होंडा सीबी 350आरएस बाइक इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी / रिनिव करा
जपानची सार्वजनिक बहुराष्ट्रीय वाहन निर्माता कंपनी होंडाने फेब्रुवारी 2021 मध्ये आपली दुसरी मध्यम आकाराची 'मेड इन इंडिया' मोटारसायकल सीबी 350आरएस लाँच केली. नवीन सीबी 350आरएस मध्ये स्पोर्टी डिझाइन आणि आक्रमक स्टायलिंग आहे जी समकालीन जीवनशैलीला खऱ्या अर्थाने पूरक आहे.
मात्र, इतर टू-व्हीलरप्रमाणेच होंडा सीबी 350आरएस लाही अपघातहोण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक ताण टाळण्यासाठी होंडा सीबी 350आरएस इन्शुरन्स खरेदी किंवा रिनिव करणे मॅनडेटरी आहे.
भारत सरकारने प्रत्येक टू-व्हीलर मालकासाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसी अनिवार्य केली आहे.
आता, डिजिटसारख्या अनेक विश्वसनीय इन्शुरन्स प्रदात्यांनी चांगली आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी उपलब्ध करून दिल्या आहेत.
खाली आपल्याला सीबी 350आरएस ची काही वैशिष्ट्ये आणि प्राइज, मोटारसायकल इन्शुरन्सचे महत्त्व आणि डिजिट निवडण्याचे फायदे याबद्दल थोडक्यात चर्चा होईल.
होंडा सीबी 350आरएस इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे
आपण डिजिटचा होंडा सीबी 350आरएस इन्शुरन्स का खरेदी करावा?
होंडा सीबी 350आरएस साठी इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार
थर्ड पार्टी
कॉम्प्रिहेन्सिव्ह
उन दामागे
अपघातामुळे स्वताच्या टू-व्हीलरचे डॅमेज/नुकसान |
×
|
✔
|
✔
|
आग लागल्यास स्वताच्या टू-व्हीलरचे डॅमेज/नुकसान |
×
|
✔
|
✔
|
नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी स्वताच्या टू-व्हीलरचे डॅमेज/ नुकसान |
×
|
✔
|
✔
|
थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज |
✔
|
✔
|
×
|
थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज |
✔
|
✔
|
×
|
वैयक्तिक अपघात इन्शुरन्स |
✔
|
✔
|
×
|
थर्ड-पार्टीच्या व्यक्तीची जखम / मृत्यू |
✔
|
✔
|
×
|
आपल्या स्कूटर किंवा बाइकची चोरी |
×
|
✔
|
✔
|
आपला आयडीव्ही(IDV) कस्टमाइज करा |
×
|
✔
|
✔
|
कस्टमाइज्ड अॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण |
×
|
✔
|
✔
|
होंडा सीबी 350आरएस – व्हेरियंट्स आणि एक्स-शोरूम प्राइज
क्लेम कसा फाइल करावा?
आपण आमची टू-व्हीलर प्लॅन खरेदी किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रोसेस आहे!
स्टेप 1
फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. फॉर्म भरायची गरज नाही.
स्टेप 2
आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.
स्टेप 3
आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत म्हणजेच रीएमबर्समेंट किंवा कॅशलेस निवडा.
डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात?
इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करताय हे चांगले आहे!
डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचाहोंडा सीबी 350आरएस बाइक इन्शुरन्ससाठी डिजिट निवडण्याची कारणे
भारतात बाइक इन्शुरन्स मॅनडेटरी आहे. म्हणूनच, सर्वोत्तम कव्हरेज निवडण्यासाठी, आपण डिजिट देत असलेल्या खालील फायद्यांचा विचार करू शकता.
- त्वरित इन्शुरन्स क्लेम - बाइक इन्शुरन्सच्या पारंपारिक पद्धतीत प्रतिनिधीकडून संपूर्ण तपासणी केली जाते, ज्यामुळे वेळ जास्त खर्च होतो. सुदैवाने, डिजिटने स्मार्टफोन-सक्षम सेल्फ इन्सपेक्शन सिस्टमद्वारे क्लेम फाइल करणे एकदम सुलभ केले आहे. याशिवाय, इन्शुरर होंडा सीबी 350आरएस इन्शुरन्स ऑनलाइन वितरित करते आणि कमीत कमी दस्तऐवज मागते.
- तीन इन्शुरन्स पर्याय - वेगवेगळ्या बाइक इन्शुरन्स पॉलिसी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या फायनान्सचे रक्षण करतात. अशाप्रकारे, आपण सर्वात योग्य निवडण्यापूर्वी त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये वाचा.
- थर्ड पार्टी लायबिलिटी टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी - या इन्शुरन्स पॉलिसीद्वारे आपण आपल्या बाइकमुळे थर्ड पार्टी वाहन, व्यक्ती किंवा मालमत्तेला झालेल्या कोणत्याही डॅमेजपासून संरक्षण मिळवून देऊ शकता. याव्यतिरिक्त, ही पॉलिसी अपघातात थर्ड पार्टीच्या इजा किंवा मृत्यूपासून आर्थिक संरक्षण देखील करते. तसेच, अशा घटनांमध्ये उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही खटल्याच्या कॉस्टसाठी आर्थिक संरक्षणाची खात्री बाळगा.
कॉम्प्रिहेन्सिव्ह टू व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी - थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हरेज व्यतिरिक्त, या पॉलिसीची निवड करणाऱ्या व्यक्तींना अपघात, डॅमेज किंवा चोरीमुळे स्वत: च्या बाइकच्या डॅमेजपासून आर्थिक संरक्षणाची खात्री दिली जाऊ शकते. नैसर्गिक आपत्ती, आग किंवा इतर कोणत्याही दुर्घटनांमुळे आपली बाइक डॅमेज झाली तरी आपण आपल्या इन्शुररकडून पेआउट मिळवू शकता.
ओन डॅमेज बाइक इन्शुरन्स पॉलिसी - प्रत्येक भारतीय बाइकर ज्याने मोटारसायकल खरेदी केली आहे आणि आधीच थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केली आहे तो ओन डॅमेज टू-व्हीलर इन्शुरन्स कव्हर निवडू शकतो. ऑन डॅमेज होंडा सीबी 350आरएस इन्शुरन्स आपल्या बाइकसाठी व्यापक संरक्षण प्रदान करते. म्हणूनच, विद्यमान थर्ड-पार्टी पॉलिसीहोल्डर चांगल्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्रपणे ओन डॅमेज कव्हर घेऊ शकतात.
होंडा सीबी 350आरएस इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी किंवा रिनिव करा - देशभरात डिजिटची लोकप्रियता मजबूत करणारे आणखी एक कारण म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी खरेदी किंवा रिनिव करण्याचा ऑनलाइन पर्याय. आपण नवीन ग्राहक असाल तर ऑनलाइन पॉलिसी खरेदी करण्यासाठी त्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. आणि विद्यमान ग्राहकांना होंडा सीबी 350आरएस इन्शुरन्स रिनिवलसाठी ऑनलाइन त्यांच्या खात्यात लॉग इन करणे आवश्यक आहे.
कस्टमाइज्ड इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यू- आयडीव्ही प्राप्त करण्यासाठी, इन्शुरन्स प्रदाता निर्मात्याच्या एक्स-शोरूम प्राइज मधून डेप्रीसीएशन कॉस्ट वजा करतात. डिजिटसारखा नामांकित इन्शुरर आपल्या ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार त्यांची आयडीव्ही रक्कम कस्टमाइज करण्याची परवानगी देतो.
नो क्लेम बोनस - प्रत्येक अग्रगण्य इन्शुरन्स प्रदाता प्रत्येक नॉन-क्लेम वर्षाच्या तुलनेत प्रीमियममध्ये डिसकाऊंट देतो. म्हणजेच जर आपण वर्षभर क्लेम केला नाही तर आपण होंडा सीबी 350आरएस इन्शुरन्स पॉलिसी रिनिवलवर आपल्या प्रीमियममध्ये बचत करू शकता.
अॅड-ऑन फायदा- डिजिटचे प्राथमिक उद्दिष्ट 100% ग्राहकांचे समाधान आहे. म्हणूनच, आपण आपले होंडा सीबी 350आरएस कव्हर निवडक अॅड-ऑनसह ऑप्टिमाइझ करू शकता, जसे की:
कंझ्युमेबल कव्हर
इंजिन आणि गिअरबॉक्स सिक्युरिटी कव्हर
रिटर्न टू इंव्हॉईस कव्हर
नेटवर्क गॅरेजची विस्तृत रेंज- डिजिट सातत्याने आपल्या ग्राहकवर्गाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे देशभरातील 9000+ हून अधिक गॅरेजसोबत सुरळीत अनुभव देण्यासाठी सहकार्य केले आहे. शिवाय, सर्व डिजिट नेटवर्क बाइक गॅरेज डॅमेज दुरुस्त करण्यासाठी कॅशलेस क्लेम्स स्वीकारतात.
प्रभावी ग्राहक केअर सपोर्ट - कोणत्याही वेळी होंडा सीबी 350आरएस इन्शुरन्सबद्दलच्या तुमच्या सर्व शंकांचे डिजिटच्या सुपर-रिस्पॉन्सिव्ह ग्राहक केअर विभागाकडून निरसन करून घेऊ शकता.
वर नमूद केलेले फायदे आपल्या टू-व्हीलरला अपघाती डॅमेज किंवा इतर अपघातांपासून चांगले संरक्षण सुनिश्चित करतात. तथापि, कमी प्रीमियमसाठी अशा फायद्यांशी कधीही तडजोड करू नका. लक्षात ठेवा, बाइक इन्शुरन्ससाठी प्रीमियम पे करणे हा दुरुस्तीचा एक्सपेनसेस उचलण्यापेक्षा परवडणारा पर्याय आहे.
आपल्या होंडा सीबी 350आरएस इन्शुरन्स पॉलिसीसाठी डिजिट का निवडावे?
बहुसंख्य भारतीय बाइक रायडर्स सावधगिरी बाळगत असले, तरी भीषण अपघात होण्याची शक्यता तशीच उरते. यामुळे भारतातील टू-व्हीलर इन्शुरन्सचे महत्त्व अधिक दृढ होते.
खाली बाइक इन्शुरन्स कव्हरचे महत्त्व सांगणारी काही कारणे दिली आहेत.
- कायदेशीर लायबिलिटीसाठी आर्थिक संरक्षण - समजा आपल्या सीबी 350आरएस ला एखादा अपघात झाला आहे आणि एखाद्या व्यक्तीला किंवा मालमत्तेचे डॅमेज किंवा इजा झाली आहे. अशा वेळी थर्ड पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स पॉलिसी उपयुक्त ठरू शकते. हे प्रभावित पक्षाला आर्थिक संरक्षण सुनिश्चित करते. ही पॉलिसी नसलेल्या व्यक्तींना डॅमेजसाठी कायदेशीररित्या जबाबदार धरले जाते.
- भरमसाठ शुल्क किंवा शिक्षेपासून संरक्षण - मोटर व्हेइकल अॅक्ट 1988 नुसार वैध थर्ड पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स पॉलिसीशिवाय प्रत्येक टू-व्हीलरला भारतीय रस्त्यावर ड्राइव्ह करण्यास मनाई आहे. त्यामुळे बाइकर्सना हे संरक्षण घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. समजा, आपण कोणत्याही पॉलिसीशिवाय आपला सीबी 350आरएस चालवत आहात. नियमांचे उल्लंघन केल्यास आपल्याला ₹ 2000 आणि ₹ 4000 रुपयांचा दंड भरावा लागेल.
- थेफ्ट कव्हर - मूलभूत कव्हरेजव्यतिरिक्त, इन्शुरन्स प्रदाते नुकसान किंवा चोरी झाल्यास भरीव पेआउट देखील देतात.
- स्वत: ला झालेल्या डॅमेजसाठीच्या दुरुस्तीचे रीएमबर्समेंट- अपघातामुळे केवळ तिसरी व्यक्ती किंवा मालमत्तेचे डॅमेज होत नाही. यामुळे आपल्या स्वतःच्या मोटारसायकलचेही मोठ्या प्रमाणात डॅमेज होऊ शकते. त्यामुळे एवढे मोठे एक्सपेनसेस टाळण्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हीलर इन्शुरन्स हा उत्तम पर्याय आहे. थर्ड पार्टी लायबिलिटी प्रोटेक्शन स्वतःच्या बाइकच्या डॅमेजची दुरुस्ती करण्यासाठी अशी मदत देत नाही.
म्हणूनच, आपल्या मौल्यवान मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी, परवडणाऱ्या होंडा सीबी 350आरएस इन्शुरन्ससाठी डिजिटसारख्या जबाबदार इन्शुरन्स प्रदात्याचा शोध घ्या जो आपली बाइक खऱ्या अर्थाने सुरक्षित करेल.
होंडा सीबी 350आरएस बद्दल अधिक जाणून घ्या
प्रीमियम सेगमेंट तसेच लो-एंड मार्केटमध्ये होंडा टू-व्हीलर्स भारतीयांमध्ये बेस्ट सेलर ठरली आहे. 'सीबी फॅमिली'चे नवे लाँच मोनो टोन आणि ड्युअल टोन या दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. चला सीबी 350 आरएसच्या काही वैशिष्ट्यांबद्दल चर्चा करूया.
शक्तिशाली इंजिन
सीबी 350 आरएस मध्ये 350 सीसी एअर कूल्ड फोर स्ट्रोक ओएचसी सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. अशी शक्तिशाली मोटर स्मूथ अॅक्सीलरेशन आणि राइड प्रदान करते.
प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये
रस्ता सुरक्षेसाठी होंडाने ड्युअल चॅनेल एबीएस सुसज्ज केले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत किंवा निसरड्या रस्त्यांवर ब्रेक लावल्यास एबीएस व्हील्स लॉक होण्यापासून रोखू शकेल. अशा प्रकारे, आपण आपली बाइक आपल्या नियंत्रणात ठेवू शकता.
आधुनिक डिजिटल एनालॉग मीटर
सीबी 350आरएस स्पोर्ट्समध्ये एक इंस्ट्रूमेंट पॅनेल आहे जे होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (एचएसटीसी), ड्युअल चॅनेल एबीएस, मायलेज इंडिकेटर, गिअर पोझिशन इंडिकेटर इत्यादी आवश्यक माहिती प्रदान करते. आपण मॅन्युअली डिस्प्ले ब्राइटनेस 5 पातळीपर्यंत अॅडजस्ट करू शकता.
- स्पोर्टी डिझाइन
सीबी 350 आरएसला प्रतिस्पर्ध्यांपासून वेगळे करण्यासाठी होंडाने एलईडी हेडलाईट, अंडर-सीट एलईडी टेललाईट, एलईडी टर्न इंडिकेटर्स, फोर्क गायटर आणि बरेच काही देऊन सुसज्ज केले आहे. तसेच, फ्लॅट हँडलबार आणि सॉलिड टेल सेक्शन त्याच्या स्पोर्टी लुकसाठी जबाबदार आहेत.