ट्रक इन्शुरन्स
I agree to the Terms & Conditions
I agree to the Terms & Conditions
ट्रक इन्शुरन्स ही एक प्रकारची कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स पॉलिसी आहे जी व्यावसायिक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रकसाठी कस्टमाइझ करण्यात आली आहे. जसे की इतर ट्रक्सपैकी सामान वितरणासाठी, पिक-अपसाठी आणि माल वाहतूक करण्यासाठी वापरले जाणारे ट्रक्स. कोणत्याही व्यवसायासाठी ट्रक इन्शुरन्स महत्वाचा आहे. कारण अपघात, टक्कर, नैसर्गिक आपत्ती, आग आणि चोरीमुळे होऊ शकणाऱ्या कोणत्याही नुकसानीपासून संबंधित व्यावसायिक वाहनाला (कमर्शिअल व्हेईकल) आर्थिकदृष्ट्या संरक्षण देते.
आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपीसारखं वागवतो, कसं ते जाणून घ्या…
तुमच्या कमर्शिअल ट्रक इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय समाविष्ट नाही हे जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. जेणेकरून तुम्ही क्लेम करताना तुम्हाला अचानक आश्चर्याचा धक्का बसणार नाही. अशा काही परिस्थितींविषयीची माहिती इथे दिली आहे:
मुख्य वैशिष्ट्ये |
डिजिट बेनिफिट |
क्लेम प्रक्रिया |
पेपरलेस क्लेम्स |
कस्टमर सपोर्ट |
24x7 सपोर्ट |
अतिरिक्त कव्हरेज |
पी.ए कव्हर्स, लिगल लायॅबिलिटी कव्हर, स्पेशल एक्स्क्लूजन्स आणि कम्प्लसरी डिडक्टिबल्स इ. |
थर्ड-पार्टीचे नुकसान |
वैयक्तिक नुकसानीसाठी अमर्याद लायॅबलिटी, मालमत्ता/ वाहन नुकसानीसाठी 7.5 लाखांपर्यंत |
तुमच्या ट्रकचा प्रकार आणि गरजांच्या आधारे आम्ही प्रामुख्याने दोन पॉलिसी ऑफर करतो. तथापि, गुड्स कॅरिंग व्हेईकल्सला असेलेला धोका आणि वापर लक्षात घेता,तुमच्या स्वत:च्या ट्रकचे आर्थिक संरक्षण करेल अशी स्टँडर्ड पॅकेज पॉलिसी घेण्याची शिफारस केली जाते आणि यात ट्रक चालवत असलेल्या ड्रायव्हरलाही कव्हर केले जाईल.
तुमच्या ट्रकमुळे कोणत्याही थर्ड-पार्टी व्यक्तीचे किंवा मालमत्तेचे नुकसान |
✔
|
✔
|
तुमच्या इन्शुरन्स असलेल्या ट्रकने व्हेइकल ओढल्याने कोणत्याही थर्ड-पार्टी व्यक्तीचे किंवा मालमत्तेचे नुकसान. |
✔
|
✔
|
नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी किंवा अपघातांमुळे स्वत:च्या ट्रकचे नुकसान किंवा हानी. |
×
|
✔
|
ट्रक मालक-चालकाला दुखापत/मृत्यू If the owner-driver doesn’t already have a Personal Accident Cover from before |
✔
|
✔
|
आम्हाला 1800-258-5956 वर कॉल करा किंवा hello@godigit.com वर ईमेल करा.
पॉलिसी नंबर, अपघाताचे ठिकाण, अपघाताची तारीख आणि वेळ आणि आमची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विमाधारक/कॉलरचा संपर्क क्रमांक अशी तुमची माहिती जवळ ठेवा.
तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना हा प्रश्न तुमच्या मनात सगळ्यात आधी आला पाहिजे. तुम्ही तसं करत आहात ही चांगली गोष्ट आहे.
डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचाहोय, मोटार वाहन कायद्यानुसार,सर्व वाहनांना किमान लायॅबिलिटी ओन्ली पॉलिसी खरेदी करणे अनिवार्य आहे, जी तुमच्या ट्रकमुळे थर्ड-पार्टी वाहन, मालमत्ता किंवा व्यक्तीचे नुकसान आणि हानी झाल्यास आर्थिक नुकसानीसाठी संरक्षण करेल आणि खर्च कव्हर करेल. मूलभूत ट्रक इन्शुरन्स घेतला नसताना, तुमचा कोणताही ट्रक भारतात फिरण्यासाठी कायदेशीररित्या पात्र ठरणार नाही.
तथापि, ट्रकचा प्रचंड आकार आणि वारंवार होणारा वापर यामुळे, आम्ही ट्रक मालकांना स्टँडर्ड पॅकेज पॉलिसी घेण्याचा सल्ला देतो, जे केवळ थर्ड-पार्टी नुकसानीचे संरक्षण करणार नाही तर एखाद्याच्या ट्रक आणि मालक-ड्रायव्हरला झालेल्या नुकसानीचे संरक्षण करेल.
आज उपलब्ध पर्यायांची संख्या पाहता, सोपा, वाजवी, संरक्षण देणारा आणि सर्व संभाव्य परिस्थितीत तुमचा व्यवसाय कव्हर करणारा इन्शुरन्स निवडणे महत्वाचे आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लवकरात लवकर क्लेम निकाली काढण्याची हमी देणारा इन्शुरन्स निवडणे महत्वाचे आहे. शेवटी, हा इन्शुरन्सचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे!
येथे काही टिप्स आहेत ज्या तुम्हाला तुमच्या ट्रकसाठी योग्य इन्शुरन्स निवड करण्यासाठी उपयोगी ठरतील:
उपलब्ध असलेल्या इन्शुरन्सपैकी सर्वात स्वस्त ट्रक इन्शुरन्स निवडणे मोहक असू शकते. तथापि, कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स किमतीची तुलना करताना,सर्व्हिस बेनिफिट्स आणि क्लेम सेटलमेंट कालावधीचा यासारख्या घटकांचा विचार करा. तुमच्या व्हेईकलच्या प्रकारानुसार, व्यावसायिक कारणांसाठी वापरले जाणारे ट्रक बऱ्याच जोखमीस बळी पडतात.
म्हणूनच, तुमचे वाहन आणि व्यवसाय सर्व अडचणींपासून सुरक्षित आहेत याची खात्री करण्यासाठी महत्त्वपूर्ण घटकांचा विचार करणे महत्वाचे आहे:
मॉडेल, इंजिन आणि ट्रकची उत्पादक कंपनी: जेव्हा कोणत्याही प्रकारच्या मोटार इन्शुरन्सचा विचार केला जातो, तेव्हा योग्य विमा हप्ता निश्चित करण्यासाठी मॉडेल, मेक आणि इंजिनची मोठी भूमिका असते! त्याचप्रमाणे ट्रकच्या तुमच्या मेक, मॉडेल आणि मॅन्युफॅक्चरिंग इयरचाही तुमच्या ट्रक इन्शुरन्स प्रीमियमवर परिणाम होईल.
ट्रकचा प्रकार आणि उद्देश: विविध प्रकारचे ट्रक व्यवसाय वेगवेगळ्या उद्देशाने वापरतात. ट्रकचा प्रकार आणि त्याचा उद्देश यानुसार आपला ट्रक इन्शुरन्स प्रीमियम वेगवेगळ्या स्केलवर असू शकतो. उदाहरणार्थ, ट्रक घेऊन जाणाऱ्या वस्तूंचा इन्शुरन्स हप्ता छोट्या पिक-अप ट्रकपेक्षा जास्त असेल. याचे कारण असे आहे की, ट्रक घेऊन जाणारा माल आकाराने मोठा असेल आणि तो वाहून नेणाऱ्या वस्तूंच्या मूल्यावरही जबाबदार असेल.
ठिकाण: तुमच्या ट्रकच्या ठिकाणाची तुमच्या ट्रकचा इन्शुरन्स हप्ता ठरविण्यात निश्चितच मोठी भूमिका असेल. तुमच्या ट्रकची नोंदणी केलेली आहे आणि महानगरीय भाग, डोंगराळ भाग किंवा छोट्या शहरात ट्रक चालवला जात असला तरी या सर्व घटकांचा विचार तुमचा ट्रक इन्शुरन्स हप्ता ठरविण्यात केला जाईल.
नो-क्लेम बोनस (NCB): जर तुमच्याकडे यापूर्वीही ट्रक इन्शुरन्स असेल आणि सध्या तुम्ही तुमच्या पॉलिसीचे नुतनीकरण करू इच्छित असाल किंवा नवीन इन्शुरन्स कंपनी मिळवू इच्छित असाल- तर या बाबतीत तुमच्या एनसीबीचा (नो क्लेम बोनस)ही विचार केला जाईल आणि तुमचा प्रीमियम सवलतीच्या दरात असेल! नो-क्लेम बोनस म्हणजे इन्शुरन्स असलेल्या व्यक्तीने आधीच्या पॉलिसी टर्ममध्ये एकही क्लेम केलेला नाही.
ट्रक इन्शुरन्स पॉलिसींचा प्रकार: सर्व कमर्शिअल वाहनांसाठी प्रामुख्याने दोन प्रकारचे इन्शुरन्स उपलब्ध आहेत. त्यामुळे आपला ट्रक इन्शुरन्स प्रीमियम आपण निवडलेल्या प्लॅनवर अवलंबून असेल. सक्तीची, लायॅबिलिटी प्लॅन केवळ कमी प्रीमियमसह येते - त्यात केवळ थर्ड-पार्टी नुकसान किंवा मालक-चालकाच्या थर्ड-पार्टी आणि वैयक्तिक अपघातामुळे होणारे नुकसान समाविष्ट आहे; तर स्टँडर्ड पॅकेज पॉलिसी प्रीमियममध्ये जास्त असू शकते परंतु, तुमच्या स्वत:च्या ट्रक आणि त्याच्या ड्रायव्हरचे नुकसान आणि हानीदेखील समाविष्ट असेल.
कमर्शिअल कारणांसाठी वापरले जाणारे सर्व ट्रक डिजिटच्या कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स अंतर्गत कव्हर केले जाऊ शकतात. या ट्रक्सचे ढोबळमानाने खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाऊ शकते: