होंडा डिओ इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी /नूतनीकरण करा
होंडा डिओ इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते
होंडा डिओसाठी डिजिटचाच इन्शुरन्स का खरेदी करावा ?
होंडा डिओसाठी इन्शुरन्स प्लॅन्सचे पर्याय
थर्ड पार्टी
कॉम्प्रिहेन्सिव्ह
स्वतःच्या टू-व्हिलरला अपघातामुळे झालेले नुकसान/हानी |
×
|
✔
|
स्वतःच्या टू-व्हिलरला आगीमुळे झालेले नुकसान/हानी |
×
|
✔
|
स्वतःच्या टू-व्हिलरला नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान/हानी |
×
|
✔
|
थर्ड पार्टी वाहनाचे नुकसान |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी मालमत्तेचे नुकसान |
✔
|
✔
|
वैयक्तिक अपघातासाठी कव्हर |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी व्यक्तीला दुखापत/ मृत्यू |
✔
|
✔
|
तुमची स्कूटर किंवा बाईकची चोरी |
×
|
✔
|
तुमचे आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करा |
×
|
✔
|
कस्टमाइझ्ड ॲड-ऑन्सद्वारे अतिरिक्त सुरक्षा |
×
|
✔
|
होंडा डिओ – विविध प्रकार आणि एक्स-शोरूम किंमत
प्रकार |
एक्स-शोरूम किंमत (शहरागणिक वेगळी असू शकते) |
डिओ एसटीडी, 109.19 सीसी |
₹ 53,218 |
डिओ डीएलएक्स 109.19 सीसी |
₹ 55,218 |
क्लेम कसा दाखल करावा?
तुम्ही टू-व्हीलर इन्शुरन्स प्लॅन घ्या किंवा त्याचे नूतनीकरण करा आणि निर्धास्त राहा, कारण आमची 3-स्टेप्सची क्लेम प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे!
स्टेप 1
फक्त 1800-258-5956 वर फोन करा. कोणतेही फॉर्म्स भरण्याची आवश्यकता नाही.
स्टेप 2
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर लिंक मिळवा. तुमच्या वाहनाला झालेल्या नुकसानाची माहिती टप्प्याटप्प्याने देण्यात येणाऱ्या मार्गदर्शनाप्रमाणे तुमच्या स्मार्टफोनवर द्या.
स्टेप 3
नेटवर्क गॅरेजेसमधून रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेस दुरुस्ती यांपैकी तुम्हाला हवे ते निवडा.
डिजिटचे इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने निकाली काढले जातात?
तुम्ही जेव्हा तुमची इन्शुरन्स कंपनी बदलत असाल तेव्हा हा प्रश्न सर्वात आधी तुमच्या मनात यायला हवा. तुम्ही तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे!
डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचाहोंडा डिओ: भारतीयांसाठी नवी आणि स्टायलिश स्कूटर
डिओ हे मुळात रोजच्या वापरासाठी योग्य असे एक प्रवासी वाहन आहे. परंतु होंडाने या स्कूटरच्या स्टायलिंगवरही खूप भर दिला आहे. या स्कूटरच्या आधुनिक रूपाने तरुणांना भुरळ घातली आहे. इतकेच नाही तर डिओची अंतर्गत वैशिष्ट्येसुद्धा अगदी खास अशीच आहेत-.
- 5.3 लिटरचे सिंगल सिलिंडर इंजिनसह ही येते.
- 110सीसी क्युबिक क्षमता असलेले 8बीएचपी टॉर्क देणारे इंजिन.
- 55 किलोमीटर प्रती लिटर इतकी इंधन कार्यक्षमता असलेली डिओ या बाबतीतही उत्कृष्टच आहे.
ही सर्व वैशिष्ट्ये आणि इतर अनेक कारणांमुळेच 2013 मध्ये होंडा डिओला इंडिया डिझाईन मार्क ॲवॉर्ड्सचा पुरस्कार प्राप्त झाला (1). या स्कूटर्सची लोकप्रियता वर्षागणिक वाढतच जात आहे. आज देशातील चालकांमध्ये सर्वात लोकप्रिय असणाऱ्या टू-व्हिलरमध्ये तिची गणना होते.
त्यामुळेच स्कूटरचे कोणत्याही हानीपासून रक्षण करण्यासाठी डिओ-धारकांनी त्यासाठी योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. होंडा डिओ इन्शुरन्स पॉलिसी घेऊन अपघाती परिस्थिती उद्भवल्यास स्कूटर दुरुस्तीसाठी जरूर ती आर्थिक मदत मिळण्याची तजवीज करून ठेवणे आवश्यक आहे.
पण आणखीन एक गोष्ट म्हणजे इन्शुरन्स कंपनीची निवड ही इन्शुरन्स प्लॅनच्या निवडीइतकीच महत्त्वाची असते. अशा प्लॅन्ससाठी तुम्ही डोळे झाकून डिजिटवर विश्वास ठेवू शकता.
पण इतर कोणी देत नाही असे डिजिट नेमके काय देते?
तुमच्या होंडा डिओ टू-व्हिलरच्या इन्शुरन्ससाठी डिजिटचीच निवड का करावी?
तुम्ही वेगवेगळ्या स्कूटर इन्शुरन्स कंपन्या देत असणारी वैशिष्ट्ये आणि लाभ यांची तुलना करू शकता. इथे डिजिट पॉलिसीधारक ज्यांची अपेक्षा करू शकतात असे काही लाभ दिले आहेत:
पॉलिसीधारकांना उपलब्ध विविध इन्शुरन्स पर्याय (Various Insurance Options for Policyholders) – डिओसाठी इन्शुरन्स योजना घेताना ग्राहकांना निवडीसाठी पुरेसा वाव मिळतो. खाली दिलेल्या इन्शुरन्सच्या ढोबळ प्रकारांमधून कोणताही प्रकार तुम्ही निवडू शकता:
थर्ड पार्टी लायॅबिलिटी टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी : या प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसी तुमच्या डिओबरोबर अपघातामुळे निर्माण झालेल्या थर्ड पार्टी व्यक्ती, वाहन किंवा मालमत्ता यांच्याप्रती असलेल्या लायॅबलिटीसाठी संरक्षण देतात. परंतु या पॉलिसीअंतर्गत तुम्ही स्वतःला झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी मदतीची अपेक्षा करू शकत नाही. असा काही खर्च झाल्यास तो तुम्हाला स्वतःलाच भरावा लागेल.
कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी : अशा पॉलिसी थर्ड पार्टी लायॅबिलिटीसाठी संरक्षणासोबत स्वतःच्या नुकसानासाठीसुद्धा संरक्षण देतात. त्यामुळे अपघात झाल्यास थर्ड पार्टीला झालेल्या नुकसानाबरोबर तुम्ही तुमच्या स्कूटरच्या दुरुस्तीची किंमतही क्लेम करू शकता. त्याशिवाय अश्या योजना चोरी, आग आणि नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानाचीही भरपाई करतात.
आणखीन एक होंडा डिओ इन्शुरन्स प्लॅन तुम्ही विचारात घेऊ शकता. ती आहे ओन-डॅमेज प्रोटेक्शन. यात तुम्हाला थर्ड-पार्टी वगळता कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीचे सर्व फायदे मिळतात.
परंतु हा प्लॅन फक्त सप्टेंबर 2018 नंतर घेतलेल्या नव्या बाईक/स्कूटर मालकांसाठीच आहे.
तुमच्या गरजा आणि इन्शुरन्स कंपनीकडून असलेल्या अपेक्षा यांनुसार खालील पर्यायांमधून निवड करा.
सोपी ऑनलाइन खरेदी आणि नूतनीकरण – बऱ्याच वेळा टू-व्हीलर इन्शुरन्स घेणे किंवा त्याचे नूतनीकरण करणे हे एक कंटाळवाणे काम वाटू शकते. तुम्हालाही असेच वाटत असेल तर डिजिट तुमच्यासाठी अगदी योग्य निवड आहे. आमच्या ऑनलाइन पोर्टलवर आम्ही तुम्हाला अगदी सहजपणे खरेदी करण्याचा पर्याय देतो. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही ऑफिसला भेट देण्याची गरज नाही. विद्यमान ग्राहकांना त्यांच्या पॉलिसीचे नूतनीकरण करायचे असले तर ही ऑनलाइन प्रक्रिया खूपच सोयीची आहे. इंटरनेटच्या माध्यमातून प्रीमियम अदा करून ते नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
आकर्षक नो-क्लेम बोनस (NCB) – क्लेम-फ्री वर्षे असणाऱ्या पॉलिसीधारकांना डिजिट खूपच आकर्षक सूट देते. अशा प्रकारे बोनस साठत जाऊन नूतनीकरणाच्या वेळी तुमचा प्रीमियम घटू शकतो. म्हणजेच एखाद्या वर्षात कोणताही क्लेम न केलेल्या व्यक्तीची पॉलिसीसंदर्भातील जबाबदारी कमी होऊ शकते.
तुमची इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू (IDV) कस्टमाइझ करा – दुर्दैवाने तुमची होंडा डिओ चोरीला गेली किंवा दुरुस्तीपलीकडे खराब झाली तर तुम्हाला तुमच्या इन्शुरन्स कंपनीकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळायला हवी. डिजिटच्या डिओ इन्शुरन्स पॉलिसी आयडीव्ही(IDV)ची लवचिकता देत असल्याने हे तसे सहज शक्य आहे. पॉलिसी घेताना तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे आणि गरजांना अनुसरून तुम्हाला हवे तितके आयडीव्ही (IDV) निवडू शकता
ऑनलाइन क्लेम दाखल करणे आणि निकाली काढणे – पॉलिसीधारकांचा त्रास कमी करण्यासाठी डिजिट इंटरनेटचा शक्य तितका वापर करते. त्यामुळेच तर कोणतीही फिकीर न करता तुम्ही ऑनलाइन क्लेम दाखल करू शकता. त्याचबरोबर स्मार्टफोनद्वारे सेल्फ इन्स्पेक्शन करून तुम्ही क्लेम दाखल करू शकता. यासाठी तुम्हाला इतर इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिसमध्ये कागदपत्रे आणि नुकसानाचा पुरावा घेऊन अनेक खेटे घालावे लागतील. त्या तुलनेत डिजिटची कागदपत्रविरहित प्रक्रिया फारच चांगली आहे. शिवाय पॉलिसीधारकांचा अमूल्य वेळ या सोप्या प्रक्रियेमुळे वाचतो.
कार्यक्षम 24x7 ग्राहक सहाय्य – डिजिटच्या ग्राहकांना रात्रंदिवस अगदी कोणत्याही वेळी मदत मिळू शकते. पॉलिसीधारकांना जेव्हा काही शंका किंवा प्रश्न असतील तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी आमचे स्वतःचे कर्मचारी आहेत. तुम्हाला इतकेच करायचे आहे – आमच्या टोल-फ्री नंबरवर कॉल करा. आमचे ग्राहक सेवा कर्मचारी तुम्हाला क्लेम फाइल करणे किंवा पॉलिसीबद्दल काही इतर समस्या असतील तर त्यासाठी मदत करतील. .
उपयुक्त ॲड-ऑन्स – बरेचवेळा इन्शुरन्स कंपनीचा सर्वात मूलभूत प्लॅन पुरेसे संरक्षण देत नाही असे वाटू शकते. डिजिटच्या आकर्षक ॲड-ऑन्सच्या सहायाने पॉलिसीधारक सहजपणे त्यांच्या गरजांनुसार पॉलिसीमध्ये फेरफार करू शकतात. आम्ही रायडरच्या स्वरूपात खालील संरक्षण देतो:
- ब्रेकडाऊन असिस्टन्स
- कंझ्युमेबल कव्हर
- इंजिन आणि गियर प्रोटेक्शन
- रिटर्न टू इन्व्हॉईस प्रोटेक्शन
- झिरो डिप्रिसिएशन प्रोटेक्शन
- तुम्हाला हवे त्याप्रमाणे तुम्ही हे रायडर्स तुमच्या होंडा डिओ पॉलिसीमध्ये समाविष्ट करू शकता.
गॅरेजेसचे उत्कृष्ट नेटवर्क – डिजिटच्या नेटवर्कमधील गॅरेजेसची संख्या अगदी प्रभावी अशी आहे. यांपैकी कोणत्याही सर्व्हिस सेंटरमध्ये तुम्ही तुमची स्कूटर दुरुस्त करून घेतली तर तुम्हाला त्यासाठी कोणताही खर्च करण्याची आवश्यकता नाही. आम्हीच थेट त्याचा सर्व खर्च भरू. तुमची आर्थिक जबाबदारी त्यामुळे शून्य होईल. भारतभरात गॅरेजेसचे मजबूत नेटवर्क असल्याने तुम्ही जिथे असाल तिथे जवळ तुम्हाला असे सेंटर मिळतेच.
योग्य इन्शुरन्स कंपनी निवडण्यासाठी वेळ द्या. डिओसाठी इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी डिजिट सर्वोत्तम पर्याय आहे हे वरील मुद्दे पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला अजूनही खात्री वाटत नसेल तर आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि अधिक माहिती मिळवा.