीत केवळ एम्प्लॉयरला पॉलिसी रद्द करण्याचा अधिकार आहे. |
जोपर्यंत एखाद्या व्यक्तीने संबंधित प्रीमियम दरवर्षी दिला आहे तोपर्यंत इन्डिव्ह्युजअल पॉलिसी वैध आहे. | जोपर्यंत कर्मचारी संबंधित संघटनेचा भाग आहे तोपर्यंत ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी वैध आहे. |
इन्डिव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्स हे प्रामुख्याने एखाद्या व्यक्तीचे वय, वैद्यकीय इतिहास, आरोग्याची परिस्थिती इत्यादींवर अवलंबून असते. | ग्रुप हेल्थ पॉलिसी हे प्रामुख्याने संस्थेच्या सामर्थ्यावर अवलंबून असते; आर्थिक आणि कर्मचारी संख्या दोन्ही यात महत्वाच्या असतात. |
सामान्यत: कोणत्याही इन्डिव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्स मध्ये इन्शुरन्स कंपनीकडे प्री-मेडिकल चेकअप केले जातील, त्यानंतर त्यावर आधारित पॉलिसी जारी केल्या जातात. | ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅनमध्ये, इन्शुरन्स कंपनीद्वारे प्री -मेडिकल चेकअप केले जात नाही, ज्यामुळे पॉलिसी रद्द होण्याचा धोका कमी होतो. |
डिजिटचा ग्रुप हेल्थ इन्शुरन्स आणि ग्रुप कोरोना व्हायरस कव्हर यामधील फरक
डिजिट ग्रुप हेल्थ इन्शुरन्स | डिजिट इलनेस ग्रुप इन्शुरन्स (कोव्हिड-19) |
---|---|
डिजिट ग्रुप हेल्थ इन्शुरन्स हा एक व्यापक कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन आहे ज्यात आजार, रोग आणि अपघातांमुळे उद्भवणाऱ्या होस्पिटलायझेशन खर्चापासून संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांना समाविष्ट केले जाते. शिवाय, डिजिटच्या ग्रुप हेल्थ इन्शुरन्समध्ये कोव्हिड-19 देखील समाविष्ट आहे, जरी तो साथीचा रोग असला तरीही. | सध्याची परिस्थिती पाहता, आम्हाला समजते की प्रीमियम खर्च आणि सध्या सुरू असलेल्या आर्थिक असुरक्षिततेमुळे बऱ्याच व्यवसायांना संपूर्ण ग्रुप हेल्थ इन्शुरन्स संरक्षण घेण्याची इच्छा नसेल. तथापि, एम्प्लॉयर्सला त्यांच्या कर्मचाऱ्यांना किमान कोव्हिड-19 साठी कव्हर करावे अशी शिफारस केली गेली आहे. म्हणूनच, आम्ही कोव्हिड-19 मधील सर्व कर्मचाऱ्यांना कमी खर्चात ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्रीमियममध्ये कव्हर करण्यास मदत करण्यासाठी त्यासाठी एक कस्टमाइज्ड कव्हर तयार केले आहे. |
भारतातील कर्मचाऱ्यांसाठीच्या कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
डिजिटच्या ग्रुप हेल्थ इन्शुरन्समध्ये कोरोनाव्हायरस कव्हर आहे का?
होय, कोरोनाव्हायरस कव्हर डिजिटच्या ग्रुप हेल्थ इन्शुरन्समध्ये समाविष्ट आहे आणि स्वतंत्र कव्हर म्हणून देखील ऑफर केले जाते.
डिजिटच्या कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स अंतर्गत प्रारंभिक प्रतीक्षा कालावधी किती आहे?
आमच्या कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्समध्ये प्रारंभिक प्रतीक्षा कालावधी केवळ 15 दिवसांचा आहे. तथापि, 50+ सदस्यांचा समावेश असलेल्या संस्थांसाठी ही गोष्ट माफ केली जाऊ शकते.
प्रतीक्षा कालावधी म्हणजे काय ?
विशिष्ट बेनिफिट्ससाठी क्लेम करण्यास सुरुवात करण्यापूर्वी जो कालावधी पूर्ण होणे आवश्यक असतो तो म्हणजे प्रतीक्षा कालावधी.
मी माझ्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कधी घ्यावी?
आमचा विश्वास आहे की प्रत्येक कंपनीने किमान आपल्या कर्मचाऱ्यांना मूलभूत ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्रदान केला पाहिजे. जर आपल्या संघटने मध्ये किमान 10 सदस्यांचा समावेश असेल, तर त्या सर्वांच्या संरक्षणासाठी ग्रुप हेल्थ इन्शुरन्स मिळविण्याचा विचार केला पाहिजे.
तथापि, सध्याच्या परिस्थितीमुळे जर आपण असे करू शकत नसाल, तर आपण आपल्या कर्मचाऱ्यांना परवडणाऱ्या किंमतीत कोरोनाव्हायरसपासून कव्हर करण्यासाठी फक्त कोरोनाव्हायरस ग्रुप कव्हरसाठी जाणे निवडू शकता.
आमच्या कामाच्या ठिकाणी फक्त 10 ते 15 सदस्य आहेत. मी तरीही त्यांच्यासाठी ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करू शकतो का?
होय आपण हे करू शकता। इतर ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींपेक्षा आमचा ग्रुप हेल्थ इन्शुरन्स किमान 10 सदस्य असलेल्या कंपन्यांना लागू आहे.
ॲडव्हान्स कॅश बेनिफिट म्हणजे काय?
ॲडव्हान्स कॅश बेनिफिट म्हणजे विमाधारकाचा उपचार खर्च आणि अंदाज यावर आधारित, तुमचा विमाकर्ता (उर्फ आम्हाला!) अंदाजे खर्चाच्या 50% रोखीने व्यवहार कव्हर करेल जेणेकरून त्यांना खात्रीअसेल की ते नेहमीच कव्हर केले जातात आणि त्यांना प्रतीक्षा करण्याची गरज नाही. त्यांचे उपचार पूर्ण होईपर्यंत. उर्वरित 50% अंदाजे खर्च उपचारानंतर परत मिळू शकते.
ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कोणाला समाविष्ट केले जाऊ शकते?
१८ वर्षांपेक्षा जास्त आणि ७० वर्षांपेक्षा कमी असलेले सर्व कर्मचारी जे एखाद्या संस्थेत नोकरी करतात ते संस्थेच्या ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत समाविष्ट करण्यासाठी पात्र आहेत. शिवाय, ते आपल्या जोडीदाराला आणि 3 महिने ते 25 वर्षे वयोगटातील आपल्या मुलांना परंतु 3 मुलांपर्यंतच फक्त देखील जोडू शकतात.
कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीपेक्षा स्वस्त आहे का?
होय, सामान्यत: कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन स्वस्त असतात कारण हा खर्च मोठ्या संख्येने लोकांमध्ये, म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये वाटला जातो.
माझ्या छोट्या व्यवसायासाठी कर्मचारी मेडिकल इन्शुरन्स कसा मिळवावा?
डिजिटमध्ये, आम्ही मोठ्या आणि छोट्या दोन्ही व्यवसायांसाठी कस्टमाइज्ड एक ग्रुप हेल्थ इन्शुरन्स ऑफर करतो. आपल्या प्लान मध्ये सुरुवात करण्यासाठी, आपले तपशील वरती एन्टर करा आणि आम्ही कस्टमाइज्ड ग्रुप हेल्थ इन्शुरन्स कोट आपल्याला देऊ.
माझ्याकडे कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन आहे. माझा प्लॅन डिजिटच्या वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स प्लॅनमध्ये पोर्ट करणे शक्य आहे का?
हे प्रामुख्याने आपल्याकडे असलेल्या कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स प्लॅनच्या प्रकारावर अवलंबून आहे. सामान्यत: कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन आपल्या संबंधित एम्प्लॉयरद्वारे काढले जातात आणि आपण कंपनी सोडल्यावर ते खंडित होतात.
तथापि, आपण असे करू शकता ते म्हणजे इन्डिव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्स निवडणे, जे आपल्याला वैयक्तिक कर बचतीत मदत करेल आणि आपल्याला अतिरिक्त आरोग्य सेवेचा लाभ देईल.
मी एकाच वेळी कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स आणि इन्डिव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेऊ शकतो का?
होय, आपण वर म्हटल्याप्रमाणे आपण कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन आणि इन्डिव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी दोन्ही नक्कीच घेऊ शकता.
एम्प्लॉयर हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स किमतीच्या बाबतीत कसे असतात?
एम्प्लॉयर हेल्थ इन्शुरन्स प्लॅनची किंमत प्रत्येक कंपनीत भिन्न असते कारण प्रत्येक कंपनीत कर्मचारी संख्या वेगळी असते. एम्प्लॉयर हेल्थ इन्शुरन्स प्लॅन.
ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमची गणना कशी केली जाते?
ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमची गणना कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांचे वय, स्थान आणि ग्रुप हेल्थ इन्शुरन्स योजनेत कव्हर करू इच्छित असलेल्या त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील लोकांच्या आधारे केली जाते.
ग्रुप हेल्थ इन्शुरन्सच्या मर्यादा काय आहेत?
ग्रुप हेल्थ इन्शुरन्स एम्प्लॉयर आणि कर्मचारी या दोघांसाठी फायदेशीर असला, तरी त्याची सर्वात मोठी मर्यादा अशी आहे की, कर्मचाऱ्याच्या संदर्भात, आरोग्य सेवेच्या सर्व गरजा भागविण्यासाठी कव्हर पुरेसे असू शकत नाही, कारण बहुतेक ग्रुप हेल्थ इन्शुरन्स योजना मर्यादित आणि सामान्य स्वरूपाच्या आहेत, इन्डिव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स प्रमाणे ज्या वैयक्तिक हेल्थकेअर आवश्यकतांनुसार कस्टमाइज्ड केल्या जाऊ शकतात.
तथापि, याबद्दल जाण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅन आणि वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स प्लॅन दोन्ही असणे जे आरोग्य सेवेच्या गरजा आणि कर बचत या दोन्हींसाठी चांगले काम करते.
डिस्क्लेमर : या आकडेवारीत प्रारंभापासून 13 सप्टेंबर 2021 पर्यंत डिजिट हेल्थ प्लस पॉलिसी (रिव्हिजन) आणि डिजिट इलनेस ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत समाविष्ट सदस्यांचा समावेश आहे
अस्वीकरण: या डेटामध्ये 13 सप्टेंबर 2021 पर्यंत डिजिट हेल्थ प्लस पॉलिसी (रिव्हिजन) आणि डिजिट इलनेस ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत समाविष्ट असलेल्या सदस्यांचा समावेश आहे.