Third-party premium has changed from 1st June. Renew now
बस इन्शुरन्स म्हणजे काय?
बस इन्शुरन्स ही एक प्रकारची कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स पॉलिसी आहे जी कमर्शिअल बसला अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा आग यासारख्या संभाव्य नुकसान आणि हानीपासून संरक्षण देते. सर्वात मूलभूत योजना थर्ड -पार्टी लायॅबलिटी (कायद्यानुसार आवश्यक) कव्हर करते, तर कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी एका एकत्रित पॉलिसी अंतर्गत, स्वतःचे नुकसान आणि हानीदेखील कव्हर करते.
कव्हर केलेल्या बसचे प्रकार:
- शालेय बस: शाळा किंवा महाविद्यालयासारख्या शैक्षणिक संस्थेचा भाग असलेल्या आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बस या पॉलिसीमध्ये समाविष्ट केल्या जाऊ शकतात.
- सार्वजनिक बस: सरकारी मालकीच्या, शहरांतर्गत किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये प्रवाश्यांची ने-आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बस या पॉलिसीमध्ये समाविष्ट केल्या जाऊ शकतात.
- खाजगी बस: खाजगी संस्थांच्या मालकीच्या बस जसे की टूर बस किंवा त्यांच्या कर्मचार्यांसाठी कार्यालये वापरत असलेल्या बस देखील या पॉलिसी अंतर्गत समाविष्ट केल्या जाऊ शकतात.
- इतर प्रवासी वाहतूक करणार्या बस: प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेण्याच्या उद्देशाने वापरल्या जाणार्या इतर सर्व प्रकारच्या कमर्शिअल बस आणि व्हॅन्सचा समावेश या पॉलिसीमध्ये केला जातो.
मी बस इन्शुरन्स का खरेदी करावा?
- अनपेक्षित नुकसानापासून संरक्षण: तृतीय-पक्षाच्या नुकसानीमुळे असो किंवा तुमच्या स्वत:च्या बसमुळे असो, बस विमा हे सुनिश्चित करतो की तुम्ही त्या संरक्षित आहात, अशा प्रकारे व्यवसायाचे नुकसान आणि तुमच्या दैनंदिन मार्गात येणारा कोणताही त्रास टाळता येईल.
- कायद्याचे पालन करा: मोटर वाहन कायद्यानुसार, सर्व वाहनांसाठी, विशेषत: व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणार्या वाहनांसाठी किमान थर्ड -पार्टी कमर्शिअल बस इन्शुरन्स पॉलिसी असणे बंधनकारक आहे जेणेकरून कोणत्याही संभाव्य तृतीय-पक्षाचे नुकसान आणि तोटा यापासून संरक्षण होईल.इन्शुरन्स नसताना पकडले गेल्यावर तुम्हाला दंड भरावा लागेल.
- मालक-ड्रायव्हरसाठी कव्हर: बस इन्शुरन्स केवळ तुमच्या वाहनाचे किंवा तृतीय पक्षाच्या वाहनाचे नुकसान आणि हानी कव्हर करत नाही, तर त्याच्या मालक-ड्रायव्हरसाठी कोणत्याही शारीरिक इजा किंवा तत्सम गोष्टीदेखील कव्हर करतो.
- प्रवासी संरक्षण: प्रत्येक कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्सचा एक भाग म्हणून, अपघात, आग किंवा नैसर्गिक आपत्ती यासारख्या कोणत्याही दुर्दैवी परिस्थितीच्या बाबतीत, तुम्ही तुमच्या प्रवाश्यांसाठीदेखील कव्हर करण्यासाठी अतिरिक्त फायद्यांच्या पर्यायाची निवड करू शकता.
डिजिटचा कमर्शिअल बस इन्शुरन्स का निवडावा?
कमर्शिअल बस इन्शुरन्समध्ये काय समाविष्ट आहे?
काय कव्हर केलेले नाही?
तुमच्या कमर्शिअल बस इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय समाविष्ट नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुम्ही क्लेम करताना तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार नाही. अशा काही परिस्थितींची माहिती इथे दिली आहे:
तुम्ही तुमच्या बससाठी फक्त थर्ड-पार्टी कमर्शिअल इन्शुरन्स घेत असाल, तर स्वतःचे नुकसान भरून काढले जाणार नाही.
दाव्यादरम्यान, चालक-मालक वैध ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय किंवा दारूच्या प्रभावाखाली बस चालवत असल्याचे आढळल्यास, बस कव्हर केली जाणार नाही.
योगदानात्मक निष्काळजीपणामुळे बसचे कोणतेही नुकसान भरून काढले जाणार नाही. उदाहरणार्थ, शहरात सध्या पूर आला असेल आणि तरीही कोणी बस चालवत असेल.
अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा आग यांचा थेट परिणाम नसलेले कोणतेही नुकसान कव्हर केले जाऊ शकत नाही.
डिजिटच्या कमर्शिअल बस इन्शुरन्सची प्रमुख वैशिष्ट्ये
महत्वाची वैशिष्ट्ये | डिजिट लाभ |
---|---|
क्लेम प्रक्रिया | पेपरलेस क्लेम |
कस्टमर सपोर्ट | 24x7 मदत |
अतिरिक्त कव्हरेज | पीए कव्हर, लिगल लायॅबलिटी कव्हर, स्पेशल एक्सक्ल्यूजन्स आणि कम्पल्सरी डिडक्टिबल्स |
तृतीय-पक्षाचे नुकसान | वैयक्तिक नुकसानीसाठी अमर्यादित लायॅबलिटी, मालमत्ता/वाहनाच्या नुकसानीसाठी ७.५ लाखांपर्यंत |
कमर्शिअल बस इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार11
तुमच्या बसच्या प्रकारावर इन्शुरन्स उतरवण्यासाठी आमच्याकडे प्रामुख्याने दोन प्लॅन्स आहेत.
Liability Only | Standard Package |
तुमच्या बसमुळे तृतीय-पक्षाच्या वाहनाचे होणारे नुकसान |
|
तुमच्या बसमुळे कोणत्याही तृतीय-पक्ष व्यक्ती किंवा मालमत्तेचे होणारे नुकसान |
|
नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी किंवा अपघातामुळे स्वतःच्या बसचे नुकसान किंवा नुकसान. |
|
बस मालक-चालकाला जखम/मृत्यूIf the owner-driver doesn’t already have a Personal Accident Cover from before |
|
Get Quote | Get Quote |
क्लेम कसा करायचा?
आम्हाला १८००-२५८-५९५६ वर कॉल करा किंवा hello@godigit.comवर ईमेल करा.
आमची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तुमचा पॉलिसी क्रमांक, अपघाताचे ठिकाण, अपघाताची तारीख आणि वेळ आणि विमाधारक/कॉलरचा संपर्क क्रमांक यासारखे तुमचे तपशील जवळ ठेवा.
भारतातील कमर्शिअल बस इन्शुरन्सबद्दल अधिक माहिती जाणून घ्या
स्कूल बसचा इन्शुरन्स काढणे महत्त्वाचे आहे का?
होय, नक्कीच! शाळेच्या बसेस प्रामुख्याने शाळा किंवा तृतीय-पक्ष संस्थांद्वारे मुलांना घरापासून शाळेत आणि परत नेण्यासाठी वापरल्या जातात. त्यामुळे, तुम्हाला किमान बस इन्शुरन्स मिळणे महत्त्वाचे आहे जे तुमच्या संस्थेचे केवळ अनपेक्षित नुकसानीपासून संरक्षण करणार नाही तर या बसमधून दररोज प्रवास करणार्या मुलांसाठी आणि शिक्षकांचेदेखील संरक्षण करेल.
योग्य बस इन्शुरन्स पॉलिसी निवडण्यासाठी खालील गोष्टींचा विचार आणि तुलना करणे आवश्यक आहे.
तुमच्या बससाठी योग्य बस इन्शुरन्स ऑनलाइन निवडण्यासाठी, खालील घटकांची तुलना आणि मूल्यमापन करणे महत्त्वाचे आहे:
- योग्य इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू (आयडीव्ही): आयडीव्ही हे तुमच्या बसचे बाजारमूल्य आहे. तुमच्या बस इन्शुरन्सच्या प्रीमियमपासून ते क्लेम पेआउटपर्यंत सर्व काही यावर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या बससाठी योग्य आणि खरा आयडीव्ही देणारी इन्शुरन्स कंपनी निवडली असल्याची खात्री करून घ्या.
- सेवेचे फायदे: 24x7 कस्टमर सपोर्ट आणि कॅशलेस गॅरेजेसचे विस्तृत नेटवर्क यासारख्या सेवांचा विचार करा. गरजेच्या वेळी, या सेवा खरोखरच महत्त्वाच्या असतात.
- ॲड-ऑन्सचे पुनरावलोकन करा: ॲड-ऑन्स तुमच्या बसला मिळणारे कव्हरेज वाढवण्यात मदत करतात. उदाहरणार्थ, आमच्या अतिरिक्त फायद्यांमध्ये वैयक्तिक अपघात कव्हर, पॅसेंजर कव्हर, कम्पल्सरी डिडक्टिबल्स, इलेक्ट्रिक ॲक्सेसरीज कव्हर, इत्यादी कव्हर समाविष्ट आहेत.
- क्लेमची गती: कोणत्याही इन्शुरन्सची ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. तुम्हाला माहीत असलेली इन्शुरन्स कंपनी निवडा जी क्लेम लवकर निकाली काढेल.
- सर्वोत्कृष्ट मूल्य: तुम्ही वरील सर्व घटकांची तुलना पूर्ण केल्यानंतर, बस इन्शुरन्स प्रीमियमची तुलना करा आणि कोणता इन्शुरन्स तुम्हाला चांगल्या किमतीत सर्वोत्तम संभाव्य लाभ देतो ते पाहा.
माझ्या बस इन्शुरन्स प्रीमियमवर कोणते घटक परिणाम करतील ?
तुमच्या बस इन्शुरन्स दरांवर परिणाम करणारे विविध घटक आहेत, जसे की:
- वाहनाचे मॉडेल, इंजिन आणि उत्पादक कंपनी: बाजारात विविध प्रकारच्या बसेस आहेत. त्यांपैकी प्रत्येकाची स्वतःची वैशिष्ट्ये आणि जोखीम पातळी आहे. त्यामुळे तुमच्या वाहनाचे मॉडेल आणि उत्पादक कंपनी याचा इन्शुरन्सच्या दरावर खूप परिणाम होतो.
- ठिकाण: प्रत्येक शहर आणि गाव त्यांच्या स्वत:च्या पातळीच्या जोखमीसह येतात. काही इतरांपेक्षा सुरक्षित आहेत, तर काही इतरांपेक्षा महाग आहेत. त्यामुळे, तुम्ही बस चालवत असलेल्या शहरानुसार, तुमचे बस इन्शुरन्स दर भिन्न असतील.
- नो-क्लेम बोनस: जर तुमच्याकडे आधीपासून तुमच्या बसचा बस इन्शुरन्स असेल आणि सध्याची तुमची पॉलिसी तुम्ही रिन्यू करू इच्छित असाल किंवा नवीन इन्शुरन्स कंपनीकडे जात असाल- तर, या प्रकरणात, तुमचा एनसीबी (नो क्लेम बोनस) देखील विचारात घेतला जाईल. तसेच तुमचा बस इन्शुरन्स प्रीमियम सवलतीच्या दरात येईल!
- इन्शुरन्स प्लॅनचा प्रकार: तुम्हाला तुमच्या बससाठी थर्ड-पार्टी लायॅबलिटी इन्शुरन्स प्लॅन किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह बस इन्शुरन्स घ्यायचा असेल तर; दोघांसाठी बस इन्शुरन्स प्रीमियम भिन्न असेल कारण या प्रत्येक प्लॅनमध्ये ऑफर केलेले कव्हरेजचे फायदे वेगळे असतील.
भारतातील ऑनलाइन बस इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
माझ्या संस्थेमध्ये माझ्याकडे दहापेक्षा जास्त स्कूल बस आहेत. मी त्या सर्वांचा इन्शुरन्स काढू शकतो का?
होय नक्कीच! तुमच्या स्कूल बसचे संरक्षण करण्यासाठी बस इन्शुरन्स तयार केला आहे. तुमच्या सगळ्या बसेस डिजिटच्या इन्शुरन्समध्ये कव्हर केल्या जाऊ शकतात. तुम्हाला फक्त आमच्याशी संपर्क साधायचा आहे जेणेकरून आम्ही तुमच्या संस्थेसाठी कस्टमाइझ प्लॅन देऊ.
कोणत्या प्रकारच्या बसेस समाविष्ट केल्या जाऊ शकतात?
स्कूल बस, व्हॅन, मिनीबस आणि अगदी टूर बसेससह सर्व बसेस आमच्या कमर्शिअल बस इन्शुरन्स अंतर्गत समाविष्ट केल्या जाऊ शकतात.
स्कूल बस विम्याची किंमत किती आहे?
तुम्हाला ज्या बसचा इन्शुरन्स काढायचा आहे त्याचा प्रकार आणि तुमचे स्थान यानुसार तुमच्या बस इन्शुरन्सची किंमत वेगवेगळी असेल. तुमच्या शाळेच्या बस इन्शुरन्सची किंमत किती असू शकते हे समजून घेण्यासाठी, तुमची माहिती येथे भरा.