हीरो एक्सपल्स बाईक इन्शुरन्स किंमत आणि पॉलिसी रिन्युअल ऑनलाईन
2019 मध्ये हीरो मोटोकॉर्पने लॉंच केलेली एक्सपल्स ही भारताची डूअल-स्पोर्ट मोटरसायकल आहे आणि हीरो इम्पल्सचीच पुढची आवृत्ती आहे. ही बाईक इम्पल्स पेक्षा वेगळी आणि एडव्हेन्चर टूरर मोटरसायकल आहे.
लॉंच झाल्यापासूनच, या हीरो बाईकला तिच्या अद्वितीय फीचर्स मुळे ग्राहकांनी प्रचंड पसंती दिली. तरी सुद्धा, ही बाईक देखील जोखीम आणि नुकसानाला बळी पडू शकते याचा विचार करून या बाईकच्या मालकांनी हीरो एक्सपल्स बाईक इन्शुरन्स घेणे आवश्यक आहे.
भारतामध्ये टू-व्हीलर इन्शुरन्स खरेदी करणे अगदी सोपे आहे, कारण असंख्य इन्शुरर्स थर्ड-पार्टी आणि कॉम्प्रीहेन्सिव्ह दोन्ही इन्शुरन्स प्लॅन्स ऑफर करतात. त्यातीलच, डिजीट ही अशी कंपनी आहे जी तुम्हाला तुमच्या इन्शुरन्स वर कव्हरेजचे तीन पर्याय ऑफर करते.
हा इन्शुरन्स प्रोव्हायडर आणखीन कोणकोणते बेनिफिट्स ऑफर करतोय, ते आता आपण पाहूया.
हीरो एक्सपल्स इन्शुरन्स मध्ये काय काय कव्हर केले जाते?
तुम्ही डिजीटचे हीरो एक्सपल्स इन्शुरन्स खरेदी करणे गरजेचे का आहे?
हीरो एक्सपल्ससाठी इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार
थर्ड पार्टी
कॉम्प्रीहेन्सिव्ह
उन दामागे
अपघातामुळे झालेले तुमच्या स्वतःच्या टू-व्हीलरचे नुकसान |
×
|
✔
|
✔
|
आगीमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या टू-व्हीलरचे नुकसान |
×
|
✔
|
✔
|
नैसर्गिक आपत्तिमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या टू-व्हीलरचे नुकसान |
×
|
✔
|
✔
|
थर्ड पार्टीच्या गाडीला झालेले नुकसान |
✔
|
✔
|
×
|
थर्ड पार्टीच्या मालमत्तेला झालेले नुकसान |
✔
|
✔
|
×
|
पर्सनल एक्सिडेंट कव्हर |
✔
|
✔
|
×
|
थर्ड पार्टी व्यक्तिला झालेली इजा/मृत्यू |
✔
|
✔
|
×
|
तुमची बाईक किंवा स्कूटर चोरीला गेल्यास |
×
|
✔
|
✔
|
तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करा |
×
|
✔
|
✔
|
कस्टमाइज्ड एड-ऑन्स सह एक्स्ट्रा प्रोटेक्शन |
×
|
✔
|
✔
|
कॉम्प्रीहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी टू-व्हीलर इन्शुरन्स मधला फरक याबद्दल आणखीन जाणून घ्या
हीरो एक्सपल्स - व्हेरियंट्स आणि एक्स-शोरूम किंमत
मी क्लेम कसा फाईल करू शकतो?
एकदा तुम्ही आमचा टू-व्हीलर इन्शुरन्स प्लॅन विकत घेतला किंवा रिन्यू केलात की तुम्ही निश्चिंत होऊ शकता, कारण आमच्याकडे 3 सोप्या स्टेप्स मध्ये पूर्णपणे डिजिटल अशी क्लेम प्रोसेस आहे.
स्टेप 1
फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोणताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.
स्टेप 2
सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवरून एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेस ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.
स्टेप 3
आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.
डिजीट इन्शुरन्स क्लेम्स किती काळात सेटल केले जातात?
तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा प्रश्न सर्वात पहिले यायला हवा. तुमचे अभिनंदन, तुम्ही हे करता आहात.
डिजीटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचाहीरो एक्सपल्स इन्शुरन्ससाठी डिजीटची निवड करण्याची काही कारणे
जर तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी नाही घेतलीत, तर तुमच्या एक्सपल्सच्या रिपेअरिंगचा खर्च तुमच्यावर आर्थिक ताण आणू शकतो. डिजीट सारखे इन्शुरन्स प्रोव्हायडर्स तुमच्या गरजांना जाणतात आणि म्हणूनच तुमच्या टू-व्हीलर इन्शुरन्स वर आकर्षक डील्स ऑफर करतात.
हीरो एक्सपल्स इन्शुरन्स खरेदी करताना तुम्ही खालील काही बेनिफिट्स मिळवू शकता:
उपलब्ध कव्हरेज पर्याय - डिजीट खालील इन्शुरन्सचे पर्याय ऑफर करतो:
- थर्ड-पार्टी डॅमेज कव्हर - या स्कीम मध्ये थर्ड-पार्टीला झालेल्या नुकसानासाठी कव्हरेज मिळते. अपघातामुळे किंवा अनपेक्षित घटनांमुळे निर्माण होणाऱ्या कायदेशीर बाबींपासून देखील सुरक्षा मिळते.
- ओन डॅमेज बाईक कव्हर - हीरो एक्सपल्ससाठी थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्स घेतलेल्या ग्राहकांना त्यांच्या बाईकचे झालेले नुकसान कव्हर करण्यासाठी डिजीटकडून हे स्टँडअलोन कव्हर मिळू शकते.
- कॉम्प्रीहेन्सिव्ह कव्हर - हे एक परिपूर्ण कव्हर आहे जे थर्ड-पार्टी आणि ओन बाईक डॅमेजेस दोन्ही कव्हर करते.
- आयडीव्ही कस्टमायझेशन - या इन्शुरर कडून कॉम्प्रीहेन्सिव्ह इन्शुरन्स प्लॅन निवडल्यावर तुम्हाला तुमच्या बाईकची आयडीव्ही कस्टमाइज करण्याचा पर्याय उपलब्ध होतो. तुमची बाईक चोरीला गेल्यास किंवा तिचे रिपेअर न होण्यासारखे नुकसान झाले तर इन्शुरर तुम्हाला जी रक्कम देतो तिला इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू म्हणजेच आयडीव्ही असे म्हणतात.
- पेपरलेस डॉक्यूमेंटेशन - डिजीटच्या टेक्नोलॉजी-ड्रिव्हन प्रक्रियेमुळे इन्शुरन्स एप्लिकेशन किंवा क्लेम प्रक्रियेच्या वेळेस कुठेही तुम्हाला कागदपत्रांची हार्ड कॉपी जमा करावी लागत नाही. त्यामुळे, तुम्ही कागदपत्र अपलोड करून प्रक्रिया कमी वेळात पूर्ण करू शकता.
- सोयीची सेल्फ-इन्स्पेक्शन प्रक्रिया - डिजीट इन्शुरन्सची क्लेम प्रक्रिया तुलनेने खूपच सुटसुटीत आहे कारण यामध्ये तुमच्या बाईकचे झालेले नुकसान चेक करण्यमध्ये त्यांच्या प्रतिनिधींचा कोणताही सहभाग नसतो. तुमच्या स्मार्टफोन मधून, तुम्हीच झालेले नुकसान सिलेक्ट करून क्लेमची पुढील प्रक्रिया पूर्ण करू शकता.
- नेटवर्क गॅरेजेसची विस्तृत रेंज - 9000+ पेक्षा अधिक डिजीट नेटवर्क बाईक गॅरेजेस भारतामध्ये उपलब्ध आहेत, जे कॅशलेस सुविधा देतात.
- उच्चतम क्लेम सेटलमेंट - स्मार्टफोन एनेबल्ड प्रक्रियेमुळे, डिजीट सारखे इन्शुरर्स काही मिनिटांतच क्लेम सेटल करतात आणि 97% चा उच्चतम क्लेम सेटलमेंट रेशिओ गाठतात.
- एड-ऑन बेनिफिट्स - ज्या ग्राहकांना त्यांच्या वर्तमान इन्शुरन्स पॉलिसी व्यतिरिक्त आणखीन जास्त सुरक्षा हवी आहे त्यांच्यासाठी डिजीट असंख्य एड-ऑन बेनिफिट्स ऑफर करतो. झिरो-डेप्रीसिएशन कव्हर, क्न्झ्युमेबल कव्हर, ब्रेकडाऊन असिस्टंस ई. अशाच एड-ऑन्सची काही उदाहरणे आहेत.
तसेच, या इन्शुररची निवड करून तुम्ही हीरो एक्सपल्स इन्शुरन्स प्राईज मध्ये डिस्काउन्ट्स देखील मिळवू शकता.
तुमच्या हीरो एक्सपल्स इन्शुरन्स साठी डिजीटचीच निवड का करावी?
आर्थिक आणि कायदेशीर लायबिलिटीज टाळण्यासाठी तुम्ही थर्ड-पार्टी एक्सपल्स इन्शुरन्स किंवा एक परिपूर्ण कॉम्प्रीहेन्सिव्ह प्लॅन घेऊ शकता. चला तर आता आपण खालील सदरात बघूया की टू-व्हीलर इन्शुरन्स खरेदी करण्याचे काय काय फायदे आहेत:
- नो क्लेम बोनस - पॉलिसी कालावधी दरम्यान एकही क्लेम न केलेल्या वर्षामध्ये तुम्ही हीरो एक्सपल्स इन्शुरन्स रिन्यू करताना पॉलिसी प्रीमियम्स वरती डिस्काउन्ट्स मिळवू शकता. हे डिस्काउन्ट्स किंवा नो-क्लेम बोनसेस, तुमच्या इन्शुरर आणि क्लेम-फ्री वर्षांनुसार 50% पर्यंत देखील असू शकतात.
- पर्सनल एक्सिडेंट कव्हर - तुम्ही थर्ड-पार्टी किंवा कॉम्प्रीहेन्सिव्ह हीरो एक्सपल्स बाईक इन्शुरन्स यापैकी कोणताही पर्याय निवडलात, तरी तुम्ही पर्सनल एक्सिडेंट कव्हर अंतर्गत नुकसानभरपाई मिळण्यास पात्र ठरता. हे कव्हर केवळ अपघाती मृत्यू झाला असेल किंवा संपूर्ण अपंगत्व आले असेल तरच लागू होते.
- थर्ड-पार्टी लायबिलिटी कमी करते - थर्ड-पार्टी व्यक्ती, मालमत्ता किंवा वेहिकलचे अपघात किंवा धडक झाल्यामुळे तुमच्या हीरो मोटरसायकल मुळे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत, थर्ड-पार्टी इन्शुरन्स असे नुकसान कव्हर करतो आणि लायबिलिटी कमी करतो.
- ओन बाईक डॅमेज - कॉम्प्रीहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसीज अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्ति किंवा अनैसर्गिक आपत्ति यामुळे तुमच्या हीरो बाईकचे झालेले नुकसान कव्हर करतात.
- आर्थिक ताण कमी करते - जर तुमच्याकडे एक वैध इन्शुरन्स नसेल तर तुमच्या एक्सपल्सच्या रिपेअरिंगचा खर्च तुम्हाला खूप महाग वाटू शकतो. तुमच्या हीरो बाईकसाठीचे इन्शुरन्स महागडे रिपेअरिंग चार्जेस कव्हर करतो जेणेकरून तुम्ही भविष्यासाठी बचत करू शकाल.
- कायदेशीर लायबिलिटी पासून सुरक्षा - एका परिपूर्ण इन्शुरन्स पॉलिसी सोबत, तुम्ही ट्रॅफिकचे भरघोस दंड भरण्यापासून स्वतःला वाचवू शकता. इन्शुरन्स नसेल तर, पहिल्यांदा नियम तोडल्यास ₹2000 दंड भरावा लागतो आणि पुन्हा पुन्हा नियम तोडल्यास ₹4000 दंड भरावा लागतो. त्यामुळे, दंड भरण्यात पैसे खर्च करण्यापेक्षा हीरो एक्सपल्स इन्शुरन्स खरेदी करण्यात पैसे खर्च करणे कधीही श्रेयस्कर ठरते.
त्याच बरोबर, तुम्ही जास्त ऐच्छिक/व्हॉलंटरी डीडक्टिबल्सचा प्लॅन घेऊन कमी किमतीचा हीरो एक्सपल्स बाईक इन्शुरन्स प्लॅन देखील निवडू शकता. परंतु, जर तुम्ही पॉलिसी कालावधी दरम्यान कमीत कमी क्लेम्स रेज केले तरच हा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
याबाबतीत, तुम्ही डिजीट इन्शुरन्सचा विचार नक्की करू शकता कारण इथे तुम्हाला तुमच्या इन्शुरन्ससंबंधी अगदी 24x7 असिस्टंस मिळतो, ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदे मिळतात.
हीरो एक्सपल्स बद्दल आणखीन जाणून घ्या
खालील काही महत्त्वाच्या फीचर्स मुळे हीरो एक्सपल्स भारतीय वाहनांच्या बाजारात सर्वात जास्त विकले जाणारे मॉडेल बनले आहे.
- यामध्ये ऑईल-कूल्ड, 4-स्ट्रोक 4-वॉल्व्ह सिंगल-सिलेंडर ओएचसी इंजिन आहे जे 8500 आरपीएम वर 19.1 पीएसची सर्वाधिक पॉवर देते. तसेच, या मॉडेलचे इंजिन डिस्प्लेसमेंट 199.6 सीसी इतके आहे.
- हीरो एक्सपल्स मध्ये मॅन्युअल ट्रांसमिशन आणि 5-स्पीड गिअरबॉक्स आहे.
- या बाईकची फ्युएल टँक क्षमता 13 लिटरची आहे आणि बाईकचे वजन 158 किग्रॅ आहे.
- तुम्हाला या मोटरसायकल मध्ये डायमंड टाईप चासिस मिळेल आणि एन्टी-फ्रिक्शन बुश टाईप फ्रंट सस्पेंशन सह टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि सोबतच मोनो-शॉक रिअर सस्पेंशन्स सह आयताकृत स्विंगआर्म देखील मिळेल.
- सिंगल एन्टी-ब्रेकिंग सिस्टम, एडजस्टेबल विंडस्क्रीन, गिअर इंडीकेटर, पॅसेन्जर फूटरेस्ट, रायडिंग मोड्स ई. या बाईक माधिक सेफ्टी फीचर्सची काही उदाहरणे आहेत.
या बाईकमध्ये जरी अनेक सेफ्टी फीचर्स असले तरी, ही बाईक देखील अपघात किंवा नुकसानाला बळी पडू शकते. त्यामुळे, हीरो एक्सपल्स बाईक इन्शुरन्स खरेदी करून रिपेअरिंगच्या खर्चातून निर्माण होणारा आर्थिक ताण कमी करणे कधीही श्रेयस्कर ठरते.
या बाबतीत, डिजीट इन्शुरन्स हा एक आदर्श/इच्छित पर्याय ठरू शकतो.