Third-party premium has changed from 1st June. Renew now
डिजीटचे कार इन्शुरन्स असेल तर, तुमची गाडी कमी चालवली गेली असेल तर तुम्हाला पैसे देखील कमीच भरावे लागतील!
कार इन्शुरन्स : ऑनलाइन कार इन्शुरन्स पॉलिसी त्वरित खरेदी/रिन्यू करा
कार इन्शुरन्स म्हणजे काय?
कार इन्शुरन्स, ज्याला ऑटो किंवा मोटार इन्शुरन्स म्हणूनही ओळखले जाते, ही एक प्रकारची व्हेईकल इन्शुरन्स पॉलिसी आहे जी तुमचे आणि तुमच्या कारचे अपघात, चोरी किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही जोखीम आणि नुकसानांपासून संरक्षण करते. त्यामुळे, अशा कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीमुळे होणारे नुकसान झाल्यास तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असाल. त्या व्यतिरिक्त, तुम्हाला थर्ड पार्टी लायॅबलिटीजपासून देखील संरक्षण दिले जाईल.
तुम्हाला सर्वात मूलभूत, थर्ड पार्टी कार इन्शुरन्ससह कायद्याचे पालन करायचे असेल किंवा तुमच्या कारला कॉम्प्रिहेेन्सिव्ह कार इन्शुरन्स किंवा स्वत:च्या नुकसान पॉलिसीसह संरक्षण द्यायचे असेल तर डिजिट तुम्हाला परवडणाऱ्या प्रीमियमवर ऑनलाइन थर्ड- पार्टी, कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि ओन डॅमेज कार इन्शुरन्स ऑफर करतो.
सर्वात बेस्ट गोष्ट काय? तुमच्या कारला साजेशा 7 फायदेशीर ॲड-ऑनसह तुम्ही तुमचा आयडीव्ही स्वतः कस्टमाइझ करू शकता. त्यामुळे, तुम्ही डिजिट सह कार इन्शुरन्स खरेदी/रिन्यूअल करू इच्छित असाल किंवा क्लेम करू इच्छित असाल तर- सर्वकाही आमच्या जलद आणि सोप्या स्मार्टफोन-सक्षम प्रक्रियेद्वारे ऑनलाइन केले जाऊ शकते.
डिजिट कार इन्शुरन्समध्ये काय कव्हर्ड आहे
डिजिट कार इन्शुरन्ससह अड-ऑन कव्हर्स
कार इन्शुरन्स ॲड-ऑन जे आपण आपल्या कार इन्शुरन्स पॉलिसीसह खरेदी करू शकता
5 वर्षांपेक्षा जुन्या कारसाठी आदर्श, शून्य डेप्रीसीएशन कव्हर आपल्याला आपल्या कार आणि त्याच्या भागांवर आकारले जाणारे डेप्रीसीएशन रद्द करण्यास मदत करते आणि आपल्याला क्लेमदरम्यान दुरुस्ती, खर्च आणि रीप्लेसमेंट्सचे संपूर्ण मूल्य देते.
चोरी किंवा दुरुस्तीच्या पलीकडे नुकसान झाल्यास, रिटर्न टू इनव्हॉइस ॲड-ऑन आपल्याला आपल्या कारच्या चलन मूल्याची संपूर्ण रक्कम परत मिळविण्याचा फायदा देते, ज्यात अनुक्रमे नवीन वाहन नोंदणीचा खर्च आणि त्याचा रोड टॅक्स यांचा समावेश आहे.
सर्वसाधारणपणे, अपघाताच्या वेळी नुकसान होत नाही तोपर्यंत टायरचे नुकसान स्टँडर्ड इन्शुरन्समध्ये कवर्ड केले जात नाही. म्हणूनच हा टायर प्रोटेक्ट ॲड-ऑन आपल्याला टायर फुटणे, फुगणे किंवा कट्स सारख्या टायरच्या इतर सर्व परिस्थितींमध्ये नुकसानीपासून संरक्षण आणि कव्हर करण्याचा फायदा देतो.
आपल्या सर्वांना कधीकधी मदतीची गरज असते! आमचे ब्रेकडाउन असिस्टन्स ॲड-ऑन आपल्याला आवश्यकतेनुसार मदत घेण्याचा फायदा देते, म्हणजेच आपल्याला पाहिजे त्यावेळी कार ब्रेकडाउन दरम्यान मदत करते. सर्वात चांगला भाग? तो क्लेम म्हणूनही गणला जात नाही!
कंझ्यूमेबल कव्हर आपल्या कारला संरक्षणाचा अतिरिक्त थर देते. अपघाताच्या परिस्थितीत इंजिन ऑइल, स्क्रू, नट-बोल्ट्स, ग्रीस इत्यादी आपल्या गाडीच्या सर्व छोट्या-मोठ्या भागांची किंमत यात भरून काढली जाते.
आपल्याला माहित आहे का की आपले इंजिन बदलण्याची किंमत त्याच्या किंमतीच्या अंदाजे 40% आहे? स्टँडर्ड कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये अपघातादरम्यान झालेल्या नुकसानीचाच समावेश असतो. तथापि, इंजिन आणि गिअर-बॉक्स संरक्षण कव्हरसह, आपण अपघातानंतर झालेल्या कोणत्याही परिणामी नुकसानीपासून आपल्या कारच्या जीवनासाठी (इंजिन आणि गिअरबॉक्स!) विशेषतः कव्हर करू शकता.
विमाधारकांनी देऊ केलेल्या 'डेली कन्व्हेयन्स बेनिफिट ॲड ऑन'मुळे पॉलिसीधारकाला विमाधारकाने दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये असताना निश्चित दैनिक भत्ता किंवा स्टॅण्डबाय वाहनाच्या स्वरूपात दैनंदिन वाहतुकीची भरपाई मिळेल, याची खात्री करून घेतली जाते.
चोरी, तोटा किंवा नुकसान झाल्यास कारमधील लॉकसेटची दुरुस्ती किंवा बदली करण्यासाठी पॉलिसीधारकाने केलेला खर्च की आणि लॉक प्रोटेक्ट ॲड-ऑन कव्हरचा भाग म्हणून विमाकंपनीद्वारे कव्हर केला जातो.
पॉलिसीधारक किंवा कुटुंबातील कोणत्याही जवळच्या सदस्याला इन्शुअर्ड वाहनात ठेवल्याला वस्तूंवर पॉलिसीनुसार निर्दिष्ट केलेल्या वैयक्तिक वस्तूंचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई विमाधारकाकडून केली जाईल.
पे ॲज यू ड्राइव कव्हर निवडलेल्या प्लॅनवर आधारित बेस पॉलिसीच्या स्वत: च्या नुकसान कव्हरच्या प्रीमियमवर सूट मिळविण्यास पात्र बनवते. अतिरिक्त प्रीमियम भरून बेस पॉलिसी अंतर्गत टॉप अप किलोमीटर्सचा पर्यायही दिला जातो.
काय कव्हर केलेले नाही?
तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय समाविष्ट नाही हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही क्लेम कराल तेव्हा तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार नाही. येथे अशा काही परिस्थितींविषयी माहिती दिली आहे:
थर्ड-पार्टी किंवा लायॅबिलिटी ओन्ली कार पॉलिसीच्या बाबतीत, स्वतःच्या वाहनाचे नुकसान कव्हर केले जाणार नाही.
तुम्ही दारू पिऊन किंवा वैध ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवत असाल तर.
तुमच्याकडे लर्निंग लायसन्स आहे आणि तुम्ही समोरच्या प्रवासी सीटवर वैध ड्रायव्हिंग लायसन्स-धारकाशिवाय गाडी चालवत आहात.
अपघाताचा थेट परिणाम नसलेले कोणतेही नुकसान (उदा. अपघातानंतर, खराब झालेली कार चुकीच्या पद्धतीने चालवल्यास आणि इंजिन खराब झाल्यास, ते कव्हर केले जाणार नाही)
कोणताही काँट्रीब्युटॉरी नेगलीजन्स (उदा. पूर आलेला असताना गाडी चालवली असताना, जे मॅन्युफॅक्चररच्या ड्राईव्हिंग मॅन्युअल मध्ये निषिद्ध सांगितलेले आहे, कव्ह केले जाणार नाही.
ॲड-ऑन्समध्ये काही परिस्थितींचा समावेश आहेत. तुम्ही ते ॲड-ऑन विकत घेतले नसल्यास, संबंधित परिस्थिती कव्हर केली जाणार नाही.
तुम्ही डिजिट कार इन्शुरन्स का खरेदी करावा?
डिजिट प्रमाणे कार इन्शुरन्सची प्रमुख वैशिष्ट्ये
मुख्य वैशिष्ट्ये | डिजिट लाभ |
---|---|
प्रीमियम | ₹2094 पासून सुरुवात |
नो क्लेम बोनस | 50% पर्यन्त सूट |
कस्टमायझेबल ॲड-ऑन्स | 10 ॲड-ऑन्स उपलब्ध |
कॅशलेस दुरुस्ती | डोअरस्टेप पिकअप आणि ड्रॉप सह 6000+ गॅरेजेस उपलब्ध आहेत |
क्लेम प्रक्रिया | स्मार्टफोन-एनेबल्ड क्लेम प्रक्रिया. 7 मिनिटांत ऑनलाइन करता येईल! |
ओन डॅमेज कव्हर | उपलब्ध |
थर्ड पार्टीला नुकसान | वैयक्तिक नुकसानीसाठी अमर्यादित लायबिलिटी, मालमत्ता / वाहन नुकसानासाठी 7.5 लाखांपर्यंत |
कार इन्शुरन्स प्लॅन जो तुमच्या सर्व गरजा पूर्ण करतो.
थर्ड पार्टी | कॉम्प्रिहेन्सिव्ह |
अपघातामुळे स्वतःच्या कारचे नुकसान/हानी |
|
आग लागल्यास स्वत:च्या कारचे नुकसान/हानी |
|
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वतःच्या कारचे नुकसान/हानी |
|
थर्ड पार्टीच्या वाहनाचे नुकसान |
|
थर्ड पार्टी मालमत्तेचे नुकसान |
|
वैयक्तिक अपघात कव्हर |
|
थर्ड पार्टी व्यक्तीचे जखमी होणे/मृत्यू |
|
तुमच्या कारची चोरी |
|
तुमचा IDV कस्टमाइझ करा |
|
कस्टमाइझ्ड अॅड -ऑन्ससह अतिरिक्त |
|
Get Quote | Get Quote |
कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील फरकाबद्दल अधिक जाणून घ्या
चारचाकी गाड्यांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स
थर्ड पार्टी कार इन्शुरन्स प्रीमिअम कॅलक्युलेटर तुमच्या कारच्य इंजिनच्या सीसी वर अवलंबून असतो आणि संबंधित प्रीमिअम रेट्स आयआरडीएआय, द्वारा पूर्व निर्धारित केलेले असतात, जें खालील प्रमाणे आहेत:
प्राईव्हेट कार त्यांच्या इंजिन क्षमतेसह | 2019-20 चा प्रीमियम INR मध्ये | प्रीमियम रेट (1 जुलै 2022 पासून लागू) |
1000सीसी पेक्षा जास्त नाही | ₹2072 | ₹2094 |
1000सीसी पेक्षा जास्त पण 1500सीसी पेक्षा कमी | ₹3221 | ₹3416 |
1500सीसी पेक्षा जास्त | ₹7890 | ₹7897 |
भारतातील कार इन्शुरन्स मार्केटचा आवाका, क्षेत्रानुसार, मुल्यानुसार वर्ष 2015 पासून ते 2025 पर्यंत
कार इन्शुरन्स क्लेम कसा दाखल करायचा?
तुम्ही आमचा कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यानंतर किंवा त्याचे रिन्यूअल केल्यानंतर, तुम्ही तणावमुक्त राहता कारण अडचणीच्या वेळी केवळ 3-स्टेप्समध्ये आपण क्लेम करू शकता!
स्टेप 1
फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणतेही फॉर्म भरायचे नाहीत
स्टेप 2
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर स्व-तपासणीसाठी लिंक मिळवा. मार्गदर्शित स्टेप- बाय- स्टेप प्रक्रियेद्वारे तुमच्या स्मार्टफोनवरून तुमच्या वाहनाच्या नुकसानाविषयीची माहिती भरा.
स्टेप 3
आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे तुम्हाला रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेसची निवड करायची असलेली दुरुस्तीची पद्धत निवडा.
डिजिटच्या कार इन्शुरन्ससह क्लेम झाले सोपे
जेव्हा आम्ही म्हणतो की आम्ही इन्शुरन्स सोपा करत आहोत, तेव्हा आमचा खरा अर्थ आहे! जेव्हा कार इन्शुरन्सचा विचार केला जातो, तेव्हा आम्हाला समजते की तुम्ही ती कार मिळवण्यासाठी आधीच खूप पैसे खर्च केले आहेत, म्हणून आम्ही तुमच्यासाठी कार इन्शुरन्सचे क्लेम शक्य तितके सोपे आणि प्रभावी करण्याचा प्रयत्न करतो.
डिजिटची कॅशलेस गॅरेजेस
6000+ नेटवर्क गॅरेजेसची यादी >आमच्या ग्राहकांना आमच्याबद्दल काय म्हणायचे आहे
डिजिटकडे सर्वोत्कृष्ट आणि सोपी इन्शुरन्स क्लेम्सची प्रक्रिया आहे. श्री. सतीश कुमार यांनी अतिशय उपयुक्त ग्राहक सेवा आणि कार्यक्षम पद्धतीने मला सर्वेक्षणात मार्गदर्शन केले. फक्त फोटो अपलोड करा आणि तुमच्या क्लेमवर प्रक्रिया करा.रिएम्बर्समेंटदेखील खूप जलद पार पडली. माझा अनुभव उत्तम होता.
माझा अलीकडील अनुभव शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. आता, मी असे म्हणू शकतो की क्लेम सेटलमेंट आणि ग्राहक समर्थनाच्या बाबतीत डिजिट ही मार्केटमधील सर्वोत्तम इन्शुरन्स आहे. मी श्री रत्ना (सर्व्हेअर) यांचे मनापासून आभार मानू इच्छितो ज्यांनी माझी केस अतिशय व्यावसायिक पद्धतीने हाताळली. त्यांनी मला योग्य वेळी योग्य सल्ला दिला आणि तुमच्या इन्शुरन्स कंपनीकडून तुम्हाला हीच अपेक्षा असते. भविष्यातही अशीच गुणवत्तापूर्ण सेवा सुरू राहील अशी अपेक्षा आहे.
डिजिट इन्शुरन्सचा अनुभव खरोखरच आनंदी आहे. ही संपूर्ण प्रक्रिया इतकी सोपी आणि ग्राहकांसाठी अनुकूल वाटली की मी माझ्या कारला वर्कशॉपमध्ये तयार होण्यावर ताण दिला नाही. तुम्हाला एक लिंक मिळेल आणि तुम्ही तुमच्या खराब झालेल्या कारच्या फोटोंवर क्लिक करा आणि त्यासाठी क्लेम नंबर तयार करा. पुढील संपूर्ण काळजी तुमच्या सर्वेक्षकाद्वारे घेतली जाते. माझ्या बाबतीत श्री. म्हात्रे अत्यंत मदत करणारे आणि सर्व बाबतीत तत्परतेने प्रतिसाद देत होते. गो गो डिजिट !!
कार इन्शुरन्स पॉलिसीचे फायदे
तुम्ही थर्ड-पार्टी कार इन्शुरन्स किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स निवडला तरीही, अपघात, नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी आणि अशा इतर वेळी होणारे नुकसान भरून काढण्यास तुम्हाला मोठी मदत होते. याव्यतिरिक्त, आपण मोठ्या वाहतूक दंडांपासून स्वतःचे संरक्षण देखील करू शकता!
अपघात प्रत्येकासोबत घडतात. तुम्ही चुकून एखाद्याला, कारला किंवा कोणाच्या मालमत्तेला धडक दिल्यास, तुमचा कार इन्शुरन्स तुमच्यासाठी थर्ड पार्टीला झालेले नुकसान भरून काढण्यासाठी असेल, त्यामुळे तुम्हाला वाद घालण्यात किंवा भांडण्यात वेळ घालवण्याची गरज नाही!
तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्सची निवड केल्यास, तुमच्या कारसाठी झिरो डिप्रिसिएशन कव्हर, रिटर्न टू इनव्हॉइस कव्हर, कन्झ्युमेबल कव्हर आणि ब्रेकडाउन असिस्टन्स यासारख्या ॲड-ऑन्सचा वापर करून तुमच्या कारसाठी चांगले कव्हरेज मिळवून तुम्हाला आणखी फायदा होऊ शकतो.
मोटार वाहन कायद्यानुसार, सर्व कारचा किमान थर्ड पार्टी कार इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. एक न केल्यास, तुम्हाला पहिल्या गुन्ह्यासाठी 2,000 रुपये आणि दुसऱ्यांदा 4,000 रुपये दंड भरावा लागेल.
तंत्रज्ञानामुळे, डिजिट सह - कार इन्शुरन्स खरेदी करण्यापासून क्लेम करण्यापर्यंत सर्व काही काही मिनिटांत ऑनलाइन करता येते. याचा अर्थ तुम्ही केवळ पैशाची बचत करत नाही तर तुमच्या मौल्यवान वेळेचीही बचत करा!
कोणती कार इन्शुरन्स पॉलिसी माझ्यासाठी सर्वोत्तम आहे?
केस 1: जर तुम्ही एक नवीन लक्झरी कार घेतलीत - बऱ्याच कारमालकांसाठी लक्झरी कार विकत घेणे ही एक वन टाईम डील असते, त्यामुळे, तुम्ही तिला थर्ड पार्टी लायबिलिटी आणि स्वतःहून होणाऱ्या नुकसानांपासून कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स द्वारा सुरक्षित केले पाहिजे. लक्झरीयस कार साठी योग्य ते अॅड ऑन्स देखील आवश्यक आहेत.
तुमच्या गाडीचे महाग पार्ट्स दुरुस्त किंवा बदलण्याचा पूर्ण खर्च क्लेम करण्यासाठी तुम्ही झीरो डेप्रीसीएशन कव्हर घेऊ शकता. लक्झरीयस कार्स साठी रिटर्न टू इंव्हॉईस कव्हर खूप फायद्याचे ठरू शकते कारण यामुळे कार चोरीला गेल्यास किंवा टोटल लॉस झाला असता ओरिजनल इंव्हॉईस एवढीच रक्कम तुम्हाला परत मिळेल.
लक्झरीयस कार्स साठी इंजिन प्रोटेक्शन कव्हर देखील गरजेचे आहे कारण इंजिन म्हणजे तुमच्या कारचा एक महाग घटक आहे आणि या कव्हर अंतर्गत तुम्हाला सर्व प्रकारच्या इंजिन आणि गिअरबॉक्स दुरुस्तींपासून तुम्हाला संरक्षण देईल. ल्युब्रीकंट, ऑईल्स, नट्स, बोल्ट्स, स्क्र्यूज, वॉशर्स, गिअर्स ई. च्या रीप्लेसमेंट कॉस्टचे कव्हर मिळवण्यासाठी कंझ्युमेबल कव्हर घेणे कधीही चांगले.
केस 2: जर तुमच्याकडे 7 वर्ष जुनी गाडी असेल जी तुम्ही रोज वापरता. - बरेचजण ज्यांच्याकडे 7 वर्ष जुनी गाडी आहे ते कार इन्श्युरन्सचे महत्त्व टाळतात; तरी कायदेशीररीत्या कमीतकमी थर्ड पार्टी इन्श्युरन्सअसणे बंधनकारक आहे. तुमची कार 7 वर्ष जुनी असेल तर अपघात, चोरी, आग लागणे, नैसर्गिक आपत्ति यासगळ्यामुळे होणाऱ्या कारच्या दुरुस्ती किंवा रीप्लेसमेंट साठीचे कव्हरेज मिळवण्यासाठी ओन-डॅमेज कव्हर घेणे योग्य ठरेल.
कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर काही अॅड ऑन्स सह जसे रोड साईड असिस्टन्स अॅड ऑन तुम्हाला लांबच्या प्रवासात कार ब्रेक डाऊन, टायर पंक्चर होणे किंवा गाडी टो करणे या सर्व समस्यांदरम्यान सुरक्षित ठेवेल.
केस 3: जर तुम्ही तुमच्या आजोबांची गाडी जतन करून ठेवली असेल जी तुम्ही क्वचितच बाहेर काढता - काही वस्तूंशी भावनिकदृष्ट्या जोडले गेले असल्यामुळे काही लोक या वस्तू जतन करून ठेवतात जसे की ती कार जी पिढ्यानपिढ्या तुमच्या कुटुंबात जतन करून ठेवली आहे आणि जी तुम्ही क्वचितच चालवता, अशी गाडी देखील कायदेशीररीत्या कमीतकमी थर्ड पार्टी कव्हरेज पॉलिसी द्वारे इन्श्युर केलेली असावी. तसही तुम्ही ती कार वरचेवर चालवत नाही त्यामुळे तुम्ही इतर अॅड ऑन्स विकार घेणे टाळू शकता.
योग्य कार इन्शुरन्स कसा निवडावा?
तुमच्या कारसाठी योग्य कार इन्शुरन्स निवडण्यासाठी तुम्ही काय पाहावे ते येथे आहे:
आपला वेळ सर्वात मौल्यवान आहे, त्यामुळे असा कार इन्शुरन्स शोधा जिथे क्लिष्ट प्रक्रियांचा समावेश नाही. डिजिटसह, तुम्ही तुमचा कार इन्शुरन्स काही मिनिटांत ऑनलाइन खरेदी करू शकता.
तुमचा आयडीव्ही, उर्फ तुमच्या कारचे बाजार मूल्य हा तुमच्या कार इन्शुरन्सचा सर्वात महत्वाचा भाग आहे. कारण याचा थेट परिणाम तुमच्या कार इन्शुरन्स प्रीमियमवर होतो, आणि क्लेमदरम्यान- तुमच्या क्लेमच्या रकमेवरही. डिजिट सह, तुम्ही तुमचा आयडीव्ही स्वतः कस्टमाइझ करू शकता.
आपल्या सर्वांना काही अतिरिक्त फायदे आवडतात, नाही का? त्यामुळे, तुमचा कार इन्शुरन्स निवडताना तुम्ही ज्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे ते म्हणजे ते कोणत्या प्रकारचे सेवा लाभ देते. उदाहरणार्थ, डिजिट वर आमच्या स्टार सेवेच्या फायद्यांमध्ये डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप समाविष्ट आहे!
आमच्या जलद क्लेम प्रक्रियांमुळे आम्ही इन्शुरन्स बाजारात प्रथम क्रमांकावर आहोत. त्यामुळे, तुमच्या इच्छित कार इन्शुरन्सची क्लेम प्रक्रिया सुरळीत आहे आणि जास्त वेळ लागणार नाही याची खात्री करा. जेव्हा तुम्ही संकटात असता, तेव्हा तुम्हाला शेवटची गोष्ट हवी असते, फक्त दावा दाखल करण्यात तुमचा सर्व वेळ आणि शक्ती खर्च करणे!
क्लेम हे कार इन्शुरन्सचा एक महत्त्वाचा भाग असल्याने, तुमच्या इच्छित इन्शुरन्स कंपनीचे क्लेम सेटलमेंटचे प्रमाण तपासा जेणेकरून तुम्हाला खात्री होईल की काहीही झाले तरी तुमचे क्लेम निकाली काढले जातील!
कदाचित याला कमी लेखले जाईल, परंतु कार इन्शुरन्सच्या बाबतीत ग्राहक समर्थन खूप महत्वाचे आहे. याचा विचार करा. अडचणीच्या वेळी कोणाला बोलावणार ? त्यामुळे, तुम्हाला 24x7 सपोर्ट देणारी कार इन्शुरन्स कंपनी शोधा.
कार इन्शुरन्स संबंधित काही व्याख्या
कार इन्शुरन्समध्ये आयडीव्ही (IDV) म्हणजे काय ?
तुमची कार चोरीला गेल्यास किंवा पूर्णपणे खराब झाल्यास तुमची इन्शुरन्स कंपनी तुम्हाला देऊ शकणारी जास्तीत जास्त रक्कम आयडीव्ही आहे.
विमा उतरवलेले घोषित मूल्य आणि तुमचा कार इन्शुरन्स प्रीमियम एकमेकांवर आधारित आहे. याचा अर्थ, तुमचा आयडीव्ही जितका जास्त असेल तितका तुमचा कार विम्याचा प्रीमियम जास्त असेल - आणि तुमच्या वाहनाचे वय आणि आयडीव्हीचे अवमूल्यन होत असताना, तुमचा प्रीमियम देखील कमी होतो.
तसेच, जेव्हा तुम्ही तुमची कार विकण्याचे ठरवता तेव्हा जास्त आयडीव्ही म्हणजे तुम्हाला त्याची जास्त किंमत मिळेल. वापर, कार इन्शुरन्स क्लेम्सचा अनुभव इ. इतर घटकांमुळे किंमत देखील प्रभावित होऊ शकते. म्हणून, जेव्हा तुम्ही तुमच्या कारसाठी योग्य कार इन्शुरन्स पॉलिसी निवडत असाल, तेव्हा फक्त प्रीमियमच नव्हे तर ऑफर केल्या जाणार्या आयडीव्हीची नोंद घ्या.
कमी प्रीमियम ऑफर करणारी कंपनी आकर्षक असू शकते, परंतु ऑफरवरील आयडीव्ही कमी असल्यामुळे असे होऊ शकते. तुमच्या कारचे एकूण नुकसान झाल्यास, जास्त आयडीव्हीमुळे जास्त भरपाई मिळते.
पुनर्विक्रीच्या वेळी, तुमचा आयडीव्ही तुमच्या कारच्या बाजार मूल्याचे सूचक आहे. तथापि, जर तुम्ही तुमची कार खरोखरच चांगली ठेवली असेलतर तुमचा आयडीव्ही तुम्हाला जे काही ऑफर करेल त्यापेक्षा जास्त किंमत ठेवू शकता. अखेरीस, आपण आपल्या कारवर किती प्रेम केले आहे यावर सर्व काही अवलंबून आहे.
कार इन्शुरन्समधील इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यूविषयी (IDV) अधिक जाणून घ्या.
कार इन्शुरन्समध्ये नो क्लेम बोनस (NCB) म्हणजे काय?
एनसीबी (नो क्लेम बोनस) व्याख्या: एनसीबी ही पॉलिसीधारकाला क्लेम फ्री पॉलिसी टर्मसाठी दिलेली प्रीमियमवरील सूट आहे.
नो क्लेम बोनस 20-50% च्या सवलतीपासून असतो आणि तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत कार अपघाताचे कोणतेही क्लेम्स न केल्याचा रेकॉर्ड राखून तुम्ही तुमच्या पॉलिसी कालावधीच्या शेवटी कमाई करता.याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही तुमची पहिली कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करता तेव्हा तुम्हाला नो क्लेम बोनस मिळू शकत नाही – तुम्ही तो तुमच्या पॉलिसीच्या रिन्यूअलवरच मिळवू शकता. तुमच्या पॉलिसीच्या रिन्यूअलच्या प्रत्येक क्लेम-फ्री वर्षानंतर तुमचा नो क्लेम बोनस वाढतो.
उदाहरणार्थ, तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत कोणताही क्लेम नसल्याच्या पहिल्या वर्षानंतर तुम्ही 20% एनसीबी मिळवू शकता. ही टक्केवारी प्रत्येक क्लेम-फ्री वर्षासह वाढेल, 5 वर्षांनंतर 50% पर्यंत पोहोचेल – आणि तुम्ही क्लेम करता तेव्हा शून्यावर रिसेट होईल. 5 व्या वर्षी 50% पर्यंत पोहोचल्यानंतर, तुमचे एनसीबी वाढणे थांबते आणि तेच राहते. याला नो क्लेम बोनस सनसेट क्लॉज म्हणतात.
तुम्ही तुमची कार बदलली तरी तुमची एनसीबी तुमच्यासोबतच राहते.तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यास, तुम्हाला नवीन कार इन्शुरन्स पॉलिसी लागू होईल , परंतु तरीही तुम्ही जुन्या कार किंवा पॉलिसीवर जमा केलेल्या एनसीबीचा लाभ घेऊ शकता.
कार इन्शुरन्सच्या एनसीबी(NCB) बद्दल अधिक जाणून घ्या.
कार इन्शुरन्समध्ये झिरो डिप्रिसिएशन कव्हर
बंपर - बंपर किंवा झिरो डेप कव्हर किंवा पार्ट्स डिप्रिसिएशन कव्हर, 5 वर्षांपेक्षा कमी जुन्या कारसाठी अर्थपूर्ण आहे. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीप्रमाणे, तुमच्या कारच्या काही भागांचे मूल्य कमी होते, ज्यामध्ये बंपर किंवा इतर धातू किंवा फायबर ग्लास भागांचा समावेश होतो. त्यामुळे, जेव्हा एखादे नुकसान होते, तेव्हा वस्तूची संपूर्ण किंमत दिली जात नाही कारण क्लेमच्या पैशातून घसारा (डिप्रिसिएशन) वजा केला जातो. परंतु हे ॲड-ऑन झिरो डिप्रिसिएशन असल्याची खात्री करते आणि तुम्हाला प्रदान केलेल्या दुरुस्ती/रिप्लेसमेंटच्या खर्चाचे संपूर्ण मूल्य मिळते. थोडक्यात, जर तुमची कार अंशतः खराब झाली असेल, तर तुमच्या डिप्रिसिएशनकरिता मोजली जाणारी रक्कम सहन करावी लागणार नाही आणि तुमची इन्शुरन्स कंपनी सर्व गोष्टींची काळजी घेईल.
याबद्दल अधिक जाणून घ्या:
- कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि झिरो डिप्रिसिएशन इन्शुरन्समधील फरक
- बंपर टू बम्पर कार इन्शुरन्स
- झिरो डिप्रिसिएशन कार इन्शुरन्स
कार इन्शुरन्समध्ये कॅशलेस क्लेम म्हणजे काय?
तुम्ही तुमची कार डिजिटच्या दुरुस्ती केंद्रामध्ये दुरुस्त करून घेण्याचे निवडल्यास, आम्ही मंजूर केलेल्या क्लेमच्या रकमेचे पैसे थेट दुरुस्ती केंद्राला देऊ. हा कॅशलेस क्लेम आहे.
कृपया लक्षात ठेवा, जर काही डिडक्टिबल्स असतील, जसे की कम्पल्सरी एक्सेसेस/डिडक्टिबल, कोणतेही दुरुस्ती शुल्क ज्यासाठी तुमचा इन्शुरन्स तुम्हाला कव्हर करत नाही किंवा कोणताही डिप्रिसिएशन खर्च, तो विमाधारकाच्या स्वतःच्या खिशातून भरावा लागेल.
योग्य कार इन्शुरन्स पॉलिसी कशी निवडावी?
कार इन्शुरन्स कॅल्क्युलेटर वापरा आणि प्रीमियमची ऑनलाइन गणना करा
तुमचा कार इन्शुरन्स प्रीमियम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि कस्टमाइझ करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी, आम्ही तुम्हाला या कार इन्शुरन्स कॅल्क्युलेटरचा वापर करून तुमच्या कार इन्शुरन्स प्रीमियमची स्वतः गणना करण्याचा पर्याय दिला आहे.
तुमचा कार इन्शुरन्स प्रीमियम कशावरून ठरतो? तुम्ही तुमच्या कार इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटरमध्ये देखील हे लक्षात घेऊ शकता. तुमच्या प्रीमियमवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये हे समाविष्ट आहे:
- कार इन्श्युरन्स पॉलिसीचे प्रकार - कार इन्श्युरन्स पॉलिसी मध्ये मिळणारे कव्हरेज आणि बेनिफिट्स यांचा तुमच्या कर इन्श्युरन्स प्रीमिअमवर परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही जर थर्ड पार्टी पॉलिसी ऐवजी कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी निवडली, तर तुमचे प्रीमिअम जास्त असेल कारण यामध्ये दुसऱ्या पॉलिसीच्या तुलनेत जास्त कव्हरेज मिळते.
- तुमच्या कारचा आयडीव्ही - इनश्यूअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू (आयडीव्ही) ही तुमच्या कारची डेप्रीसिएशन चार्जेस डिडक्ट करून उरलेली वर्तमान मार्केट व्हॅल्यू असते. तुमच्या कारची आयडीव्ही वाढली की इन्श्युरन्स प्रीमिअम देखील वाढणार.
- तुम्ही निवडलेले अॅड ऑन्स - एक अॅड ऑन्स सह असलेली कस्टमायझ्ड इन्श्युरन्स पॉलिसी, जी तुमच्या महत्त्वाच्या इन्श्युरन्स रीक्वायरमेंट्स पूर्ण करण्यासाठी कव्हर देते त्याचबरोबर कोणत्याही परीस्थित तुमची कार सुरक्षित ठेवते, जास्त प्रीमिअम आकारते.
- डिडक्टिबल्स - कार इन्श्युरन्स मधील डीडक्टीबल्स म्हणजे इन्श्युरर ने उरलेली क्लेम अमाउंट भरण्याआधी पॉलिसी होल्डरला तस्वखर्चाने भरावी लागणारी पूर्वसुनिश्चित रक्कम. तर, तुम्ही कमी प्रीमिअमसाठी हायर व्हॉलंटरी डीडक्टीबल निवडू शकता कारण इन्श्युररला क्लेम सेटलमेंट करताना कमी रक्कम भरावी लागेल.
- नो क्लेम बोनस (NCB) - जर तुम्ही तुमच्या पॉलिसी घेतलेल्या वर्षात कोणतेही क्लेम केले नाही तर इन्श्युरर तुम्हाला नो क्लेम बोनस या स्वरूपात तुमच्या पुढच्या पॉलिसी रिन्युअल प्रीमिअमवर सूट देतो.
- तुमच्या गाडीचे मॅन्यूफॅक्चरिंग आणि मॉडेल - कार इन्शुरन्स प्रीमिअममध्ये बदल मॅन्यूफॅक्चरिंग आणि मॉडेल यावर अवलंबून असते. एका लक्झरीयस गाडीचा इन्श्युरन्स करताना एका सेदान हॅचबॅक पेक्षा या गाडीचे प्रीमिअम जास्त असेल. या व्यतिरिक्त, इंजिनची क्युबिक कपॅसिटी आणि फ्युल एफीशियन्सी कार इन्श्युरन्स प्रीमिअमवर थेट परिणाम करतात.
- कार चे वय - तुमच्या कारमध्ये होणाऱ्या सामान्य झीज मुळे दर वर्षी तिची किंमत कमी होत जाते, आयडीव्ही कमी होते आणि पर्यायाने पॉलिसी प्रीमिअम देखील कमी होते. यामुळे हे लक्षात येते की जुन्या कारच्या तुलनेत नवीन कार साठी इन्श्युरन्स प्रीमिअम जास्त असतात.
तुमचे कार इन्श्युरन्स प्रीमिअम कमी करण्यासाठी काही टिप्स
- व्हॉलंटरी डिडक्टिबल्स वाढवा - जर तुमच्याकडे 4-5 वर्षांहून अधिक काळ कोणतेही क्लेम्स नाहीत, किंवा तुम्हाला असे वाटत असेल की, दाव्यांच्या वेळी तुमच्या खिशातून जास्त पैसे भरावे लागतील, तर तुम्ही तुमची व्हॉलंटरी डिडक्टिबल्स वाढवू शकता आणि तुमचा कार इन्शुरन्स प्रीमियम कमी करू शकता.
- चांगला ड्रायव्हिंग रेकॉर्ड ठेवा - हे स्पष्ट आहे, परंतु महत्वाचे आहे. रस्त्यावर सुरक्षित असण्याव्यतिरिक्त, वेग-मर्यादेत सावधपणे वाहन चालवल्याने अपघात टाळता येतील आणि तुम्हाला दरवर्षी नो क्लेम बोनस मिळेल याची खात्री करा.
- योग्य ॲड-ऑन निवडा - जोपर्यंत तुम्ही योग्य ॲड-ऑन निवडता तोपर्यंत अतिरिक्त कव्हर्स खरोखरच फायदेशीर ठरू शकतात. म्हणून, सर्वच नाही तर निवडक ॲड-ऑन निवडा जे तुम्हाला तुमच्यासाठी आणि तुमच्या कारसाठी मौल्यवान वाटतात.
कार इन्शुरन्सची गणना कशी करावी याबद्दल अधिक जाणून घ्या.
कार इन्शुरन्सच्या किमतीची ऑनलाइन तुलना करा
तुमची कार इन्शुरन्स कंपनी तुम्हाला खाली दिलेली मुद्दयांबाबत योग्य माहिती देत असल्याची खात्री करा.
- तुमचा आयडीव्ही (IDV)तपासा - बर्याच स्वस्त कार इन्शुरन्स कोट्समध्ये कमी आयडीव्ही (इन्शुअर डिक्लेर्ड व्हॅल्यू) असेल, जे तुमच्या कारचे बाजार मूल्य आहे. जर ते कमी असेल, तर क्लेमच्या वेळी, उदा. चोरी आणि एकूण नुकसान दरम्यान तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. त्यामुळे हे योग्य मूल्यावर सेट करणे महत्त्वाचे आहे. डिजिट तुम्हाला तुमची कार इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी करताना सेट करण्याचा पर्याय देतो.
- सेवा लाभ तपासा - तुम्हाला चांगल्या विक्री-पश्चात सेवा देणाऱ्या कंपनीकडे जा. डोअरस्टेप पिकअप, रिपेअर अँड ड्रॉप 6 महिन्यांची वॉरंटी, 24*7 कस्टमर केअर सपोर्ट, 6000+ गॅरेजवर कॅशलेस आणि अनेक काही सेवा डिजिट ऑफर आहेत.
- इन्शुरन्स कंपनीची क्लेम्सची गती - तुम्ही क्लेम्ससाठी इन्शुरन्स खरेदी करता, त्यामुळे तुम्ही कंपनी बदलण्यापूर्वी याची चौकशी केली पाहिजे. डिजिटचे 90.4% क्लेम्स केवळ 30 दिवसांत निकाली काढले गेले आहेत. याचा अर्थ आमचे क्लेम जलद आणि त्रासमुक्त आहेत. शिवाय आमच्याकडे झिरो हार्डकॉपी पॉलिसी आहे म्हणजे आम्ही फक्त सॉफ्ट-कॉपीवर, पूर्णपणे पेपरलेस क्लेम्स करून घेतो!
- सर्वोत्तम मूल्य - तुम्ही सेवेबद्दल समाधानी असल्यास आणि आयडीव्ही योग्य असल्यास, प्रीमियम आणि तुम्हाला मिळत असलेली सूट तपासा.
कार इन्शुरन्सच्या किमतीची तुलना करण्याच्या योग्य मार्गाबद्दल अधिक जाणून घ्या.
कार इन्शुरन्सच्या किमतीची तुलना करताना टाळण्यासारख्या सामान्य चुका
खरेदी करण्यापूर्वी तुमच्या कार इन्शुरन्स किमतीची तुलना करणे ही एक चांगली गोष्ट आहे. परंतु तुम्ही त्यांची तुलना खालील निकषांवर करत असल्याची खात्री करा. लोक त्यांच्या कार इन्शुरन्स रिन्यूअल करताना सहसा काय पाहतात?
- कमी प्रीमियम
पण तुमच्या कार इन्शुरन्सचे रिन्यूअल करताना तुम्ही प्रत्यक्षात काय पाहावे?
- योग्य आयडीव्ही( IDV)
- उत्तम सेवा
- जबरदस्त किमती
कार पॉलिसी डिजिटसह का रिन्यू करावी
डिजिटसह कार इन्शुरन्सचे रिन्यूअल का करावे?
तुमची जुनी कार इन्शुरन्स पॉलिसी आमच्याकडे होती की नाही याने काही फरक पडत नाही,कार इन्शुरन्स रिन्यूअलसाठी डिजिटची निवड करणे सोपे आणि त्रासमुक्त आहे आणि ते काही मिनिटांत ऑनलाइन केले जाऊ शकते.
तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीचे आमच्यासोबत पहिल्यांदाच रिन्यूअल करू इच्छित आहात? मग निर्णय घेण्यासाठी हे काही फायदे नक्की मदत करतील :
- जलद क्लेम्स - कार इन्शुरन्स खरेदी करण्याचा प्रत्येकाचा प्राथमिक उद्देश हा आहे की ते गरजेच्या वेळी त्यांचे क्लेम्स सहजपणे पूर्ण करू शकतील. सुदैवाने, आमच्या सर्व प्रक्रियेसह क्लेम करण्यापासून ते कारच्या नुकसानाचे मूल्यांकन करण्यापर्यंत सर्व काही ऑनलाइन केले जाऊ शकते.
- कॅशलेस कार दुरुस्ती - अपघाताच्या वेळी तुम्हाला शेवटची गोष्ट करायची असते ती म्हणजे तुमच्या खिशातून अनावश्यक खर्च करणे. म्हणूनच आम्ही कॅशलेस रिपेअरचा पर्याय ऑफर करतो, जिथे तुम्ही आमच्या कोणत्याही नेटवर्क गॅरेजमध्ये जाऊन तुमची क्लेम केलेली दुरुस्ती कोणत्याही अतिरिक्त पैसे खर्च न करता पूर्ण करू शकता.
- गॅरेजेसचे मोठे नेटवर्क - तुम्ही आमच्या नेटवर्क गॅरेजेसवरच कॅशलेस सेवांचा लाभ घेऊ शकता परंतु तुमच्यासाठी, आमच्याकडे देशभरात पसरलेली 6000+ गॅरेज आहेत ज्यातून तुम्ही निवडू शकता.
- 24x7 सपोर्ट - तर, दिवसातली कोणतीही वेळ असो, आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी असू.
- तुमचा आयडीव्ही ( IDV) कस्टमाइझ करा - तुमची कमी प्रीमियम आणि अगदी कमी आयडीव्हीमध्ये फसवणूक होऊ देऊ नका जे तुम्हाला क्लेमदरम्यान मिळू शकणार्या पैशांवर त्वरित परिणाम करू शकतात. म्हणूनच, डिजिटमध्ये आमचा पारदर्शकतेवर विश्वास आहे कारण आम्ही तुम्हाला तुमचा आयडीव्ही आवश्यकतेनुसार कस्टमाइझ करू देतो.
डिजिट सह कार इन्शुरन्स पॉलिसी कशी खरेदी/रिन्यू करावी?
- स्टेप 1: तुमच्या वाहनाची उत्पादक कंपनी, मॉडेल, व्हेरिएंट, नोंदणीची तारीख आणि तुम्ही ज्या शहरात वाहन चालवत आहात ते भरा. ‘गेट कोट’ वर क्लिक करा आणि तुमच्या आवडीचा प्लॅन निवडा.
- स्टेप 2: केवळ थर्ड पार्टी लायॅबलिटी किंवा स्टँडर्ड पॅकेज (कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स) यापैकी निवडा.
- स्टेप 3: आम्हाला तुमच्या मागील इन्शुरन्स पॉलिसीबद्दल माहिती द्या- कालबाह्यता तारीख, गेल्या वर्षी केलेला क्लेम, मिळालेला नो क्लेम बोनस.
- स्टेप 4: तुम्हाला तुमच्या प्रीमियमच्या रकमेची माहिती मिळेल. तुम्ही स्टँडर्ड प्लॅन निवडला असेल तर तुम्ही ॲड-ऑन निवडून, आयडीव्ही सेट करून आणि तुमच्याकडे सीएनजी कार आहे की नाही याची पुष्टी करून ते पुढे कस्टमाइझ करू शकता. तुम्हाला पुढील पेजवर अंतिम प्रीमियम दिसेल.
- स्टेप 5: तुमचे पेमेंट पूर्ण करा आणि तुमची पॉलिसी तुम्हाला ऑनलाइन पाठवली जाईल!
कार इन्श्युरन्स पॉलिसी बद्दल जाणून घेण्यासारख्या काही महत्त्वच्या गोष्टी
भारतात कार इन्शुरन्स अनिवार्य का आहे?
दुर्दैवाने, जेव्हा कार इन्शुरन्ससारख्या गोष्टींचा विचार केला जातो, तेव्हा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा विसरतात जोपर्यंत ते नसल्याचा परिणाम होत नाही.
तथापि, बरेचदा ही मार्गदर्शक तत्त्वे तुमच्या आणि माझ्यासारख्या लोकांच्या संपूर्ण सुरक्षिततेसाठी बनवलेली आहेत. उदाहरणार्थ ; थर्ड पार्टी कार इन्शुरन्स कायद्याने अनिवार्य नसल्यास अनेकजण इन्शुरन्स घेणारही नाही व अपघात झाल्यास, दोन्ही पक्षांना नाहक खर्च व नुकसान सहन करावे लागेल. त्यामुळे, कार इन्शुरन्सचे प्राथमिक उद्दिष्ट अपघात किंवा अपघातादरम्यान प्रभावित पक्षाचे संरक्षण करणे हे असले तरी, भारतात कार इन्शुरन्स अनिवार्य करण्याची ही सुद्धा कारणे आहेत
- मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात: भारतामध्ये रस्ते अपघात अत्यंत सामान्य आहेत आणि मोटार वाहन कायद्याने कार इन्शुरन्स अनिवार्य केल्याचे मुख्य कारण आहे. 2017 मध्ये, रस्ते अपघातांमुळे दररोज 1200 हून अधिक जखमी झाल्याची नोंद झाली होती! कार इन्शुरन्स हे सुनिश्चित करेल की अशा परिस्थितीत कोणालाही आर्थिक फटका सहन करावा लागणार नाही.
- थर्ड -पार्टीचे रक्षण: तुम्ही एखाद्याच्या वाहनाला धडकले किंवा एखादी कार तुमच्या प्रिय कारला धडकली तरी, किमान तृतीय-पक्ष कार इन्शुरन्स असल्यास, कारचे नुकसान झाल्यास प्रभावित थर्ड- पार्टीला भरपाई दिली जाईल.
- कायदेशीर प्रक्रिया सुलभ करते: जेव्हा एखादी दुर्घटना घडते तेव्हा नुकसानापेक्षा जास्त वेळकाढू ही कायदेशीर प्रक्रिया असते ज्यासाठी एखाद्याचा वेळ आणि शक्ती लागते. तथापि, जेव्हा तुमच्याकडे वैध कार विमा असतो, तेव्हा कायदेशीर प्रक्रियांचीही काळजी घेतली जाते.
भारतात कार इन्शुरन्स अनिवार्य का आहे ? याबद्दल अधिक जाणून घ्या?
कार इन्श्युरन्स ऑनलाईन घेणे समजदारीचे का ठरते?
तुम्ही तुमच्या नोंदणीकृत केंद्रावर तुमचे वीज बिल भरण्याचा शेवटचा प्रयत्न कधी केला होता किंवा तुमचा मोबाईल रिचार्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या किरणाच्या दुकानात गेल्या वेळी कधी गेला होता? बराच वेळ झाला आहे ना? इंटरनेटचे यासाठी आभार मानायला हवेत, आपल्यापैकी बरेच जण आता बहुतेक गोष्टी पूर्ण करण्यासाठी इंटरनेट वापरतात. बिले भरा, रिचार्ज करा आणि आता, अगदी किराणा सामानाची ऑर्डर द्या! साहजिकच, तंत्रज्ञानाने अशा प्रकारे प्रगती केली आहे की यापुढे आमचा कार विमा काढण्यासाठी आम्हाला विमा एजंटांना भेट देण्याची किंवा आमच्या डीलर्सशी संपर्क साधण्याची गरज नाही.
आता, तुम्ही तुमचा कार इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करू शकता 😊 तुमच्या प्रीमियमवर प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या कारच्या मूलभूत तपशीलांची आणि तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डची आवश्यकता आहे आणि इतकेच, तुमची कार इन्शुरन्स पॉलिसी काही मिनिटांत तुम्हाला ईमेल केली जाईल.
- ऑनलाइन कार इन्शुरन्स खरेदी केल्याने तुमचा बराच वेळ वाचू शकतो. काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वाट पाहण्यात किंवा एखाद्याला भेट देण्यात तुमचा वेळ वाया घालवण्याची गरज नाही. तुम्ही ते तुमच्या बेडरूम मधून, तुमच्या हातात लॅपटॉप घेऊन आणि फक्त पाच मिनिटे वेळ काढून करू शकता.
- कार इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी केल्याने तुम्हाला तुमची कार इन्शुरन्स पॉलिसी स्वतः कस्टमाइझ करता येते. शिवाय, डिजिटच्या कार इन्शुरन्ससह; तुम्ही तुमच्या कारचा आयडीव्ही स्वतः कस्टमाइझ देखील करू शकता.
- कार इन्शुरन्स खरेदी करणे अधिक अर्थपूर्ण बनते कारण एखादे खरेदी करण्याची प्रक्रिया त्वरित पारदर्शक बनते कारण तुमच्यासाठी ते करण्यासाठी थर्ड-पार्टीच्या व्यक्तीवर अवलंबून न राहता तुम्ही स्वतःसाठी ते स्वतःच खरेदी करता.
- ऑनलाइन कार इन्शुरन्स खरेदी करण्याचा सर्वात चांगला भाग म्हणजे यात कोणतीही कागदपत्रे लागत नाहीत!
सेकंडहँड कार इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करा किंवा त्याचे रिन्यूअल करा
तुम्ही नुकतीच नवीन गाडी घेतली असली किंवा सेकंड-हँड कार खरेदी केली असली तरीही, त्यापैकी कोणत्याही कारसाठी कार इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केली जाऊ शकते.
तथापि, तुमची सेकंड-हँड कार खरेदी करताना मालकाकडे आधीच वैध कार इन्शुरन्स आहे का ते तपासा आणि ते तुमच्या नावावर हस्तांतरित करा, खरेदी केल्यापासून 14 दिवसांच्या आत. याव्यतिरिक्त, तुमच्या सेकंड-हँड कारचा इन्शुरन्स उतरवताना, तुम्हाला याची खात्री करणे आवश्यक आहे:
- कार आणि इन्शुरन्स दोन्ही तुमच्या नावावर यशस्वीरित्या हस्तांतरित केले जातात. तुम्ही आदर्शपणे हे खरेदीच्या 14 दिवसांच्या आत केले पाहिजे.
- तुम्हाला कारच्या क्लेमच्या इतिहासाची माहिती असल्याची खात्री करा. तुम्ही संबंधित कार इन्शुरन्स कंपनीला पॉलिसी क्रमांक देऊन हे करू शकता.
- जर तुमचा कार इन्शुरन्स पूर्वी असेल, तर तुम्ही तुमचा नो क्लेम बोनस तुमच्या नवीन कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये हस्तांतरित केल्याची खात्री करा.
- मालकाकडे कारचा इन्शुरन्स नसेल किंवा त्याची मुदत संपली असेल, तर तुम्ही आमच्या वेबसाइटवर तुमच्या कारचा त्वरित इन्शुरन्स काढू शकता.
- जर तुम्ही तुमच्या सेकंडहँड कारचा इन्शुरन्स तुमच्या नावावर यशस्वीरित्या हस्तांतरित केला असेल, तर कालबाह्यता तारीख तपासा आणि तुम्ही ती कालबाह्य होण्याच्या तारखेपूर्वी किंवा त्यापूर्वी रिन्यूअल करत असल्याची खात्री करा.
सेकंड हँड कार इन्शुरन्सबद्दल अधिक जाणून घ्या
जुन्या कारसाठी कार इन्शुरन्स खरेदी किंवा रिन्यू करा
तुम्ही नुकतीच जुनी, सेकंड हँड कार खरेदी केली असेल किंवा तुमच्या सध्याच्या कारसाठी तुमच्याकडे अद्याप कार इन्शुरन्स नाही हे लक्षात आले असेल; तुम्ही आमच्या वेबसाइटवर त्वरित इन्शुरन्स काढू शकता.
तथापि, तुमच्या जुन्या कारसाठी ऑनलाइन कार इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी येथे तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत:
- कार वापर आणि इन्शुरन्सचा प्रकार - कार इन्शुरन्सचे मूलत: दोन प्रकार आहेत; थर्ड-पार्टी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स. आम्ही सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त फायद्यांसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स घेण्याची शिफारस करत असलो तरी, तुम्ही जर कार जास्त वापरणार नसाल किंवा ती लवकरच टाकून देणार असाल तर तुम्ही थर्ड-पार्टी इन्शुरन्ससाठी देखील जाऊ शकता. या परिस्थितीत, थर्ड-पार्टी कार इन्शुरन्स अर्थपूर्ण ठरू शकतो कारण तो किमान तुमच्या कारची कायदेशीर जबाबदारी पूर्ण करतो.
- आयडीव्ही (इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू) - आयडीव्ही म्हणजेच इन्शुरन्स उतरवलेले घोषित मूल्य हे तुमच्या कारचे बाजार मूल्य असते. तुमची कार जुनी असल्याने, आयडीव्ही सुद्धा कमी असेल (कार इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करताना तुम्ही आमच्या वेबसाइटवर त्यानुसार कस्टमाइझ करू शकता) कालांतराने अवमूल्यन झाल्यामुळे, ती किती जुनी आहे यावर अवलंबून आहे. आयडीव्ही थेट तुमच्या प्रीमियमवर आणि विम्याची रक्कम प्रभावित करते. प्रीमियम कमी असला तरी, दाव्याच्या वेळी विम्याची रक्कमही कमी असेल.
- ॲड-ऑन्स - ॲड-ऑन्स म्हणजे तुम्ही तुमच्या जुन्या कारसाठी ऑनलाइन कार इन्शुरन्स खरेदी करताना निवडू शकता. तथापि, जेव्हा तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह/स्टँडर्ड कार इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करता तेव्हाच हे लागू होते. हे तुम्हाला आणि तुमच्या कारला जास्तीत जास्त कव्हरेज आणि फायद्यांमध्ये मदत करतात जसे की; टायर प्रोटेक्शन, गिअरबॉक्स आणि इंजिन प्रोटेक्शन, रिटर्न टू इनव्हॉइस कव्हर, इ. तथापि, तुम्ही जुन्या कारसाठी कार इन्शुरन्स खरेदी करण्याचा विचार करत असल्याने, कोणते ॲड-ऑन लागू होतील की नाही ते पहा. उदाहरणार्थ; तुमची कार पाच वर्षांपेक्षा जुनी असल्यास झिरो डेिप्रिसिएशन किंवा बंपर ते बंपर कव्हर लागू होणार नाही.
जुन्या कार इन्शुरन्सबद्दल ऑनलाइन अधिक जाणून घ्या.
एक्सपायर्ड कार इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करा किंवा त्याचे नूतनीकरण करा
तुमच्या कालबाह्य झालेल्या (एक्सपायर्ड) कार इन्शुरन्स पॉलिसीचे वेळेवर नूतनीकरण करणे महत्त्वाचे का आहे?
- तुम्ही तुमचे एनसीबी ( NCB) गमावाल - तुमचा NCB हा तुमचा नो क्लेम बोनस आहे जे तुम्ही कोणतेही क्लेम केले नसलेल्या वर्षांसाठी जमा केले आहेत. तुमचा एनसीबी जितका जास्त असेल तितकी तुमची रिन्यूअलदरम्यान सवलत जास्त असेल. तथापि, जर तुम्ही तुमची पॉलिसी कालबाह्य होण्याआधी तिचे रिन्यूअल न केल्यास, तुम्ही तुमचा एनसीबी गमवाल आणि त्यामुळे सूट देखील!
- दंड भरण्याची उच्च शक्यता - जर तुम्ही तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीचे वेळेवर रिन्यूअल केले नाही, तर तुम्हाला दंड भरावा लागेल कारण तुमची मागील कार इन्शुरन्स पॉलिसी तिची कालबाह्यता तारीख निघून गेल्यानंतर ती खरी राहणार नाही.
- आर्थिक फटका सहन करा - ट्रॅफिक पेनल्टी आणि तुमच्या एनसीबीवर बचत करण्याव्यतिरिक्त, तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीचे वेळेत रिन्यूअल न करणे म्हणजे दुर्दैवी अपघात किंवा अपघात झाल्यास तुमचे पैसे गमावले जातील. त्यामुळे, नुकसान सहन करण्यापेक्षा सुरक्षित राहणे आणि तुमच्या सध्याच्या पॉलिसीच्या कालबाह्य तारखेपूर्वी तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीचे रिन्यूअल करणे केव्हाही चांगले!
ऑनलाईन एक्सपायर्ड कार इन्शुरन्सबद्दल अधिक जाणून घ्या.
बातम्यांमध्ये डिजीट
How to make your car and bike ‘fire-proof’ with motor insurance? Key points
- 05 Apr 2022
- Financial Express
कार इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करण्याशी संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न (
मी माझ्या वाहनासाठी स्वतंत्र स्वत:च्या नुकसानीची कार इन्शुरन्स पॉलिसी घेऊ शकतो का?
जर तुमच्याकडे आमच्याकडून किंवा अन्य विमा कंपनीकडून आधीच थर्ड पार्टी कार इन्शुरन्स घेतलेला असेल, तर तुम्ही तुमच्या स्वत:च्या कारचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी ओन डॅमेज कार पॉलिसीसाठी जाऊ शकता.
तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीचे डिजिटसह रिन्यूअल कसे करावे?
तुमची सध्याची कार इन्शुरन्स पॉलिसी लवकरच कालबाह्य होणार असल्यास किंवा एव्हाना कालबाह्य झाली असल्यास (असे नसावे अशी आम्हाला आशा!) तुम्ही खालील पद्धतीने सहजपणे ऑनलाइन नूतनीकरण करू शकता:
स्टेप 1: www.godigit.com ला भेट द्या
स्टेप 2: तुमचा कार ब्रँड, कार व्हेरिएंट आणि नोंदणी तारीख एंटर करा आणि गेट कोटवर क्लिक करा.
स्टेप 3: तुम्हाला तुमची सध्याची किंवा मागील पॉलिसी एक्सपायरी तारीख आणि तुमचा नो क्लेम बोनस (असल्यास) एंटर करण्यास सांगितले जाईल.
स्टेप 4: तुमच्या कार विमा योजनेची निवड करा (थर्ड पार्टी कार इन्शुरन्स/कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स) आणि पुढे तुमची पॉलिसी अॅड-ऑनसह कस्टमाइज करा (तुम्हाला हवे असल्यास)
स्टेप 5: तुमचे पेमेंट पूर्ण करा आणि तुमची पॉलिसी तुम्हाला ऑनलाइन पाठवली जाईल!
क़ॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स किंवा थर्ड - पार्टी लायॅबलिटी इन्शुरन्सपैकी उत्तम कार इन्शुरन्स कोणता आहे?
कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स कव्हर घेणे नेहमीच उत्तम कारण ते केवळ दुसर्याच्या कारचे जसे की थर्ड-पार्टी कार इन्शुरन्सचेच नव्हे, तर तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान तसेच मालक-चालकाला झालेल्या कोणत्याही दुखापतीचेही संपूर्ण संरक्षण देते.
प्रवासी कार इन्शुरन्सद्वारे कव्हर होतात का?
कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये, कोणत्याही वैयक्तिक अपघाताच्या बाबतीत सामान्यतः फक्त मालकचालकाला संरक्षण दिले जाते. मात्र, जवळजवळ सर्व इन्शुरन्स कंपन्या प्रवासी कव्हर अॅड-ऑन ऑफर करतात जे तुम्ही काही अतिरिक्त प्रीमियम देऊन तुमच्या कारमधील प्रवाशांसाठी खरेदी करू शकता.
मला तुमच्यासोबत माझ्या कार इन्शुरन्सचे रिन्यूअल करायचे असल्यास माझा नो क्लेम बोनस स्थलांतरित होईल का?
निश्चितच, डिजिट दुसर्या कार इन्शुरन्स प्रदात्यासह तुमच्या मागील इतिहासाचा अंदाज घेत तुम्हाला NCB वर सवलत देईल. चला तर मग!
मी दुरुस्तीसाठी माझ्या आवडीचे गॅरेज निवडू शकतो का?
हो, आपण हे करू शकता! आम्ही समजतो की तुम्ही नेटवर्क गॅरेजच्या आसपास नसल्यावर किंवा तुमच्या आवडीच्या दुसर्या गॅरेजमध्ये तुमच्या बाईक किंवा कारची दुरुस्ती करण्याची तुमची इच्छा असू शकते. अशावेळी, तुम्ही आम्हाला पावत्या पाठवताच आम्ही दुरुस्तीसाठी खर्च केलेल्या खर्चाचा रिफंड करू.
याव्यतिरिक्त, तुम्ही आमच्या कस्टमर केअर टीमशी आमच्या पसंतीच्या नेटवर्क गॅरेजबाबत देखील तपासू शकता आणि आवश्यक असल्यास आम्ही त्यांच्याद्वारे पिक-अपची व्यवस्था करू शकतो.
इन्शुरन्स कंपनीकडे रिन्यूअल करण्यापूर्वी मला काय विचारात घेणे आवश्यक आहे?
कोणतीही पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी पुढील महत्त्वाच्या बाबी विचारात घेतल्या पाहिजेत:
- क्लेम सेटलमेंटची गती- तुम्हाला तुमच्या पैशांसाठी वाट बघायची नाही, बरोबर?
- अॅप्रोचबिलिटी- कस्टमर केअरशी बोलण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागणे नाही!
- तुमच्या कारच्या दुरुस्तीसाठी कॅशलेस पर्याय नेटवर्क कनेक्टिव्हिटी- तुमचे फोनचे नाही तर हे आहे सर्व्हिस सेंटरचे नेटवर्क!
कंपनीचा क्लेम सेटलमेंटचा इतिहास
अपघात झाल्यास, मी काय करावे?
आम्हाला ताबडतोब 1800-103-4448 वर कॉल करावा! तिथून आम्ही तुम्हाला मदत करू.
डिजिटमध्ये किती नेटवर्क गॅरेजेस आहेत?
आमची देशभरात 6000+ नेटवर्क गॅरेजेस आहेत!
मी माझ्या जुन्या कार इन्शुरन्स कंपनीकडून शिफ्ट झाल्यावर माझे एनसीबी( NCB) हस्तांतरित केले जाईल का?
नक्कीच, तुम्ही तुमचा NCB तुमच्या जुन्या इन्शुरन्स कंपनीकडून हस्तांतरित करू शकता आणि आम्ही तुम्हाला नेहमी काही अतिरिक्त सूट देऊ. शेवटी, चांगल्या ड्रायव्हर्सना नेहमीच पुरस्कृत केले पाहिजे.
माझ्या जुन्या इन्शुरन्स कंपनीकडून माझी पॉलिसी हस्तांतरित करण्यासाठी मला पॉलिसी खरेदी करताना काही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता आहे का?
नाही, आम्ही झिरो-पेपरवर्क धोरणावर विश्वास ठेवतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही आमच्यासोबत पॉलिसीचे नूतनीकरण करत असाल, तेव्हा आम्ही कोणतीही कागदपत्रे मागणार नाही!
कार इन्शुरन्सद्वारे इंजिन कव्हर होते का?
इंजिन सहसा स्टॅंडर्ड पॅकेज पॉलिसीमध्ये समाविष्ट नसते. मात्र, बहुतेक इन्शुरन्स कंपन्यांनी एक अॅड डॉन ऑफर केला आहे जेथे तुम्ही थोडे अतिरिक्त प्रीमियम भरून इंजिन कव्हर करू शकता.
इंजिन आणि गियर प्रोटेक्ट अॅडऑन कोणत्याही अनपेक्षित घटनेच्या बाबतीत इंजिन आणि गियर बॉक्सच्या नुकसानीची काळजी घेते.
कारच्या इन्शुरन्सअंतर्गत टायर कव्हर केले जातात का?
टायर सहसा स्टॅंडर्ड पॅकेज पॉलिसीमध्ये समाविष्ट केले जात नाही. मात्र, बर्याच इन्शुरन्स कंपन्यांनी ऑफर केलेले टायर प्रोटेक्ट अॅड डॉन आहे जेथे तुम्ही थोडे अतिरिक्त प्रीमियम भरून टायर कव्हर करू शकता.
कार इन्शुरन्समध्ये इलेक्ट्रिकल आगींचा समावेश होतो का?
अपघातामुळे विजेच्या ठिकाणी आग लागल्यास, ते तुमच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह कार धोरणांतर्गत समाविष्ट आहे.
कॅशलेस कार इन्शुरन्स म्हणजे काय?
कॅशलेस कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्स कंपनीद्वारे दिला जाणारा एक लाभ आहे त्याअंतर्गत कंपनीच्या अधिकृत गॅरेजमध्ये दुरुस्ती केली जात असल्यास तुम्हाला तुमची कार दुरुस्त करण्यासाठी काहीही पैसे द्यावे लागत नाहीत.
डिजिटवर आमची देशभरात 6000+ गॅरेजेस आहेत आणि आम्ही 6 महिन्यांच्या दुरुस्ती वॉरंटीसह पिक-अप, रिपेअर आणि ड्रॉप सेवा देखील देतो.
कार इन्शरन्स खरेदी करण्याची पात्रता काय आहे?
जोपर्यंत तुमच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असलेली कार आहे, तोपर्यंत तुम्ही तुमच्या संबंधित कारसाठी कार इन्शुरन्स काढण्यासाठी पात्र आहात (खरे तर कायद्यानुसार ते अनिवार्य आहे).
भारतात कार इन्शुरन्स अनिवार्य आहे का?
हो, मोटार वाहन कायदा 1988 नुसार किमान थर्ड पार्टीच्या नुकसानीस कव्हर करणारा कार विमा अनिवार्य आहे.
मी माझ्या कारमध्ये कोणती कागदपत्रे ठेवली पाहिजेत?
तुमच्या कारमध्ये नेहमी तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स आणि तुमचे नोंदणी प्रमाणपत्र (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट RC) असायला हवे.
मी भारतातील सर्वोत्तम कार इन्शुरन्स कसा निवडू शकतो?
- तुम्ही पहिल्यांदाच कार इन्शुरन्स खरेदी करत असाल, तर तुम्हाला किती IDV, कोणते अॅड-ऑन देत आहेत, क्लेम्सच्या वेळी त्यांची सेवा कशी आहे, इत्यादींवर आधारित विविध कार इन्शुरन्सबद्दल संशोधन करा.
- तुम्ही तुमच्या कार विम्याचे नूतनीकरण करत असल्यास, तुम्हाला सर्वोत्तम डील मिळत असल्याची खात्री करण्यासाठी इतर कंपन्यांचे दर तपासा.
- तुमच्या कारसाठी तुम्हाला किती IDV ऑफर केले जात आहेत ते पहा आणि त्यामुळे तुमचे कव्हरेज जाणून घ्या.
- योग्य वजावट सेट करा. अनिवार्य आणि ऐच्छिक वजावट तपासा. ऐच्छिक वजावटीमुळे तुमचा प्रीमियम कमी होतो, परंतु अपघात झाल्यास तुम्हाला खिशातून अधिक पैसे द्यावे लागतील. जर तुमचा ड्रायव्हिंग रेकॉर्ड चांगला असेल आणि तुमची चूक नसलेला अपघात झाला नसेल, तर तुम्ही जुगार खेळू शकता आणि उच्च प्रीमियमची निवड करू शकता.
- तुम्ही तुमच्या कार इन्शुरन्सचे नूतनीकरण करत असल्यास, तुमच्या NCB वर क्लेम करण्यास विसरू नका, कारण यामुळे तुम्हाला कमी प्रीमियम मिळेल.
अपघातांसाठी कार इन्शुरन्सचा क्लेम करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला क्लेम फॉर्म.
- तुमच्या वाहनाच्या आरसीची प्रत.
- तुमच्या वैध ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत.
- तुमच्या पॉलिसी दस्तऐवजाच्या पहिल्या 2 पानांची एक प्रत.
- एफआयआरची प्रत.
- रोख आणि कॅशलेस गॅरेजसाठी मूळ अंदाज, इन्व्हॉईस आणि पेमेंट पावती.
थर्ड-पार्टी कार इन्शुरन्स क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रे ?
- योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला क्लेम फॉर्म.
- एफआयआरची प्रत.
- तुमच्या वैध ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत.
- तुमच्या पॉलिसी दस्तऐवजाच्या पहिल्या 2 पानांची एक प्रत.
- तुमच्या वाहनाच्या आरसीची प्रत.
चोरी झाल्यास कार इन्शुरन्स क्लेम दाखल करण्याची प्रक्रिया काय आहे?
दुर्दैवाने, तुमची कार चोरीला गेल्यास, तुम्ही क्लेम करण्यासाठी खालील बाबी फॉलो करा:
अ) पोलिसांकडे एफआयआर नोंदवा.
ब) तुमच्या इन्शुरन्स कंपनीला चोरीबद्दल सांगा. खालील कागदपत्रे सादर करावी लागतील:
- तुमच्या कारच्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत.
- तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत.
- एफआयआरची प्रत.
- तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसी दस्तऐवजाची पहिली दोन पाने.
- आरटीओला उद्देशून पत्र. एकदा हे पूर्ण झाल्यावर पोलीस तुमचे वाहन शोधण्याचा प्रयत्न करतील. 6 महिन्यांनंतरही जर वाहन सापडले नाही, तर पोलिस तुमच्या हरवलेल्या कारची आरसी इन्शुरन्स कंपनीकडे हस्तांतरित करून, ‘नॉन-ट्रेसेबल रिपोर्ट’ जारी करतील. निवेदनाचे पत्रही सादर करण्यात येईल. सर्व संबंधित कागदपत्रे विमा कंपनीला प्राप्त झाल्यानंतर मग दावा निकाली काढला जाईल.
तुम्ही तुमचा जुना इन्शुरन्स तुमच्या नवीन कारसाठी हस्तांतरित करू शकता का? जर हो तर, ते कसे करावे?
जेव्हा तुम्ही नवीन कार खरेदी करता तेव्हा तुम्ही तुमची जुनी कार इन्शुरन्स पॉलिसी नवीन कारमध्ये हस्तांतरित करू शकता. तुम्हाला तुमच्या इन्शुरन्स कंपनीला ट्रान्सफरबद्दल कळवावे लागेल. तुम्ही तुमचा NCB देखील राखून ठेवू शकता.
तुम्ही वापरलेली कार खरेदी करत असल्यास सर्वप्रथम त्यासंबंधी नोंदणी प्रमाणपत्र (RC) हस्तांतरित करवून घ्यावे. त्याच वेळी इन्शुरन्स पॉलिसीही हस्तांतरित करून घ्यावी. एकदा नवीन मालकाने कार विकत घेतली की, आधीच्या मालकाची पॉलिसी वैध राहणार नाही.
IRDAI मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कार आणि आरसीच्या इन्शुरन्स कागदपत्रांवरील नाव आणि पत्ता जुळला पाहिजे. त्यामुळे, आणीबाणीच्या प्रसंगी, नवीन कार मालक जास्त त्रास न घेता झालेला खर्च वसूल करू शकतो.
कार इन्शुरन्स हस्तांतरित करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
- नोंदणी प्रमाणपत्राची प्रत (फॉर्म 29).
- जुन्या इन्शुरन्स पॉलिसीचे दस्तऐवज.
- मागील कार मालकाकडून ना हरकत कलम (NOC).
- रीतसर भरलेला नवीन अर्ज फॉर्म
- तपासणी अहवाल - हा वाहन सर्वेक्षणानंतर इन्शुरन्स कंपनी तयार करेल.