मुदत संपलेल्या कार इन्शुरन्सचे ऑनलाइन नुतनीकरण
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
तुमच्या कारची देखभाल करण्यासाठी सर्वात आवश्यक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे, तिच्या इन्शुरन्सचे वेळेवर नुतनीकरण करणे. ऐनवेळी मोठ्या खर्चात पडायचं नसेल तर आपल्या इन्शुरन्सची मुदत संपण्याच्या आधीच त्याचे नुतनीकरण कधीही हिताचे ठरेल. आपल्याला ठाऊकच असेल की, कार इन्शुरन्स तुम्हाला अपघात, नैसर्गिक आपत्ती, चोरी आणि आग यांसारख्या अनपेक्षित नुकसानांसाठी कव्हर करतो. इतकेच नव्हे तर हा इन्शुरन्स तुम्हाला कायद्यापासून देखील संरक्षित ठेवतो.
सामान्यतः कार इन्शुरन्स एक वर्ष किंवा त्याहून अधिक पॉलिसी कालावधीसह येतो. या कालावधीनंतर तुम्हाला निदान इन्शुरन्स संपल्याच्या दिवशी किंवा सर्वात उत्तम म्हणजे त्याआधी नुतनीकरण करणे अनिवार्य आहे. तथापि, जर तुमचा कार इन्शुरन्स संपून बराच कालावधी झाला असेल, तरीही लवकरात लवकर कार इन्शुरन्सचे ऑनलाइन नुतनीकरण करण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीसह सर्वकाही मुदत संपण्याच्या तारखेसह येते. जेव्हा ती मुदत संपते तेव्हा काय होते? अगदी एका वाक्यात सांगायचे तर, तुम्हाला त्याचे कोणतेही फायदे मिळू शकत नाहीत!
त्यामुळे जर तुमच्या कार इन्शुरन्सची मुदत संपली असेल आणि तुम्ही अद्याप त्याचे नुतनीकरण केले नसेल, तर खालील काही फायदे आहेत जे तुम्ही गमवाल:
कार इन्शुरन्स पॉलिसी विकत घेण्यामागे किंवा त्याचे नुतनीकरण करण्याचे प्राथमिक कारण म्हणजे, कारचे किंवा कारमुळे होणारे कोणतेही अनपेक्षित नुकसान आपल्या खिश्यावर ऐनवेळी भार ठरू नये. मात्र, तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीची मुदत संपलेली असल्यास, तुम्ही यापुढे कोणत्याही भरपाईसाठी पात्र राहणार नाही.
कार इन्शुरन्स पॉलिसी (किमान थर्ड पार्टी कार इन्शुरन्स) कायद्याने अनिवार्य आहे. इन्शुरन्स नसल्यास कार मालकांना १,००० ते २,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. तुमची कार इन्शुरन्स पॉलिसी आधीच संपलेली असताना तुम्ही पकडले गेल्यास, तुम्हाला दंड भरावा लागेल.
जर तुमच्याकडे पूर्वी कार इन्शुरन्स पॉलिसी असेल, तर तुम्हाला ‘नो क्लेम बोनस’ बद्दल माहिती असेल. नो क्लेम बोनस म्हणजे तुमच्या कार इन्शुरन्स नुतनीकरण प्रीमियमवर तुम्हाला मिळणाऱ्या सवलतीचा संदर्भ आहे जर तुम्ही मागील पॉलिसी वर्षात कोणताही दावा(क्लेम) केला नसेल.तर, तुम्हाला त्याचा लाभ मिळेल याची खात्री करण्यासाठी, तुमची पॉलिसी संपण्यापूर्वी तुम्हाला नुतनीकरण करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीची मुदत संपल्यावर नुतनीकरण केल्यास दुर्दैवाने तुम्ही संभाव्य सवलत गमवाल.
जर तुम्ही तुमच्या सर्वसमावेशक कार इन्शुरन्स पॉलिसीचे नुतनीकरण करण्याची योजना आखत असाल आणि तुमच्या सध्याच्या पॉलिसीची मुदत आधीच संपली असेल, तर नुतनीकरण करताना तुम्हाला पुन्हा एकदा स्वयं-तपासणीच्या प्रक्रियेतून जावे लागेल.स्मार्टफोन-सक्षम प्रक्रियांसह, डिजिटमध्ये हे खूपच सोपे आहे.
त्यामुळेच, तुमच्यासाठी सर्वोत्तम परिस्थिती म्हणजे नेहमी वेळेवर किंवा वेळेअगोदर पॉलिसी नुतनीकरण करावे. तथापि, आपण अद्याप ते केले नसले तरीही उशीर झालेला नाही! डिजिटसह तुम्ही मुदत संपलेल्या इन्शुरन्सचे ऑनलाइन नुतनीकरण कसे करू शकता हे पाहण्यासाठी पुढील माहिती वाचा.
तुम्ही तुमच्या मुदत संपलेल्या कार इन्शुरन्स पॉलिसीचे ऑनलाइन नुतनीकरण करू इच्छित असल्यास पुढील सोपे टप्पे (स्टेप्स) एकदा पाहा :
तुमच्या नवीन कार इन्शुरन्स पॉलिसीसाठी यावेळी डिजिटचा विचार करत आहात? तर आमची ही वैशिष्ट्य एकदा जाणून घ्या...
एकदा तुमच्या इन्शुरन्सची मुदत संपण्याची तारीख जवळ आली की, तुम्ही तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीचे त्वरित नुतनीकरण करावे. तथापि, काही प्रकरणांमध्ये वेळ लागू शकतो आणि आम्हीही ते समजतो.कदाचित हा निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला काही कार इन्शुरन्स कंपन्यांचे मूल्यमापन करायचे असेल किंवा स्व-तपासणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुम्हाला वेळ हवा असेल.
मात्र अशावेळी जर तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीची मुदत आधीच संपली असेल किंवा ती अद्याप सक्रिय नसेल, तर तुम्हाला आणि तुमची कार सुरक्षित ठेवण्यासाठी येथे काही गोष्टी केल्या पाहिजेत.