मोटर इन्शुरन्स एजंट बना
Work
in spare time
Earn
side income
FREE
training by Digit
मोटर इन्शुरन्स एजंट म्हणजे कोण ?
भारतातील मोटर इन्शुरन्स उद्योगाबद्दल काही तथ्ये
डिजिट सह मोटर इन्शुरन्स एजंट का व्हावे?
तुम्ही मोटर इन्शुरन्स एजंट का व्हावे आणि तुम्ही यासाठी डिजिटची निवड का करावी याबद्दल अधिक जाणून घ्या...
मोटर इन्शुरन्स एजंट कसे व्हावे?
व्हेईकल इन्शुरन्स एजंट बनण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पीओएसपी प्रमाणपत्र पूर्ण करणे. पीओएसपी (पॉइंट ऑफ सेल्स पर्सन) हे इन्शुरन्स एजंटला दिलेले नाव आहे. पीओएसपी विशिष्ट इन्शुरन्स उत्पादने विकू शकतात.
पीओएसपी होण्यासाठी, तुमच्याकडे फक्त आयआरडीएआयद्वारे आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता असणे आणि आमच्याद्वारे प्रदान केलेले प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. डिजिट तुमच्या प्रशिक्षण प्रक्रियेची काळजी घेईल. काळजी करू नका!
मोटर इन्शुरन्स एजंट होण्यासाठी काय काय लागते ? पात्रतेच्या अटी काय आहेत?
तुम्हाला कार इन्शुरन्स एजंट कसे व्हायचे हे जाणून घ्यायचे असल्यास, तुमचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे, किमान इयत्ता १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे आणि तुमच्याकडे वैध आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
त्यानंतर तुम्हाला आयआरडीएआयद्वारे सांगण्यात आलेले १५ तासांचे अनिवार्य प्रशिक्षण पूर्ण करण्यास सांगितले जाईल. तुम्हाला जे काही माहित असणे आवश्यक आहे ते जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करण्याचे वचन देतो!
मोटर विमा एजंट कोण बनू शकतो?
मोटर इन्शुरन्स एजंट होण्यासाठी उमेदवाराचे वय १८ वर्षांहून अधिक असणे आवश्यक आहे आणि इयत्ता १० वी पूर्ण केलेली असावी.
याचा अर्थ असा की ज्याला इन्शुरन्स पॉलिसी विकण्याची क्षमता आहे तो पीओएसपी एजंट होऊ शकतो. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहिणी, सेवानिवृत्त आणि नोकरदार पुरुष/महिला यांचा समावेश होतो.
डिजिटसह मोटर इन्शुरन्स एजंट/पीओएसपी कसे व्हावे?
स्टेप १
वर दिलेला आमचा पीओएसपी फॉर्म भरून साइन अप करा, सर्व तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप २
तुमचे १५ तासांचे प्रशिक्षण आमच्यासोबत पूर्ण करा.
स्टेप ३
परीक्षा पूर्ण करा.
स्टेप ४
करारावर स्वाक्षरी करा आणि तुम्ही प्रमाणित पीओएसपी व्हाल.
आपण किती कमवू शकता?
इन्शुरन्स एजंट म्हणून तुमचे उत्पन्न तुम्ही विकत असलेल्या पॉलिसींच्या संख्येवर अवलंबून असते. तुम्ही जितक्या जास्त पॉलिसी विकता तितके तुमचे उत्पन्न जास्त. मोटार विमा एजंट कार, बाईक आणि व्यावसायिक वाहनांसाठी इन्शुरन्स पॉलिसी विकू शकतो.
याचा अर्थ असा की तुम्ही ग्राहकांना कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि स्टँडअलोन अशा दोन्ही पॉलिसी विकू शकता, ज्यासाठी कमिशनची रचना खाली दिली आहे:
पॉलिसी आणि वाहनाचा प्रकार |
वाहनाचे वय |
कमिशनचा कमाल दर |
कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी - चारचाकी आणि इतर प्रकारची खाजगी किंवा व्यावसायिक वाहने |
१-३ वर्षे |
स्वतःच्या नुकसानीच्या प्रीमियमच्या १५व% |
कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी- टू- व्हिलर |
१-३ वर्षे |
प्रीमियमच्या १७.५% |
कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी - चारचाकी आणि इतर प्रकारच्या खाजगी किंवा व्यावसायिक वाहनांसाठी |
४ वर्षे त्याहून अधिक |
१५% स्वतःचे नुकसान प्रीमियम + २.५% तृतीय पक्ष प्रीमियम |
कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी - दुचाकी |
4 वर्षे त्याहून अधिक |
17.5% स्वतःच्या नुकसान प्रीमियम + 2.5% तृतीय पक्ष प्रीमियम |
स्टँडअलोन थर्ड-पार्टी लायॅबिलिटी पॉलिसी - सर्व प्रकारची वाहने |
अमर्याद |
प्रीमियमच्या २.५% |
मी मोटर इन्शुरन्स एजंट का व्हावे?
सतत विचारले जाणारे प्रश्न