सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स
No Capping
on Room Rent
Affordable
Premium
24/7
Customer Support
No Capping
on Room Rent
Affordable
Premium
24/7
Customer Support
सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय?
सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स प्लॅनला तुम्ही तुमच्या हेल्थ इन्शुरन्स चाच एक वाढीव भाग म्हणू शकता. तुमच्या कॉर्पोरेट इन्शुरन्सची कमाल क्लेम मर्यादा (त्या वर्षाची) तुम्ही आधीच वापरली असेल आणि वाढत्या किमती लक्षात घेत तुमच्या हेल्थ इन्शुररकडून पुरेसे सुरक्षा कवच मिळावे असे तुम्हाला वाटत असेल; आणि त्यासाठी तुमच्या खिशातून थोडा खर्च करायला तुमची हरकत नसेल तेव्हा तो घेता येतो.
सुपर टॉप-अप प्लॅनची खासियत ही आहे की या पॉलिसीद्वारे एका वर्षातील एकूण आरोग्यविषयक खर्च डिडक्टिबल रकमेपेक्षा जास्त झाल्यास असे सर्व क्लेम कव्हर केले जातात. त्याउलट साध्या टॉप-अप पॉलिसीत जर एकच क्लेम डिडक्टिबलपेक्षा जास्त झाला तरच कव्हर करतात!
उदाहरणासह सुपर टॉप-अप समजून घ्या
सुपर टॉप-अप इन्शुरन्स (डिजिट हेल्थ केअर प्लस) | इतर टॉप-अप प्लॅन | |
निवडलेले डिडक्टिबल्स | 2 लाख | 2 लाख |
निवडलेली सम इन्शुअर्ड | 10 लाख | 10 लाख |
वर्षातला पहिला क्लेम | 4 लाख | 4 लाख |
तुम्हाला द्यावे लागतील | 2 लाख | 2 लाख |
तुमचा टॉप-अप इन्शुअरर देईल | 2 लाख | 2 लाख |
वर्षातील दुसरा क्लेम | 6 लाख | 6 लाख |
तुम्हाला द्यावे लागतील | काहीही नाही! 😊 | 2 लाख (डिडक्टिबल निवडल्यास) |
तुमचा टॉप-अप इन्शुअरर देईल | 6 लाख | 4 लाख |
वर्षातील तिसरा क्लेम | 1 लाख | 1 लाख |
तुम्हाला द्यावे लागतील | काहीही नाही! 😊 | 1 लाख |
तुमचा टॉप-अप इन्शुअरर देईल | 1 लाख | काहीही नाही ☹️ |
सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्सचे फायदे कोणकोणते आहेत?
तुम्ही सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स का घ्यायला हवा?
सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स कोणी घ्यावा?
सुपर टॉप-अप इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते ?
फायदे |
|
सुपर टॉप- अप डीडक्टीबलची रक्कम ओलांडली की ते एका पॉलिसी वर्षात एकत्रित वैद्यकीय खर्चासाठी केलेल्या क्लेमचे पैसे देते, याच्या विरुद्ध नियमित टॉप-अप इन्शुरन्स आहे ज्यामध्ये थ्रेशोल्ड मर्यादेपेक्षा फक्त एकच जास्तीचा क्लेम कव्हर होतो. |
तुमची डिडक्टिबल रक्कम एकदाच भरा –डिजिटची खासियत
|
सर्व हॉस्पिटलायझेशन यात आजारपण, अपघात किंवा अगदी गंभीर आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्याच्या खर्चाचा समावेश आहे.जेव्हा आपली डीडक्टीबल मर्यादा ओलांडली गेली आहे तेव्हा जोपर्यंत एकूण खर्च आपल्या विम्याच्या रकमेपर्यंत आहे तोपर्यंत कितीही वेळा हे हॉस्पिटलायझेशनसाठी कव्हर करण्यासाठी वापरले जाऊ शकते. |
✔
|
डे केअर प्रक्रिया हेल्थ इन्शुरन्स केवळ 24 तासांपेक्षा जास्त रुग्णालयात दाखल होणाऱ्या वैद्यकीय खर्चाचा समावेश करतो. डे केअर प्रक्रिया म्हणजे रुग्णालयात केलेल्या वैद्यकीय उपचारांचा यात संदर्भ आहे, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे उपचारांना 24 तासांपेक्षा कमी वेळ लागतो. |
✔
|
प्री-एक्झिस्टिंग/विशिष्ट आजाराचा प्रतीक्षा कालावधी जोपर्यंत आपण प्री-एक्झिस्टिंग (आधीपासून असलेल्या) किंवा विशिष्ट आजारासाठी क्लेम करू शकत नाही तोपर्यंतचा प्रतीक्षा करायला लागणारा हा वेळ आहे. |
4 वर्षे /2 वर्षे
|
रूम रेंट कॅपिंग हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या श्रेणींच्या खोल्यांचे भाडे वेगवेगळे असते. हॉटेलच्या खोल्यांचे दर वेगवेगळे असतात. तसेच हे आहे. डिजिटसह, काही योजना आपल्याला खोली भाड्याची मर्यादा नसल्याचा फायदा देतात, जोपर्यंत ते आपल्या इन्शुरन्सच्या रकमेपेक्षा कमी आहे. |
खोलीच्या कमाल भाड्यावर कोणतीही मर्यादा नाही – डिजिटची खासियत
|
आय.सी.यू(ICU) रूमचे भाडे आय.सी.यू (अतिदक्षता विभाग) हे गंभीर आजारी रुग्णांसाठी असतात. आय.सी.यू मध्ये जास्त काळजी घेतली जाते, त्यामुळेच भाडेही जास्त असते. जोपर्यंत ते आपल्या विम्याच्या रकमेपेक्षा कमी आहेत तोपर्यंत डिजिट भाड्याची कोणतीही मर्यादा ठेवत नाही. |
कोणतीही मर्यादा नाही
|
रोड ॲम्ब्युलन्स चार्जेस रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) सेवा ही सर्वात आवश्यक वैद्यकीय सेवांपैकी एक आहे कारण ती केवळ आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यास मदत करत नाही तर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधादेखील पुरवते. त्याची किंमत या सुपर टॉप-अप पॉलिसीअंतर्गत कव्हर केली जाते. |
✔
|
कॉम्प्लिमेंटरी वार्षिक आरोग्य तपासणी आपल्याला आपल्या आरोग्याबद्दल संपूर्ण माहिती आहे याची खात्री करण्यासाठी वार्षिक आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे. हे एक रिन्यूअल बेनिफिट आहे जे आपल्याला आपल्या आवडीच्या कोणत्याही रुग्णालयात कोणत्याही वार्षिक वैद्यकीय चाचण्या आणि तपासणी करण्यासाठी आपल्या खर्चाची भरपाई करण्यास मदत करते. |
✔
|
प्री/पोस्ट हॉस्पिटलायझेशन हे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरचे सर्व खर्च जसे की निदान, चाचण्या आणि रिकव्हरी कव्हर करते. |
✔
|
हॉस्पिटलायझेशननंतरची लमसम- डिजिटल स्पेशल हा एक फायदा आहे जो आपण रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा आपला सर्व वैद्यकीय खर्च भागविण्यासाठी वापरू शकता, डिस्चार्जच्या वेळी. बिलांची गरज नाही. रिएम्बर्समेंटच्या प्रक्रियेद्वारे आपण एकतर हा लाभ वापरणे निवडू शकता किंवा हॉस्पिटलायझेशननंतरचा स्टँडर्ड लाभ वापरू शकता. |
✔
|
मानसिक आजाराचे कव्हर एखाद्या आघातामुळे मनोरुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागत असेल, तर त्याचा या लाभात समावेश केला जाईल. तथापि, ओ.पी.डी(OPD) सल्लामसलत या अंतर्गत कव्हर केली जात नाही. |
✔
|
बॅरिॲट्रिक सर्जरी हे कव्हरेज लठ्ठपणामुळे अवयवांच्या समस्येचा सामना करीत असलेल्या लोकांसाठी आहे (बी.एम.आय > 35). तथापि, जर लठ्ठपणा हा खाण्याचे विकार, हार्मोन्स किंवा इतर कोणत्याही उपचार करण्यायोग्य परिस्थितीमुळे आला असेल तर त्या शस्त्रक्रियेचा खर्च कव्हर केला जाणार नाही. |
✔
|
यात काय कव्हर केले जात नाही ?
क्लेम कसा दाखल करावा ?
सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्सचे मुख्य फायदे
डिडक्टिबल |
एकदाच भरावे लागते! |
कोपेमेंट |
कोणतेही वय-आधारित कोपेमेंट नाही |
कॅशलेस रुग्णालये |
भारतभर 16400+ हून अधिक कॅशलेस रुग्णालये |
खोलीच्या भाड्यावर कमाल मर्यादा |
खोलीच्या भाड्यावर कोणतीही कमाल मर्यादा नाही. तुम्हाला आवडेल ती खोली निवडा. |
क्लेम प्रक्रिया |
डिजिटल स्नेही. कोणत्याही कागदपत्रांची जरूर नाही! |
कोव्हिड-19 साठी उपचार |
कव्हर केले जातात |