भारतात बाईक इन्शुरन्स अनिवार्य का आहे?
ग्रामीण भाग असो किंवा ठप्प झालेले महानगर, टू-व्हिलर वाहने निःसंशयपणे भारतातील वाहतुकीचे सर्वात सोयीस्कर साधन आहेत. कारण मुंबई, बंगळुरू किंवा दिल्ली सारख्या व्यस्त महानगरातील गर्दीच्या रस्त्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील अरुंद रस्त्यांवर टू-व्हिलर वाहने तुम्हाला सहजतेने प्रवास करण्यास मदत करतात. शिवाय, टू-व्हिलर वाहने बहुतेक लोकांना सहज परवडणारी आहेत. किंबहुना, ज्यांना टू-व्हिलर विकत घेणे परवडत नाही त्यांनाही आजकाल बँकांकडून त्या विकत घेण्यासाठी कर्ज मिळू शकते.
भारतीय मध्यमवर्गाच्या वाढत्या गरजा व बदलत्या जीवनशैलीनुसार टू-व्हिलरच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे आणि त्यामुळे भारतीय रस्त्यांवर टू-व्हिलर वाहनांची संख्या पूर्वीपेक्षा जास्त आहे. रस्त्यावर टू-व्हिलरची संख्या वाढल्याने अपघाताचा धोकाही वाढला आहे. त्याच प्रमाणात, भारतात टूू-व्हिलर इन्शुरन्सची गरज वाढली आहे. का आणि कसे? चला या लेखात जाणून घेऊया.
तुम्ही तुमच्या टू-व्हिलरचा इन्शुरन्स का काढावा?
नवीकोरी टू-व्हिलर खरेदी करताना, जवळजवळ सर्व मोटार कंपन्या बाईक इन्शुरन्स देतात. तथापि, अनेकजण अगदी किंचित बचत करायची म्हणून इन्शुरन्स रद्द करतात किंवा ते कालबाह्य झाल्यानंतर त्याचे नूतनीकरण करत नाहीत. मात्र वेळ व पैशांच्या बचतीशिवाय बाईक इन्शुरन्स घेणे टाळण्याच्या या वृत्तीमागील खरे कारण म्हणजे त्यांना मुळात मी बाईक इन्शुरन्स का घ्यावा? याचेच उत्तर ठाऊक नाही.
अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, तुमच्या टू-व्हिलरसाठी इन्शुरन्स निवडण्यामागे दोन मुख्य कारणं असू शकतात: एक, ज्या टू-व्हिलर भारतीय रस्त्यावर धावतात त्या सर्व टू-व्हिलरसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स घेणे अनिवार्य आहे. दोन, इन्शुरन्स तुमचे, तुमचे वाहन आणि अपघात किंवा दुर्घटनेत सामील असलेल्या थर्ड पार्टीचे संरक्षण करतो आणि खर्च वाचवतो.
प्रत्येकी टू-व्हिलरसाठी किमान थर्ड पार्टी इन्शुरन्स आवश्यक असला तरी, त्याऐवजी कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हिलर इन्शुरन्स प्लॅन निवडण्याची नेहमीच शिफारस केली जाते. कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्ती इत्यादींपासून तुमच्या वाहनाच्या व स्वतःच्या संरक्षणात कामी येते. त्याशिवाय, थर्ड पार्टीला दुखापत किंवा त्यांच्या मालमत्तेचे नुकसान देखील कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसीचा एक भाग म्हणून कव्हर केले जाते. थर्ड-पार्टी इन्शुरन्स आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा स्टँडर्ड इन्शुरन्स या दोन्हींची तपशीलवार तुलना करण्यासाठी खालील तक्ता तपासून पाहा आणि हुशारीने निवड करा.
भारतात बाइक विमा योजना
थर्ड पार्टी
कॉम्प्रिहेन्सिव्ह
स्वत:च्या टू-व्हिलरचे अपघातामुळे नुकसान/हानी |
×
|
✔
|
स्वत:च्या टू-व्हिलरचे आग लागल्यास नुकसान/हानी |
×
|
✔
|
स्वत:च्या टू-व्हिलरचे नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी होणारे नुकसान/हानी |
×
|
✔
|
थर्ड-पार्टीच्या वाहनाचे नुकसान |
✔
|
✔
|
थर्ड-पार्टीच्या मालमत्तेचे नुकसान |
✔
|
✔
|
पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर |
✔
|
✔
|
थर्ड-पार्टीच्या व्यक्तीला दुखापत/मृत्यू |
✔
|
✔
|
तुमच्या स्कूटर किंवा बाईकची चोरी |
×
|
✔
|
तुमचा आयडीव्ही ( IDV) कस्टमाइझ करा |
×
|
✔
|
कस्टमाइझ्ड ॲड-ऑनसह जास्त संरक्षण |
×
|
✔
|
डिजिट आज बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात सुस्पष्ट, संतुलित कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हिलर इन्शुरन्स पॉलिसी ऑफर करते. डिजिटसह कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स लहानसहान क्लेम्समध्येही, कोणतेही खर्च न लपवता पारदर्शक इन्शुरन्स प्रक्रिया यंत्रणा ऑफर करतो.
तुम्ही एक जबाबदार चालक असू शकता, परंतु तुमच्या बाईकचा रस्त्यावर अपघात होणार नाही याची खात्री तुम्ही कधीही देऊ शकत नाही. सावधपणे गाडी चालवतानासुद्धा कोणतीही पूर्वसूचना न देता कधीही अपघात होऊ शकतो. अपघाताशिवाय चोरी किंवा नैसर्गिक आपत्ती यांसारख्या घटनाही केव्हाही घडू शकतात. या प्रकारांना तुम्ही जबाबदार असाल की नाही हे महत्त्वाचे नाही पण अशा घटनांमुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसान होणार हे निश्चित. परंतु जर तुमच्याकडे कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हिलर इन्शुरन्स असेल, तर ते तुमचे आर्थिक नुकसान तसेच संभाव्य लायॅबलिटी या दोन्हीपासून संरक्षण करेल.
शिवाय, मोटार वाहन कायदा, 1998 नुसार भारतात टू-व्हिलर इन्शुरन्स अनिवार्य झाला आहे आणि टू-व्हिलर खरेदी करणार्याला बाईक खरेदीच्या वेळी बाईक इन्शुरन्स काढावा लागतो.
डिजिटच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हिलर इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते ?
डिजिट टू-व्हिलर इन्शुरन्स पॉलिसी खालील जोखीम कव्हर करते:
नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान - भूकंप, वादळ, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्ती आपल्या जीवनात कधीही येऊ शकतात आणि आपल्या जीवनाचे आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान करू शकतात. टू-व्हिलर इन्शुरन्स पॉलिसी नैसर्गिक आपत्तींमुळे होणार्या सर्व नुकसानीच्या वेळी आर्थिक नुकसानापासून तुमचे संरक्षण करतात.
मानवनिर्मित आपत्तींमुळे होणारे नुकसान - नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त तुमच्या टू-व्हिलरला मानवनिर्मित नैसर्गिक आपत्ती जसे की दरोडा, चोरी, दंगल किंवा अशा कोणत्याही दुर्दैवी घटनांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.डिजिटच्या टू-व्हिलर इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला अशा मानवनिर्मित आपत्तींमुळे होणाऱ्या सर्व नुकसानीपासून आर्थिक नुकसानीपासून पूर्ण संरक्षण देईल.
अपघातामुळे आलेले पूर्ण किंवा आंशिक अपंगत्व - अपघात हे जीवनातील सर्वात मोठे दुर्दैव आहे जे कोणत्याही वेळी कोणत्याही धोक्याच्या सूचनेशिवाय घडू शकते. जेव्हा एखाद्या रायडरला अपघात होतो तेव्हा त्याला आंशिक किंवा पूर्ण अपंगत्व येऊ शकते. आंशिक अपंगत्वाची उदाहरणे म्हणजे तात्पुरती हालचाल कमी होणे, शरीराच्या काही भागाची असमर्थता इ. तर पूर्ण दृष्टी कमी होणे, चालण्यात पूर्ण अपयश इ. पूर्ण अपंगत्वाची काही उदाहरणे आहेत. टू-व्हिलरचा इन्शुरन्स या सर्व दुर्दैवी घटनांना कव्हर करतो आणि तुम्हाला उपचाराचा खर्च देतो.
पॉलिसीधारकाचा मृत्यू - मोठ्या अपघातामुळे पॉलिसीधारकाचा किंवा अपघाताच्या वेळी टू-व्हिलर चालवणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. अशा परिस्थितीत,पॉलिसीधारकाने पीए कव्हरची निवड केली असल्यास बाईक इन्शुरन्स कंपनी पॉलिसीधारकाच्या वारसदारांना भरपाई देते.
या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या डिजिटच्या टू-व्हिलर इन्शुरन्स पॉलिसीमध्ये समाविष्ट आहेत. हे खरे आहे की भारतीय रस्त्यांवर अनेकदा वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नाही आणि त्यामुळे टू-व्हिलर चालवताना एखाद्याला जास्त धोका पत्करावा लागू शकतो. किंबहुना, रस्त्यावर कार चालवण्यापेक्षा टू-व्हिलर चालवणे धोकादायक मानले जाते. याचे कारण असे की तुम्ही बाईक चालवत असताना, कार चालवणार्या व्यक्तीपेक्षा तुम्हाला जास्त धोका असतो. कारण तो कारच्या आत बसलेला असतो. डिजिटने ऑफर केलेला कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हिलर इन्शुरन्सद्वारे, तुम्हाला स्वत:ला झालेली शारीरिक इजा, वाहनाचे एकूण किंवा आंशिक नुकसान, संपूर्ण किंवा आंशिक अपंगत्व तसेच थर्ड पार्टीच्या लायॅबलिटीसाठी मोठ्या प्रमाणात जोखीम कव्हरेज प्रदान केले जाते.
कायदेशीर अनुपालन, जोखीम घटक आणि खर्चात बचत - या प्रश्नाचे पुरेसे उत्तर देण्यासाठी ही पुरेशी कारणे आहेत - भारतात बाईक इन्शुरन्स अनिवार्य का आहे. बाईक इन्शुरन्सचे महत्त्व समजल्यानंतर, तुम्ही कशाची वाट पाहत आहात? तुम्हाला अजूनही तुमच्या टू-व्हिलरसाठी इन्शुरन्स कव्हर मिळाले नसेल, तर लगेच तुमच्या वाहनासाठी इन्शुरन्स घ्या!