हीरो स्प्लेंडर इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करा/नूतनीकरण करा
हीरो स्प्लेंडर कदाचित भारतातील सर्वात प्रसिद्ध बजेट बाईकपैकी एक आहे. त्यामुळे जर आपण टू-व्हीलर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्याची वैशिष्ट्ये, ती गाडी कशामुळे लोकप्रिय होते आणि त्यासाठी बाईक इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी आपण काय शोधावे याची माहिती काढणे कधीही चांगले.
स्प्लेंडर उत्पादनामागील कंपनी हिरो मोटोकॉर्प गेल्या काही काळापासून देशांतर्गत टू-व्हीलरच्या विक्रीत बाजारपेठेत अग्रेसर राहिली आहे. जून 2019 मध्ये, हीरोच्या स्प्लेंडर आणि एच.एफ(HF) डिलक्सने प्रभावी विक्रीची नोंद केली आणि यात स्प्लेंडरची विक्री 2.42 लाख युनिटपेक्षा जास्त होती. (1)
आपण टिकाऊ आणि इंधन-कार्यक्षम बाईक शोधत आहात का? ठीक आहे, स्प्लेंडर मध्ये कदाचित आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी असू शकतात.
जरी स्प्लेंडरला नैसर्गिकरित्या होणाऱ्या झिजेचा सामना करण्यासाठी डिझाइन केलेले आहे, तरीही आपल्या बाईकचे अपघाती नुकसान त्याची कार्यक्षमता कमी करू शकते. अशा दुर्घटना घडल्यास हिरो स्प्लेंडर इन्शुरन्स खरेदी केल्यास आपल्या बाईकच्या महागड्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत होऊ शकते. अपघातामुळे उद्भवू शकणाऱ्या थर्ड पार्टी लायॅबिलिटीजची पूर्तता करण्यासाठीही इन्शुरन्स पॉलिसी महत्त्वाची आहे.
शिवाय, हे लक्षात ठेवणे चांगले आहे की मोटार वाहन कायदा 1988 नुसार आपल्या दुचाकी वाहनासाठी इन्शुरन्स संरक्षण केवळ आवश्यकच नाही तर कायद्याने देखील बंधनकारक आहे. या नियमाचे पालन न केल्यास 2000 रुपये वारंवार गुन्हा केल्यास 4,000 रुपये इतका मोठा वाहतूक दंड होऊ शकतो.
हिरो स्प्लेंडर इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले आहे
आपण डिजिटचा हीरो स्प्लेंडर इन्शुरन्स का खरेदी करावा?
हिरो स्प्लेंडरसाठी इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार
थर्ड पार्टी
कॉम्प्रिहेन्सिव्ह
अपघातामुळे स्वत:च्या टू-व्हीलरचे हानी/नुकसान |
×
|
✔
|
आग लागल्यास स्वत:च्या टू-व्हीलरचे हानी/नुकसान |
×
|
✔
|
नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीत स्वत: च्या टू-व्हीलरचे हानी/नुकसान |
×
|
✔
|
थर्ड पार्टीच्या वाहनाचे नुकसान |
✔
|
✔
|
थर्ड पार्टीच्या प्रॉपर्टीचे नुकसान |
✔
|
✔
|
वैयक्तिक अपघात कव्हर |
✔
|
✔
|
इजा/थर्ड-पार्टी व्यक्तीचा मृत्यू |
✔
|
✔
|
किंवा |
×
|
✔
|
आपले आय.डी.व्ही(IDV) कस्टमाइझ करा |
×
|
✔
|
कस्टमाइझ ॲड-ऑन्ससह अतिरिक्त संरक्षण |
×
|
✔
|
क्लेम कसा करावा?
आपण आमचा टू व्हीलर इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यावर किंवा नूतनीकरण केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्सची, पूर्णपणे डिजिटल क्लेम्सची प्रक्रिया आहे!
स्टेप 1
फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. फॉर्म भरायचे गरज नाही.
स्टेप 2
आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर सेल्फ-इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. मार्गदर्शित टप्प्याटप्प्याने प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाच्या नुकसानाविषयीची माहिती द्या.
स्टेप 3
आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत निवडा म्हणजे आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस.
डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती लवकर सेटल केले जातात?
आपली इन्शुरन्स कंपनी स्विच करताना हा प्रश्न सगळ्यात आधी आपल्या मनात आला पाहिजे. तुम्ही तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे!
डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचाहिरो स्प्लेंडरची ओळख
25 वर्षांहून अधिक काळापूर्वी सादर करण्यात आलेल्या हिरो स्प्लेंडरने हिरोच्या टू -व्हीलरच्या प्रभावी लाइन-अपमध्ये उत्तम भर घातली होती. परवडणारी किंमत आणि चमकदार कामगिरी यामुळे स्प्लेंडर जवळजवळ काही वेळातच घराघरात लोकप्रिय झाली.
शिवाय, जेव्हा ती बाईक बाजारात आले तेव्हा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची ऑफर देऊन तिने उद्योगात क्रांती घडवून आणली, जसे की इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टम, जे भारतात कोणी ऐकले नव्हते.
आज, आपण अनेक स्प्लेंडर मॉडेल्समधून निवडू शकता, जे सर्व सुमारे 80 के.एम.पी.एल(kmpl)चे मायलेज देतात. 4-स्ट्रोक सिंगल-सिलिंडर 97 सी.सी(cc )चे शक्तिशाली इंजिन दररोजच्या वापरासाठी उत्तम आहे, यामुळे ही बाईक नियमित वापरासाठी योग्य वाहन आहे.
अनेक पुरस्कार विजेते, हीरो स्प्लेंडर रेंजने टीकाकारांना तसेच आपल्या ग्राहकांना प्रभावित करण्यात यश मिळवले आहे.
2006 मध्ये ई.टी(ET) ब्रँड इक्विटी सर्वेक्षणानुसार, स्प्लेंडर हे टू-व्हीलर श्रेणीतील पहिल्या दोन मॉडेल्सपैकी एक होते. 2016 मध्ये, जे.डी. पॉवर इंडियाने हिरो सुपर स्प्लेंडरला सर्वोत्कृष्ट कार्यकारी मोटरसायकल म्हणून घोषित केले. (2)
नोव्हेंबर 2019 मध्ये, कंपनीने लोकप्रिय बाईकची बी.एस- VI (BS-VI) अनुरूप आवृत्ती बाजारात आणली, ज्याचे टायटल आहे स्प्लेंडर आयस्मार्ट जे वाहन चालवताना हानिकारक उत्सर्जन मर्यादित करू शकते. (3)
त्यामुळे स्प्लेंडर ही आपल्या अभिमानाला आणि संरक्षणास पात्र ठरणारी बाईक आहे. वाहनाचे कोणतेही नुकसान झाल्यास दुरुस्ती सुरू करण्यात आपले आर्थिक उत्तरदायित्व वाढेल. तथापि, भारतीय रस्त्यांवर अपघात सामान्य आहेत. अशा प्रकारे आपण करू शकता ते म्हणजे हिरो सुपर स्प्लेंडर इन्शुरन्स प्लॅनची निवड करणे.
आपण आपल्या बाईकसाठी इन्शुरन्स कव्हरेज खरेदी करत असतानाही, सर्वोत्तम इन्शुरन्स कंपनी निश्चित करणे महत्वाचे आहे. डिजिट विश्वासार्ह, पेपरलेस इन्शुरन्स पॉलिसी प्रदान करते ज्यात जवळपास कोणतीही अडचण नसते.
पण,डिजिटवरून इन्शुरन्स घेतल्यानंतर आपल्याला कसा फायदा होईल? चला, जाणून घेऊयात.
आपल्या हिरो स्प्लेंडर बाईक इन्शुरन्ससाठी डिजिटच का निवडावे?
बाजारात असंख्य पर्याय उपलब्ध असताना, आपल्यासाठी आश्चर्य वाटणे अगदी सामान्य आहे की डिजिटमध्ये इतरांपेक्षा वेगळे काय आहे. जेव्हा आपण आमच्याकडून स्प्लेंडर बाईक इन्शुरन्स पॉलिसी घेता तेव्हा आपण लाभ घेऊ शकता अशी काही वैशिष्ट्यांची यादी खाली दिली आहे:
- ऑनलाइन क्लेम प्रोसेस -डिजिटला आपल्या वेळेचं महत्त्व समजतं. त्यामुळे पॉलिसिसचा लाभ घेण्यासाठी आणि क्लेम करण्यासाठी त्यांनी डिजिटल प्रक्रिया आखली आहे. जेव्हा आपण इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत क्लेम्स करता तेव्हा आपल्याला यापुढे इन्शुरन्स कंपनीला खूप कागद सादर करण्याची आवश्यकता नाही. शिवाय, डिजिट स्मार्टफोन-एनेबल्ड सेल्फ-इन्सपेक्शन प्रक्रिया ऑफर करते जी क्लेम प्रक्रिया अधिक सुलभ करते. पुढे, डिजिटचे जास्त क्लेम सेटलमेंटचे प्रमाण हा आणखी एक बोनस आहे जो आपला क्लेम नाकारला जाण्याची शक्यता कमी करतो.
- मोठ्या संख्येने नेटवर्क गॅरेजसह असल्याने कॅशलेस क्लेम्स सोपे - डिजिट आपल्याला देशभरातील 1,000 पेक्षा जास्त नेटवर्क गॅरेजमधून कॅशलेस अपघाती दुरुस्तीचा लाभ घेण्यास पात्र बनवते. जर आपल्या बाइकचे नुकसान झाले असेल आणि अपघातामुळे दुरुस्तीची आवश्यकता असेल तर आपण जवळचे नेटवर्क गॅरेज शोधू शकता आणि कॅशलेस दुरुस्तीचा लाभ घेऊ शकता. या ठिकाणी, आपण त्वरित आपल्या डिजिट पॉलिसीचा लाभ घेऊ शकता, त्याद्वारे, आपल्या स्वत: च्या खिशातून कोणतेही पैसे खर्च करण्याची आवश्यकता दूर करू शकता.
- कार्यक्षम 24x7 ग्राहक सेवा - अपघात कधीही होऊ शकतात, मग ते दिवसभरातले असोत किंवा रात्रीचे असोत. त्यामुळे इन्शुरन्स विक्री करणाऱ्या कंपनीने क्लेम फाइलिंग आणि इतर समस्या नेहमी सोडवण्यास तयार असणे आवश्यक आहे. सुदैवाने, डिजिटचा ग्राहक सहाय्य विभाग राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24 तास ग्राहकांसाठी उपलब्ध असतो. आपल्याला आपल्या पॉलिसीसंदर्भात काही प्रश्न असतील किंवा आपल्याला फक्त कंपनीला अपघातांची माहिती द्यायची असेल, तर कंपनीचा प्रतिनिधी नेहमीच फक्त एक कॉलवर आपल्या मदतीला येतो.
- स्प्लेंडर इन्शुरन्स पॉलिसीचे निवडण्यासाठी विविध पर्याय – डिजिट ग्राहकांना त्यांच्यासाठी सर्वोत्तम काय आहे हे ठरवू देण्यावर विश्वास ठेवते. हे लक्षात घेऊन, ते खालील प्रकारच्या हीरो स्प्लेंडर प्लस इन्शुरन्स पॉलिसी देतात:
- a) थर्ड पार्टी लायॅबिलिटी टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी - या प्लॅनमध्ये, आपली स्प्लेंडर टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी केवळ आपल्या बाइकच्या अपघातात थर्ड -पार्टीच्या व्यक्तीने, वाहनाने किंवा मालमत्तेद्वारे झालेल्या नुकसानीची भरपाई करेल.
- b) कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीज - हा इन्शुरन्स प्लॅन आपल्या वाहनाच्या अनेक प्रकारच्या नुकसानीसाठी संरक्षण प्रदान करतो. थर्ड पार्टी लायॅबिलिटी बरोबरच, पॉलिसीमध्ये आपल्या स्वतःच्या बाईकचे नुकसान भरून काढण्यासाठी केलेल्या खर्चाचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त, अशा योजनेत आग, चोरी, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमुळे बाईकचे नुकसान झाल्यास केलेल्या खर्चाचा समावेश आहे.
शिवाय, आपण आपल्या स्प्लेंडर टू-व्हीलरसाठी स्वत: चे नुकसान कव्हर देखील घेऊ शकता. ही एक तुलनेने नवीन इन्शुरन्स पॉलिसी आहे. सप्टेंबर 2018 नंतर आपले स्प्लेंडर वाहन खरेदी केले असल्यास आपण त्याचा लाभ घेऊ शकता. डिजिटच्या स्वत: च्या नुकसानीच्या कव्हरमध्ये, आपण अशा योजनेच्या थर्ड-पार्टीच्या लायॅबिलीतच्या भागासह सामान्यत: कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसींमध्ये आढळणाऱ्या विस्तृत संरक्षणाचा लाभ घेऊ शकता.
आपण निवडलेल्या पॉलिसीची पर्वा न करता, दुर्दैवी घटना घडल्यास यामुळे आपली आर्थिक लायॅबिलिटी बऱ्यापैकी कमी होईल याची खात्री करा.
- कस्टमाईझेबल इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू (IDV) - आपल्या बाईक इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत ऑफर केलेले इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू किंवा आय.डी.व्ही(IDV) म्हणजे आपली बाईक चोरीला गेल्यास किंवा दुरुस्तीच्या पलीकडे खराब झाल्यास डिजिट आपल्याला पे करेल अशा पूर्वनिर्धारित निधीचा संदर्भ देते. इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू बाईक मॉडेलच्या उत्पादक किंमतीइतके आहे वजा त्याचे डेप्रीसिएशन. डिजिट आपल्याला एक उच्च आय.डी.व्ही ऑफर करते आणि पुढे आपल्याला आपला आय.डी.व्ही. कस्टमाइझ करण्यास मदत करते, ज्यामुळे आपण आपल्या बाईक इन्शुरन्स पॉलिसीमधून आपले फायदे जास्तीत जास्त मिळवू शकता.
- नो क्लेम बोनस (NCB) - जर आपण आपल्या पॉलिसीवर एकदाही क्लेम न करता संपूर्ण इन्शुरन्स टर्म पास करू शकलात, तर आपण आपल्या पॉलिसी प्रीमियमवर एन.सी.बी(NCB) किंवा नो-क्लेम बोनस बेनिफिट्ससाठी पात्र व्हाल. प्रत्येक सकसेसिव्ह क्लेम-मुक्त टर्मस् सह, आपली एन.सी.बी एकत्र केली जाते (आणि 50% पर्यंत जाऊ शकते), आपल्याला कमी इन्शुरन्स प्रीमियमवर सर्वोत्तम संरक्षण मिळविण्याची परवानगी देते. डिजिटची आकर्षक एन.सी.बी. ऑफर हे कंपनीची पॉलिसी निवडण्याचे आणखी एक कारण आहे.
आपल्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये बदल करण्यासाठी ॲड-ऑन कव्हर्सची उपलब्धता – डिजिट आपल्याला आपल्या इच्छेनुसार पॉलिसीमध्ये विविध प्रकारच्या अॅड-ऑन्स सह बदल करण्यास मदत करते. जेव्हा आपल्या बाइकचे कोणतेही नुकसान होते तेव्हा हे स्वतंत्र कव्हरेज आपले आर्थिक संरक्षण वाढवते. Digit च्या टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत आपण घेऊ शकता अशा काही ॲड-ऑन्स खालीलप्रमाणे आहेत:
- झिरो डिप्रीसिएशन कव्हर .
- इंजिन आणि गिअर प्रोटेक्शन कव्हर
- ब्रेकडाउन असिस्टन्स
- कंझ्यूमेबल कव्हर
- रिटर्न टू इनव्हॉइस कव्हर
अशा फायद्यांसह आणि बरेच काही असणारा डिजिटचा परवडणारा स्प्लेंडर टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी वाहनाच्या बाबतीत सर्वव्यापी आर्थिक संरक्षण प्रदान करतो.
हीरो स्प्लेंडर इन्शुरन्स: विशिष्ट मॉडेल्सच्या पॉलिसी
हिरो मोटोकॉर्पने आजवर स्प्लेंडर प्लस, स्प्लेंडर प्रो, स्प्लेंडर प्रो क्लासिक, स्प्लेंडर आयस्मार्ट, सुपर स्प्लेंडर आणि स्प्लेंडर आयस्मार्ट 110 अशी सहा स्प्लेंडर मॉडेल्स बाजारात आणली आहेत.
- स्प्लेंडर प्लस - सर्व स्प्लेंडर व्हेरिएंट्सपैकी सर्वात जुने मॉडेल, स्प्लेंडर प्लसचे डिझाइन 1995 मध्ये त्याच्या लाँच डिझाईनपेक्षा अपरिवर्तित राहिले आहे. यात 97.20 सी.सी चे फोर स्ट्रोक सिंगल-सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे.डिजिटची हीरो होंडा स्प्लेंडर प्लस इन्शुरन्स पॉलिसी वाहनाला पुरेसे संरक्षण देऊ शकते, ज्यामुळे आपण खराब झालेले भाग बदलू शकता आणि विश्वासार्ह बाईकचा एकूण देखावा आणि भावना टिकवून ठेवू शकता.
- हीरो स्प्लेंडर प्लस आय3एस - स्प्लेंडर प्लस आय3एस हे हिरोच्या ऑफरवर आणखी एक परवडणारे प्रवासी मॉडेल आहे. यात 4 स्पीड ट्रान्समिशनसह 97.2 सीसी इंजिन देण्यात आले आहे. वाहन खरेदी करताना आपण पाच वेगवेगळ्या रंगांपैकी एकाची निवड करू शकता .
- स्प्लेंडर आयस्मार्ट 110 - प्रगत बॉडी आणि ग्राफिक्स असलेले आयस्मार्ट 110 मध्ये चार स्ट्रोक, 110 सी.सी आणि सिंगल सिलिंडरसह सुधारित इंजिनही आहे. यात अत्याधुनिक आय3एस तंत्रज्ञानही देण्यात आले असून, अन्यथा बजेट-फ्रेंडली क्षेत्रात प्रीमियम फील आणला जातो.
आपल्या मालकीच्या सहा स्प्लेंडर मॉडेल्सपैकी कोणत्याही मॉडेल्सची पर्वा न करता, डिजिटच्या इन्शुरन्स पॉलिसींचा लाभ घेतल्यास आपण निर्धास्त राहू शकाल.
बाईकची चिंता करण्याऐवजी प्रवासाचा आनंद घ्या
हीरो स्प्लेंडर – प्रकार आणि एक्स-शोरूम किंमत
प्रकार |
एक्स-शोरूम किंमत (शहरानुसार बदलू शकते) |
स्प्लेंडर प्लस किक अलॉय, 97.2 सीसी |
₹ 51,790 |
स्प्लेंडर प्लस सेल्फ अलॉय, 97.2 सीसी |
₹ 53,790 |
स्प्लेंडर प्लस आय3एस, 97.2 सीसी |
₹ 55,200 |
स्प्लेंडर प्लस आय.बी.एस आय3एस, 97.2 सीसी |
₹ 55,600 |
सुपर स्प्लेंडर एस.डी.ए, 124.7 सीसी |
₹ 59,650 |
सुपर स्प्लेंडर एस.डी.ए एस.एक्स 124.7 सीसी |
₹ 60,250 |