तुमच्या लक्षात आले आहे की तुमचा हेल्थ इन्शुरन्सचा हप्ता नूतनीकरण केल्यावर वाढतो आणि हे का घडते याची तुम्हाला खात्री नाही? दरवर्षी हेल्थ इन्शुरन्सचे हप्ते का वाढतात, तुम्ही ही वाढ कशी कमी करू शकता आणि डिजिटच्या हेल्थ इन्शुरन्सद्वारे तुम्हाला नूतनीकरणाचे कोणते फायदे मिळू शकतात हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती आवर्जून वाचा.
तुमच्या पगारापासून, तुमच्या घराच्या भाड्यापासून ते इंधन आणि अन्नाच्या किमती प्रमाणेच तुमच्या हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियमवरही वेळ आणि महागाई परिणाम करतात. हे तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते (किंवा नाही) परंतु आरोग्य सेवा उद्योगातील महागाई इतर व्यवसायांहून खूप जास्त आहे.
तथापि, हेल्थ केअर क्षेत्रातील महागाई व्यतिरिक्त तुमचा हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम नूतनीकरणावर वाढण्याची इतर कारणे आहेत जसे की तुमचे वय, तुमचे कव्हरेज फायदे, तुम्ही वर्षभरात केलेले क्लेम आणि अर्थातच तुमचे एकंदर आरोग्य.
चला या प्रत्येक कारणाची सविस्तर माहिती घेऊया आणि नूतनीकरण केल्यावर तुमचा हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम का वाढतो आणि तुम्ही त्याबद्दल काय करू शकता ते पाहूया.
इकॉनॉमिक टाईम्सच्या मते, आरोग्य सेवेतील महागाई 12 ते 18% च्या दराने वाढत आहे, यामध्ये औषधांचा खर्च, हॉस्पिटलमध्ये प्रवेश शुल्क, विविध उपचारांचा खर्च, वैद्यकीय प्रगती इत्यादी एकूण खर्चाचा समावेश होतो. या खर्चात वाढ झाल्यामुळे, तुम्ही दावा करता तेव्हा या खर्चांसाठी कव्हरेज सक्षम होण्यासाठी तुमच्या विमा कंपनीला दरवर्षी तुमची विम्याची रक्कम वाढवणे आवश्यक आहे. म्हणूनच, जेव्हा तुम्ही नवीन पॉलिसी वर्षासाठी नूतनीकरण करता प्रामुख्याने तुमच्या हेल्थ इन्शुरन्स प्रीमियममध्ये वाढ होते
आपण याबद्दल काय करू शकता?
वाईट बातमी ही आहे की वैद्यकीय खर्चाशी थेट संबंध असल्याने आणि तुमच्या इन्शुरन्सच्या रकमेत बदल करणे आवश्यक असल्याने तुम्ही करु शकता असे यात काही नाही.
मात्र, चांगली बातमी ही आहे की काही इन्शुरन्स कंपन्या तुमच्या क्लेमच्या इतिहासावर अवलंबून नूतनीकरण सवलत आणि बोनस ऑफर करतात.
त्यामुळे, तुमच्या प्लॅनमध्ये तुम्हाला यापैकी कोणतेही फायदे आहेत का हे पाहण्यासाठी तुमच्या इन्शुरन्स कंपनीशी (किंवा फक्त तुमचे पॉलिसी दस्तऐवज तपासा) संपर्क साधा. तुमच्याकडे डिजिटचा हेल्थ इन्शुरन्स असल्यास – तुम्ही तुमच्या पॉलिसीचा सारांश तपासू शकता.
ज्यांनी मागील वर्षी कोणतेही क्लेम केले नाहीत त्यांच्यासाठी आम्ही क्युम्युलेटिव्ह बोनस बेनिफिट देतो. याचा अर्थ, आम्ही तुमच्या हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये कोणतीही वाढ न करता तुमच्या इन्शुरन्सची रक्कम वाढवतो! 😊 आपल्या आरोग्याची इतकी चांगली काळजी घेतल्याबद्दल हे बक्षीस तर तुम्हाला मिळायलाच हवं.
याव्यतिरिक्त, आम्ही एक ॲड-ऑन कव्हर देखील देऊ करतो जिथे तुम्ही तुमची इन्शुरन्सची रक्कम दरवर्षी 25,000 किंवा रु. 50,000 ने वाढवून महागाई-प्रूफ होण्यासाठी तुमची योजना कस्टमाइझ करू शकता!
तुम्ही क्लेम केले आहेत की नाही याची पर्वा न करता, आणि या फायद्यासाठी प्रीमियममधील वाढ केवळ नूतनीकरणाच्या वेळीच लागू होईल.
काही इन्शुरन्स कंपन्या तुम्ही वर्षभरात केलेल्या क्लेमची संख्या आणि प्रमाणानुसार तुमचा हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम वाढवतात. तथापि, सर्व हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांच्या बाबतीत असे आवश्यक नाही.
तुमचा हेल्थ इन्शुरन्स तुमच्या क्लेमच्या इतिहासाच्या आधारे तुमचा प्रीमियम वाढवतो की नाही हे तपासण्यासाठी, तुमचे पॉलिसी दस्तऐवज आणि तुमचे क्लेम किंवा तुमच्या अटी व शर्ती दाखवला जाणारा विभाग तपासा.
तुमच्याकडे डिजिटची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असल्यास, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्ही केलेल्या क्लेमच्या संख्येवर किंवा रकमेच्या आधारावर आम्ही तुमचा हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम वाढवत नाही.
आपण याबद्दल काय करू शकता?
तुमच्या क्लेमवर आधारित तुमच्या इन्शुरन्स कंपनीने तुमच्या प्रीमियममध्ये वाढ केली असल्यास, तुमच्या सध्याच्या इन्शुरन्सच्या अटी व शर्तींचा भाग असल्याने तुम्ही त्याबाबत फारसे काही करू शकत नाही.
तथापि, तुम्ही वेगळ्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडे पोर्ट करण्याचा विचार करू शकता. पोर्ट (हस्तांतरण) ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही नूतनीकरणादरम्यानच करू शकता, त्यामुळे इतर पर्यायांचे मूल्यमापन करा आणि त्यानुसार तुमचा निर्णय घ्या.
तुम्हाला हे आधीच माहीत असेल, की तुमचा हेल्थ इन्शुरन्सचा हप्ता साधारणपणे तुमच्या वयासह विविध घटकांवर अवलंबून असतो. काही प्रकरणांमध्ये, वय वाढल्याने तुमच्या हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियमवरही परिणाम होऊ शकतो. हे विशेषत: नूतनीकरणादरम्यान किंवा त्यापूर्वी वयाची साठी गाठणाऱ्यांसाठी लागू होते.
आपण याबद्दल काय करू शकता?
तुम्ही वेळ मागे घेऊ शकत नाही आणि तरुण होऊ शकत नाही, परंतु तुम्ही काय करू शकता ते म्हणजे तुम्ही ज्या इन्शुरन्सच्या रकमेची निवड करत आहात त्याबद्दल विचार करा. तुम्ही तुलनेने तरुण असल्यास, तुम्हाला कदाचित जास्त कव्हरेजची गरज नाही, परंतु तुमच्या ज्येष्ठ पालकांसाठी तुमच्याकडे योजना असल्यास, त्यांना अधिक कव्हरेजची आवश्यकता असू शकते. त्यामुळे, तुमची आणि तुमच्या कुटुंबाची इन्शुरन्सची रक्कम त्यांच्या वयाच्या आणि आरोग्यसेवा गरजांवर आधारित नेहमी कस्टमाइझ करा.
तुमच्या हेल्थ इन्शुरन्सच्या नूतनीकरणादरम्यान, तुम्ही तुमच्या इन्शुरन्स कंपनीच्या अटी व शर्तींवर अवलंबून, तुमच्या कव्हरेज आणि फायद्यांमध्ये बदल करणे निवडू शकता.
तुम्हाला अधिक कव्हरेजची आवश्यकता आहे हे लक्षात आल्याने किंवा वैयक्तिक कारणांनी तुम्ही हे निवडू शकता (कदाचित तुम्ही प्रसूती ॲड-ऑनची निवड करण्याची योजना आखली असेल किंवा अलीकडे तुम्हाला आरोग्य स्थितीचे निदान झाले असेल ज्यासाठी अधिक कव्हरेजची आवश्यकता असेल.) त्यामुळे, जर तुम्ही ॲड ऑन निवडणे किंवा तुमची इन्शुरन्सची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला; मग तुमचा हेल्थ इन्शुरन्सचा हप्ता देखील त्याच आधारावर वाढेल.
आपण याबद्दल काय करू शकता?
या प्रकरणात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅनचे तपशीलवार पुनरावलोकन करणे, अशा प्रकारे तुम्ही तुमचे कव्हरेज आणि फायदे काय आहेत आणि ते तुमच्या आरोग्याच्या वाढत्या गरजा पूर्ण करतात की नाही हे पाहू शकता.
तुम्ही तुमच्या सध्याच्या इन्शुरन्स कंपनीसह इतर प्लॅनचे पर्याय तपासून अपग्रेड करू शकता. तुमच्या गरजांनुसार तुम्ही इतर हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सची सुद्धा ऑनलाइन तुलना करा
महागाईमुळे तुमचा हेल्थ इन्शुरन्सचा हप्ता थोड्याफार प्रमाणात वाढणार आहेच . तथापि, बहुतेक हेल्थ इन्शुरन्स कंपन्या मागील वर्षात तुम्ही किती निरोगी होता याचा विचार करतात आणि त्यानुसार तुम्हाला बक्षीस देतात.
उदाहरणार्थ: डिजिटमध्ये, तुम्ही वर्षभरात कोणतेही क्लेम केले नसतील तर - आम्ही तुम्हाला एक क्युम्युलेटिव्ह बोनस बेनिफिट देतो म्हणजेच आम्ही नूतनीकरणादरम्यान तुमच्या प्रीमियममध्ये कोणतीही वाढ न करता तुमचे कव्हरेज वाढवतो!
त्याचप्रमाणे, काही हेल्थ इन्शुरन्स कंपन्या नूतनीकरणावर तुमचा हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम देखील वाढवू शकतात जर तुम्हाला नुकतेच एखाद्या आजाराचे किंवा रोगाचे निदान झाले असेल ज्यासाठी अधिक कव्हरेज आवश्यक असेल.
आपण याबद्दल काय करू शकता?
याचे स्पष्ट उत्तर, तुम्ही तुमच्या आरोग्याची चांगली काळजी घेत आहात याची खात्री करणे हे आहे! तथापि, आम्ही समजतो की हे अनिश्चित आहे आणि काहीवेळा तुम्ही कितीही सावध असलात तरीही, गोष्टी घडतात! क्युम्युलेटिव्ह बोनससारख्या फायद्यांचा लाभ घेण्यासाठी एक शिफारस म्हणजे तुम्ही वर्षभरात लहान क्लेम करणे टाळू शकता.
उदाहरणार्थ; तुम्हाला वर्षभरात फ्रॅक्चर झाले आहे – तुम्ही त्यासाठी क्लेम न करणे निवडू शकता (कारण खर्चही तितका जास्त नसेल).
अशा प्रकारे, वर्षभरात तुमचा कोणताही क्लेमचा इतिहास नसेल तर तुमच्या इन्शुरन्सच्या रकमेत वाढ करून, तुमच्या प्रीमियममध्ये कोणतीही वाढ न करता तुम्हाला बक्षीस मिळू शकते.
तुमची सध्याची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कालबाह्य होण्याच्या किमान दोन महिने आधी, तुमच्या प्लॅनचे पुनरावलोकन करणे आणि तुमचा प्लॅन जसा आहे तसा नूतनीकरण करण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणे ही चांगली कल्पना आहे. तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे नूतनीकरण करताना तुम्ही काही गोष्टींचा विचार केला पाहिजे:
कदाचित तुम्ही खरेदीच्या वेळी इन्शुरन्सची रक्कम कमी निवडली असेल किंवा जास्त निवडली असेल आणि तुमच्या लक्षात येईल की तुमचे कव्हरेज एकतर खूप कमी आहे किंवा तुमच्या गरजांसाठी खूप जास्त आहे.
बहुतेक इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला नूतनीकरणाच्या वेळी तुमची इन्शुरन्सची रक्कम वाढवण्याचा पर्याय देतात. ते तुम्हाला कारणे विचारू शकतात आणि त्याच आधारावर तुमचा हेल्थ इन्शुरन्सचा हप्ता किती वाढवायचा हे तुम्ही ठरवता.
कदाचित तुम्ही नुकतेच कुटुंब सुरू केले असेल किंवा तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅनमध्ये तुमच्या जोडीदारालाही जोडायचे आहे असे ठरवले आहे. या गोष्टींचा विचार करा आणि तुमच्या इन्शुरन्स कंपनीला कोणत्याही नवीन सदस्य जोडण्याबद्दल कळवा. तुम्ही फॅमिली फ्लोटर पर्यायावर शिफ्ट करून तुमच्या प्लॅनमध्ये कुटुंबातील सदस्यांचा समावेश करा किंवा प्रत्येक सदस्यासाठी इन्डिव्ह्युजअल प्लॅन खरेदी करू शकता.
तुमच्या नूतनीकरणादरम्यान विचारात घेण्याची दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला नवीन ॲड-ऑन कव्हर्सची निवड करायची आहे की नाही. उदाहरणार्थ: कदाचित आतापर्यंत तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये कोणत्याही ॲड-ऑनची निवड केली नसेल पण आता तुम्हाला मातृत्व आणि नवजात बाळाच्या कव्हरची निवड करायची आहे. याबाबत, तुमच्या इन्शुरन्स कंपनीला कळवा आणि नूतनीकरणादरम्यान ते तुमच्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅनमध्ये समाविष्ट करा.
Many people port their health insurance plans when they’re not happy with their existing insurer. This could be due to the coverage benefits or simply because of its service and processes too.
However, porting can only be done at the time of renewal. Most importantly, you have to let your current insurer know about the same at least 45-days before the expiry date so that they can make the change.
In case you’re not happy with your insurer, evaluate and compare health insurance plans online and port to a plan and insurer that works best for you.
आता, तुमच्या इन्शुरन्सची रक्कम आणि नवीन कव्हर निवडण्याव्यतिरिक्त, तुम्हाला तुमच्या कव्हरेजमध्ये इतर कोणतेही बदल हवे आहेत की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅनचे संपूर्ण पुनरावलोकन देखील केले पाहिजे.
उदाहरणार्थ: तुम्ही मूलभूत कव्हरेज प्लॅनची निवड केली आहे आणि आता अधिक फायद्यांसह कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनकडे वळू इच्छिता असे म्हणा. या प्रकरणात, तुम्ही तुमचा प्लॅन बदलू शकता का ते तुमच्या इन्शुरन्स कंपनीकडे तपासू शकता आणि त्यानुसार तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी नूतनीकरणाच्या वेळी ते पूर्ण करून घेऊ शकता.