बाइक इन्शुरन्समध्ये नो क्लेम बोनस (NCB)
तुम्हाला तुमचे बालपण आठवते का? जसे की, जेव्हा तुम्ही 5 किंवा 6 वर्षांचे असाल आणि तुमचे बाबा तुम्हाला सांगतील की जर तुम्ही दिवसभर चांगले वागलात, खूप अभ्यास केला आणि त्रास दिला नाही तर तुम्हाला ट्रीट म्हणून कँडी मिळेल? नो क्लेम बोनस (NCB) हा देखील असाच एक प्रकार आहे; एक चांगला शिस्तबद्ध बाइकर होण्यासाठी दिली जाणारी एक कँडी आहे.
आता तुम्ही विचाराल, बोनसचा चांगल्या बाइक चालवण्याशी काय संबंध आहे, बरोबर? जर तुम्ही बाइक इन्शुरन्स घेतला, पण तुम्ही बाइक सुरक्षितपणे चालवली असेल आणि बाइकची योग्य देखभाल केली असेल, तर तुम्हाला इन्शुरन्सचा क्लेम वाढवण्याची गरज नाही, कारण क्लेम करण्यासाठी कोणतेही नुकसान होणार नाही!
बाइक इन्शुरन्सध्ये एनसीबी (NCB) म्हणजे काय?
आता इन्शुरन्स कंपन्यांचे म्हणणे आहे की जर तुम्ही सुरक्षितपणे गाडी चालवली आणि एक वर्षासाठी क्लेम केला नाही, तर तुमच्या पॉलिसीच्या नूतनीकरण करताना तुम्हाला प्रीमियमवर सवलत मिळेल. या सवलतीलाच नो क्लेम बोनस (NCB) म्हणतात.
औपचारिकपणे, पॉलिसी वर्षात क्लेम न केल्यास पॉलिसीधारकाला दिलेल्या प्रीमियमवरील सवलत अशी एनसीबीची (NCB) व्याख्या केली जाते. चुकीचे क्लेम्स रोखण्यासाठी आणि काही प्रकारची शिस्त लावण्यासाठी, नो क्लेम बोनसची संकल्पना सुरू करण्यात आली (जरी आम्हाला क्लेम्स आणि लोकांना मदत करणे आवडत असले तरी!).
चांगली बातमी अशी आहे की, तुम्ही चांगली वागणूक अशीच ठेवलीत आणि टचवूड तुमच्या बाइकला कधीही कोणत्याही समस्या, नुकसान किंवा अपघातांचा सामना करावा लागला नाही, तर तुम्ही वर्षानुवर्षे तुमचे नो क्लेम बोनस (NCB) जमा करू शकता. हे तुमच्या खिशासाठी कितपत चांगले काम करते ते आपल्याला पुढचे वाचून समजेल.
नवीन बाइक खरेदी करता तेव्हा तुम्ही एनसीबी (NCB) हस्तांतरित करू शकता का?
अजून एक चांगली बातमी म्हणजे, जमा झालेला एनसीबी (NCB) बोनस सावलीसारखे आहे; तुम्ही जिथे जाल तिथे तो तुमच्यासोबत जातो. म्हणजेच, जोपर्यंत तुम्ही पॉलिसीधारक असाल तोपर्यंत तुम्ही नवीन बाइक घेण्याचा निर्णय घेतल्यास ते तुमच्या जुन्या वाहनातून नवीन वाहनात हस्तांतरित करता येईल. तुमचा एनसीबी ((NCB) हा पॉलिसीधारक म्हणून तुमच्यासाठी आहे, तुमच्या बाइकसाठी नाही.
बाइक इन्शुरन्समध्ये एनसीबी (NCB) ची मोजणी कशी केली जाते
तुमचा नो क्लेम बोनस ((NCB) केवळ तुमच्या सर्वसमावेशक टू व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीच्या पहिल्या नूतनीकरणानंतरच सुरू होतो. (लक्षात ठेवा, एनसीबी (NCB) केवळ तुमच्या प्रीमियमच्या स्वतःच्या नुकसानीच्या घटकावर लागू होते, जो IDV किंवा बाइकचे इन्शुर्ड डिक्लेर्ड व्हॅल्यू वजा बाइकच्या झीजच्या किंमतीवर आधारित प्रीमियम आहे. बोनस थर्ड पार्टी कव्हर प्रीमियमवर लागू होत नाही) .
पहिल्या क्लेम-फ्री वर्षानंतर तुम्ही तुमच्या प्रीमियमवर 20% सूट मिळवण्यापासून सुरुवात करता. प्रत्येक वर्षी पॉलिसी नूतनीकरणाच्या वेळी सवलत 5-10% ने वाढते. दुसर्या शब्दांत, प्रत्येक वर्षी तुम्ही क्लेम न करता, सवलत जमा केली जाते, जसे की पॉलिसी धारकाच्या चांगल्या वागणुकीसाठी त्याला हे बक्षीस मिळत राहते.
उदाहरणार्थ, जर तुम्हाला पहिल्या पॉलिसी वर्षाच्या शेवटी 20% एनसीबी (NCB) मिळाले आणि तुम्ही दुसर्या वर्षीही क्लेम केला नाही, तर तुमच्या प्रीमियमवरील सूट 25-30% पर्यंत जाईल, नंतर 30-35% पर्यंत. हेच गणित पुढे न्यायचे. अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या प्रीमियमवर 5 वर्षांमध्ये 50% पर्यंत सूट मिळवू शकता.
तपासा: एनसीबी (NCB) सवलतीसह बाइक इन्शुरन्स प्रीमियम मिळवण्यासाठी बाइक इन्शुरन्स कॅल्क्युलेटर वापरा.
क्लेमफ्री वर्षे |
नो क्लेम बोनस (NCB) |
1 वर्षानंतर |
20% |
2 वर्षानंतर |
25% |
3 वर्षानंतर |
35% |
4 वर्षानंतर |
45% |
5 वर्षानंतर |
50% |
लोभी होऊ नका कारण पाच वर्षांनंतर, सवलत वाढणार नाही, जरी तुम्ही एका वर्षात क्लेम केला नसला तरी. आता एका साध्या उदाहरणाने ही मोजणी कशी होते ते पाहू.
तुम्ही 2010 मध्ये एक सुंदर हाय-स्पीड बाइक विकत घेतली होती. तुमच्यासारखा दुसरा आदर्श बाइकर उर्फ पॉलिसीधारक जगात असू शकत नाही. तुम्ही तुमचा प्रीमियम वेळेवर भरला. तुम्ही पहिल्या वर्षी किंवा दुसऱ्या वर्षी...किंवा पाचव्या वर्षी क्लेम केला नाही.
आता, तुम्हाला वाटले की, तुमची ही बाइक आता बास झाली. तुम्ही ही बाइक विकून 2015 मध्ये दुसरे जबरदस्त मॉडेल घरी आणाल. तुमच्या नवीन बाइकसोबत तुमच्या बाइकचा इन्शुरन्सही काढला आहे. समजा नवीन वाहनासाठी स्वतःचे नुकसान प्रीमियम रु.3000 आहे. पण तुम्ही एनसीबी ( NCB) 5 वर्षांपासून जमा केले आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या नवीन वाहनाच्या प्रीमियमवर 50% पर्यंत सूट मिळेल. ओन डॅमेजच्या प्रीमियमसाठी तुम्हाला फक्त रु.1500 भरावे लागतील!
मी एनसीबी (NCB) कधी गमावतो?
तुमच्या पॉलिसीचे कोणतेही वर्ष असो एकदा तुम्ही क्लेम केल्यानंतर एनसीबी ( NCB) शून्यावर रीसेट होईल. याला अपवाद आहे का? अर्थात, आहे. तुमच्या पॉलिसीमध्ये एनसीबी(NCB) कव्हर वैशिष्ट्य जोडले असल्यास, हा नियम लागू होणार नाही.
मी क्लेम करू शकतो आणि तरीही माझा एनसीबी (NCB) ठेवू शकतो असा कुठला मार्ग आहे का?
तुमच्या आवडीची इन्शुरन्स कंपनी हे लाभ देते की नाही यावर अवलंबून आहे. इन्शुरन्स कंपनीने परवानगी दिल्यास, तुम्ही तुमच्या सर्वसमावेशक पॉलिसीचा भाग म्हणून एनसीबी (NCB) कव्हर अॅड-ऑन घेऊ शकता. या वैशिष्ट्यासह, तुम्ही तुमचा नो क्लेम बोनस ((NCB) न गमावता एका वर्षात विशिष्ट संख्येत इन्शुरन्स क्लेम्स (बहुधा फक्त एक) करू शकता. काही इन्शुरन्सकर्ते कव्हर वैशिष्ट्य सुरू होण्यापूर्वी तुमच्या पॉलिसीवर क्लेम न करता तुमची किती वर्षे जायला हवी होती याची अट देखील ठेवू शकतात.
त्यामुळे, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही बाइक रेसिंगच्या मूडमध्ये असाल, तेव्हा लक्षात ठेवा की स्व-नियंत्रणाच्या दुसऱ्या बाजूला तुमची वाट पाहत आहे नो क्लेम बोनस. हे बक्षीस नवीन वाहने आणि नवीन इन्शुरन्सधारकांना हस्तांतरित करण्यायोग्य आहे हे देखील लक्षात ठेवण्यासारखे आहे. म्हणून शहाणपणाने म्हणायचे झाले तर, सुरक्षितपणे वाहन चालवा, जोपर्यंत तुम्हाला खरोखर गरज नाही तोपर्यंत कोणताही क्लेम वाढवा आणि तुमच्या समोर येणारा नो क्लेम बोनस मिळवत रहा!