वापरलेल्या बाईकसाठीच्या इन्शुरन्सबद्दल सर्व
तरुणाईमध्ये टू-व्हीलर खरेदी करणे ही एक क्रेझ कायम असते. एक काळ असा होता की वाहन विकत घेणे म्हणजे श्रीमंतीचे लक्षण मानले जायचे. जरी भारतातील कार मालकांची संख्या वाढली असली तरी तरुणांना बाईकचे आणि बाईकवर स्वार होण्याचे नेहमीच आकर्षण असते.
दैनंदिन मॉडेल्स व्यतिरिक्त, भारतीय बाजारपेठेत फॅन्सी बाईक्स देखील उपलब्ध आहेत ज्या खास आणि वेगळ्या वैशिष्ट्यांसह आणि वैविध्यपूर्ण डिझाइनसह येतात. जुनी असो वा नवीन, चांगली बाईक ही चांगली बाईकच असते. त्याचप्रमाणे, विंटेजच्या प्रेमासाठी जुन्या बाईक्स पसंत करणारेही अनेक खरेदीदार आहेत. खाद्यपदार्थ वितरण, कुरिअर आणि इतर तत्सम सेवांमध्ये दुचाकींचा(टू -व्हिलर) चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, बाईक्सची मागणीदेखील वाढत आहे, मग ती सेकंड हँड असो किंवा अगदी नवीन बाईक.
सेकंड हँड बाईक चांगल्या स्थितीत असेल तर ती खरेदी करणे त्रासदायक नाही. पण जर तुम्हाला निर्धारित वेळेत कुठेतरी पोहोचायचे असेल तर अशा बाईक चालवणे जास्त जोखमीचे आहे. ट्रॅफीक आणि रस्त्यांची परिस्थिती खूपच वाईट आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला आणि तुमच्या दुचाकीला बाईक इन्शुरन्सने सुरक्षित करणे ही एक अपरिहार्य गोष्ट बनते.
सेकंड-हँड बाईक इन्शुरन्स म्हणजे काय?
इतर कोणत्याही टू-व्हिलर इन्शुरन्सप्रमाणेच, सेकंड-हँड बाईक इन्शुरन्स हा तृतीय पक्षाला(थर्ड पार्टी) आणि स्वत:ला झालेल्या नुकसानीपासून आणि तोट्यांपासून संरक्षण देतो.
सेकंड हँड बाईकचा इन्शुरन्स का घ्यावा?
तुम्ही विकत घेतलेली सेकंड हँड बाईक तुम्हाला चांगली दिसते का? कदाचित ती दिसायला चांगली असेलही पण आधीच्या बाईक मालकाने बाईक वापरल्याने बाईकची जी झीज होत असते त्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही. तुमच्या सेकंड हँड बाईकसाठी इन्शुरन्स आवश्यक का आहे हे समजून घेण्यासाठी खालील काही करणे नीट तपासून घ्या
# कल्पना करा की तुम्ही विकत घेतलेल्या सेकंड-हँड बाईकमध्ये लूज गियर आहे. ट्रॅफिकमध्ये तुम्ही बाईक चालवत असताना, तुमचे गिअर्स बंद पडले आणि दुर्दैवाने अपघात झाला. या अपघातात तुमच्या बाईकच्या मडगार्डचे नुकसान झाले आणि हँडल फिरले. या प्रकरणात, इन्शुरन्स तुमच्या बाईकच्या नुकसानीसाठी दुरुस्तीचा खर्च कव्हर करेल. त्यामुळे, कोणत्याही परिस्थितीत तुमच्या सेकंड-हँड बाइकसाठी इन्शुरन्स पॉलिसी आवश्यक आहे.
# इन्शुरन्स कव्हर पादचारी (तृतीय-पक्ष) रस्ता ओलांडत असताना तुम्हाला धडकल्यास उद्भवणाऱ्या लिगल लायॅबलिटीजपासून वाचवेल.पिवळा ट्रॅफिक सिग्नल दिसल्यावर शेवटच्या काही मिनिटांत तुम्ही रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी एका पादचाऱ्याने घाईघाईने रस्ता ओलांडण्यास सुरुवात केली.मग पुढच्याच सेकंदात तुम्हा दोघांचा अपघात झाला. तुमच्या मारामुळे तो जमिनीवर पडला आणि त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाला.
ही पूर्णपणे तुमची चूक होती आणि म्हणून तुम्ही नुकसान भरपाईसाठी जबाबदार असाल. तृतीय-पक्षाच्या शारीरिक दुखापतीसाठी तुम्हाला जो खर्च करावा लागतो, त्याची भरपाई इन्शुरन्स पॉलिसी करेल.
# वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे केवळ स्वत:ला वाचवण्यासाठीच नाही तर रस्त्यावरील इतरांना त्रास होऊ नये म्हणूनही अनिवार्य आहे.
तुम्ही मित्रांसह मस्त बाईक राईडवर गेला होता. त्यापैकी एकाने विकत घेतलेल्या सेकंड हँड बाईकचा वेग वाढवला. तेवढ्यात रस्त्याच्या उजव्या बाजूने एक कार आली आणि ती त्याला धडकली. यात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. त्याच्याकडे इन्शुरन्स कव्हर होते ज्यामध्ये त्याने मालक-ड्रायव्हरसाठी पीए कव्हर निवडले. मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास इन्शुरन्स कंपनी वाहन मालकाच्या नॉमिनीला पैसे देईल.
अपघातामुळे झालेल्या दुखापतीनंतर दुरुस्ती आणि उपचाराचा आर्थिक भार दूर ठेवण्यासाठी आपल्याला टू-व्हिलर इन्शुरन्स आवश्यक आहे. तुमच्या सेकंड हँड बाईक इन्शुरन्सचा प्रीमियम मिळवण्यासाठी बाईक इन्शुरन्स कॅल्क्युलेटर वापरा.
सेकंड-हँड बाइक इन्शुरन्ससह ॲड-ऑन कव्हर
बेसिक कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स व्यतिरिक्त, शक्य असल्यास कव्हरेज वाढवण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही निवडू शकता असे काही ॲड-ऑन कव्हर्स पुढीलप्रमाणे आहेत:
आयआरडीएने थर्ड पार्टी लायॅबिलिटी पॉलिसी अंतर्गत गाडीवर मागे बसलेल्या व्यक्तीसाठी तरतूद केली आहे. अपघात झाल्यास, बाईकवर मागे बसलेल्या व्यक्तीसाठी 3 लाख. रु.चे संरक्षण दिले जाईल. आणि मागे बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्याच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये भरपाई दिली जाईल.
बाईकची मालकी आणि इन्शुरन्स हस्तांतरित करा
सेकंड हँड बाईकचे तुम्ही तेव्हाच मालक असाल जेव्हा वाहनाच्या आरसी (RC) वर तुमचे नाव असेल. त्यामुळे, तुम्ही शहराभोवती तुमच्या पहिल्या राइडसाठी निघण्यापूर्वी, सर्व संबंधित कागदपत्रे तुमच्या नावावर असल्याची खात्री करा.
तुम्ही हस्तांतरणाची विनंती सुरू करण्यापूर्वी, तुम्हाला आरटीओकडून जेथे वाहनाची नोंदणी केली गेली होती तिथून ना हरकत पत्र (NOC) घेणे आवश्यक आहे. जर वाहन कर्जावर खरेदी केले असेल तर, आरटीओसह, बँकरकडून ना हरकत पत्र ((NOC) देखील आवश्यक असेल.
तुमच्या सेकंड-हँड बाईकच्या मालकीचे हस्तांतरण पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:
# मालकासह स्थानिक आरटीओला भेट द्या. त्याला बाईकची मालकी हस्तांतरित करण्याचे कारण नमूद करणारा विनंती अर्ज दाखल करावा लागेल आणि फॉर्म 29 भरावा लागेल. तो मालकाने भरावा जो तेथे मूळ आरसी(RC) तयार करेल.
# स्वयं-साक्षांकित (सेल्फ अटेस्टेड) मोटर इन्शुरन्सची कॉपी सबमिट करा.
# त्यानंतर तुम्हाला फॉर्म 30 भरावा लागेल आणि तो आरटीओमध्ये सबमिट करावा लागेल.
# तुमच्या (नवीन मालकाच्या) पत्त्याच्या पुराव्याची (ॲड्रेस प्रूफ) अटेस्टेड फोटोकॉपी सबमिट करा.
# प्रदूषण नियंत्रणाचे प्रमाणपत्र (PUC) सादर करा.
# इतर कागदपत्रांसह, तुम्हाला पॅन किंवा फॉर्म 60 किंवा फॉर्म 61 ची अटेस्टेड कॉपी द्यावी लागेल.
# हस्तांतरण शुल्क लागू असेल त्याप्रमाणे जमा करा.
प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणि मालकी हस्तांतरित होण्यासाठी साधारण 10-15 दिवस लागतील. दरम्यान, बाईकची इन्शुरन्स पॉलिसी आहे की नाही ते तपासा. जर होय, तर तुम्ही इन्शुरन्सचे हस्तांतरण अंमलात आणू इच्छिता की नाही हे ठरवा किंवा त्याऐवजी तुम्ही तुमच्या इच्छित इन्शुरन्स कंपनीकडून नवीन इन्शुरन्स पॉलिसी घ्याल.
समजा इन्शुरन्स पॉलिसी अस्तित्वात आहे आणि तुम्हाला ती तुमच्या नावावर हस्तांतरित करायची आहे. या प्रकरणात, बाईकच्या पूर्वीच्या मालकाने इन्शुरन्स पॉलिसी, ओळखीचा पुरावा, वाहन नोंदणीची प्रत आणि फॉर्म 20 आणि फॉर्म 30 च्या फोटोकॉपीसोबत इन्शुरन्स कंपनीला भेट दिली पाहिजे. इन्शुरन्स कंपनीला विनंती पूर्ण करण्यासाठी व नाव बदलण्यासाठी सुमारे 15 दिवस लागू शकतात.
सेकंड-हँड बाईक खरेदी करण्यापूर्वी तपासण्यासारख्या गोष्टी
ज्ञानी माणूस सगळी माहिती घेतल्याशिवाय काहीही विकत घेत नाही किंवा त्याचे फायदे/वैशिष्ट्यांचे विश्लेषण केल्याशिवाय निवड करत नाही. आणि जेव्हा ती सेकंड-हँड बाईक असते, तेव्हा तुम्हाला त्याबद्दल खात्री असणे आवश्यक आहे. सेकंड हँड बाईक खरेदी करण्यापूर्वी तपासल्या पाहिजेत अशा काही गोष्टी इथे दिल्या आहेत:
- बाईकची संपूर्ण तपासणी करा: बाईककडे काळजीपूर्वक पाहा आणि तुम्ही निरीक्षण केलेल्या गोष्टींसाठी काही संशोधन करा. तुमचे डोळे उघडे ठेवा आणि तुमची विवेकबुद्धी जागृत ठेवा. कोणतेही ओरखडे किंवा काही धडकल्याची चिन्हे आहेत का ते शोधा.
- असामान्य आवाज तपासा: बाईक सुरू करा आणि निष्क्रियतेच्या वेळी आणि वेग वाढवताना आवाज येत नाही ना हे तपासा. या व्यतिरिक्त, तुम्ही आवाजासाठी इंडिकेटर, दिवे आणि हॉर्न तपासले पाहिजेत.
- सर्व कागदपत्रांची पडताळणी करा: इंजिनवर नमूद केल्याप्रमाणे आरसी (RC) चा समान ओळख क्रमांक आहे का ते तपासा. तुम्ही क्लेम करता तेव्हा कोणतीही विसंगती समस्या निर्माण करेल.
- सर्व्हिसिंगविषयीची माहिती जाणून घ्या: तुम्ही बाईकच्या मालकाला गाडीच्या सर्व्हिसिंगची वारंवारता आणि ती कुठे केली होती त्या केंद्राबद्दल विचारले पाहिजे.
- टेस्ट राइड घ्या: तुम्ही बाईक टेस्ट ड्राइव्हसाठी घेतल्याची खात्री करा. एक खडबडीत रस्ता निवडा ज्यावर तुम्ही बाईकच्या कामगिरीचे सर्वोत्तम मूल्यांकन करू शकता. त्याचे सस्पेन्शन आणि ब्रेक्स त्यांचा खेळ दाखवतील.
तर तुम्ही तुमची सेकंड-हँड बाईक खरेदी करण्यापूर्वी तपासण्यासाठी पॉइंटरसह सज्ज आहात. तुम्हाला मालकी हस्तांतरित करण्याची आणि तुमच्या नावावर इन्शुरन्स हस्तांतरित करण्याची प्रक्रिया देखील माहित आहे. पण तुम्हाला नवीन इन्शुरन्स पॉलिसी हवी असेल तर? हा छोटासा मुद्दा तुम्हाला खूप चिंतित करतो का ? सेकंड हँड बाईकसाठी नवीन इन्शुरन्स कसा मिळवता येईल ते पाहू.
तुमच्या सेकंड-हँड बाईकसाठी नवीन इन्शुरन्स खरेदी करू इच्छिता ?
जर तुमची सेकंड-हँड बाईक वैध इन्शुरन्ससह येत नसेल, किंवा तुम्ही सध्याच्या बाईकवर फारसे खूश नसाल, तर तुम्ही पुढील प्रक्रियेद्वारे तुमच्या सेकंड-हँड बाईकसाठी नवीन इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करू शकता:
# बर्याच इन्शुरन्स कंपन्यांकडे ऑनलाइन-सक्षम प्रक्रिया असतात. त्यांच्या वेबसाइटना ऑनलाइन भेट द्या.
# ऑनलाइन पोर्टलद्वारे तुमच्या आरसीची स्कॅन केलेली प्रत(कॉपी), इनव्हॉइसची प्रत (कॉपी) आणि ओळखीचा पुरावा सबमिट करा. किंवा तुम्ही नोंदणीच्या शहरात, मॉडेलचे नाव आणि प्रकार आणि नोंदणीची तारीख फक्त पंच करू शकता.
# इन्शुरन्स कंपनी तपासणीची व्यवस्था करेल, त्यानंतर तुम्ही प्रीमियम भरू शकता.
# कोणतीही प्रतीक्षा करावी लागणार नाही आणि तुम्हाला तुमच्या इन्शुरन्सची कॉपी मिळेल.
शेवटी, तुमच्या स्वप्नातील बाईक तुमच्या मालकीची आहे. जीवन साहसाने भरलेले आहे पण ते मौल्यवान आहे. तुम्ही खरेदी केलेली बाईक, अगदी वापरलेली बाईकही चालवत असताना तुम्ही सेफ्टी स्टँडर्ड पाळत आहात याची खात्री करा. हे केवळ तुम्हालाच नाही तर रस्त्यावरील इतर प्रवाशांनादेखील वाचवेल.