आरोग्य संजीवनी हेल्थ इन्शुरन्स

Zero Paperwork. Quick Process.

आरोग्य संजीवनी पॉलिसी काय आहे?

आरोग्य संजीवनी हेल्थ इन्शुरन्स हा एक स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्स प्लॅन आहे ज्यामध्ये 3 लाखापासून 2 कोटीपर्यंत सम इन्शुअर्ड ठेऊन तुमचे वैद्यकीय खर्च कव्हर केले जातात. या कव्हरेजमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याआधीचे आणि दाखल केल्यानंतरचे सगळे खर्च दिले जातात.हॉस्पिटल रुम रेंट (राहण्याचे आणि बेडचे चार्जेस), आयसीयू सेवा आणि अगदी आधुनिक उपचार पद्धतीसाठीचा खर्चदेखील यात कव्हर केला जातो.

डिजिटच्या आरोग्य संजीवनी हेल्थ इन्शुरन्समध्ये तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबातील लोकांसाठी फॅमिली फ्लोटर प्लॅन किंवा इन्डिव्ह्युजअल पॉलिसी यातील एकाची निवड करु शकता.

आरोग्य संजीवनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे महत्त्व काय आहे?

ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स कोणता घ्यावा याबद्दल तुमचा गोंधळ होत असल्यास असे वाटणारे तुम्ही एकटे नाही. त्यामुळेच आरोग्य संजीवनी हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून सर्व हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांद्वारे समान फायद्यांसह, एक मूलभूत, स्टँडर्ड प्लॅन प्रदान करून  हेल्थ इन्शुरन्स सुलभ करण्याचा प्रयत्न आयआरडीएआय द्वारे करण्यात आला.

खरेदी आणि क्लेम प्रक्रियेदरम्यान प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स कंपनीने दिलेल्या सेवेमध्ये फरक असतो , प्रत्येक इन्शुरन्स कंपनीच्या नेटवर्कमध्ये उपलब्ध असलेली कॅशलेस रुग्णालये आणि आरोग्य संजीवनी पॉलिसी प्रीमियम यात फरक असू शकतो.


*डिस्क्लेमर  -  30-वर्ष पूर्ण झालेल्या आणि आरोग्याच्या कोणत्याही समस्या नसलेल्या पुरुषासाठी 1 कोटीच्या इन्शुरन्सच्या रकमेसाठी  ₹ 640/प्रति महिना प्रीमियम मोजला जातो. या प्रीमियम रकमेत जीएसटी समाविष्ट केलेला नाही.

तुम्ही आरोग्य संजीवनी पॉलिसी का खरेदी करावी?

भारतात आजारांचे प्रमाण खूप वाढत असून आरोग्य सेवेवरचा खर्चदेखील दिवसागणिक वाढत आहे.

आरोग्य संजीवनी पॉलिसी ही आज बाजारातील सर्वात परवडणारी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे.

किमान  बेसिक (मूलभूत) हेल्थ इन्शुरन्स असणे ही स्मार्ट आर्थिक नियोजनाची आणि गुंतवणूकीची गुरुकिल्ली आहे!

भारत जगातील सर्वात जास्त कोव्हिड प्रभावित देशांपैकी एक आहे. आरोग्य संजीवनी पॉलिसी ही तुम्हाला दीर्घकालीन कोव्हिड-19 आणि इतर आजारांपासून संरक्षण देण्यासाठी एक किफायतशीर पर्याय ठरु शकतो.

डिजिटच्या आरोग्य संजीवनी पॉलिसीमध्ये काय चांगले आहे?

सोप्या ऑनलाइन प्रक्रिया  - तुमची पॉलिसी खरेदी करण्यापासून ते क्लेम करण्यापर्यंत सर्व काही सोपे, जलद, पेपरलेस आणि त्रासमुक्त आहे! हार्ड कॉपीची आवश्यकता नाही!

इन्शुरन्सची रक्कम  - तुमच्या गरजांच्या आधारे तुमची इन्शुरन्सची रक्कम कस्टमाइझ करा!

कोरोनाव्हायरस सारख्या साथीच्या रोगांचा समावेश होतो – कोव्हिड-19 चा विचार करता भारत हा सर्वात जास्त कोव्हिड-19 प्रभावित देशांपैकी एक आहे. आम्ही आमच्या हेल्थ इन्शुरन्सचा एक भाग म्हणून कोव्हिड-19 ला कव्हर करतो जेणेकरून तुम्हाला खरोखर वेगळी कोरोना व्हायरस पॉलिसी घेण्याची आवश्यकता नाही.

संचयी बोनस - निरोगी राहण्यासाठी बक्षीस मिळवा! तुम्ही क्लेम - फ्री वर्षांसाठी वार्षिक संचयी बोनससाठी पात्र असाल.

कोणत्याही रुग्णालयात उपचार घ्या - भारतातील आमच्या 6400+ नेटवर्क रुग्णालयांमधून कॅशलेस ट्रिटमेंट किंवा रिएम्बर्समेंटचा पर्याय निवडा.

किमान कोपेमेंट - हेल्थ इन्शुरन्सच्या क्लेम प्रक्रियेदरम्यान, तुम्हाला तुमच्या खिशातून क्लेमच्या रकमेच्या 5% रक्कम भरावी लागेल.

24X7 कस्टमर असिस्टंस - तुम्हाला काही मदत हवी असल्यास, तुम्ही राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही आमची 24x7 कॉल सुविधा वापरू शकता.

क्लेमची सोपी प्रक्रिया -  क्लेमची आमची प्रक्रिया पूर्णपणे तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे. त्यामुळे  फक्त क्लेम करणेच नाही तर सेटलमेंट करणेही तितकेच सोपे आहे.

आरोग्य संजीवनी पॉलिसी प्रीमियम चार्ट आणि कॅल्क्युलेटर

डिजिटच्या आरोग्य संजीवनी पॉलिसीमध्ये ₹ 50,000 च्या पटीत ₹ 3 लाख ते ₹ 2 कोटीपर्यंतच्या रकमेचे इन्शुरन्सचे पर्याय आहेत. एका व्यक्तीसाठी किमान ₹3 लाख आणि कमाल ₹2 कोटी इन्शुरन्सच्या रकमेसाठी आरोग्य संजीवनी पॉलिसी प्रीमियमच्या तुलनेविषयीची माहिती इथे आहे.*

वय गट संजीवनी पॉलिसी प्रीमियम (एस आय (SI) 3 लाख) आरोग्य संजीवनी पॉलिसी प्रीमियम (एसआय (SI) 2 कोटी)
18-25 ₹2,414 ₹9,642
26-30 ₹2,503 ₹9,999
31-35 ₹2,803 ₹11,197
36-40 ₹3,702 ₹13,333
41-45 ₹4,698 ₹18,764
46-50 ₹6,208 ₹24,799
51-55 ₹8,420 ₹33,633
56-60 ₹11,569 ₹46,211
*डिस्क्लेमर - या प्रीमियम रकमेची गणना आरोग्याची कोणतीही समस्या नसलेल्या एका पुरुषासाठी केलेली आहे. या प्रीमियममध्ये जीएसटी समाविष्ट केलेला नाही. या इन्शुरन्सच्या रकमेव्यतिरिक्त, तुमच्याकडे ₹3 लाख, ₹5 लाख, ₹10 लाख, ₹25 लाख, ₹50 लाख, ₹1 कोटी आणि ₹2 कोटी असे इतर पर्याय आहेत.

आरोग्य संजीवनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत काय कव्हर केले जाते ?

काय कव्हर केलेले नाही?

  • मेडिकल क्लेमशी संबंधित नसलेले कोणतेही हॉस्पिटलायझेशन किंवा हॉस्पिटलायझेशन पूर्वीचे खर्च कव्हर केले जाणार नाहीत.
  • कोणत्याही को-मॉर्बिडिटीज संबंधित नसलेल्या लठ्ठपणा किंवा वजन नियंत्रणाशी संबंधित शस्त्रक्रिया कव्हर केल्या जाणार नाहीत.
  • लिंग उपचार बदल या पॉलिसी अंतर्गत समाविष्ट नाही.
  • अपघात, कर्करोग, किंवा थेट आणि तात्काळ आरोग्य जोखीम सोडून कराव्या लागणाऱ्या कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरीचा समावेश केला जात नाही.
  • आरोग्य संजीवनी पॉलिसीमध्ये निवासी देखभाल किंवा ओपीडी खर्च समाविष्ट नाही.
  • गुन्हेगारी कृत्य केल्यामुळे किंवा करण्याचा प्रयत्न केल्यामुळे होणारे क्लेम कव्हर केले जाणार नाहीत.
  • मादक पदार्थांच्या गैरवापरामुळे होणारे उपचार हेल्थ पॉलिसीमध्ये समाविष्ट केलेले नाहीत.
  • धोकादायक किंवा साहसी खेळांमध्ये सहभागी होण्याशी संबंधित वैद्यकीय खर्च वगळण्यात आला आहे.
  • मातृत्वासाठी करण्यात आलेला खर्च या पॉलिसीचा भाग नाही.
  • वंध्यत्व आणि प्रजनन उपचार समाविष्ट नाहीत.
  • डॉक्टरांच्या शिफारशीशिवाय किंवा वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक नसलेले उपचार कव्हर केले जाणार नाहीत.

क्लेम कसा दाखल करायचा?

रिएम्बर्समेंट क्लेम्स  - हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून दोन दिवसांच्या आत 1800-258-4242 वर संपर्क साधून आम्हाला कळवा किंवा आम्हाला healthclaims@godigit.com वर ईमेल करा आणि आम्ही तुम्हाला एक लिंक पाठवू जिथे तुम्ही  रिएम्बर्समेंट प्रक्रिया करण्यासाठी तुमची हॉस्पिटलची बिले आणि सर्व संबंधित कागदपत्रे अपलोड करू शकता.

कॅशलेस क्लेम्स  - आमच्या नेटवर्कमधील हॉस्पिटल निवडा. तुम्हाला नेटवर्क हॉस्पिटल्सची संपूर्ण यादी इथे मिळेल. हॉस्पिटलच्या हेल्पडेस्कवर ई-हेल्थ कार्ड दाखवा आणि कॅशलेस रिक्वेस्ट फॉर्म मागवा. सर्व काही चांगले असल्यास, तुमच्या क्लेमवर लगेच तिथल्या तिथे प्रक्रिया केली जाईल.

तुम्ही कोरोना व्हायरससाठी क्लेम केला असल्यास, आयसीएमआरच्या अधिकृत केंद्राकडून - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणेकडून तुमचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची खात्री करा –

आरोग्य संजीवनी पॉलिसीची प्रमुख वैशिष्ट्ये

इन्शुरन्सची रक्कम 3 लाख ते 2 कोटी
को- पेमेंट 5% कम्पल्सरी को-पेमेंट
प्रीमियम प्रति वर्ष 2414 पासून सुरू*
रुम रेंट कॅपिंग तुमच्या इन्शुरन्सच्या रकमेच्या 2% (5,000 पर्यंत)
संचयी बोनस प्रत्येक क्लेम-मुक्त वर्षासाठी तुमच्या विम्याच्या रकमेमध्ये अतिरिक्त 5%
क्लेम प्रक्रिया डिजिटल फ्रेंडली, हार्डकॉपी नाहीत!
उपलब्ध पर्याय फॅमिली फ्लोटर आणि इन्डिव्ह्युजअल पॉलिसी

आरोग्य संजीवनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे स्टँडर्ड फायदे

आजीवन नुतनीकरण क्षमता

या पॉलिसीच्या खरेदीसाठी एंट्री लेव्हल 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांसाठी मर्यादित असताना, ही पॉलिसी तुम्ही वेळेवर नुतनीकरण (रिन्युअल) करत असल्यास आजीवन नुतनीकरणाच्या फायद्यासह येते.

कमी आरोग्य संजीवनी पॉलिसी प्रीमियम

आयआरडीएआयद्वारे निर्धारित केलेली ही बेसिक स्टँडर्ड पॉलिसी असल्याने, आरोग्य संजीवनी पॉलिसीचा प्रीमियम बाजारातील इतर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींपेक्षा तुलनेने कमी आहे.

कमी को-पेमेंट

प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स स्वतंत्र को-पेमेंट मर्यादांसह येतो. काहींकडे 10-20% को-पेमेंट असते, तर काहींकडे अजिबात को-पेमेंट नसते. या पॉलिसीमध्ये, फक्त 5% ची किमान को- पेमेंट आहे; म्हणजे क्लेमदरम्यान तुम्हाला तुमच्या खिशातून 5% रक्कम खर्च करावी लागेल.

इन्डिव्ह्युजअल आणि फॅमिली फ्लोटर उपलब्ध

GoDigit  जनरल इन्शुरन्सने ऑफर केलेली आरोग्य संजीवनी पॉलिसी दोन योजनांसह उपलब्ध आहे: एक इन्डिव्ह्युजअल हेल्थ पॉलिसी (कुटुंबातील सदस्यासाठी प्रत्येकी एक पॉलिसी) आणि फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स (संपूर्ण कुटुंबासाठी एक पॉलिसी).

इन्शुरन्सची मर्यादित रक्कम

आरोग्य संजीवनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत, तुम्ही निवडू शकता अशी विम्याची रक्कम 3 लाख ते 2 कोटींपर्यंत मर्यादित आहे.

आरोग्य संजीवनी पॉलिसी कोणी खरेदी करावी?

पहिल्यांदा हेल्थ इन्शुरन्स विकत घेणारा माणूस

आरोग्य संजीवनी पॉलिसीचे फायदे सर्व इन्शुरन्स कंपन्यांमध्ये जवळपास सारखेच आहेत आणि सध्या बाजारात सर्वात स्वस्त हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे. त्यामुळे, जर तुम्ही अजूनही तरुण असाल आणि तुमचा हेल्थ इन्शुरन्स घेऊन प्रवास सुरू करत असाल, तर आरोग्य प्लॅनसारखी मूलभूत हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणे सध्या योग्य असू शकते तुम्हाला 5 लाखांपेक्षा जास्त इन्शुरन्सची रक्कम आवश्यक असण्याची शक्यता कमी आहे आणि तुम्ही तुमच्या हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियमवर अजून जास्त खर्च करू इच्छित नाही अशा परिस्थितीत आरोग्य संजीवनी इन्शुरन्स घेणे फायदेशीर ठरेल.

कोव्हिड -19 कव्हर शोधत असलेले लोक

कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव झाल्यापासून, लोक जास्त प्रमाणात हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी शोधत आहेत जी त्यांना कोरोना संसर्ग झाल्यास संरक्षित करेल. तुम्हीही अशा पॉलिसीच्या शोधात असाल तर, आरोग्य संजीवनी पॉलिसी हा एक चांगला पर्याय असू शकतो कारण त्याची किंमत कोरोनाव्हायरस स्पेसिफिक प्लॅनइतकीच आहे आणि इतर रोग आणि आजारांमध्येही कोविड-19 समाविष्ट आहे. काही महिन्यांत कालबाह्य होणार्‍या इन्डिव्ह्युजअल कोरोनाव्हायरस प्लॅनच्या तुलनेत ती आजीवन नुतनीकरणाच्या फायद्यासह येते हा सर्वात चांगला भाग आहे.

बेसिक, परवडणारा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन शोधत असलेल्या व्यक्ती

तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सद्वारे तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करायचे असेल, परंतु तुमच्या वार्षिक हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियमवर जास्त खर्च करू इच्छित नसल्यास, तुम्ही आरोग्य संजीवनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी निवडू शकता जी सध्या सर्वात स्वस्त पर्यायांपैकी एक आहे.

आरोग्य संजीवनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन कशी खरेदी करावी?

आरोग्य संजीवनी पॉलिसी ऑनलाइन खरेदी करणे ही 123 म्हणण्याइतकी सोपी प्रक्रिया आहे:

  • स्टेप 1: डिजिट वेबसाइट किंवा मोबाईल ॲपला भेट द्या आणि आरोग्य संजीवनी पेजवर, तुमचा मोबाइल नंबर आणि पिन कोड ही माहिती भरा.
  • स्टेप 2: पॉलिसीमध्ये कोणाचा समावेश आहे, जन्मतारीख, प्राधान्य देण्यात यावे अशी इन्शुरन्सची रक्कम, मूलभूत वैद्यकीय माहिती आणि संपर्कविषयक तपशील यासारखी माहिती भरा.
  • स्टेप 3: एकदा तुम्ही ही माहिती शेअर केल्यानंतर, तुम्हाला एक अंतिम किमतीविषयीची माहिती मिळेल आणि तुम्ही पेमेंटसह पुढे जाऊ शकता. त्यानंतर, तुम्हाला तुमच्या इनबॉक्समध्ये काही मिनिटांत पॉलिसी मिळेल.

तुमच्या पॉलिसीचे नुतनीकरण (रिन्युअल) करणे आणखी सोपे आहे. तुम्हाला फक्त तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरने (किंवा पॉलिसी तपशील) साइन इन करायचे आहे, तुमची माहिती योग्य असल्याचे कन्फर्म करा आणि पेमेंट करा. बस एवढेच!

आरोग्य संजीवनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

आरोग्य संजीवनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कोरोनाव्हायरस कव्हर केला जातो का?

होय, कोरोनाव्हायरस हॉस्पिटलायझेशन बेनिफिटमध्ये समाविष्ट केले जाईल.

Go Digit ची आरोग्य संजीवनी पॉलिसी कोण खरेदी करू शकते ?

18 ते 60 वर्षे वयोगटातील कोणीही आरोग्य संजीवनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्यास पात्र आहे.

GoDigit च्या आरोग्य संजीवनी पॉलिसीमध्ये इन्शुरन्सची जास्तीत जास्त रक्कम किती आहे?

GoDigit च्या आरोग्य संजीवनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये तुम्ही किमान 3 लाख आणि कमाल 2 कोटींचे कव्हर खरेदी करू शकता.

इन्डिव्ह्युजअल आणि फॅमिली फ्लोटर आरोग्य संजीवनी पॉलिसीमध्ये काय फरक आहे?

डिजिटवर, आरोग्य संजीवनी पॉलिसी दोन पर्यायांसह निवडता येते; तुम्ही एकतर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला एका पॉलिसीसह संरक्षित करू शकता, म्हणजे फॅमिली फ्लोटर (जास्तीत जास्त इन्शुरन्स रक्कम 2 कोटी) किंवा कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी इन्डिव्ह्युजअल पॉलिसी खरेदी करू शकता. (तुम्ही इन्शुरन्सची रक्कम म्हणून 3 लाख ते 2 कोटी दरम्यान रक्क्म निवडू शकता)

आरोग्य संजीवनी पॉलिसीसाठी प्रतीक्षा कालावधी आहे का?

होय. या पॉलिसीमधील प्रतीक्षा कालावधी रोगाच्या प्रकारानुसार बदलतो: 24 महिने आणि 48 महिने. याचा अर्थ असा की काही रोगांसाठी, जेव्हा रोगासाठी निर्दिष्ट प्रतीक्षा कालावधी निघून जाईल तेव्हाच तुम्हाला संरक्षित केले जाईल.

मी माझी सध्याची पॉलिसी गो डिजिटच्या आरोग्य संजीवनी पॉलिसीमध्ये पोर्ट करू शकतो का?

होय, तुम्ही हे करू शकता!

क्लेमदरम्यान मला माझ्या खिशातून पैसे द्यावे लागतील का?

होय, पॉलिसीच्या अटींनुसार, आरोग्य संजीवनी आरोग्य पॉलिसी 5% को- पेमेंटसह येते.

आरोग्य संजीवनी पॉलिसीसाठी रूम भाड्याची मर्यादा आहे का?

होय, बहुतेक रुग्णालये ज्या किमतीत चांगल्या खोल्या ऑफर करतात ते पाहता स्टँडर्ड खोलीचे भाडे भरताना SI(सम इन्शुअर्ड) च्या 2% रक्कम आणि कमाल मर्यादा रु. 5,000 प्रतिदिन इतकी आहे.

कंपनीने दिलेल्या कव्हरेजपेक्षा जास्त मी माझे कव्हरेज वाढवू शकतो का?

नाही, आरोग्य संजीवनी पॉलिसी केवळ योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या स्टँडर्ड बेनिफिटसह येते. तुम्ही स्वत:हून निवडू शकाल असे कोणतेही ॲड-ऑन किंवा कव्हर यात नाही.

सेट केलेल्या ब्रॅकेट पलीकडे मी माझी इन्शुरन्सची रक्कम वाढवू शकतो का?

नाही, आरोग्य संजीवनी पॉलिसीच्या अटी आणि शर्तींनुसार, तुम्ही तुमची इन्शुरन्सची रक्कम 3 लाख ते 2 कोटींपर्यंतच निवडू शकता.

मला कम्पल्सरी कोपेमेंट भरावे लागेल का?

होय, आरोग्य संजीवनी पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार, क्लेम्सच्या दरम्यान 5% कम्पल्सरी कोपेमेंट भरणे अनिवार्य आहे.

डिजिटच्या आरोग्य संजीवनी पॉलिसीचा पॉलिसी कालावधी किती आहे?

डिजिटच्या आरोग्य संजीवनी पॉलिसीचा कालावधी 1 वर्षाचा आहे. या कालावधीनंतर तुमचे कव्हरेज सुरू ठेवायचे असल्यास, तुम्हाला तुमच्या पॉलिसीचे रिन्युअल करावे लागेल.

गो डिजिटद्वारे आरोग्य संजीवनी पॉलिसीसाठी वयोमर्यादा आणि पात्रता काय आहे ?

होय. या पॉलिसी अंतर्गत, प्रौढांसाठी प्रवेश वयोमर्यादा 18 वर्षे ते 60 वर्षे आहे. फॅमिली फ्लोटर प्लॅन अंतर्गत मुलांसाठी, ती 3 महिने ते 25 वर्षे आहे. तथापि, रिन्युअलसाठी वयोमर्यादा नाही.