तुमच्यासाठी जे सर्वोत्तम आहे ते निवडण्याबाबत तुम्ही नेहमीच काळजी घेतली आहे. योग्य नोकरी करणे, योग्य आहार प्लॅन फॉलो करणे किंवा तुमच्या गरजेनुसार कार खरेदी करणे. पण जेव्हा हेल्थ इन्शुरन्सचा विचार केला जातो तेव्हा मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते, असे का? आपल्याला असे वाटते की आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे, म्हणजे आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही परंतु योग्य सम इनशूअर्ड निवडणे हे हेल्थ इन्शुरन्स निवडण्याइतकेच महत्त्वाचे आहे.
आवश्यकतेपेक्षा कमी सम इनशूअर्ड असणे तितकेच वाईट आहे कारण अशा परिस्थितीत, तुम्ही त्यासाठी प्रीमियम देखील भरत आहात आणि तुमच्याकडे हे कव्हर आहे असा विचार करून तुम्ही हेल्थसाठी तितकी बचतही करत नाही.
चला यासंदर्भातील काही तथ्ये जाणून घेऊया:
"5 पैकी 1 कॅन्सर रुग्ण 36 ते 45 वयोगटातील आहे"
सोर्स: टाइम्स ऑफ इंडिया
"कॅन्सरचा रुग्ण उपचार, औषधे आणि इतर सर्व काळजीसाठी सुमारे 20 लाख खर्च करतो."
सोर्स: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
मग, अशा गरजेच्या वेळी तुम्हाला 20 लाख परवडू शकतात असे जरी आपल्याला वाटत असले तरी, आपली आयुष्यभराची बचत पूर्ण खर्चून टाकणे खरोखरच योग्य आहे का?
आता तुम्ही म्हणाल उपाय काय? कारण अशा आपत्कालीन परिस्थितीत आपली बचत हीच आपल्या पाठीशी असते. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की पुरेशा सम इनशूअर्डसह हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतल्याने तुमची बचत होऊ शकते? हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊ
श्री अग्निहोत्री, जे 30 वर्षांचे आहेत, दरमहा 50,000 कमावतात आणि दरमहा 10,000 वाचवतात. वयाच्या 40 व्या वर्षीपर्यंत ते सुमारे 17 लाखांची बचत करतात. पण एक दिवस तब्येत बिघडते, श्री अग्निहोत्री यांना कॅन्सर झाल्याचे निदान होते. त्या दिवशी अकल्पनीय मानसिक आणि शारीरिक तणावाव्यतिरिक्त, श्री अग्निहोत्री यांना उपचार आणि औषधोपचाराच्या खर्चाचीही व्यवस्था करावी लागते.
त्यामुळे, आम्ही पाहतो की योग्य सम इनशूअर्ड असलेली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ही अशी गुंतवणूक आहे जी तुमच्या बचतीचे आयुष्यभर संरक्षण करू शकते.
तुमचे वय: तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल तितकी जास्त तुमची सम इनशूअर्ड असावी कारण यानुसार बाकी वर्षांसाठी अधिक सुरक्षा मिळू शकते.
तुमचा जीवनाचा टप्पा: तुम्ही जीवनाच्या ज्या टप्प्यावर आहात त्या आधारावर, उदाहरणार्थ, तुम्ही लग्न करणार असाल किंवा कुटुंब सुरू करणार असाल तर, त्याप्रमाणे तुमच्यावर येणाऱ्या किंवा वाढणाऱ्या हेल्थ संबंधी गोष्टींचा विचार करून तुमची सम इनशूअर्ड ठरवावी.
हेल्थ स्थिती: तुमच्या कुटुंबात आजार किंवा तत्सम स्थितीचा इतिहास असल्यास, तुमच्या सम इनशूअर्ड भविष्यात अनपेक्षित हेल्थ स्थितीला सामावून घेणारी असावी
कुटुंबातील अवलंबित सदस्य: जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह फ्लोटर पॉलिसी घेण्याचे प्लॅन करत असाल, तर सम इनशूअर्डने प्रत्येक सदस्याच्या गरजा आणि त्यांच्यासाठी भविष्यातील हेल्थसेवा खर्च विचारात घेतला पाहिजे.
जीवनशैली आणि वैयक्तिक सवयी: नोकरीचा प्रकार, खाण्याच्या सवयी, तणाव पातळी आणि इतर वैयक्तिक सवयी एखाद्या व्यक्तीच्या भविष्यातील हेल्थसेवा गरजांचा अंदाज घेण्यासाठी विचारात घ्यायला हव्यात. सम इनशूअर्ड निवडताना याचाही विचार केला पाहिजे.
शेवटी आरोग्य हीच संपत्ती!
महत्वाचे: भारतातील कोरोनाव्हायरस इन्शुरन्सचे फायदे आणि तोटे याबद्दल अधिक जाणून घ्या