ट्रक इन्शुरन्स

तुमच्या ट्रकसाठी कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स

Third-party premium has changed from 1st June. Renew now

ट्रक इन्शुरन्स म्हणजे काय?

ट्रक इन्शुरन्स ही एक प्रकारची कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स पॉलिसी आहे जी व्यावसायिक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रकसाठी कस्टमाइझ करण्यात आली आहे. जसे की इतर ट्रक्सपैकी सामान वितरणासाठी, पिक-अपसाठी आणि माल वाहतूक करण्यासाठी वापरले जाणारे ट्रक्स. कोणत्याही व्यवसायासाठी ट्रक इन्शुरन्स महत्वाचा आहे. कारण अपघात, टक्कर, नैसर्गिक आपत्ती, आग आणि चोरीमुळे होऊ शकणाऱ्या कोणत्याही नुकसानीपासून संबंधित व्यावसायिक वाहनाला (कमर्शिअल व्हेईकल) आर्थिकदृष्ट्या संरक्षण देते.

मी कमर्शिअल ट्रक इन्शुरन्स का विकत घ्यावा?

  • जर तुम्ही व्यवसाय करत असाल, तर तुमच्या कामाचा एक भाग म्हणून तुमच्याकडे किमान एक किंवा अधिक ट्रक असण्याची शक्यता आहे. हा ट्रक तुमच्या कंपनीच्या मालमत्तेचा एक भाग आहे हे लक्षात घेता, त्याचे संरक्षण केले पाहिजे. त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या व्यवसायाला अनपेक्षित आणि दुर्दैवी परिस्थितीच्या बाबतीत अचानक उद्भवलेल्या नुकसानीचा सामना करावा लागत नाही.
  • ट्रक इन्शुरन्स असणे म्हणजे तुमच्या ट्रकमुळे आणि त्याद्वारे होणाऱ्या कोणत्याही आर्थिक नुकसानीच्या बाबतीत तुमचा व्यवसाय कव्हर केला जाईल. याचा अर्थ असा आहे की तुमचे कोणतेही संभाव्य डाऊनटाइम टाळेल, नफ्याचे प्रमाण वाढवू शकाल आणि तुमच्या व्यवसायावर पैसे खर्च करू शकाल.
  • कायद्यातील तरतुदीनुसार, किमान लायॅबिलिटी पॉलिसी असणे बंधनकारक आहे. जी तुमच्या ट्रकमुळे होऊ शकणाऱ्या कोणत्याही नुकसानीपासून आणि हानीपासून थर्ड- पार्टीला संरक्षण देते. तथापि, ट्रक्सना भेडसावू शकणारे धोके पाहता, तुमच्या ट्रकचे आणि मालक-ड्रायव्हरचे संरक्षण करण्यासाठी  स्टँडर्ड पॅकेज पॉलिसी असणे नेहमीच चांगले आहे.

डिजिटचाच कमर्शिअल ट्रक इन्शुरन्स का निवडावा ?

कमर्शिअल ट्रक इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते ?

काय कव्हर्ड नाही?

तुमच्या कमर्शिअल  ट्रक इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय समाविष्ट नाही हे जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. जेणेकरून तुम्ही क्लेम करताना तुम्हाला अचानक आश्चर्याचा धक्का बसणार नाही. अशा काही परिस्थितींविषयीची माहिती इथे दिली आहे:

थर्ड पार्टी पॉलिसी धारकाचे स्वतःचे नुकसान

थर्ड पार्टी लायॅबिलिटी ओन्ली पॉलिसीच्या बाबतीत, स्वत:च्या वाहनाचे नुकसान कव्हर केले जाणार नाही.

मद्यधुंद ड्रायव्हिंग किंवा विना लायसन्स चालवणे

जर ट्रकसाठी क्लेम केलेला मालक-चालक मद्यधुंद असेल किंवा वैध परवान्याशिवाय गाडी चालवत असेल.

निष्काळजीपणे केलेली वर्तणूक

मालक-ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे होणारे कोणतेही नुकसान (जसे की पूर आलेला असताना वाहन चालवणे)

कॉन्सिक्वेनशुअल नुकसान

अपघाताचा थेट परिणाम नसलेले कोणतेही नुकसान (उदा. अपघातानंतर, खराब झालेल्या ट्रकचा चुकीचा वापर केला जात असेल आणि इंजिन खराब झाले तर ते कव्हर केले  जाणार नाही)

डिजिटच्या कमर्शिअल ट्रक इन्शुरन्सची मुख्य वैशिष्ट्ये

मुख्य वैशिष्ट्ये डिजिट बेनिफिट
क्लेम प्रक्रिया पेपरलेस क्लेम्स
कस्टमर सपोर्ट 24x7 सपोर्ट
अतिरिक्त कव्हरेज पी.ए कव्हर्स, लिगल लायॅबिलिटी कव्हर, स्पेशल एक्स्क्लूजन्स आणि कम्प्लसरी डिडक्टिबल्स इ.
थर्ड-पार्टीचे नुकसान वैयक्तिक नुकसानीसाठी अमर्याद लायॅबलिटी, मालमत्ता/ वाहन नुकसानीसाठी 7.5 लाखांपर्यंत

कमर्शिअल ट्रक इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार11

तुमच्या ट्रकचा प्रकार आणि गरजांच्या आधारे आम्ही प्रामुख्याने दोन पॉलिसी ऑफर करतो. तथापि, गुड्स कॅरिंग व्हेईकल्सला असेलेला धोका आणि वापर लक्षात घेता,तुमच्या स्वत:च्या ट्रकचे आर्थिक संरक्षण करेल अशी स्टँडर्ड पॅकेज पॉलिसी घेण्याची शिफारस केली जाते आणि यात ट्रक चालवत असलेल्या ड्रायव्हरलाही कव्हर केले जाईल.

लायॅबिलिटी ओन्ली स्टँडर्ड पॅकेज

तुमच्या ट्रकमुळे कोणत्याही थर्ड-पार्टी व्यक्तीचे किंवा मालमत्तेचे नुकसान

×

तुमच्या इन्शुरन्स असलेल्या ट्रकने व्हेइकल ओढल्‍याने कोणत्याही थर्ड-पार्टी व्यक्तीचे किंवा मालमत्तेचे नुकसान.

×

नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी किंवा अपघातांमुळे स्वत:च्या ट्रकचे नुकसान किंवा हानी.

×

ट्रक मालक-चालकाला दुखापत/मृत्यू

If the owner-driver doesn’t already have a Personal Accident Cover from before

×
Get Quote Get Quote

क्लेम कसा करावा?

आम्हाला 1800-258-5956 वर कॉल करा किंवा hello@godigit.com वर ईमेल करा.

पॉलिसी नंबर, अपघाताचे ठिकाण, अपघाताची तारीख आणि वेळ आणि आमची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विमाधारक/कॉलरचा संपर्क क्रमांक अशी तुमची माहिती जवळ ठेवा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने निकाली काढले जातात? तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना हा प्रश्न तुमच्या मनात सगळ्यात आधी आला पाहिजे. तुम्ही तसं करत आहात ही चांगली गोष्ट आहे. डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

आमचे ग्राहक आमच्याविषयी काय सांगतात

प्रज्वल जी.एस.
★★★★★

मोहम्मद रिझवान यांनी मला खूप चांगले मार्गदर्शन केले आहे आणि माझ्या व्हेईकल इन्शुरन्सच्या रिन्युअलच्या सर्व माहितीचा पाठपुरावा केला आहे... त्यांच्या समर्पित कार्याचे कौतुक आहे आणि  मला खात्री आहे की ग्राहकाला शिक्षित करणे सोपे काम नाही आणि त्याला डिजिटकडून खरोखर चांगली शाब्बासकी मिळावी ..पुन्हा एकदा सांगतो  मोहम्मद रिझवान खूप चांगला व्यक्ती आहे . :)

अजय मिश्रा
★★★★★

ही इन्शुरन्स कंपनी बाजारात नवीन आहे. मात्र मी आपल्याला खात्री देतो की लवकरच मोटार इन्शुरन्स क्षेत्रामध्ये हा एक मोठा ब्रँड होणार आहेत. माझे वाहन 25 नोव्हेंबर रोजी चोरीला गेले. मी तक्रार नोंदविली आणि मी आपल्याला सांगतो की Go Digit चा प्रतिसाद विस्मयकारक होता. त्यांनी माझी वेदना समजून घेतली आणि मला जास्त त्रास न देता काही दिवसांत हा प्रश्न सोडविला. मी श्री. सिवरिन मंडळचे (प्रामाणिक कर्मचाऱ्यांपैकी एक) आभार मानतो ज्यांनी मला क्लेम मिळविण्यात मदत केली. मला अभिमान वाटतो की मी Go Digitचा मोटार इन्शुरन्स घेतला आणि माझा क्लेम निकाली काढण्यासाठी श्री. सिवरिन भेटले त्यामुळे मी भाग्यवान आहे. Go Digit आणि श्री. सोवरिन यांचे आभार.

सिद्धार्थ मूर्ती
★★★★★

Go-Digit मधून माझा फोर्थ व्हेईकल इन्शुरन्स खरेदी करण्याचा हा एक चांगला अनुभव होता. सु.श्री पूनम देवी यांनी पॉलिसीची माहिती चांगल्या प्रकारे सांगितली. तसेच त्यांना ग्राहकांच्या गरजेबद्दल माहित होते आणि त्यांनी माझ्या गरजेनुसार कोट दिले. याशिवाय ऑनलाइन पेमेंट करणे अजिबात त्रासदायक नव्हते. हे लवकरात लवकर पूर्ण केल्याबद्दल पूनमचे विशेष आभार. आशा आहे की कस्टमर रिलेशनशिप टीम दिवसेंदिवस अधिक चांगली होईल!! चिअर्स.

Show all Reviews

भारतातील कमर्शिअल ट्रक इन्शुरन्सबद्दल अधिक माहिती जाणून घ्या

मला माझ्या व्यवसायासाठी कमर्शिअल ट्रक इन्शुरन्स विकत घ्यावा लागेल का?

होय, मोटार वाहन कायद्यानुसार,सर्व वाहनांना किमान लायॅबिलिटी ओन्ली पॉलिसी खरेदी करणे अनिवार्य आहे, जी तुमच्या ट्रकमुळे थर्ड-पार्टी वाहन, मालमत्ता किंवा व्यक्तीचे नुकसान आणि हानी झाल्यास आर्थिक नुकसानीसाठी संरक्षण करेल आणि खर्च कव्हर करेल. मूलभूत ट्रक इन्शुरन्स घेतला नसताना, तुमचा कोणताही ट्रक भारतात फिरण्यासाठी कायदेशीररित्या पात्र ठरणार नाही. तथापि, ट्रकचा प्रचंड आकार आणि वारंवार होणारा वापर यामुळे, आम्ही ट्रक मालकांना स्टँडर्ड पॅकेज पॉलिसी घेण्याचा सल्ला देतो, जे केवळ थर्ड-पार्टी नुकसानीचे संरक्षण करणार नाही तर एखाद्याच्या ट्रक आणि मालक-ड्रायव्हरला झालेल्या नुकसानीचे संरक्षण करेल.

होय, मोटार वाहन कायद्यानुसार,सर्व वाहनांना किमान लायॅबिलिटी ओन्ली पॉलिसी खरेदी करणे अनिवार्य आहे, जी तुमच्या ट्रकमुळे थर्ड-पार्टी वाहन, मालमत्ता किंवा व्यक्तीचे नुकसान आणि हानी झाल्यास आर्थिक नुकसानीसाठी संरक्षण करेल आणि खर्च कव्हर करेल. मूलभूत ट्रक इन्शुरन्स घेतला नसताना, तुमचा कोणताही ट्रक भारतात फिरण्यासाठी कायदेशीररित्या पात्र ठरणार नाही.

तथापि, ट्रकचा प्रचंड आकार आणि वारंवार होणारा वापर यामुळे, आम्ही ट्रक मालकांना स्टँडर्ड पॅकेज पॉलिसी घेण्याचा सल्ला देतो, जे केवळ थर्ड-पार्टी नुकसानीचे संरक्षण करणार नाही तर एखाद्याच्या ट्रक आणि मालक-ड्रायव्हरला झालेल्या नुकसानीचे संरक्षण करेल.

ट्रक इन्शुरन्स खरेदी/नुतनीकरण करणे का महत्वाचे आहे?

कोणत्याही किरकोळ किंवा मोठ्या अपघातामुळे, धडकेमुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होऊ शकणाऱ्या कोणत्याही नुकसानीपासून आपल्या व्यवसायाचे संरक्षण करणे. लिगल लायॅबलिटीजपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ; भारतातील प्रत्येक कारमध्ये किमान त्यांच्या व्यावसायिक कारसाठी थर्ड पार्टी पॉलिसी असणे आवश्यक आहे. तुमच्या प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी. तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स घेतल्यास प्रवासी कव्हर निवडण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. यामुळे फक्त तुमच्या प्रवाशांचे संरक्षण होणार नाही, तर तुम्हाला विश्वासार्ह व्यवसाय आणि/किंवा ड्रायव्हर म्हणून अधिक विश्वासार्हता मिळेल.

  • कोणत्याही किरकोळ किंवा मोठ्या अपघातामुळे, धडकेमुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होऊ शकणाऱ्या कोणत्याही नुकसानीपासून आपल्या व्यवसायाचे संरक्षण करणे.
  • लिगल लायॅबलिटीजपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ; भारतातील प्रत्येक कारमध्ये किमान त्यांच्या व्यावसायिक कारसाठी थर्ड पार्टी पॉलिसी असणे आवश्यक आहे.
  • तुमच्या प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी. तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स घेतल्यास प्रवासी कव्हर निवडण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. यामुळे फक्त तुमच्या प्रवाशांचे संरक्षण होणार नाही, तर तुम्हाला विश्वासार्ह व्यवसाय आणि/किंवा ड्रायव्हर म्हणून अधिक विश्वासार्हता मिळेल.

माझ्या व्यवसायासाठी सर्वोत्तम ट्रक इन्शुरन्स कसा निवडावा?

आज उपलब्ध पर्यायांची संख्या पाहता, सोपा, वाजवी, संरक्षण देणारा आणि सर्व संभाव्य परिस्थितीत तुमचा व्यवसाय कव्हर करणारा इन्शुरन्स निवडणे महत्वाचे आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लवकरात लवकर क्लेम निकाली काढण्याची हमी देणारा इन्शुरन्स निवडणे महत्वाचे आहे. शेवटी, हा इन्शुरन्सचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे! येथे काही टिप्स आहेत ज्या तुम्हाला तुमच्या ट्रकसाठी योग्य इन्शुरन्स निवड करण्यासाठी उपयोगी ठरतील: योग्य इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू (आयडीव्ही) (IDV): आयडीव्ही ही उत्पादकाची सूचीबद्ध विक्री किंमत आहे ज्याचा तुम्हाला विमा उतरवायचा आहे. तुमचा प्रीमियम यावर अवलंबून असेल. ऑनलाइन योग्य ट्रक इन्शुरन्स शोधत असताना, तुमचा आयडीव्ही बरोबर सांगितला आहे याची खात्री करा. सर्व्हिस बेनिफिट्स: 24x7 कस्टमर सपोर्ट आणि कॅशलेस गॅरेजेसचे विस्तृत नेटवर्क यांसारख्या सेवांचा विचार करा. गरजेच्या वेळी या सेवा महत्त्वाच्या असतात. रीव्ह्यू ॲड-ऑन्स: तुमच्या ट्रकसाठी योग्य कमर्शिअल इन्शुरन्स निवडताना, जास्तीत जास्त फायदे सुनिश्चित करण्यासाठी उपलब्ध असलेल्या ॲड-ऑनचा विचार करा. क्लेम स्पीड: कोणत्याही इन्शुरन्सचा हा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. तुम्हाला माहित असलेली क्लेम लवकर निकाली काढणारी इन्शुरन्स कंपनी निवडा. सर्वोत्तम मूल्य: योग्य प्रीमियमपासून आणि सेवांनंतर सेटलमेंटचा क्लेम करण्यासाठी आणि जोडण्यासाठी;एक मोटार इन्शुरन्स निवडा जो तुम्हाला आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीला शक्य तितक्या चांगल्या मूल्यावर सोयीस्करपणे कव्हर करतो.

आज उपलब्ध पर्यायांची संख्या पाहता, सोपा, वाजवी, संरक्षण देणारा आणि सर्व संभाव्य परिस्थितीत तुमचा व्यवसाय कव्हर करणारा इन्शुरन्स निवडणे महत्वाचे आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लवकरात लवकर क्लेम निकाली काढण्याची हमी देणारा इन्शुरन्स निवडणे महत्वाचे आहे. शेवटी, हा इन्शुरन्सचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे!

येथे काही टिप्स आहेत ज्या तुम्हाला तुमच्या ट्रकसाठी योग्य इन्शुरन्स निवड करण्यासाठी उपयोगी ठरतील:

  • योग्य इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू (आयडीव्ही) (IDV): आयडीव्ही ही उत्पादकाची सूचीबद्ध विक्री किंमत आहे ज्याचा तुम्हाला विमा उतरवायचा आहे. तुमचा प्रीमियम यावर अवलंबून असेल. ऑनलाइन योग्य ट्रक इन्शुरन्स शोधत असताना, तुमचा आयडीव्ही बरोबर सांगितला आहे याची खात्री करा.
  • सर्व्हिस बेनिफिट्स: 24x7 कस्टमर सपोर्ट आणि कॅशलेस गॅरेजेसचे विस्तृत नेटवर्क यांसारख्या सेवांचा विचार करा. गरजेच्या वेळी या सेवा महत्त्वाच्या असतात.
  • रीव्ह्यू ॲड-ऑन्स: तुमच्या ट्रकसाठी योग्य कमर्शिअल इन्शुरन्स निवडताना, जास्तीत जास्त फायदे सुनिश्चित करण्यासाठी उपलब्ध असलेल्या ॲड-ऑनचा विचार करा.
  • क्लेम स्पीड: कोणत्याही इन्शुरन्सचा हा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. तुम्हाला माहित असलेली क्लेम लवकर निकाली काढणारी इन्शुरन्स कंपनी निवडा.
  • सर्वोत्तम मूल्य: योग्य प्रीमियमपासून आणि सेवांनंतर सेटलमेंटचा क्लेम करण्यासाठी आणि जोडण्यासाठी;एक मोटार इन्शुरन्स निवडा जो तुम्हाला आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीला शक्य तितक्या चांगल्या मूल्यावर सोयीस्करपणे कव्हर करतो.

कमर्शिअल ट्रक इन्शुरन्सच्या किमतीची ऑनलाइन तुलना कशी करावी?

उपलब्ध असलेल्या इन्शुरन्सपैकी सर्वात स्वस्त ट्रक इन्शुरन्स निवडणे मोहक असू शकते. तथापि, कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स किमतीची तुलना करताना,सर्व्हिस बेनिफिट्स आणि क्लेम सेटलमेंट कालावधीचा यासारख्या घटकांचा विचार करा. तुमच्या व्हेईकलच्या प्रकारानुसार, व्यावसायिक कारणांसाठी वापरले जाणारे ट्रक बऱ्याच जोखमीस बळी पडतात. म्हणूनच, तुमचे वाहन आणि व्यवसाय सर्व अडचणींपासून सुरक्षित आहेत याची खात्री करण्यासाठी महत्त्वपूर्ण घटकांचा विचार करणे महत्वाचे आहे: सर्व्हिस बेनिफिट्स: अडचणीच्या वेळी उत्तम सेवा खरोखरच महत्त्वाच्या असतात. प्रत्येक इन्शुरन्स कंपनी देत असलेल्या सेवांचे मूल्यांकन करण्याची खात्री करा आणि त्यानुसार आपली योग्य निवड करा. इतर सेवांसह डिजिट ऑफर करत असलेल्या सेवा म्हणजे 24*7 कस्टमर केअर सपोर्ट आणि 1000+ गॅरेजेसमध्ये कॅशलेस क्लेम्स अशा आहेत. जलद क्लेम सेटलमेंट: इन्शुरन्सचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे क्लेम निकाली काढणे! तर, तुम्ही त्वरित क्लेम सेटलमेंटची हमी देणारी इन्शुरन्स कंपनी निवडली आहे याची खात्री करा. डिजिटचे 90.4% क्लेम्स 30 दिवसांच्या आत निकाली काढले जातात ! शिवाय, आमच्याकडे झिरो-हार्ड कॉपी धोरण आहे, याचा अर्थ आम्ही फक्त सॉफ्ट कॉपी मागतो. सर्व काही पेपरलेस, जलद आणि त्रासरहित आहे! तुमचे आयडीव्ही(IDV) तपासा: ऑनलाइन बऱ्याच इन्शुरन्सच्या किमतीमध्ये कमी आयडीव्ही (इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू), म्हणजे उत्पादकाची सूचीबद्ध विक्री किंमत असेल. आयडीव्हीचा आपल्या प्रीमियमवर परिणाम होत असला, तरी सेटलमेंटच्या वेळी तुम्हाला तुमचा योग्य क्लेम मिळेल याची ही खात्री आहे. चोरी किंवा नुकसानीदरम्यान आपल्याला नको असलेली गोष्ट म्हणजे आपला आयडीव्ही कमी आहे/ चुकीच्या मूल्यावर आहे हे समजणे ! डिजिट मध्ये, आम्ही तुम्हाला तुमची ट्रक इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी करताना तुमचे आयडीव्ही सेट करण्याचा पर्याय देतो. सर्वोत्तम मूल्य: शेवटी, असा ट्रक इन्शुरन्स निवडा जो तुम्हाला या सर्वांचे योग्य कॉम्बिनेशन देतो. योग्य किंमत, सेवा आणि अर्थातच त्वरित क्लेम्स!

उपलब्ध असलेल्या इन्शुरन्सपैकी सर्वात स्वस्त ट्रक इन्शुरन्स निवडणे मोहक असू शकते. तथापि, कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स किमतीची तुलना करताना,सर्व्हिस बेनिफिट्स आणि क्लेम सेटलमेंट कालावधीचा यासारख्या घटकांचा विचार करा. तुमच्या व्हेईकलच्या प्रकारानुसार, व्यावसायिक कारणांसाठी वापरले जाणारे ट्रक बऱ्याच जोखमीस बळी पडतात.

म्हणूनच, तुमचे वाहन आणि व्यवसाय सर्व अडचणींपासून सुरक्षित आहेत याची खात्री करण्यासाठी महत्त्वपूर्ण घटकांचा विचार करणे महत्वाचे आहे:

  • सर्व्हिस बेनिफिट्स: अडचणीच्या वेळी उत्तम सेवा खरोखरच महत्त्वाच्या असतात. प्रत्येक इन्शुरन्स कंपनी देत असलेल्या सेवांचे मूल्यांकन करण्याची खात्री करा आणि त्यानुसार आपली योग्य निवड करा. इतर सेवांसह डिजिट ऑफर करत असलेल्या सेवा म्हणजे 24*7 कस्टमर केअर सपोर्ट आणि 1000+ गॅरेजेसमध्ये कॅशलेस क्लेम्स अशा आहेत.
  • जलद क्लेम सेटलमेंट: इन्शुरन्सचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे क्लेम निकाली काढणे! तर, तुम्ही त्वरित क्लेम सेटलमेंटची हमी देणारी इन्शुरन्स कंपनी निवडली आहे याची खात्री करा. डिजिटचे 90.4% क्लेम्स 30 दिवसांच्या आत निकाली काढले जातात ! शिवाय, आमच्याकडे झिरो-हार्ड कॉपी धोरण आहे, याचा अर्थ आम्ही फक्त सॉफ्ट कॉपी मागतो. सर्व काही पेपरलेस, जलद आणि त्रासरहित आहे!
  • तुमचे आयडीव्ही(IDV) तपासा: ऑनलाइन बऱ्याच इन्शुरन्सच्या किमतीमध्ये कमी आयडीव्ही (इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू), म्हणजे उत्पादकाची सूचीबद्ध विक्री किंमत असेल. आयडीव्हीचा आपल्या प्रीमियमवर परिणाम होत असला, तरी सेटलमेंटच्या वेळी तुम्हाला तुमचा योग्य क्लेम मिळेल याची ही खात्री आहे. चोरी किंवा नुकसानीदरम्यान आपल्याला नको असलेली गोष्ट म्हणजे आपला आयडीव्ही कमी आहे/ चुकीच्या मूल्यावर आहे हे समजणे ! डिजिट मध्ये, आम्ही तुम्हाला तुमची ट्रक इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी करताना तुमचे आयडीव्ही सेट करण्याचा पर्याय देतो.
  • सर्वोत्तम मूल्य: शेवटी, असा ट्रक इन्शुरन्स निवडा जो तुम्हाला या सर्वांचे योग्य कॉम्बिनेशन देतो. योग्य किंमत, सेवा आणि अर्थातच त्वरित क्लेम्स!

माझ्या ट्रक इन्शुरन्स प्रीमियमवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत?

मॉडेल, इंजिन आणि ट्रकची उत्पादक कंपनी: जेव्हा कोणत्याही प्रकारच्या मोटार इन्शुरन्सचा विचार केला जातो, तेव्हा योग्य विमा हप्ता निश्चित करण्यासाठी मॉडेल, मेक आणि इंजिनची मोठी भूमिका असते! त्याचप्रमाणे ट्रकच्या तुमच्या मेक, मॉडेल आणि मॅन्युफॅक्चरिंग इयरचाही तुमच्या ट्रक इन्शुरन्स प्रीमियमवर परिणाम होईल. ट्रकचा प्रकार आणि उद्देश: विविध प्रकारचे ट्रक व्यवसाय वेगवेगळ्या  उद्देशाने वापरतात. ट्रकचा प्रकार आणि त्याचा उद्देश यानुसार आपला ट्रक इन्शुरन्स प्रीमियम वेगवेगळ्या स्केलवर असू शकतो. उदाहरणार्थ, ट्रक घेऊन जाणाऱ्या वस्तूंचा इन्शुरन्स हप्ता छोट्या पिक-अप ट्रकपेक्षा जास्त असेल. याचे कारण असे आहे की, ट्रक घेऊन जाणारा माल आकाराने मोठा असेल आणि तो वाहून नेणाऱ्या वस्तूंच्या मूल्यावरही जबाबदार असेल. ठिकाण: तुमच्या ट्रकच्या ठिकाणाची तुमच्या ट्रकचा इन्शुरन्स हप्ता ठरविण्यात निश्चितच मोठी भूमिका असेल. तुमच्या ट्रकची नोंदणी केलेली आहे आणि महानगरीय भाग, डोंगराळ भाग किंवा छोट्या शहरात  ट्रक चालवला जात असला तरी या सर्व घटकांचा विचार तुमचा ट्रक इन्शुरन्स हप्ता ठरविण्यात केला जाईल. नो-क्लेम बोनस  (NCB): जर तुमच्याकडे यापूर्वीही ट्रक इन्शुरन्स असेल आणि सध्या तुम्ही तुमच्या पॉलिसीचे नुतनीकरण करू इच्छित असाल किंवा नवीन इन्शुरन्स कंपनी मिळवू इच्छित असाल- तर या बाबतीत तुमच्या एनसीबीचा (नो क्लेम बोनस)ही विचार केला जाईल आणि तुमचा प्रीमियम सवलतीच्या दरात असेल! नो-क्लेम बोनस म्हणजे इन्शुरन्स असलेल्या व्यक्तीने आधीच्या पॉलिसी टर्ममध्ये एकही क्लेम केलेला नाही. ट्रक इन्शुरन्स पॉलिसींचा प्रकार: सर्व कमर्शिअल वाहनांसाठी प्रामुख्याने दोन प्रकारचे इन्शुरन्स उपलब्ध आहेत. त्यामुळे आपला ट्रक इन्शुरन्स प्रीमियम आपण निवडलेल्या प्लॅनवर अवलंबून असेल. सक्तीची, लायॅबिलिटी प्लॅन केवळ कमी प्रीमियमसह येते - त्यात  केवळ थर्ड-पार्टी नुकसान किंवा मालक-चालकाच्या थर्ड-पार्टी आणि वैयक्तिक अपघातामुळे होणारे नुकसान समाविष्ट आहे; तर स्टँडर्ड पॅकेज पॉलिसी प्रीमियममध्ये जास्त असू शकते परंतु,  तुमच्या स्वत:च्या ट्रक आणि त्याच्या ड्रायव्हरचे नुकसान आणि हानीदेखील समाविष्ट असेल.

मॉडेल, इंजिन आणि ट्रकची उत्पादक कंपनी: जेव्हा कोणत्याही प्रकारच्या मोटार इन्शुरन्सचा विचार केला जातो, तेव्हा योग्य विमा हप्ता निश्चित करण्यासाठी मॉडेल, मेक आणि इंजिनची मोठी भूमिका असते! त्याचप्रमाणे ट्रकच्या तुमच्या मेक, मॉडेल आणि मॅन्युफॅक्चरिंग इयरचाही तुमच्या ट्रक इन्शुरन्स प्रीमियमवर परिणाम होईल.

ट्रकचा प्रकार आणि उद्देश: विविध प्रकारचे ट्रक व्यवसाय वेगवेगळ्या  उद्देशाने वापरतात. ट्रकचा प्रकार आणि त्याचा उद्देश यानुसार आपला ट्रक इन्शुरन्स प्रीमियम वेगवेगळ्या स्केलवर असू शकतो. उदाहरणार्थ, ट्रक घेऊन जाणाऱ्या वस्तूंचा इन्शुरन्स हप्ता छोट्या पिक-अप ट्रकपेक्षा जास्त असेल. याचे कारण असे आहे की, ट्रक घेऊन जाणारा माल आकाराने मोठा असेल आणि तो वाहून नेणाऱ्या वस्तूंच्या मूल्यावरही जबाबदार असेल.

ठिकाण: तुमच्या ट्रकच्या ठिकाणाची तुमच्या ट्रकचा इन्शुरन्स हप्ता ठरविण्यात निश्चितच मोठी भूमिका असेल. तुमच्या ट्रकची नोंदणी केलेली आहे आणि महानगरीय भाग, डोंगराळ भाग किंवा छोट्या शहरात  ट्रक चालवला जात असला तरी या सर्व घटकांचा विचार तुमचा ट्रक इन्शुरन्स हप्ता ठरविण्यात केला जाईल.

नो-क्लेम बोनस  (NCB): जर तुमच्याकडे यापूर्वीही ट्रक इन्शुरन्स असेल आणि सध्या तुम्ही तुमच्या पॉलिसीचे नुतनीकरण करू इच्छित असाल किंवा नवीन इन्शुरन्स कंपनी मिळवू इच्छित असाल- तर या बाबतीत तुमच्या एनसीबीचा (नो क्लेम बोनस)ही विचार केला जाईल आणि तुमचा प्रीमियम सवलतीच्या दरात असेल! नो-क्लेम बोनस म्हणजे इन्शुरन्स असलेल्या व्यक्तीने आधीच्या पॉलिसी टर्ममध्ये एकही क्लेम केलेला नाही.

ट्रक इन्शुरन्स पॉलिसींचा प्रकार: सर्व कमर्शिअल वाहनांसाठी प्रामुख्याने दोन प्रकारचे इन्शुरन्स उपलब्ध आहेत. त्यामुळे आपला ट्रक इन्शुरन्स प्रीमियम आपण निवडलेल्या प्लॅनवर अवलंबून असेल. सक्तीची, लायॅबिलिटी प्लॅन केवळ कमी प्रीमियमसह येते - त्यात  केवळ थर्ड-पार्टी नुकसान किंवा मालक-चालकाच्या थर्ड-पार्टी आणि वैयक्तिक अपघातामुळे होणारे नुकसान समाविष्ट आहे; तर स्टँडर्ड पॅकेज पॉलिसी प्रीमियममध्ये जास्त असू शकते परंतु,  तुमच्या स्वत:च्या ट्रक आणि त्याच्या ड्रायव्हरचे नुकसान आणि हानीदेखील समाविष्ट असेल.

ट्रक इन्शुरन्समध्ये कोणत्या प्रकारच्या ट्रकचा इन्शुरन्स काढता येईल?

कमर्शिअल कारणांसाठी वापरले जाणारे सर्व ट्रक डिजिटच्या कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स अंतर्गत कव्हर केले जाऊ शकतात. या ट्रक्सचे ढोबळमानाने खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाऊ शकते: मिनी ट्रक्स: उपलब्ध ट्रक्सपैकी मिनी ट्रक्स एक प्रकार आहे. सामान्यत: व्यावसायिक, हायपरलोकल आणि स्थानिक पिकअपसाठी वापरले जाणारे हे ट्रक आहेत. जसे की प्रसिद्ध अशोक लेलँड दोस्त आपण बऱ्याचदा भारतीय रस्त्यांवर पाहिले असतील लाइट ट्रक्स: लाइट ट्रक्स हा प्रकार सर्रास एका शहरातून दुसऱ्या शहरात माल नेण्यासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ; आज बाजारात बरेच ई-कॉमर्स व्यावसायिक दररोज वाहतुकीसाठी लाइट ट्रकचा वापर करतात. मिडियम ट्रक्स: नावाप्रमाणेच मिडियम (मध्यम) ट्रक्स आपल्या नेहमीच्या पिकअप ट्रक्सपेक्षा थोडे मोठे असतात. हे ट्रक सहसा फर्निचर, कचरा गोळा करणारे इत्यादी मोठ्या गोष्टींच्या वाहतुकीसाठी वापरले जातात. ऑफ-रोड ट्रक्स: ऑफ रोड ट्रक्स हे हेवी ड्युटी ट्रक्स आहेत जे प्रामुख्याने कार टोइंग आणि बांधकामाच्या उद्देशाने वापरले जातात.

कमर्शिअल कारणांसाठी वापरले जाणारे सर्व ट्रक डिजिटच्या कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स अंतर्गत कव्हर केले जाऊ शकतात. या ट्रक्सचे ढोबळमानाने खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाऊ शकते:

  • मिनी ट्रक्स: उपलब्ध ट्रक्सपैकी मिनी ट्रक्स एक प्रकार आहे. सामान्यत: व्यावसायिक, हायपरलोकल आणि स्थानिक पिकअपसाठी वापरले जाणारे हे ट्रक आहेत. जसे की प्रसिद्ध अशोक लेलँड दोस्त आपण बऱ्याचदा भारतीय रस्त्यांवर पाहिले असतील
  • लाइट ट्रक्स: लाइट ट्रक्स हा प्रकार सर्रास एका शहरातून दुसऱ्या शहरात माल नेण्यासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ; आज बाजारात बरेच ई-कॉमर्स व्यावसायिक दररोज वाहतुकीसाठी लाइट ट्रकचा वापर करतात.
  • मिडियम ट्रक्स: नावाप्रमाणेच मिडियम (मध्यम) ट्रक्स आपल्या नेहमीच्या पिकअप ट्रक्सपेक्षा थोडे मोठे असतात. हे ट्रक सहसा फर्निचर, कचरा गोळा करणारे इत्यादी मोठ्या गोष्टींच्या वाहतुकीसाठी वापरले जातात.
  • ऑफ-रोड ट्रक्स: ऑफ रोड ट्रक्स हे हेवी ड्युटी ट्रक्स आहेत जे प्रामुख्याने कार टोइंग आणि बांधकामाच्या उद्देशाने वापरले जातात.

भारतात ऑनलाइन ट्रक इन्शुरन्स खरेदी करण्याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

ट्रकला इन्शुअर करण्यासाठी किती खर्च येतो?

हे प्रामुख्याने तुम्ही इन्शुरन्स काढू इच्छित असलेल्या ट्रकच्या प्रकारावर, तुम्ही ट्रक वापरत असलेल्या शहरावर किंवा शहरांवर आणि आपण निवडलेल्या पॉलिसीच्या प्रकारावर अवलंबून असेल.

प्रत्येक व्यावसायिक ट्रक दुसऱ्या ट्रकपेक्षा वेगळा असल्याने आम्ही शेअर केलेल्या तपशीलांनुसार तुमचा प्रीमियम कस्टमाइज करतो. तुम्हाला फक्त आम्हाला व्हॉट्सॲप करणे आवश्यक आहे आणि आम्ही तुमच्या ट्रकचा इन्शुरन्स काढण्यासाठी कस्टमाइज किमतीसह तुम्हाला मदत करू.

ट्रक इन्शुरन्समध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड-पार्टी पॉलिसी काय आहे?

एक कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रक इन्शुरन्स पॉलिसी ट्रकला स्वत:च्या अनिवार्य थर्ड-पार्टी लायॅबिलिटी तसेच अपघात, टक्कर, नैसर्गिक आपत्ती, आग, दुर्भावनापूर्ण कृत्ये इत्यादींमुळे होऊ शकणारे स्वतःचे नुकसान या दोन्हींपासून होणारे नुकसान कव्हर करते.

तर, थर्ड-पार्टी ट्रक इन्शुरन्स पॉलिसी ही एक स्वतंत्र ट्रक इन्शुरन्स पॉलिसी आहे जी केवळ थर्ड-पार्टी संबंधित  लायॅबिलिटी कव्हर करेल.

मला ट्रक इन्शुरन्सचे सर्वात कमी दर कसे मिळू शकतात ?

(70 2600 2400) या क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सॲप करा आणि आम्ही तुम्हाला तुमच्या ट्रक आणि व्यवसायासाठी सर्वात कमी कस्टमाइज दरासह मदत करू.

माझ्या कंपनीत माझ्याकडे 100 हून अधिक ट्रक्स आहेत, मी त्या सर्वांसाठी डिजिटचा कमर्शिअल ट्रक इन्शुरन्स काढू शकतो का?

नक्कीच! आपल्याला फक्त 70 2600 2400 वर आम्हाला व्हॉट्सॲप करणे आवश्यक आहे आणि आम्ही लवकरात लवकर तुमच्यासाठी कस्टमाइज प्लॅन घेऊन येऊ.

माझ्या ट्रकचा अपघात झाला तर मी काय करू?

ताबडतोब आम्हाला 1800-258-5956 वर फोन करा किंवा hello@godigit.com वर ईमेल करा.