बिल्डिंग इन्शुरन्स म्हणजे काय?
तुम्हाला कमर्शियल( व्यावसायिक) बिल्डींग किंवा तुमच्या रेसिडेन्शियल( निवासी) अपार्टमेंटचे संरक्षण करायचे आहे का; बिल्डींग इन्शुरन्स ही एक कस्टमाइझ्ड इन्शुरन्स पॉलिसी आहे जी आग, घरफोड्या, नैसर्गिक आपत्ती आणि इतर जोखमी यांसारख्या अनपेक्षित परिस्थितींपासून तुमच्या बिल्डींगीचे संरक्षण करण्यात मदत करेल.
बिल्डिंग इन्शुरन्स का महत्त्वाचा आहे याबद्द्ल खात्री नाही?
वाचा.
2021 मध्ये भारतात 16 लाख आगीच्या दुर्घटना घडल्या. (1)
भारतातील 64 टक्के लोक घराच्या संबंधित सुरक्षेचे धोके हाताळण्यास सक्षम नाहीत. (2)
व्यवसायातील सातत्य आणि कामकाजासाठी तिसरा सर्वात मोठा धोका म्हणून आगीचा उद्रेक मानला जातो. (3)
भारतातील 70 टक्के चोऱ्या घरफोड्या आहेत. (4)
डिजिटच्या बिल्डिंग इन्शुरन्समध्ये काय चांगले आहे?
पैशाचे मूल्य: बिल्डींगसाठी कव्हर करणे हे महाग प्रकरण वाटू शकते. मात्र आमचा इन्शुरन्स पूर्णपणे ऑनलाइन आणि डिजिटल असल्यामुळे आमची किंमत कमी आहे आणि म्हणूनच प्रीमियम देखील तुम्हाला इतरांपेक्षा कमी आणि अधिक परवडणारे आहे.
डिजिटल फ्रेंडली: भारतातील पहिल्या ऑनलाइन इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक असल्याने, आमच्या बहुतेक प्रक्रिया; बिल्डिंग इन्शुरन्स खरेदी करण्यापासून ते क्लेम सांगण्यापर्यंत ऑनलाइन केल्या जाऊ शकतात! त्यामुळे क्लेमसाठी तपासणी आवश्यक असतानाही, तुम्ही ते फक्त ऑनलाइन करू शकता. मात्र, 1 लाख रुपयांच्या वरच्या क्लेम्ससाठी आयआरडीएआयनुसार, ते फक्त मॅन्युअली करणे आवश्यक आहे.
व्यवसायाचे सगळे प्रकार कव्हर होतात: तुम्ही तुमची ऑफिस बिल्डिंग किंवा तुमची रिटेल स्टोअर्सची साखळी कव्हर करू इच्छित असाल तरीही, आम्ही मोठ्या आणि लहान सर्व व्यवसाय श्रेणी कव्हर करतो.
भाडेकरूंसाठी योजना: आजचे अनेक तरुण स्वतःचे घर घेण्यापेक्षा भाड्याचे घर घेऊन राहण्याची निवड करत आहेत. त्यामुळेच, एखाद्याला संपूर्ण बिल्डींग इन्शुरन्स प्लॅन महत्त्वाचा वाटू शकत नाही. ज्यांना त्यांच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये फक्त त्यांच्या मालकीच्या गोष्टींसाठी कव्हर करायचे आहे त्यांच्यासाठी आम्ही कस्टमाइझ बिल्डींग इन्शुरन्स प्लॅन्स तयार केले आहेत.
डिजिटच्या बिल्डिंग इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते ?
बिल्डिंग इन्शुरन्स प्लॅनचे प्रकार
डिजिटमध्ये, आमचा विमा आमच्या गो डिजिट, भारत लघु उद्यम सुरक्षा, गो डिजिट, भारत सुक्ष्म उद्यम सुरक्षा आणि गो डिजिट, भारत गृह रक्षा पॉलिसीद्वारे आग आणि पूर आणि भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींपासून आपल्या इमारतीला संरक्षण देतो. मात्र, इमारतींनाही घरफोडीचा धोका असल्याने आम्ही घरफोड्यांना स्वतंत्र पॉलिसी डिजिट बर्गलरी इन्शुरन्स पॉलिसी म्हणूनही कव्हर करतो. अशा प्रकारे, आपली इमारत केवळ आग आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि हानीपासूनच नव्हे तर घरफोडीपासून देखील सुरक्षित राहील. आपल्यासाठी हे सोपे करण्यासाठी, आमच्याकडे खालीलप्रमाणे भिन्न कव्हरेज पर्याय आहेत:
पर्याय 1 | पर्याय 2 | पर्याय 3 |
फक्त आपल्या घराच्या किंवा व्यवसायाच्या सामग्रीचा समावेश आहे. | आपली इमारत आणि आपल्या घर किंवा व्यवसायातील सामग्री दोन्ही समाविष्ट करते. | फक्त तुमची इमारत कव्हर होते. |
बिल्डिंग इन्शुरन्स बद्दल जाणून घेण्यासारख्या गोष्टी
कंटेंट- बिल्डिंग इन्शुरन्समध्ये 'कंटेंट' म्हणजे काय याबद्दल आपण संभ्रमात असाल तर ते आपल्या आवारातील त्या वस्तु किंवा गोष्टींना संदर्भित करते जे आपल्या परिसराच्या संरचनेशी कायमस्वरूपी जोडलेले किंवा निश्चित नाहीत. उदाहरणार्थ, जर आपल्या घरात चोरी झाली असेल आणि आपला लॅपटॉप चोरीला गेला असेल; आपला बिल्डिंग इन्शुरन्स त्यासाठी कव्हर करेल, म्हणजे आपला लॅपटॉप देखील कव्हर केले जाइल.
बिल्डिंग/स्ट्रक्चर - नावाप्रमाणेच तुमच्या बिल्डिंग इन्शुरन्समधील 'बिल्डींग' किंवा 'स्ट्रक्चर' तुम्हाला कव्हर करू इच्छित असलेल्या संपूर्ण मालमत्तेचा संदर्भ देते. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या स्वतंत्र बिल्डींगीचे संरक्षण करू इच्छित असाल, तर तुमच्या संपूर्ण बिल्डींगला 'बिल्डींग' म्हणून संबोधले जाईल.
आमच्या बिल्डिंग इन्शुरन्स ऑफरिंग्स
बिल्डिंग इन्शुरन्स कोणाला हवा आहे?
तुमचे वर्षानुवर्षांचे जुने घर असो वा नवे स्वप्नातील, घर ही कोणाचीही सर्वात मौल्यवान मालमत्ता असते. अशा प्रकारे, आपल्या नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीपासून त्याचे संरक्षण करणे हे आपल्या खिशाचे आणि घराचे रक्षण करण्यासाठी आपण करू शकणारे कमीत कमी आहे.
सामान्यतः, लोक गृहीत धरतात की बिल्डींग इन्शुरन्स केवळ त्यांच्या मालमत्तेच्या मालकीसाठी समर्पित आहे. पण डिजीटमध्ये ज्यांनी त्यांच्या संबंधित व्यवसायांसाठी घरे किंवा कार्यालये भाड्याने घेतली आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे कस्टमाइज्ड बिल्डिंग इन्शुरन्स पॉलिसी देखील आहेत. त्यामुळे, जर तुम्ही या श्रेणीमध्ये येत असाल तर, तुमच्यासाठीही बिल्डिंग इन्शुरन्स तयार केला आहे!
तुम्ही एखादे छोटे जनरल स्टोअर्स चालवत असाल किंवा फॅशन व हस्तकला असलेले छोटे बुटीक चालवत असाल, हा बिल्डिंग इन्शुरन्स सर्व प्रकारच्या व्यवसायांसाठी खास बनवला आहे. जर तुम्ही स्वतंत्र, लहान व्यवसाय चालवत असाल, तर नैसर्गिक आपत्ती आणि घरफोड्या यांसारख्या तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीत उद्भवू शकणार्या कोणत्याही संभाव्य तोटा आणि जोखमींपासून तुमच्या व्यवसायाचे संरक्षण करण्यासाठी बिल्डिंग इन्शुरन्स अत्यावश्यक असेल
जर आपण जनरल स्टोअर्स, रेस्टॉरंट्स किंवा मध्यम आकाराच्या उद्योगाची साखळी चालवत असाल; मध्यम आकाराच्या व्यावसायिकांसाठी आग, स्फोट किंवा पूर, वादळ आणि भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे कोणतेही नुकसान आणि हानी भरून काढण्यासाठी बिल्डिंग इन्शुरन्स देखील योग्य आहे.
तुमच्या व्यवसायाच्या मोठ्या कार्यामुळे तुम्ही अनेक बिल्डींगचे मालक असल्यास, तुमच्या व्यवसायाचा इन्शुरन्स फक्त एक नाही तर तुमच्या सर्व बिल्डींग्सचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अशाने व्यवसाय जोखीम कमी करण्यास मदत तर होईलच सोबत एक जबाबदार व्यावसायिक असण्यासाठी सद्भावना देखील सुधारेल.
कव्हर केलेल्या घराच्या मालमत्तेचे प्रकार
तुम्ही स्वतःच्या घरात राहत असाल किंवा भाड्याने घेतलेल्या स्वतंत्र फ्लॅटमध्ये राहत असाल जो एकतर हाऊसिंग सोसायटीचा किंवा स्वतंत्र बिल्डींगचा भाग असेल, तर आमच्या कस्टमाइझ्ड ऑफर तुमच्यासाठी योग्य आहेत.
कदाचित तुम्ही आणि तुमचे विस्तारित कुटुंब एका स्वतंत्र बिल्डींगमध्ये राहत असाल; संपूर्ण बिल्डींगमध्ये फ्लॅटचे मालक असाल किंवा भाड्याने राहत असाल. या प्रकरणात, तुम्ही त्या सर्वांना डिजिटद्वारे बिल्डिंग इन्शुरन्ससह कव्हर करणे निवडू शकता.
जर आपल्याकडे स्वतंत्र व्हिला किंवा घर असेल किंवा भाड्याने घेतले असेल तर पूर, वादळ आणि इतर अनपेक्षित परिस्थितीसारख्या संभाव्य जोखमींपासून आपला व्हिला आणि त्यातील सामग्रीचे संरक्षण करण्यासाठी, बिल्डिंग इन्शुरन्स उपयुक्त असेल.
व्यवसायाचे प्रकार आणि दुकानाच्या मालमत्तेचे कव्हर
जे व्यवसाय प्रामुख्याने मोबाइल फोन, मोबाइल अॅक्सेसरीज किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स विकतात. क्रोमा, वनप्लस, रेडमी इत्यादी स्टोअर्स अशा इमारतींची उत्तम उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत, बिल्डिंग इन्शुरन्स स्टोअर आणि त्याच्या प्राथमिक सामग्रीचे संभाव्य नुकसान आणि हानीपासून संरक्षण करण्यास मदत करेल.
शेजारच्या किराणा दुकानांपासून ते तुमच्या बजेट फ्रेंडली सुपरमार्केट आणि जनरल स्टोअर्सपर्यंत; सर्व किराणा दुकाने आणि जनरल स्टोअर्स देखील बिल्डिंग इन्शुरन्समध्ये समाविष्ट आहेत. बिग बाजार, स्टार बाजार आणि रिलायन्स सुपरमार्केट यांसारखी दुकाने ही त्याचीच काही सामान्य उदाहरणे आहेत.
कार्यालय परिसर आणि शैक्षणिक संस्था जसे की महाविद्यालये, शाळा आणि कोचिंग क्लासेससाठी डिझाइन केलेली ही योजना आहे. अशा मालमत्तेचा इन्शुरन्स काढणे केवळ तोट्याचे संरक्षण करण्यासाठीच महत्त्वाचे नाही तर, तुमच्या कर्मचार्यांना किंवा विद्यार्थ्यांना तुमच्या संबंधित संस्थेबद्दल अधिक आत्मविश्वास द्या.
डिजिट बिल्डिंग इन्शुरन्स तुमच्या आवडत्या मॉल्स आणि कपड्यांच्या दुकानांपासून ते स्पा, जिम आणि इतर दुकानांपर्यंत सर्व वैयक्तिक जीवनशैली आणि फिटनेस क्षेत्रातील व्यवसायांसाठी कव्हर देतो. अशा मालमत्ता असलेल्या उदाहरणांमध्ये एनरिच सलून, कल्ट फिटनेस सेंटर, फिनिक्स मार्केट सिटी आणि इतर स्टोअर्स यांचा समावेश होतो.
प्रत्येकाला आवडणारी अशी ही एक जागा! कॅफे आणि फूड ट्रकपासून रेस्टॉरंट चेन आणि बेकरीपर्यंत; डिजिटद्वारे बिल्डिंग इन्शुरन्स सर्व प्रकारच्या खाण्यापिण्याच्या जॉइंट्ससाठी देखील योग्य आहे.
सर्वात महत्त्वाच्या मालमत्तांपैकी एक जे संरक्षित केले पाहिजे ते म्हणजे हॉस्पिटल, क्लिनिक, डायग्नोस्टिक सेंटर्स, फार्मसी आणि इतर मेडिकल स्टोअर्स! यासाठी देखील बिल्डींग इन्शुरन्स समाविष्ट आहे.
व्यवसायांच्या या श्रेणीमध्ये सुतारकाम आणि प्लंबिंग दुरुस्तीपासून ते मोटर गॅरेज आणि अभियांत्रिकी कार्यशाळेपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे.
वर नमूद केलेल्या व्यवसायाच्या प्रकारांव्यतिरिक्त, डिजिटचे बिल्डिंग इन्शुरन्स हे सर्व आकार आणि व्यवसायांच्या स्वरूपासाठी योग्य आहे. तुम्हाला तुमचा प्रकार यादीमध्ये सापडत नसेल, तर मोकळ्या मनाने आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही तुम्हाला तुमच्या घरासाठी किंवा व्यवसायासाठी सर्वात योग्य बिल्डींग इन्शुरन्स निवडण्यात मदत करू.
बिल्डिंग इन्शुरन्सबद्दल अधिक जाणून घ्या
बिल्डिंग इन्शुरन्सचा प्रीमियम कसा मोजला जातो ?
तुमचा बिल्डिंग इन्शुरन्स प्रीमियम खालील घटकांवर अवलंबून असेल:
- बिल्डींगचा प्रकार: तुम्ही ज्या बिल्डींगचा इन्शुरन्स घेत आहात त्याचा थेट परिणाम तुमच्या बिल्डिंग इन्शुरन्स प्रीमियमवर होईल. उदाहरणार्थ, एखाद्या कारखान्याचा इन्शुरन्स उतरवण्याच्या मालमत्तेच्या स्वरूपातील फरकामुळे जनरल स्टोअरपेक्षा जास्त प्रीमियम असेल.
- बिल्डींगचे वय : इतर कोणत्याही इन्शुरन्स पॉलिसीप्रमाणे, प्रीमियम किमती निर्धारित करण्यासाठी वय हा एक प्रमुख घटक आहे. बिल्डींग जितकी जुनी असेल तितका तिचा प्रीमियम कमी असेल आणि त्याउलट परिस्थिती.
- मालमत्तेचे क्षेत्रफळ: इन्शुरन्स उतरवल्या जाणार्या बिल्डींगीच्या क्षेत्राचा त्याच्या बिल्डींगीच्या प्रीमियमवर सर्वाधिक आणि थेट परिणाम होतो. याचे कारण असे की मोठ्या मालमत्तेमध्ये इन्शुरन्स रक्कम जास्त असते आणि त्यामुळे अनुक्रमे जास्त बिल्डिंग इन्शुरन्स प्रीमियम असतो.
- सुरक्षिततेचे उपाय: अनेक घरे आणि व्यवसाय आज आपली घरे आणि दुकाने आगीसारख्या जोखमीपासून वाचविण्यासाठी विविध सुरक्षा उपायांचा पर्याय निवडतात. त्यामुळे जर आपल्या घराचा किंवा दुकानाचा यात समावेश असेल तर आपला धोका आणि बिल्डिंग इन्शुरन्स प्रीमियम कमी होईल.
- अतिरिक्त कव्हरेज: बिल्डिंग इन्शुरन्स प्रामुख्याने इमारत आणि त्यातील सामग्रीसाठी कव्हर करतो, परंतु दुकानातील अपघाती नुकसान किंवा घरी ठेवलेले दागिने यासारख्या इतर किंमतीच्या वस्तू आहेत. हे कव्हर करण्यासाठी, आपण अॅड-ऑन्सची निवड करू शकता ज्यामुळे आपल्याला चांगले कव्हरेज मिळेल आणि आपला बिल्डिंग इन्शुरन्स प्रीमियम वाढेल.
बिल्डींग इन्शुरन्स प्लॅन्सची तुलना करण्यासाठी टिप्स
योग्य बिल्डिंग इन्शुरन्सची निवड करणे गोंधळात टाकणारे असू शकते. शेवटी, तुमच्या सुंदर घराचे किंवा तुमच्या प्रिय व्यवसायाचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही याची निवड करत आहात! तुमची निर्णय घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, तुम्ही तुलना आणि विचार करायला हवा अशा तीन महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आमच्या शिफारसी पुढीलप्रमाणे:
- कव्हरेज फायदे : तुमच्या इन्शुरन्सचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचे कव्हरेज मिळत आहे. एखाद्या दुर्दैवी घटनेच्या बाबतीत तुम्हाला काय कव्हर केले जाईल हे जाणून घेणे आवश्यक आहे. म्हणून, आपल्यासाठी सर्वात मौल्यवान योजनेचे मूल्यांकन करण्यात मदत करण्यासाठी नेहमी काय कव्हर केले आहे आणि काय कव्हर केलेले नाही ते पाहा.
- इन्शुरन्सची रक्कम : बिल्डिंग इन्शुरन्समधील तुमची इन्शुरन्सची रक्कम म्हणजे तुम्ही केलेल्या क्लेमच्या बाबतीत तुम्हाला संरक्षित केलेली एकूण रक्कम. म्हणून, तुम्ही ज्या रकमेसाठी जाऊ इच्छिता त्याबद्दल खूप सावध राहा. कारण याचा केवळ तुमच्या बिल्डिंग इन्शुरन्स प्रीमियमवर परिणाम होणार नाही तर नुकसानीच्या बाबतीत तुम्हाला मिळणार्या क्लेमच्या रकमेवरही परिणाम होईल!
- अॅड-ऑन उपलब्ध : काहीवेळा, तुम्हाला फक्त मूलभूत प्लॅनच्या फायद्यांच्या पलीकडे कव्हरेजची आवश्यकता असते. इथेच अॅड-ऑन वापरात येतात. वेगवेगळे इन्शुरन्स प्रदाते लोकांना निवडण्यासाठी विविध अॅड-ऑन्स देतात. तुमच्या पर्यायांची तुलना करा आणि तुमच्यासाठी आणि तुमच्या बिल्डिंगसाठी काय चांगले आहे ते बघा!
योग्य बिल्डींग इन्शुरन्स प्लॅन कसा निवडावा ?
योग्य बिल्डींग इन्शुरन्स प्लॅन निवडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या सर्व पर्यायांची तुलना करणे आणि त्यांचे मूल्यमापन करणे. त्यानुसार तुमची निवड पक्की करावी. तुमच्या सर्वात मौल्यवान गोष्टींचे संरक्षण करण्यासाठी तुमचा कोणावर विश्वास आहे हे निवडण्यापूर्वी तुमचे कव्हरेज फायदे, इन्शुरन्सची रक्कम, उपलब्ध असलेले अॅड-ऑन, बिल्डिंग इन्शुरन्स प्रीमियम, ग्राहक समर्थन इ. पाहा!
बिल्डींग इन्शुरन्ससाठी योग्य इन्शुरन्सची रक्कम कशी निवडावी?
तुमची इन्शुरन्सची रक्कम तुमच्या मालमत्तेच्या एकूण मूल्याचा संदर्भ देते म्हणजेच ही दाव्याच्या बाबतीत तुम्हाला मिळू शकणारी कमाल रक्कम! म्हणून, तुम्हाला खात्री असणे आवश्यक आहे की ते तुमच्या मालमत्तेचे खरे मूल्य प्रतिबिंबित करते. तुमच्या बिल्डिंग इन्शुरन्ससाठी योग्य इन्शुरन्सची रक्कम निवडण्यासाठी, तुम्ही येथे आमचे कॅल्क्युलेटर वापरू शकता जे तुमच्या बिल्डिंग इन्शुरन्स प्रीमियम आणि तुमच्या मालमत्तेच्या क्षेत्रावर आधारित शिफारस केलेली इन्शुरन्सची रक्कम निर्धारित करण्यात मदत करते.
बिल्डींग इन्शुरन्सचे फायदे काय आहेत?
भारतातील बिल्डिंग इन्शुरन्सच्या मुख्य फायद्यांची एक झलक पुढीलप्रमाणे :
- संपूर्ण कव्हरेज : बिल्डिंग इन्शुरन्स केवळ तुमच्या मालमत्तेचे (म्हणजे तुमची बिल्डींग किंवा स्टोअर) संरक्षण करण्यास मदत करत नाही तर, त्यातील वस्तू देखील सुनिश्चित करते. ज्यामुळे तुमचा खिसा सर्व संभाव्य नुकसानांपासून दूर राहतो. याव्यतिरिक्त, अनेक इन्शुरन्स कंपन्या तुमच्या गरजेनुसार तुमचे कव्हरेज वाढवण्यासाठी अॅड-ऑन देखील देतात.
- व्यवसायाची जोखीम कमी करते : बिल्डींग इन्शुरन्स तुमच्या दुकानाचे आणि त्यातील वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी कस्टमाइझ्ड पॉलिसींसह देखील येतो. त्यामुळे आग, भूकंप, पूर, घरफोडी, इत्यादीसारख्या घटनांमध्ये व्यवसायाचे नुकसान होण्याचा धोका कमी होतो.
- मनःशांती : तुमचे दुकान असो किंवा तुमचे घर, दोन्हीकडे मोठ्या प्रमाणावर आर्थिक महत्त्व आहे. बिल्डिंग इन्शुरन्स तुम्हाला अनपेक्षित परिस्थितीत लक्षणीय नुकसान होण्यापासून प्रतिबंधित करतो. अशा प्रकारे तुम्हाला काळजी करण्याची फारशी गरज नाही कारण तुमची इन्शुरन्स कंपनी तुमच्या पाठीशी असतील!
भारतामध्ये ऑनलाइन बिल्डिंग इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
बिल्डिंग इन्शुरन्स पॉलिसी असणे ही कायदेशीर गरज आहे का?
नाही, भारतात बिल्डिंग इन्शुरन्स असणे ही अद्याप कायदेशीर आवश्यकता नाही. तथापि, नेहमीच याची शिफारस केली जाते कारण व्यावसायिक आणि निवासी दोन्ही इमारतींचे नुकसान आणि हानी हे खूप महागडे असू शकते.
व्यावसायिक मालमत्तांच्या बाबतीत बिल्डिंग इन्शुरन्स पॉलिसीचा हप्ता कोणाला भरावा लागेल?
व्यावसायिक मालमत्तेच्या बाबतीत, बिल्डिंग इन्शुरन्स पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी प्रीमियम भरण्याची जबाबदारी सहसा मालकाची असते. तथापि, गेटेड समुदायांसाठी, बिल्डर त्यांच्या मालमत्तेतील सर्व इमारतींसाठी बिल्डिंग इन्शुरन्स प्रीमियम देखील कव्हर करू शकतो आणि भरू शकतो.