टू-व्हीलर इन्शुरन्ससंदर्भात ॲड-ऑन कव्हर म्हणजे काय?
आपल्या लाडक्या टू-व्हिलरसाठी आपल्यापैकी बहुतेकजण कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हीलर इन्शुरन्स घेऊन खूश होतात. कारण आपल्याला वाटतं की आपल्या सुरक्षेच्या सगळ्या गरजा त्यानं पूर्ण होतात. पण खरंच तसं आहे का?
चला, उदाहरणासह समजून घेऊया. तुम्ही तुमचा आवडत्या पिझ्झा ऑर्डर केला. तो चवीला चांगलाच असतो. पण त्यावर तुमच्या आवडीची काही जास्तीची टॉपिंग्ज असली तर तो जास्त चविष्ट लागेल ना? थोडे जास्त ऑलिव्ह्ज किंवा खारवलेल्या मिरच्या, टॅबॅस्को सॉसचे काही थेंब. सुटलं ना तोंडाला पाणी ?😊
तुमच्या टू-व्हीलर कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्सचंही तसंच आहे. इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला ॲड-ऑन्सची एक श्रेणी देतात. त्यातून निवडून तुम्ही तुमचे कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स कव्हर जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह करू शकता!
इथे आम्ही माहिती देत आहोत 5 आघाडीच्या ॲड-ऑन कव्हर्सची जी तुमच्या टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीसोबत तुम्ही नक्की घ्यावीत असं आम्ही सुचवू. मात्र हेही जरूर लक्षात घ्या की या सर्व ॲड-ऑन्ससाठी तुमच्या मूळ इन्शुरन्स पॉलिसीच्या प्रीमियमपेक्षा अगदी मोजकाच जास्त प्रीमियम भरावा लागतो. आणि त्यामुळे तुमच्या खिशाला काही मोठा भार होणार नसला तरीही तुम्ही दिलेल्या प्रत्येक पैशाचा तुम्हाला उत्तम मोबदला मिळणार आहे हेही लक्षात ठेवा.
हे बघा: ॲड-ऑन्ससहित इन्शुरन्स प्रीमियम मोजण्यासाठी टू-व्हीलर इन्शुरन्स प्रीमियम कॅलक्युलेटर वापरा.
डिजिटद्वारे दिले जाणारे टू-व्हीलर इन्शुरन्स ॲड-ऑन्स
शेवटी निष्कर्ष असा की ॲड-ऑन कव्हर्स घेऊन तुम्ही तुमच्या बाईकवर निर्धास्त मनाने स्वार व्हा. कारण तुम्ही सुरक्षित आहात असे नाही तर तुमच्याकडे कवच-कुंडले आहेत 😊!