ट्रॅक्टर इन्शुरन्स

कृषि/शेतीसाठीच्या ट्रॅक्टर्ससाठी कमर्शियल व्हेहिकल इन्शयुरन्स

Third-party premium has changed from 1st June. Renew now

 ट्रॅक्टर इन्शुरन्स ही तुमच्या ट्रॅक्टरचे अपघात, टक्कर, नैसर्गिक आपत्ती, आग किंवा चोरी यांसारख्या घटनांमुळे उद्भवू शकणार्‍या कोणत्याही अनपेक्षित नुकसान आणि तोट्यापासून संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेली एक प्रकारची कमर्शियल वाहन इन्शुरन्स पॉलिसी आहे.

ट्रॅक्टरसाठीची थर्ड-पार्टी लायबिलिटी पॉलिसी फक्त थर्ड-पार्टीला होणारे नुकसान कव्हर करते, तर ट्रॅक्टरचा सर्वसमावेशक इन्शुरन्स तुम्हाला स्वतःला झालेले नुकसान आणि तोटादेखील कव्हर करतो. त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या व्यवसायाला तुमच्या ट्रॅक्टरसाठी आवश्यक अश्या योग्य तेवढया रकमेचे कव्हरेज मिळते.

मी ट्रॅक्टर इन्शुरन्स का घ्यावा?

  • तुम्ही किंवा तुमची संस्था तुमच्या रोजच्या कामासाठी एक किंवा अधिक ट्रॅक्टर वापरत असाल तर  मोटार व्हेहिकल अॅक्टनुसार किमान थर्ड पार्टी लायॅबिलिटी ट्रॅक्टर इन्शुरन्स असणे अनिवार्य आहे. त्याने तुमच्या व्यवसायिक मालकीच्या ट्रॅक्टरमुळे थर्ड पार्टीला झालेल्या कोणत्याही नुकसान आणि तोट्यापासून आर्थिक संरक्षण मिळते.
  • लहान मोठ्या जोखमींचा सामना सर्वच व्यवसायांना करावा लागतो. पण जर तुमचा व्यवसाय साधन-सामग्रीवर खूप भर असणारा असेल आणि अनेक ट्रॅक्टर व्यवसायाच्या कामासाठी वापरले जात असतील, तर तुमच्या सर्व ट्रॅक्टर्सचे आणि ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरचे/मालकाचे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही खरं तर ट्रॅक्टर इन्शुरन्स घ्यायलाच हवा.
  • तुमच्या ट्रॅक्टरचा इन्शुरन्स काढल्याने तुम्हाला अनपेक्षित होणाऱ्या मोठ्या नुकसानापासून संरक्षण मिळते. व्यवसायात नैसर्गिक आपत्ती, आग वगैरेंमुळे येणाऱ्या संकटांपासून बचाव होतो.

कमर्शियल ट्रॅक्टर इन्शुरन्स डिजिटमार्फतच का?

कमर्शियल ट्रॅक्टर इन्शुरन्समध्ये कशाचा समावेश असतो?

यात कशाचा समावेश नाही?

तुमच्या कमर्शियल ट्रॅक्टर इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कशाचा समावेश होत नाही हे माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून कधी क्लेम करायची वेळ असल्यास तुमच्यावर चकित व्हायची पाळी  येऊ नये. अश्या काही परिस्थिति खाली दिल्या आहेत :

थर्ड पार्टी पॉलिसीधारकाचे स्वतःचे नुकसान

जर तुम्ही तुमच्या ट्रॅक्टरचा फक्त थर्ड पार्टी कमर्शियल इन्शुरन्स घेणार असाल तर तुमचे स्वतःचे होणारे कोणतेही नुकसान त्यामध्ये कव्हर होणार नाही.

Drunk Driving, or Driving Without a valid License

जर क्लेमदरम्यान ड्रायव्हर-मालक वैध ड्रायव्हिंग लायसेन्सशिवाय किंवा दारूच्या नशेत ट्रॅक्टर चालवत असल्याचे आढळले तर क्लेम मंजूर होत नाही.

नुकसनास जबाबदार निष्काळजीपणा

ट्रॅक्टरला नुकसान होण्यास कारणीभूत वर्तन केले असल्यास असे नुकसान कव्हर होणार नाही. उदाहरणार्थ, गावात पूर आलेला असतानासुद्धा कोणी ट्रॅक्टर बाहेर काढला असेल तर.

आनुषंगिक नुकसान

कोणतेही नुकसान जे अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा आग यांचा थेट परिणाम म्हणून झालेले नसेल तर ते कव्हर होत नाही.

डिजिटच्या कमर्शियल ट्रॅक्टर इन्शुरन्सची ठळक वैशिष्ट्ये

ठळक वैशिष्ट्ये डिजिटचा फायदा
क्लेम प्रक्रिया कागदपत्र विरहित क्लेम
ग्राहक सपोर्ट 24x7 सपोर्ट
अतिरिक्त कव्हरेज पीए (PA) कव्हर, कायदेशीर दायित्वासाठी कव्हर, खास एक्सक्ल्युजन्स आणि अनिवार्य डिडक्टिबल्स इ.
थर्ड पार्टीचे नुकसान वैयक्तिक हानी झाल्यास अमर्यादित, मालमत्ता/वाहन यांची हानी झाल्यास 7.5 लाखांपर्यंत दायित्व

कमर्शियल ट्रॅक्टर इन्शुरन्सचे प्रकार

तुमच्या ट्रॅक्टरचा प्रकार आणि तुम्हाला इन्शुअर करायच्या असणाऱ्या ट्रॅक्टर्सची संख्या यांच्यावर अवलंबून तुम्ही दोन प्राथमिक प्लॅन्समधून निवड करू शकता

फक्त दायित्व स्टँडर्ड पॅकेज

तुमच्या ट्रॅक्टरमुळे कोणत्याही थर्ड पार्टीला झालेले नुकसान.

×

तुमच्या ट्रॅक्टरमुळे कोणत्याही थर्ड पार्टीच्या व्हेहिकलला झालेले नुकसान.

×

तुमच्या ट्रॅक्टरचे नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी किंवा अपघातामुळे झालेले नुकसान.

×

मालक-ड्रायव्हरला इजा किंवा त्यांचा मृत्यू

If the owner-driver doesn’t already have a Personal Accident Cover from before

×
Get Quote Get Quote

क्लेम कसा कराल?

आम्हाला 1800-258-5956 वर कॉल करा किंवा hello@godigit.com वर मेल करा.

तुमचा पॉलिसी क्रमांक, अपघाताची जागा, तारीख आणि वेळ आणि इन्शुअर्ड व्यक्ती/फोन करणारी व्यक्ती यांचा संपर्क क्रमांक वगैरे तपशील तयार ठेवा ज्यामुळे आम्हाला प्रक्रिया करणे सुलभ होते.

डिजिटचे इन्शुरन्स क्लेम्स निकालात निघायला किती वेळ लागतो? तुम्ही तुमची इन्शुरन्स कंपनी बदलू इच्छित असाल तर हा प्रश्न सर्वप्रथम तुमच्या मनात यायला हवा. तुम्ही योग्य प्रकारे विचार करत आहात! डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा

भारतात ऑनलाइन ट्रॅक्टर इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

ट्रॅक्टर इन्शुरन्समध्ये ड्रायव्हरचे कव्हरही समाविष्ट असते का?

होय, ट्रॅक्टर इन्शुरन्समध्ये व्हेहिकल आणि मालक-ड्रायव्हर दोघांचा समावेश असतो.

मला माझे सर्व ट्रॅक्टर्स एकाच पॉलिसीद्वारे इन्शुअर करता येतील का?

नाही, प्रत्येक ट्रॅक्टरची वेगळी पॉलिसी असणे आवश्यक असते. पण आमच्याशी संपर्क साधून तुम्ही तुमचे सर्व ट्रॅक्टर्स वाजवी प्रीमियमच्या हप्त्यासह इन्शुअर करण्यासाठी कस्टमाइज्ड कोट मिळवू शकता.

ट्रॅक्टर्सचा इन्शुरन्स घेणे अनिवार्य आहे का?

होय, मोटर व्हेहिकल्स अॅक्टप्रमाणे भारतीय रस्त्यांवर कायदेशीरपणे चालवायचे असेल तर ट्रॅक्टर्सचा किमान थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे अनिवार्य आहे. शिवाय ट्रॅक्टर्स म्हटले की त्यांच्याशी संबंधित जोखीमही मोठी असते, त्यामुळे त्यासाठी जास्तीत जास्त कव्हर घेणे केव्हाही चांगले.

थर्ड पार्टी ट्रॅक्टर इन्शुरन्स आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रॅक्टर इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय फरक आहे?

थर्ड पार्टी ट्रॅक्टर इन्शुरन्स तुम्हाला फक्त थर्ड पार्टीच्या मालमत्ता, वाहन किंवा वैयक्तिक इजेमुळे होणाऱ्या नुकसानापासून रक्षण देतो. कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रॅक्टर इन्शुरन्स पॉलिसी नैसर्गिक आपत्ती, अपघात आणि चोरी इत्यादींमुळे होणारे थर्ड पार्टीचे आणि तुमच्या ट्रॅक्टरचे अश्या दोन्हीच्या नुकसानापासून तुम्हाला कव्हर देते.

ट्रॅक्टर इन्शुरन्सची किंमत किती असते?

हे मुळात तुमच्या ट्रॅक्टरची किंमत आणि तुम्ही कोणत्या गावात तो वापरता त्यावर अवलंबून असते. इथे तुम्ही तुमचा इन्शुरन्स प्रीमियम अगदी सहजपणे मोजू शकता.