आजकाल, आरोग्य आणि स्वास्थ्य याकडे लक्षदेण्याचे चलन संपूर्ण भारतात दिसून येते. सर्वांगीण आरोग्याची वाढती जागरूकता लोकांना आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अवलंबन करण्यासाठी प्रोत्साहन करते आहे. तरी, आरोग्याच्या समस्यांशी तुमची लढाई एका योग्य अशा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन शिवाय अपूर्ण ठरेल.
इन्शुरन्स बद्दल संशय चुकीच्या माहितीमुळे निर्माण होतो, त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स संबंधी हे गाईड घेऊन आलो आहोत. यामध्ये आम्ही फिक्स्ड बेनिफिट हेल्थ इन्शुरन्स आणि इंडेम्नीटी मेडिकल इन्शुरन्स आणि त्यांच्यातील गुंतागुंत याबद्दल सर्व माहिती देऊ.
चला तर सुरु करूया!
फिक्स्ड बेनिफिट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन: तुम्हाला काय माहिती असावे
फिक्स्ड बेनिफिट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन तुम्हाला कोणत्याही पूर्वनिर्धारित इन्शुअर्ड प्रसंगासाठी ठराविक रक्कम देतो. जर इन्शुररला पॉलिसीच्या नियमांमध्ये नमूद केलेल्या प्रसंगांपैकी कोणत्याही इन्शुअर्ड प्रसंगाला सामोरे जावे लागले, तर हा प्लॅन त्याला ठराविक आणि खात्रीशीर रकमेची हमी देतो.
इथे, इन्शुअर्ड प्रसंग म्हणजे मेडिकल कंडीशन किंवा गम्भीर आजार, जसे की हृदय किंवा रक्तवाहिन्यांसम्बंधी आजार, किडनी फंक्शन संबंधी आजार, आणि कॅन्सर, आणि इतर, असू शकते.
त्याचबरोबर, फिक्स्ड बेनिफिट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन इन्शुररला हॉस्पिटलायझेशनच्या वेळेस कितीही खर्च आला असला तरी क्लेम केल्यावर एकत्रित रक्कम देतो. त्यामुळे, क्लेमच्या रकमेचा पुरेपूर उपयोग हा पॉलिसीहोल्डरचा विशेषाधिकार आहे.
मेडिकल इमर्जन्सीमुळे एखाद्या व्यक्तीचा हॉस्पिटलमध्ये राहण्याचा वाढू शकतो आणि अशा परिस्थितीत जास्तीचा खर्च देखील उद्भवू शकतो. ही परिस्थिती सर्वसाधारणपणे अशा व्यक्तींच्या बाबतीत घडू शकते ज्यांना गंभीर आजार झाला आहे आणि हल्लीच तो वाढत चालला आहे.
वर्षानुवर्षे भारतामध्ये अशा गंभीर आजाराच्या अनेक केसेस झालेल्या आहेत. तशातच, 2022 मध्ये इंडिअन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) द्वारा दिलेल्या एका रिपोर्टनुसार असे आढळून आले आहे की अशा गंभीर आजारांमुळे मृत्यूचा दर वाढतच जाणार आहे. त्यामुळे, अशा आजारांपासून तुमच्या जवळच्या व्यक्तींना सुरक्षित करण्यासाठी पाऊले उचलण्याची आता वेळ आली आहे.
तसेच, फिक्स्ड बेनिफिट हेल्थ प्लॅन्स अशाच वेळेस मदतीसाठी सज्ज असतात.
गंभीर आजारांच्या पॉलीसिच्या बाबतीत, जर इन्शुअर्ड व्यक्ती नमूद केलेल्या गंभीर आजारांची नोंद केली तर, हा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन पॉलिसीहोल्डरला इन्शुअर केलेली रक्कम देतो. आता आम्ही हेच तुम्हाला एका उदाहरणाद्वारे अजून स्पष्ट करून सांगतो:
समजा श्रीमती. वर्मांनी एक गंभीर आजारांसाठीचा Rs. 10 लाखांचा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घेतला. पॉलिसी नियमांनुसार, प्लॅन अंतर्गत नमूद केलेल्या आजारांपैकी एका आजाराचे त्यांना निदान झाले. त्यामुळे, त्यांना त्या आजाराच्या उपचारासाठी कितीही खर्च करावा लागलागला तरी क्लेम स्वरूपात पूर्ण Rs. 10 लाख रुपये मिळतील. त्यांना जेव्हां प्लॅन अंतर्गत इन्शुअर केलेली सर्व रक्कम मिळेल तेव्हा पॉलिसी टर्मिनेट होईल.
तसेच, फिक्स्ड बेनिफिट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन निवडताना, सर्व असे आजार तुमच्या प्लॅन मध्ये कव्हर होत आहेत ना याची खात्री तुम्ही करून घेणे योग्य ठरेल. त्यामुळे, आम्ही तुम्हाला सुचवू की तुम्ही असा प्लॅन निवडा, ज्यामध्ये सर्वसाधारणपणे गंभीर समजले जाणारे सर्व आजार कव्हर केले जात असतील.
त्याचबरोबर, मेडिकल केअर संदर्भातील वाढत्या किमती लोकांना एका चांगल्या आर्थिक योजनेचा आधार घेण्यास भाग पाडत आहेत. इथे तुम्ही तुमच्या आत्ताच्या हेल्थ कव्हर मध्ये एका फिक्स्ड बेनिफिट प्लॅनला जोडण्याचा विचार करू शकता.
यामध्ये नॉन-मेडिकल खर्च, जसे की हॉस्पिटलमध्ये राहिल्यामुळे उपजीविकेचे किंवा अर्थार्जनाचे नुकसान झाल्यामुळे ती नुकसानभरपाई देखील कव्हर होते. तसेच, जर तुम्ही अनुवांशिक किंवा राहणीमान ई. यामुळे उद्भवणाऱ्या ठराविक मेडिकल परिस्थितींना सहज बळी पडत असाल तर हा प्लॅन तुमच्या साठी योग्य आहे.
जसे की नावावरून लक्षात येते की इंडेम्नीटी मेडिकल इन्शुरन्स प्लॅन त्याच्या पॉलिसी होल्डरना आजारपणात हॉस्पिटल मध्ये झालेल्या पूर्ण खर्चासाठी नुकसानभरपाई देतो. इन्शुअर्ड व्यक्तीला हॉस्पिटल मध्ये राहण्यासाठी आलेला वास्तविक झालेला सर्व खर्च हा प्लॅन परत मिळवून देतो. तरी, हा प्लॅन खर्चातील तेवढीच रक्कम परत मिळवून देऊ शकतो जेवढी रक्कम यात इन्शुअर्ड आहे. या प्रकारचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे मेडिक्लेम, जे सर्वात लोकप्रिय प्रॉडक्ट आहे.
हे प्लॅन्स अनेक वेगवेगळ्या पॉलिसीजच्या प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत, जसे की गंभीर आजारांसाठीची पॉलिसी, डेली हॉस्पिटल कॅश पॉलिसी, आणि पर्सनल एक्सिडेंट पॉलिसी. परिणामी, ते वेगवेगळ्या मेडिकल गरजा पूर्ण करू शकतात.
तसेच, जर एखाद्या व्यक्तीने कॅशलेस हॉस्पिटलायझेशन प्लॅन निवडला असेल, त्या व्यक्तीला काही ठराविकच रक्कम भरावी लागते आणि बाकीची रक्कम इन्शुरर भरतो. तरी, जर या व्यक्तीकडे कॅशलेस हॉस्पिटलायझेशन प्लॅन नसेल, तर त्याला इन्शुरर कडे सर्व रिसीट्स आणि बिले जमा करावी लागतात. या कागदपत्रांच्या आधारे इन्शुरर इन्शुअर्ड व्यक्तीला झालेल्या खर्चाची भरपाई करेल.
या प्लॅन्सचे इन्शुरर्सचा साधारणपणे अनेक मेडिकल सेंटर्स आणि पार्टनर हॉस्पिटल्स सोबत टाय-अप असतात. परिणामी, हॉस्पिटलायझेशनच्या बाबतीत इंडेम्नीटी असलेले हेल्थ इन्शुरन्स जास्त फ्लेक्जीबल आहेत. त्यामुळे, पॉलिसी होल्डर्स देखभालीच्या खर्चाची काळजी न करता त्यांच्या सोयीने ठराविक एक मेडिकल सेंटर निवडू शकतात.
त्याचबरोबर हे प्लॅन्स हॉस्पिटल मध्ये राहताना आलेला सर्व खर्च कव्हर करण्यासह आजारांची आणि उपचारांची मोठी श्रुंखला देखील कव्हर करतात. खालील उदाहरण उत्तमरित्या हॉस्पिटल इंडेम्नीटी इन्शुरन्स कव्हरेज प्रकार स्पष्ट करते:
समजा श्री. शर्मांनी Rs. 10 लाखांचा इंडेम्नीटी असलेला हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घेतला. पॉलिसी नियमांनुसार, त्यांना हॉस्पिटल मध्ये एडमिट करावे लागले आणि त्याचे बिल Rs. 3.5 रुपयांचे झाले. इथे, श्री. शर्मा हॉस्पिटल मध्ये राहतानाच्या सर्व खर्चाची सविस्तर बिले जमा करतील. ही सर्व बिले तपासल्यानंतर त्यांची इन्शुरन्स कंपनी त्यांना Rs. 3.5 रुपये परत देईल.
या प्लॅन्सचे इन्शुरर्सचा साधारणपणे अनेक मेडिकल सेंटर्स आणि पार्टनर हॉस्पिटल्स सोबत टाय-अप असतात. परिणामी, हॉस्पिटलायझेशनच्या बाबतीत इंडेम्नीटी असलेले हेल्थ इन्शुरन्स जास्त फ्लेक्जीबल आहेत. त्यामुळे, पॉलिसी होल्डर्स देखभालीच्या खर्चाची काळजी न करता त्यांच्या सोयीने ठराविक एक मेडिकल सेंटर निवडू शकतात.
त्याचबरोबर हे प्लॅन्स हॉस्पिटल मध्ये राहताना आलेला सर्व खर्च कव्हर करण्यासह आजारांची आणि उपचारांची मोठी श्रुंखला देखील कव्हर करतात. खालील उदाहरण उत्तमरित्या हॉस्पिटल इंडेम्नीटी इन्शुरन्स कव्हरेज प्रकार स्पष्ट करते:
समजा श्री. शर्मांनी Rs. 10 लाखांचा इंडेम्नीटी असलेला हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घेतला. पॉलिसी नियमांनुसार, त्यांना हॉस्पिटल मध्ये एडमिट करावे लागले आणि त्याचे बिल Rs. 3.5 रुपयांचे झाले. इथे, श्री. शर्मा हॉस्पिटल मध्ये राहतानाच्या सर्व खर्चाची सविस्तर बिले जमा करतील. ही सर्व बिले तपासल्यानंतर त्यांची इन्शुरन्स कंपनी त्यांना Rs. 3.5 रुपये परत देईल.
तर आता जेव्हा तुम्हाला हे दोन्ही प्लॅन्स लक्षात आले आहेत, आपण या दोन्ही प्लॅन्सची खालील तक्त्यामध्ये एकमेकांशी तुलना करून बघूया:
मुद्दे |
फिक्स्ड बेनिफिट हेल्थ प्लॅन |
इंडेम्नीटी असलेले हेल्थ प्लॅन |
उपयोगिता |
हा प्लॅन तुम्हाला पूर्वनिर्धारित मेडिकल परीस्थितींसाठी किंवा गंभीर आजारांसाठी इन्शुअर केलेली रक्कम परत मिळवून देतो. |
या प्लॅन मध्ये एखाद्या व्यक्तीला त्याच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी आलेल्या सर्व खर्चापैकी केवळ जेवढ्या रुपयांची इन्शुरन्स पॉलिसी असेल तेवढीच रक्कम परत मिळवून देतो. |
आवश्यक असलेल्या गोष्टी |
या प्लॅन मध्ये पॉलिसी होल्डरला पॉलिसी मध्ये नमूद केलेल्या आजारांपैकी एखाद्या आजाराचे निदान झालेले असावे. क्लेम करतेवेळी एखाद्या व्यक्तीला झालेल्या आजाराचे एका सर्टिफाईड डॉक्टर कडून घेतलेले रिपोर्ट सादर करावे लागतात. |
इंडेम्नीटी मेडिकल इन्शुरन्स मध्ये इन्शुअर्ड व्यक्तीला हॉस्पिटल मध्ये एडमिट केलेले असावे किंवा मेडिकल ट्रीटमेंट घ्यावी लह्ली असावी (डे-केअर प्रोसिजर किंवा डायग्नोस्टिक टेस्ट). क्लेम करतेवेळी पॉलिसी होल्डरला हॉस्पिटलची सर्व सविस्तर बिले इन्शुरर किंवा इन्शुरन्स कंपनीकडे जमा करावी लागतात. तसेच, त्या व्यक्तीला एक क्लेम फॉर्म पूर्णपणे भरून आणि सही करून जमा करावा लागतो. या फॉर्म मध्ये महत्त्वाची माहिती जसे हॉस्पिटल मध्ये किती दिवस राहावे लागले, डिस्चार्जची तारीख, ई. |
प्लॅनचा सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य |
कॅश फ्लो वाढतो कारण एकरकमी पैसे मिळतात. एखादा गंभीर आजार, ज्याच्या उपचारासाठी खूप खर्च करावा लागतो, अशा साठी उपयुक्त आहे. या प्लॅन मध्ये ट्रीटमेंट किंवा तब्येत सुधारताना उपजीविकेचे किंवा अर्थार्जनाचे झालेले नुकसान देखील कव्हर केले जाते. परिणामी, इन्शुअर्ड व्यक्तीचा घरखर्च, नर्सिंग कॉस्ट कव्हर होतात आणि मुलांच्या शिक्षणासाठी देखील आर्थिक मदत मिळते. फिक्स्ड बेनिफिट हेल्थइन्शुरन्स प्लॅन मध्ये एखाद्या ठराविक मेडिकल परिस्थितीसाठीचे कव्हरेज घेण्यासाठी कोणत्याही सब-लिमिट्स नाहीत. इंडेम्नीटी मेडिकल इन्शुरन्सच्या तुलनेत या प्लॅनची डॉक्युमेंटेशन प्रोसेस अगदीच सोपी आणि सुटसुटीत आहे. हे प्लॅन्स अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध असल्यामुळे वेगवेगळ्या मेडिकल गरजा पूर्ण करू शकतात. |
या प्लॅन्स मध्ये वेगवेगळ्या आजारांच्या आणि मेडिकल ट्रीटमेंटच्या प्रकारांसाठी कव्हरेज मिळते. इन्शुअर्ड व्यक्ती वर्षभरात कधीही आणि कितीही वेळा क्लेम मागू शकतात आणि त्यांची इन्शुरन्सची रक्कम वापरू शकतात. यामध्ये वेगवेगळ्या मेडिकल सेंटर्स आणि हॉस्पिटल्स मधून योग्य निवड करण्याची संधी आणि सोबतच काही केसेस मध्ये कॅशलेसची सुविधा देखील मिळते. फिक्स्ड इंडेम्नीटी हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रीमियम बऱ्याचदा कॉस्ट इफेक्टिव्ह असतात. तसेच, प्रीमियमची रक्कम भावी पॉलिसी होल्डरच्या वयावर, त्याच्या / तिच्या जुन्या आजारावर, आणि पॉलीसिच्या वैशिष्ट्यांवर अवलंबून असते. |
प्लॅनची मर्यादा |
फिक्स्ड बेनिफिट हेल्थ प्लॅनसाठीची पात्रता काही ठराविक आजारांसाठी मर्यादित आहे.तसेच, इंडेम्नीटी असलेल्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सच्या प्रीमियम पेक्षा या प्लॅन्सचे प्रीमियम महाग आहे. |
इंडेम्नीटी असलेल्या हेल्थ इन्शुरन्स असलेले प्लॅन्स त्यांच्या पॉलिसीच्या नियमांनुसार डिडक्टिबल्स पे करत नाहीत. सोप्या शब्दांत सांगायचे झालेतर या प्लॅन मध्ये नमूद केलेल्या यादीतील ठराविक काही खर्च आहेत जे कव्हर केले जाणार नाहीत, जसे गॉज, ग्ल्व्हस, ऑक्सिजन मास्क ई. त्यामुळे, पॉलिसी होल्डरला हॉस्पिटल मध्ये एडमिट व्हावे लागल्यास वरील सर्व वस्तूंसाठी स्वतःच खर्च करावा लागेल. क्लेम साठीची डॉक्युमेंटेशन प्रोसेस लेंदी लांबलचक आणि दीर्घकाळ चालणारी आहे. |
दोन्ही हेल्थ प्लॅन्स अगदी वैशिट्यपूर्ण आहेत आणी वेगवेगळ्या मेडिकल गरजा पूर्ण करतात. तसेच, तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे प्रत्येक
प्लॅन चे स्वतःचे असे काही फायदे आणि काही तोटे देखील आहेत.
या दोन्ही प्लॅन्सचे मूल्यांकन करण्यासाठीचा आणखीन एक मुद्दा म्हणजे त्यांचे त्यांचे टॅक्स बेनिफिट्स. तरी, या दोन्हीप्लॅन्सचे टॅक्स बेनिफिट्स एकसारखेच आहेत. त्यामुळे, तुम्ही कोणताही प्लॅन निवडला तरी तुम्हाला इन्कम टॅक्स एक्ट, 1961 मधील सेक्शन 80डी अंतर्गत डिडक्शन मिळेल. इथे, सीनियर सिटिझन्ससाठी Rs. 50,000 रुपयापर्यंतचे प्रीमियम आणि नॉन-सीनियर सिटीझन्ससाठी Rs. 25,000 रुपयापर्यंतचे प्रीमियम टॅक्स डिडक्शन साठी पात्र आहे.
तर, तुम्ही कोणता प्लॅन निवडावा? आम्हाला वाटते की हा निर्णय तुमच्या गरजा आणी अवश्यकतांवर येऊन थाबतो. एका फिक्स्ड इंडेम्नीटी मेडिकल इन्शुरन्स प्लॅन मध्ये तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी साठी आर्थिक तयारी आणि अतिरक्त सुरक्षा मिळवू शकता.
तसेच, आजकालचे धकाधकीचे आयुष्य आपल्याला अनेक गंभीर आजार ओढवून घेण्यास बळी पाडते, तर तुमच्या आत्ताच्या हेल्थ पॉलिसीला जोडून तुम्ही एक फिक्स्ड बेनिफिट हेल्थ प्लॅन घेणे श्रेयस्कर ठरेल.
तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेणे हे सर्वतोपरी आहे. तरी, जसे की सर्वमान्य आहे की आजकाल मेडिकल केअर महाग झाली आहे. त्यामुळे, इन्शुरन्स प्लॅन्स तुम्हाला महागडी बिले भरणे टाळण्यासाठी मदत करतात आणि तुमचे आर्थिक नुकसान होण्यापासून वाचवतात. आणि आम्हाला आशा आहे की या गाईडमध्ये तुम्हाला यासंदर्भात पर्याप्त माहिती मिळाली आहे आणि हेल्थ प्लॅन निवडण्याची तुमचा संकोच कमी झाला असावा.