जनरल इन्शुरन्स एजंट कोण असतो?
इन्शुरन्स एजंट इन्शुरन्स कंपनीबरोबर विशिष्ट इन्शुरन्स उत्पादने विक्री करण्याचे काम करतो.
जर तुम्ही घरबसल्या इन्शुरन्स एजंट कसे बनावे किंवा पीओएसपी (POSP) वा जनरल इन्शुरन्स एजंट कसे व्हावे याबद्दल विचार करत असाल, तुम्ही ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक गरजांनुसार योग्य ती इन्शुरन्स पॉलिसी कशी निवडावी यासाठी मदत कराल. [t1]
डिजिटबरोबर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स, मोटर (गाडी, दुचाकी, व्यावसायिक वाहने) इन्शुरन्स, एसएफएसपी (SFSP) इन्शुरन्स आणि इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स यांची विक्री करू शकता.
जनरल इन्शुरन्स म्हणजे काय?
जनरल इन्शुरन्समध्ये सर्व नॉन-लाईफ इन्शुरन्स पॉलिसीजचा समावेश होतो. उदा. कार इन्शुरन्स, बाईक इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, एसएफएसपी (SFSP) इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स इत्यादी.
या सर्व जनरल इन्शुरन्स पॉलिसीज लोकांना काही दुर्दैवी घटना घडल्यास त्यातून उद्भवणाऱ्या नुकसानापासून स्वतःचा बचाव करण्यास मदत करतात.
उदाहरणार्थ कार इन्शुरन्समुळे अपघातात कारला झालेले नुकसान आणि मोडतोडीपासून एखाद्याचे रक्षण होते तर एसएफएसपी (SFSP) इन्शुरन्स चोरी किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानापासून रक्षण देतो.
शहरी भारतातले वाढते जीवनमान आणि मोटर व्हेईकल्स अधिनियमासारख्या कायद्यांमुळे अधिकाधिक भारतीय नागरिक त्यांची मालमत्ता आणि जीवन यांचा इन्शुरन्स घेणे पसंत करताहेत.
*डिस्क्लेमर – एजंट्सची कोणतीही विशिष्ट वर्गवारी नाही. तुम्ही जनरल इन्शुरन्स एजंट होण्यासाठी नोंदणी केली असेल तर तुम्ही सर्व जनरल इन्शुरन्स उत्पादने विकू शकता.
भारतीय जनरल इन्शुरन्स उद्योगबद्दल काही रोचक गोष्टी
केवळ मागच्याच वर्षात भारतातील जनरल इन्शुरन्स उद्योगामध्ये १४.५% इतकी वाढ झाली. (1)
भारतातील नॉन-लाईफ इन्शुरन्स धारणकर्त्यांनी 2019 मध्ये एकूण 1.59 ट्रिलियन (खरब) रुपयांचा प्रीमियम अदा केला. (2)
भारतातील जनरल इन्शुरन्सची मागणी 2020 पर्यंत $40 बिलियन (अब्ज)पेक्षा जास्त असेल अशी शक्यता आहे. (3)
डिजिटचा जनरल इन्शुरन्स एजंट का व्हावे?
तुम्ही जनरल इन्शुरन्स एजंट का व्हायला हवे आणि त्यासाठी डिजिटची निवड का करावी ते जाणून घ्या.
आमचा पीओएसपी (POSP) भागीदार म्हणून तुम्ही थेट आमच्याबरोबरच काम कराल. त्यात इतर कोणतेही मध्यस्थ नसतात. आज डिजिट भारतातली सर्वात वेगाने वाढणारी इन्शुरन्स कंपनी आहे. आजच्या घडीला आम्ही ‘एशिया’ज जनरल इन्शुरन्स कंपनी ऑफ द इयर 2019’ हे बिरुद मिळवणारी वयाने सर्वात लहान कंपनी आहोत.
वेगवेगळ्या प्रकारच्या मालमत्तेसाठी आम्ही इन्शुरन्स पॉलिसीजची विशाल श्रेणी उपलब्ध करून दिली आहे. उदाहरणार्थ आम्ही हेल्थ, मोटर (गाडी, दुचाकी, व्यावसायिक वाहने), ट्रॅव्हल, होम आणि इतर अनेक प्रकारचे सुरक्षा कव्हर देतो.
आमचा भर इन्शुरन्स घेणे सोपे करण्यावर आहे. म्हणूनच आमची सर्व कागदपत्रे इतकी सोपी असतात की एखाद्या 15 वर्षांच्या मुलालाही ती समजायला कोणतीही अडचण येऊ नये.
आमच्यासाठी तंत्रज्ञान हा पायाभूत घटक आहे. त्याच्या सहायाने आम्ही तुम्हाला समर्पित सपोर्ट टीम आणि ज्याच्याद्वारे तुम्ही 24x7 विक्री करू शकाल असे प्रगत वेब आणि मोबाइल ॲप देतो!
आमच्या सर्व प्रक्रिया ऑनलाइन असतात. त्यासाठी कोणतेही कागदपत्रांचे व्यवहार लागत नाहीत. ही दोन्ही बाजूंनी फारच सोयीची गोष्ट आहे. तुम्ही तुमचा वेळ त्यामुळे वाचवू शकता आणि ग्राहकांनाही हे जास्त आवडते!
आता कोणत्याही भल्या मोठ्या प्रक्रिया किंवा कटकटीच्या कागदपत्रांची आवश्यकता नाही. आम्ही कोणत्याही गैरसोयीशिवाय तात्काळ ऑनलाइन इन्शुरन्स पॉलिसीज देतो.
आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अजिबात काळजी करू नका! आम्ही कमिशन अगदी वेगाने अदा करतो. पॉलिसी इन्शुरन्सनंतर 15 दिवसांतच तुमचे कमिशन तुमच्या खात्यात जमा केले जाते.
ऑनलाइन इन्शुरन्स एजंट कसे बनाल?
पीओएसपी (POSP) प्रमाणपत्र मिळवणे हा इन्शुरन्स एजंट बनण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. पीओएसपी - पॉइंट ऑफ सेल्स पर्सन (POSP- Point of Sales Person) म्हणजे जो विशिष्ट इन्शुरन्स उत्पादने विकू शकतो अशा इन्शुरन्स एजंटला दिलेले नाव आहे
पीओएसपी (POSP) होण्यासाठी तुम्हाला केवळ आयआरडीएआयद्वारे निर्देशित किमान शैक्षणिक पात्रता असणे आणि आम्ही देत असलेले प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक असते. तुमच्या प्रशिक्षणाची जबाबदारी डिजिट घेते, तेव्हा तुम्ही चिंता सोडून द्या!
इन्शुरन्स एजंट होण्यासाठी कोणती पात्रता आणि गुणवत्ता असणे आवश्यक आहे?
ऑनलाइन इन्शुरन्स एजंट होण्यासाठी तुम्हाला खालील बाबींची पूर्तता करावी लागेल
- तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असायला हवे,
- तुम्ही किमान इयत्ता 10 वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असावे,
- तुमच्याकडे वैध आधार कार्ड आणि पॅन कार्ड असावे.
- तुम्हाला आयआरडीएआयने सक्तीचे केलेले 15 तासांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यास सांगितले जाईल.
तुम्हाला जरूर असेल ते सर्व शिकवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत
इन्शुरन्स एजंट कोण होऊ शकते?
इन्शुरन्स एजंट होण्यासाठीची किमान पात्रता एवढीच आहे की उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे आणि तो इयत्ता 10 वी उत्तीर्ण असावा.
म्हणजेच इन्शुरन्स विकण्याची क्षमता आहे अशी कोणतीही व्यक्ती पीओएसपी (POSP) एजंट बनू शकते. महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहिणी किंवा पती, निवृत्त व्यक्ती आणि व्यावसायिक यांचा यात समावेश होतो.
डिजिटचे इन्शुरन्स एजंट कसे व्हाल?
स्टेप 1
वर दिलेला पीओएसपी (POSP) फॉर्म भरून साईन अप करा, सर्व तपशील भरा आणि कागदपत्रे आपलोड करा.
स्टेप 2
आम्ही देत असलेले 15-तासांचे प्रशिक्षण पूर्ण करा.
स्टेप 3
सांगण्यात आलेली परीक्षा द्या.
स्टेप 4
आमच्याबरोबर करार करा की काम झाले! आता तुम्ही एक प्रमाणित पीओएसपी (POSP) बनला आहात.
मी जनरल इन्शुरन्स एजंट का व्हावे?
पीओएसपी (POSP) असण्याचा एक फायदा म्हणजे तुम्हाला तुमच्या सोयीने काम करण्याचे स्वातंत्र्य असते. तुम्ही असता तुमच्या मर्जीचे मालक!
तुम्हाला पूर्णवेळ की अर्धवेळ काम करायचे आहे हे तुम्ही ठरवू शकता आणि त्याप्रमाणे स्वतःचे कामाचे तास नक्की करू शकता.
डिजिट इन्शुरन्स इन्शुरन्स पॉलिसींची प्रामुख्याने ऑनलाइन विक्री करते. म्हणजेच एक पीओएसपी (POSP) म्हणून तुम्ही घरच्या घरी काम करून आमच्या ऑनलाइन प्रक्रिया वापरुन पॉलिसी विकू शकता.
पीओएसपी (POSP) चे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एक आवश्यक निकष आहे की आयआरडीएआयद्वारा दिले जाणारे सक्तीचे 15 तासांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असावे. खरं सांगायचं तर ते काही विशेष कठीण नाही! फक्त 15 तासांची गुंतवणूक केलीत की तुम्ही काम सुरू करू शकता.
तुमची कमाई तुम्ही किती तास काम करता यावर नाही तर तुम्ही किती पॉलिसीज विकता यावर अवलंबून असते.
एक स्मार्टफोन, चांगले इंटरनेट कनेक्शन आणि आवश्यक असलेले 15-तासांचे प्रशिक्षण याशिवाय पीओएसपी (POSP) होण्यासाठी तुम्हाला आणखी कशाचीही गरज नसते. तुम्हाला जवळजवळ काहीच भांडवल गुंतवावे लागत नाही पण तुमची आवक मात्र भरभक्कम असण्याची शक्यता असते!
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
डिजिटचा इन्शुरन्स एजंट (POSP) होण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता लागते?
नोंदणी करताना तुम्हाला इयत्ता 10वी किंवा त्यापुढचे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड (पुढची आणि मागची बाजू) यांची प्रत, एक कॅन्सल्ड (त्यावर तुमचे नाव लिहिलेला) चेक आणि एक फोटो इतक्या गोष्टी सादर कराव्या लागतात.
पॅन कार्ड धारक आणि बँक खातेधारक एकच असणे आवश्यक आहे का ?
होय, देण्यात येणारे सर्व कमिशन टीडीएस (TDS) पात्र असते. तुमच्या पॅन कार्डच्या आधारे टीडीएस (TDS) आयकर खात्याकडे जमा केला जातो.
इन्शुरन्स विक्री करायला मी कधी सुरुवात करू शकतो?
आमच्याकडे नोंदणी केल्याबरोबर तुम्ही पीओएसपी (POSP) परीक्षेसाठी तुमचे प्रशिक्षण चालू करू शकता. परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला त्याचे ईप्रमाणपत्र मिळेल.
आता तुम्ही पीओएसपी (POSP) एजंट म्हणून इन्शुरन्स विक्री करण्यासाठी सज्ज आहात.
प्रमाणित पीओएस (POS) व्यक्ती होण्यासाठी कोणतेही प्रशिक्षण घेणे सक्तीचे आहे का?
होय, तुम्हाला पीओएसपी (POSP) व्हायचे असेल तर प्रशिक्षण घ्यावेच लागते. त्यात इन्शुरन्सबद्दल मूलभूत माहिती, पॉलिसीचे प्रकार, इन्शुरन्सच्या क्लेमची प्रक्रिया, नियम आणि कायदे इत्यादींचा समावेश असतो.
डिजिट इन्शुरन्सबरोबर भागीदार (पार्टनर) झाल्यावर मला कोणत्या प्रकारच्या सपोर्ट सर्व्हिसेस मिळतील?
डिजिटच्या प्रत्येक भागीदारासाठी एक विशिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर नियुक्त केला जातो. एजंटला डिजिटच्या प्लॅटफॉर्मवर विकल्या गेलेल्या कोणत्याही पॉलिसीबद्दल असलेल्या सर्व शंकाकुशंकांचे निवारण करून तो एजंटना मार्गदर्शन करतो.
त्याशिवाय एजंट कोणत्याही मदतीसाठी partner@godigit.com वर ईमेल करूनही सपोर्ट टीमकडून मदत मिळवू शकतात.
पीओएसपी (POSP) प्रमाणपत्र मिळवल्यानंतरही मी माझे ज्ञान कसे विस्तारू शकतो?
आमच्या पीओएसपीं(POSPs)साठी प्रमाणपत्र मिळवल्यानंतरही आम्ही एक व्यापक प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतो. त्यामुळे इन्शुरन्सबद्दलचे तुमचे ज्ञान आणि विक्री आणि सेवेचे कौशल्य सुधारण्यासाठी मदत होते. या प्रशिक्षणामध्ये खालील गोष्टींचा समावेश असतो:
- किचकट प्रकरणे हाताळण्यासाठी इन्शुरन्सबद्दल अधिक माहिती
- लेेटेस्ट इन्शुरन्स उत्पादनांबद्दल आणि त्यांची विक्री कशी करावी याबद्दल माहिती
- तुमची एकूण विक्री वाढेल असे विक्रीचे कौशल्य शिकण्याचे अनेक रोचक आणि मजेशीर मार्ग