जनरल इन्शुरन्स एजंट बना

60,000+ भागीदारांनी डिजिटसह 1000 कोटी+ कमावले आहेत.
  • {{itemType}}
Please Select the Type
Full Name is required Maximum 150 characters allowed
RM Code is required
  • {{item}}
POSP Code is required
Enter Valid Email Address Please Enter Valid Email ID Email Id Of Digit Employee Is Not Allowed
Pincode is required Please enter 6 digit pincode
Mobile Number is required Enter valid mobile number Mobile Number Of Digit Employee Is Not Allowed
Please Enter IMF Number
Please Enter IRDA Number

I agree to the Terms & Conditions

Please accept terms and conditions

Work

in spare time

Earn

side income

FREE

training by Digit

जनरल इन्शुरन्स एजंट कोण असतो?

इन्शुरन्स एजंट इन्शुरन्स कंपनीबरोबर विशिष्ट इन्शुरन्स उत्पादने विक्री करण्याचे काम करतो.

जर तुम्ही घरबसल्या इन्शुरन्स एजंट कसे बनावे किंवा पीओएसपी (POSP) वा जनरल इन्शुरन्स एजंट कसे व्हावे याबद्दल विचार करत असाल, तुम्ही ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक गरजांनुसार योग्य ती इन्शुरन्स पॉलिसी कशी निवडावी यासाठी मदत कराल. [t1]

डिजिटबरोबर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स, मोटर (गाडी, दुचाकी, व्यावसायिक वाहने) इन्शुरन्स, एसएफएसपी (SFSP) इन्शुरन्स आणि इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स यांची विक्री करू शकता.

जनरल इन्शुरन्स म्हणजे काय? 

जनरल इन्शुरन्समध्ये सर्व नॉन-लाईफ इन्शुरन्स पॉलिसीजचा समावेश होतो. उदा. कार इन्शुरन्स, बाईक इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, एसएफएसपी (SFSP) इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स इत्यादी.

या सर्व जनरल इन्शुरन्स पॉलिसीज लोकांना काही दुर्दैवी घटना घडल्यास त्यातून उद्भवणाऱ्या नुकसानापासून स्वतःचा बचाव करण्यास मदत करतात.

उदाहरणार्थ कार इन्शुरन्समुळे अपघातात कारला झालेले नुकसान आणि मोडतोडीपासून एखाद्याचे रक्षण होते तर एसएफएसपी (SFSP) इन्शुरन्स चोरी किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानापासून रक्षण देतो.

शहरी भारतातले वाढते जीवनमान आणि मोटर व्हेईकल्स अधिनियमासारख्या कायद्यांमुळे अधिकाधिक भारतीय नागरिक त्यांची मालमत्ता आणि जीवन यांचा इन्शुरन्स घेणे पसंत करताहेत.

*डिस्क्लेमर – एजंट्सची कोणतीही विशिष्ट वर्गवारी नाही. तुम्ही जनरल इन्शुरन्स एजंट होण्यासाठी नोंदणी केली असेल तर तुम्ही सर्व जनरल इन्शुरन्स उत्पादने विकू शकता.

Read More

भारतीय जनरल इन्शुरन्स उद्योगबद्दल काही रोचक गोष्टी

1
केवळ मागच्याच वर्षात भारतातील जनरल इन्शुरन्स उद्योगामध्ये  १४.५% इतकी वाढ झाली. (1)
2
भारतातील नॉन-लाईफ इन्शुरन्स धारणकर्त्यांनी 2019 मध्ये एकूण 1.59 ट्रिलियन (खरब) रुपयांचा प्रीमियम अदा केला. (2)
3
भारतातील जनरल इन्शुरन्सची मागणी 2020 पर्यंत $40 बिलियन (अब्ज)पेक्षा जास्त असेल अशी शक्यता आहे. (3)

डिजिटचा जनरल इन्शुरन्स एजंट का व्हावे?

तुम्ही जनरल इन्शुरन्स एजंट का व्हायला हवे आणि  त्यासाठी डिजिटची निवड का करावी ते जाणून घ्या.

डिजिटबरोबर थेट काम करा

आमचा पीओएसपी (POSP) भागीदार म्हणून तुम्ही थेट आमच्याबरोबरच काम कराल. त्यात इतर कोणतेही मध्यस्थ नसतात. आज डिजिट भारतातली सर्वात वेगाने वाढणारी इन्शुरन्स कंपनी आहे. आजच्या घडीला आम्ही ‘एशिया’ज जनरल इन्शुरन्स कंपनी ऑफ द इयर 2019’ हे बिरुद मिळवणारी वयाने सर्वात लहान कंपनी आहोत.

उत्पादनांची विशाल श्रेणी

वेगवेगळ्या प्रकारच्या मालमत्तेसाठी आम्ही इन्शुरन्स पॉलिसीजची विशाल श्रेणी उपलब्ध करून दिली आहे. उदाहरणार्थ आम्ही हेल्थ, मोटर (गाडी, दुचाकी, व्यावसायिक वाहने), ट्रॅव्हल, होम आणि इतर अनेक प्रकारचे सुरक्षा कव्हर देतो.

इन्शुरन्स झाला सोपा

आमचा भर इन्शुरन्स घेणे सोपे करण्यावर आहे. म्हणूनच आमची सर्व कागदपत्रे इतकी सोपी असतात की एखाद्या 15 वर्षांच्या मुलालाही ती समजायला कोणतीही अडचण येऊ नये.

दमदार बॅक एंड सपोर्ट

आमच्यासाठी तंत्रज्ञान हा पायाभूत घटक आहे. त्याच्या सहायाने आम्ही तुम्हाला समर्पित सपोर्ट टीम आणि ज्याच्याद्वारे तुम्ही 24x7 विक्री करू शकाल असे प्रगत वेब आणि मोबाइल ॲप देतो!

स्पर्शरहित इन्शुरन्स

आमच्या सर्व प्रक्रिया ऑनलाइन असतात. त्यासाठी कोणतेही कागदपत्रांचे व्यवहार लागत नाहीत. ही दोन्ही बाजूंनी फारच सोयीची गोष्ट आहे. तुम्ही तुमचा वेळ त्यामुळे वाचवू शकता आणि ग्राहकांनाही हे जास्त आवडते!

तात्काळ पॉलिसी दिली जाते

आता कोणत्याही भल्या मोठ्या प्रक्रिया किंवा कटकटीच्या कागदपत्रांची आवश्यकता नाही. आम्ही कोणत्याही गैरसोयीशिवाय तात्काळ ऑनलाइन इन्शुरन्स पॉलिसीज देतो.

जलद कमिशन सेटलमेंट

आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अजिबात काळजी करू नका! आम्ही कमिशन अगदी वेगाने अदा करतो. पॉलिसी इन्शुरन्सनंतर 15 दिवसांतच तुमचे कमिशन तुमच्या खात्यात जमा केले जाते.

ऑनलाइन इन्शुरन्स एजंट कसे बनाल?

डिजिटचे इन्शुरन्स एजंट कसे व्हाल?

स्टेप 1

वर दिलेला पीओएसपी (POSP) फॉर्म भरून साईन अप करा, सर्व तपशील भरा आणि कागदपत्रे आपलोड करा.

स्टेप 2

आम्ही देत असलेले 15-तासांचे प्रशिक्षण पूर्ण करा.

स्टेप 3

सांगण्यात आलेली परीक्षा द्या.

स्टेप 4

आमच्याबरोबर करार करा की काम झाले! आता तुम्ही एक प्रमाणित पीओएसपी (POSP) बनला आहात.

मी जनरल इन्शुरन्स एजंट का व्हावे?

स्वतःच्या मर्जीचे मालक बना

पीओएसपी (POSP) असण्याचा एक फायदा म्हणजे तुम्हाला तुमच्या सोयीने काम करण्याचे स्वातंत्र्य असते. तुम्ही असता तुमच्या मर्जीचे मालक!

वेळेची बंधने नाहीत!

तुम्हाला पूर्णवेळ की अर्धवेळ काम करायचे आहे हे तुम्ही ठरवू शकता आणि त्याप्रमाणे स्वतःचे कामाचे तास नक्की करू शकता.

घरबसल्या काम करा

डिजिट इन्शुरन्स इन्शुरन्स पॉलिसींची प्रामुख्याने ऑनलाइन विक्री करते. म्हणजेच एक पीओएसपी (POSP) म्हणून तुम्ही घरच्या घरी काम करून आमच्या ऑनलाइन प्रक्रिया वापरुन पॉलिसी विकू शकता.

केवळ 15 तासांचे प्रशिक्षण

पीओएसपी (POSP) चे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एक आवश्यक निकष आहे की आयआरडीएआयद्वारा दिले जाणारे सक्तीचे 15 तासांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असावे. खरं सांगायचं तर ते काही विशेष कठीण नाही! फक्त 15 तासांची गुंतवणूक केलीत की तुम्ही काम सुरू करू शकता.

उच्च कमाईची क्षमता

तुमची कमाई तुम्ही किती तास काम करता यावर नाही तर तुम्ही किती पॉलिसीज विकता यावर अवलंबून असते. 

शून्य गुंतवणूक

एक स्मार्टफोन, चांगले इंटरनेट कनेक्शन आणि आवश्यक असलेले 15-तासांचे प्रशिक्षण याशिवाय पीओएसपी (POSP) होण्यासाठी तुम्हाला आणखी कशाचीही गरज नसते. तुम्हाला जवळजवळ काहीच भांडवल गुंतवावे लागत नाही पण तुमची आवक मात्र भरभक्कम असण्याची शक्यता असते!

वारंवार विचारले जाणारे प्रश्न