मुदत संपलेल्या कार इन्शुरन्सचे ऑनलाइन नुतनीकरण

Get Instant Policy in Minutes*

Third-party premium has changed from 1st June. Renew now

मुदत संपलेल्या कार इन्शरन्सचे ऑनलाइन नुतनीकरण करा

तुमच्‍या कारची देखभाल करण्‍यासाठी सर्वात आवश्‍यक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे, तिच्या इन्शुरन्सचे वेळेवर नुतनीकरण करणे. ऐनवेळी मोठ्या खर्चात पडायचं नसेल तर आपल्या इन्शुरन्सची मुदत संपण्याच्या आधीच त्याचे नुतनीकरण कधीही हिताचे ठरेल. आपल्याला ठाऊकच असेल की, कार इन्शुरन्स तुम्हाला अपघात, नैसर्गिक आपत्ती, चोरी आणि आग यांसारख्या अनपेक्षित नुकसानांसाठी कव्हर करतो. इतकेच नव्हे तर हा इन्शुरन्स तुम्हाला कायद्यापासून देखील संरक्षित ठेवतो.

सामान्यतः कार इन्शुरन्स एक वर्ष किंवा त्याहून अधिक पॉलिसी कालावधीसह येतो. या कालावधीनंतर तुम्हाला निदान इन्शुरन्स संपल्याच्या दिवशी किंवा सर्वात उत्तम म्हणजे त्याआधी नुतनीकरण करणे अनिवार्य आहे. तथापि, जर तुमचा कार इन्शुरन्स संपून बराच कालावधी झाला असेल, तरीही लवकरात लवकर कार इन्शुरन्सचे ऑनलाइन नुतनीकरण करण्याचा प्रयत्न करा.

तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीची मुदत संपल्यावर काय होते?

तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीसह सर्वकाही मुदत संपण्याच्या तारखेसह येते. जेव्हा ती मुदत संपते तेव्हा काय होते? अगदी एका वाक्यात सांगायचे तर, तुम्हाला त्याचे कोणतेही फायदे मिळू शकत नाहीत!

त्यामुळे जर तुमच्या कार इन्शुरन्सची मुदत संपली असेल आणि तुम्ही अद्याप त्याचे नुतनीकरण केले नसेल, तर खालील काही फायदे आहेत जे तुम्ही गमवाल:

१. नुकसान भरपाई नाही

कार इन्शुरन्स पॉलिसी विकत घेण्यामागे किंवा त्याचे नुतनीकरण करण्याचे प्राथमिक कारण म्हणजे, कारचे किंवा कारमुळे होणारे कोणतेही अनपेक्षित नुकसान आपल्या खिश्यावर ऐनवेळी भार ठरू नये. मात्र, तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीची मुदत संपलेली असल्यास, तुम्ही यापुढे कोणत्याही भरपाईसाठी पात्र राहणार नाही.

२. कायदेशीर परिणामांना सामोरे जा

कार इन्शुरन्स पॉलिसी (किमान थर्ड पार्टी कार इन्शुरन्स) कायद्याने अनिवार्य आहे. इन्शुरन्स नसल्यास कार मालकांना १,००० ते २,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. तुमची कार इन्शुरन्स पॉलिसी आधीच संपलेली असताना तुम्ही पकडले गेल्यास, तुम्हाला दंड भरावा लागेल.

३. तुमचा ‘नो क्लेम बोनस’ गमवाल

जर तुमच्याकडे पूर्वी कार इन्शुरन्स पॉलिसी असेल, तर तुम्हाला ‘नो क्लेम बोनस’ बद्दल माहिती असेल. नो क्लेम बोनस म्हणजे तुमच्या कार इन्शुरन्स नुतनीकरण प्रीमियमवर तुम्हाला मिळणाऱ्या सवलतीचा संदर्भ आहे जर तुम्ही मागील पॉलिसी वर्षात कोणताही दावा(क्लेम) केला नसेल.तर, तुम्हाला त्याचा लाभ मिळेल याची खात्री करण्यासाठी, तुमची पॉलिसी संपण्यापूर्वी तुम्हाला नुतनीकरण करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीची मुदत संपल्यावर नुतनीकरण केल्यास दुर्दैवाने तुम्ही संभाव्य सवलत गमवाल.

४. पुन्हा एकदा तपासणी करा!

जर तुम्ही तुमच्या सर्वसमावेशक कार इन्शुरन्स पॉलिसीचे नुतनीकरण करण्याची योजना आखत असाल आणि तुमच्या सध्याच्या पॉलिसीची मुदत आधीच संपली असेल, तर नुतनीकरण करताना तुम्हाला पुन्हा एकदा स्वयं-तपासणीच्या प्रक्रियेतून जावे लागेल.स्मार्टफोन-सक्षम प्रक्रियांसह, डिजिटमध्ये हे खूपच सोपे आहे. 

त्यामुळेच, तुमच्यासाठी सर्वोत्तम परिस्थिती म्हणजे नेहमी वेळेवर किंवा वेळेअगोदर पॉलिसी नुतनीकरण करावे. तथापि, आपण अद्याप ते केले नसले तरीही उशीर झालेला नाही! डिजिटसह तुम्ही मुदत संपलेल्या इन्शुरन्सचे ऑनलाइन नुतनीकरण कसे करू शकता हे पाहण्यासाठी पुढील माहिती वाचा.

डिजिटसह मुदत संपलेल्या कार इन्शुरन्सचे ऑनलाइन नुतनीकरण कसे करावे?

तुम्ही तुमच्या मुदत संपलेल्या कार इन्शुरन्स पॉलिसीचे ऑनलाइन नुतनीकरण करू इच्छित असल्यास पुढील सोपे टप्पे (स्टेप्स) एकदा पाहा :

टप्पा १

वर तुमचा कार क्रमांक भरा किंवा तुमच्या वाहनाची उत्पादक कंपनी, मॉडेल, व्हेरिएंट, नोंदणीची तारीख आणि तुम्ही ज्या शहरात गाडी चालवत आहात त्याची माहिती द्या. ‘गेट कोट’ वर क्लिक करा आणि तुमचा पर्याय निवडा.

टप्पा २

थर्ड-पार्टी लायबिलिटी, ओन्ली कार इन्शुरन्स पॉलिसी किंवा स्टँडर्ड/कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसी यापैकी निवडा.

टप्पा ३

आम्हाला तुमच्या आधीच्या इन्शुरन्स पॉलिसीबद्दल माहिती द्या- मुदत संपण्याची तारीख, गेल्या वर्षी केलेले क्लेम्स (असल्यास).

टप्पा ४

तुमचा कार इन्शुरन्स प्रीमियम आता तयार केला जाईल. जर तुम्ही स्टँडर्ड प्लॅन निवडला असेल तर तुम्ही कार इन्शुरन्समधील ॲड-ऑन निवडून,आयडीव्ही सेट करून आणि तुमच्याकडे सीएनजीची कार आहे का याची पुष्टी करून पॉलिसी पुढे कस्टमाइझ करू शकता. त्यानंतर तुम्हाला पुढील पेजवर प्रीमियम दिसेल.

तुम्ही डिजिटचा कार इन्शुरन्स का घ्यावा?

तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीची मुदत संपल्यावर लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

एकदा तुमच्या इन्शुरन्सची मुदत संपण्याची तारीख जवळ आली की, तुम्ही तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीचे त्वरित नुतनीकरण करावे. तथापि, काही प्रकरणांमध्ये वेळ लागू शकतो आणि आम्हीही ते समजतो.कदाचित हा निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला काही कार इन्शुरन्स कंपन्यांचे मूल्यमापन करायचे असेल किंवा स्व-तपासणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुम्हाला वेळ हवा असेल.

मात्र अशावेळी जर तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीची मुदत आधीच संपली असेल किंवा ती अद्याप सक्रिय नसेल, तर तुम्हाला आणि तुमची कार सुरक्षित ठेवण्यासाठी येथे काही गोष्टी केल्या पाहिजेत.

  • वैध कार इन्शुरन्स पॉलिसीशिवाय वाहन चालवणे टाळा. शेवटी, काय होऊ शकते हे आपल्याला माहित नसते तुम्‍हाला पोलिसांनी पकडल्‍यास किंवा एखाद्या लहानशा अपघातामुळे नुकसान झाल्यास ते किती खर्चिक होऊ शकते हे आपणही सांगू शकत नाही. 
  • तुम्ही तुमची सध्याची कार इन्शुरन्स कंपनी बदलण्याबाबत गोंधळात असाल तर तुमच्या पर्यायांचे ऑनलाइन मूल्यांकन करा आणि माहिती गोळा करून योग्य निर्णय घ्या. शेवटी, तुमची कार ही तुमच्या सर्वात मौल्यवान वस्तूंपैकी एक आहे आणि तुम्हाला तिच्या सुरक्षिततेसाठी योग्य निर्णय घ्यायचा आहे.
  • तुम्ही तुमच्या पॉलिसीचे ऑनलाइन नुतनीकरण करत असताना दीर्घ मुदतीची पॉलिसी निवडू शकत असल्यास, अशा प्रकारे तुम्हाला काही काळ नुतनीकरणाची काळजी करण्याची गरज नाही.

मुदत संपलेल्या कार इन्शुरन्सच्या नुतनीकरणाबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

माझ्या कार इन्शुरन्स पॉलिसीची मुदत दोन दिवसांपूर्वी संपली असताना माझा नो क्लेम बोनस अजूनही वैध असेल का?

नाही. दुर्दैवाने, तुमच्या नो क्लेम बोनसचा फायदा घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या पॉलिसीचे मुदत संपण्याच्या तारखेपूर्वी नुतनीकरण करा.

मला मुदत संपलेल्या कार इन्शुरन्स पॉलिसीसह पकडले गेल्यास काय दंड होईल?

मुदत संपलेल्या कार इन्शुरन्स पॉलिसीसह वाहन चालवणे म्हणजे कार इन्शुरन्स नसताना गाडी चालवण्यासारखेच आहे. भारतात असे केल्यामुळे १,००० ते २,००० रुपये दंड भरावा लागू शकतो. वाहतूक दंड आणि दंडांची संपूर्ण यादी येथे पाहा.

माझ्या कार इन्शुरन्स पॉलिसीची मुदत संपल्यानंतर मी त्याचे नुतनीकरण करू शकतो का?

होय आपण हे करू शकता. तथापि, जर पॉलिसीची मुदत संपल्यानंतर एक महिन्याहून अधिक काळ झाला असेल तर तुमची पॉलिसी पूर्णपणे बंद झाली आहे. मात्र तरीही तुम्ही तुमची कार इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी करू शकता.

मी माझ्या कार इन्शुरन्स पॉलिसीची मुदत संपण्याची तारीख कशी तपासू?

तुम्ही तुमची कार इन्शुरन्स पॉलिसी डिजिटसह खरेदी केली असेल, तर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ईमेलवर तुमची कार इन्शुरन्स पॉलिसीची कागदपत्र प्राप्त झाली असतील. त्या कागदपत्रांवर तुम्ही पॉलिसीची मुदत संपण्याची तारीख  शोधू शकता.

मुदत संपण्याच्या तारखेपूर्वी मी माझ्या कार इन्शुरन्स पॉलिसीचे नुतनीकरण करू शकतो का?

नक्कीच ! किंबहुना हाच सर्वोत्तम मार्ग आहे. तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीची मुदत संपण्याच्या किमान २-३ दिवस अगोदर नुतनीकरण करणे चांगले आहे. जेणेकरून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही आणि तुमची कारदेखील सुरक्षित राहील.