Third-party premium has changed from 1st June. Renew now
ऑटो रिक्षा इन्शुरन्स म्हणजे काय?
नावावरूनच लक्षात येईल की ऑटो रिक्षा इन्शुरन्स हा खास भारतातल्या तीन चाकी रिक्षांना संरक्षण देण्यासाठी, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन बनवलेला कमर्शियल व्हेईकल इन्शुरन्स आहे. सर्व ऑटो रिक्षा मालकांसाठी थर्ड पार्टी आर्थिक जबाबदाऱ्यांपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी किमान थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे अनिवार्य आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑटो रिक्षा पॉलिसी असणे तर फारच चांगले. कारण त्याने अपघात, टक्कर, नैसर्गिक आपत्ती, आग किंवा तत्सम दुर्दैवी घटनांमुळे स्वतःचे झालेले नुकसानही कव्हर होते.
डिजिट इन्शुरन्स कडे रिक्षा मालकांसाठी या दोन्ही प्रकारच्या पॉलिसी परवडण्याजोग्या आणि कस्टमाईज्ड प्रीमियम किमतीत उपलब्ध आहेत.
ऑटो रिक्षा इन्शुरन्स का घ्यायला हवा?
- तुमच्या किंवा तुमच्या संघटनेच्या मालकीच्या रिक्षा असतील तर कायद्याने किमान लायॅबिलिटी ओन्ली पॉलिसी घेणे आवश्यक आहे. त्याने तुमच्या रिक्षा/रिक्षांमुळे थर्ड पार्टी व्यक्ती किंवा त्यांची मालमत्ता किंवा वाहनाला नुकसान झाले तर त्याची आर्थिक जबाबदारी कव्हर केली जाते.
- जर तुमची रिक्षा ही तुमच्या व्यवसायाचा प्राथमिक भाग असेल तर स्टँडर्ड किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅकेज पॉलिसी घेणे उचित असते कारण त्यामुळे तुमची रिक्षा आणि मालक-चालक दोघांचेही नैसर्गिक आपत्ती, अपघात, अतिरेकी कारवाया, आग, चोरी, दुर्भावनेने केलेली कृत्ये वगैरे कोणत्याही अकल्पनिय परिस्थितीत होणाऱ्या नुकसानापासून रक्षण होते.
- वैध इन्शुरन्स असलेली ऑटो रिक्षा ही तुमच्या ग्राहक/प्रवाशांसाठीसुद्धा तुम्ही एक जबाबदार व्यावसायिक असून तुमच्या कामाप्रती पूर्णपणे गंभीर असल्याचे द्योतक असते.
- ऑटो रिक्षाचा इन्शुरन्स असला की तुम्हाला कोणत्याही अनियोजित नुकसान किंवा रिक्षा नीट चालत नसल्याच्या परिस्थितीचा सामना करावा लागत नाही. तुम्ही तुमचा वेळ आणि पैसे तुमच्या व्यवसायाच्या इतर बाबींकडे लक्ष देण्यासाठी गुंतवू शकता.
डिजिटचाच ऑटो रिक्षा इन्शुरन्स का?
ऑटो रिक्षा इन्शुरन्समध्ये कशा-कशाचा समावेश असतो?
यात कशाचा समावेश नसतो ?
तुमच्या ऑटो रिक्षा इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कशाचा समावेश नसतो हे माहिती असणेदेखील महत्त्वाचे आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा क्लेम करता तेव्हा तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसण्याची वेळ येणाऱ नाही. इथे ज्या गोष्टी पॉलिसीमध्ये कव्हर होत नाही अशा काही परिस्थितींविषयी माहिती दिली आहे:
थर्ड पार्टी लायॅबिलिटी ओन्ली पॉलिसी असल्यास स्वतःच्या वाहनाला झालेले नुकसान त्यात कव्हर होत नाही.
जर इन्शुरन्स असलेल्या ऑटो रिक्षाचा मालक-चालक नशेत असला किंवा वैध लायसन्सशिवाय गाडी चालवताना आढळला तर
मालक-चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेले नुकसान (उदा. पूर आलेला असतानाही रिक्षा चालवणे)
कोणताही अपघात/नैसर्गिक आपत्ती इ.चा थेट परिणाम न होता झालेले नुकसान
डिजिटच्या ऑटो रिक्षा इन्शुरन्सची ठळक वैशिष्ट्ये
ठळक वैशिष्ट्ये | डिजिटचा फायदा |
---|---|
क्लेम प्रक्रिया | कागदपत्रे विरहित क्लेम्स |
ग्राहक सपोर्ट | 24x7 सपोर्ट |
अतिरिक्त कव्हरेज | पीए कव्हर्स, वैधानिक जबाबदारी कव्हर, विशेष एक्सक्लयूजन्स, अनिवार्य वजावटी इ. |
थर्ड पार्टीचे नुकसान | वैयक्तिक नुकसानाची अमर्यादित जबाबदारी, मालमत्ता किंवा वाहनाला नुकसान झाल्यास ७.५ लाखांपर्यंत भरपाई |
ऑटो रिक्षा इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार11
तुमच्या तीनचाकीच्या(थ्री व्हिलर) गरजांवर अवलंबून आमच्या दोन पॉलिसी आहेत. परंतु जोखीम आणि कोणत्याही कमर्शियल वाहनाच्या वापराची वारंवारता लक्षात घेता स्टँडर्ड पॅकेज पॉलिसी घेणे जास्त चांगले. त्यामुळे तुमची रिक्षा आणि मालक-चालक दोन्हींना आर्थिक सुरक्षा मिळेल.
केवळ जबाबदारी | स्टँडर्ड पॅकेज |
तुमच्या ऑटो रिक्षामुळे कोणत्याही थर्ड पार्टी व्यक्ती अथवा मालमत्तेला झालेले नुकसान |
|
तुमच्या ऑटो रिक्षामुळे थर्ड पार्टीच्या वाहनाला झालेले नुकसान |
|
तुमच्या ऑटो रिक्षाला नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी किंवा आपघातामुळे झालेले नुकसान |
|
मालक-चालकाला इजा किंवा त्यांचा मृत्यूIf the owner-driver doesn’t already have a Personal Accident cover in his name |
|
Get Quote | Get Quote |
क्लेम कसा कराल?
आम्हाला १८००-२५८-५९५६ वर फोन करा किंवा hello@godigit.com वर ईमेल पाठवा.
आमची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी तुमचा पॉलिसी क्रमांक, अपघाताची जागा, अपघाताची तारीख आणि वेळ आणि इन्शुरन्स घेतलेल्याचा/फोन करणाऱ्याचा संपर्क क्रमांक हा तपशील तयार ठेवा.
आमचे ग्राहक आमच्याबद्दल काय सांगतात
डिजिट इन्शुरन्सकडे केलेल्या माझ्या व्हेईकलच्या इन्शुरन्स क्लेमची प्रक्रिया हा एक आश्चर्यकारक अनुभव होता. ते अतिशय ग्राहकस्नेही असून उपयुक्त तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्षात न भेटताच माझ्या क्लेम २४ तासांतच निकालात निघाला. माझे फोन ग्राहक सेवा केंद्रांनी व्यवस्थित हाताळले. श्री. रामराजू कोंढाणा यांनी माझी केस फार उत्तम प्रकारे हाताळली, त्यांचा विशेष उल्लेख करायला हवा.
खरोखर एक उत्कृष्ट इन्शुरन्स कंपनी आणि त्यांनी जाहीर केलेले आयडीव्ही मूल्यही सर्वाधिक आहे. कर्मचारी अतिशय नम्र आहेत आणि मी त्यांच्यावर अतिशय खुश आहे. उवेस फारखून यांचे विशेष कौतुक करायला हवे कारण त्यांनी मला वेळेत वेगवेगळ्या ऑफर्स आणि लाभांची माहिती दिली, ज्यामुळे मी डिजिट इन्शुरन्सकडूनच पॉलिसी घ्यायचे ठरवले आणि आता किंमत आणि सेवा यांच्याशी निगडीत अनेक कारणांमुळे मी आणखीन एका वाहनाची पॉलिसीदेखील डिजिट इन्शुरन्सकडूनच घ्यायचे ठरवले आहे.
गो-डिजिटकडून माझा चौथा व्हेईकल इन्शुरन्स घेण्याचा अनुभव अतिशय चांगला होता. कु. पुनम देवी यांनी पॉलिसी चांगल्या प्रकारे समजावून सांगितली. तसेच त्यांना ग्राहकाकडून काय अपेक्षा आहेत तेही माहिती होते. माझ्या गरजांप्रमाणे त्यांनी मला किंमत कोट केली. ऑनलाइन पैसे भरणेही अगदी बिनत्रासाचे होते. हे इतक्या वेगाने करून घेतल्याबद्दल पुनम यांचे विशेष आभार. ग्राहक संबंध टीम दिवसेंदिवस अधिक चांगली होत जाईल अशी आशा आहे!! चीयर्स.
ऑटो रिक्षा इन्शुरन्सबद्दल अधिक माहिती करून घ्या
डिजिटच्या ऑटो रिक्षा इन्शुरन्स प्लॅनमध्ये कोणत्या प्रकारच्या रिक्षांचा समावेश आहे ?
डिजिटच्या कमर्शियल व्हेईकल पॅकेज पॉलिसीअंतर्गत खाली दिल्याप्रमाणे सर्व रिक्षांचा समावेश होतो
- पेट्रोल/डीझेलवर चालणाऱ्या ऑटोरिक्षा : तुमच्या शहरात सर्वत्र दिसणाऱ्या टीव्हीएस आणि बजाजच्या ऑटोरिक्षा या भारतातील दळणवळणाचे सर्वात जास्त आढळणारे साधन आहे.
- इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा : तीनचाकींमधे(थ्री व्हिलर) नवीनच निघालेल्या ई-ऑटो रिक्षा इतर रिक्षांप्रमाणे पेट्रोल/डीझेलवर नाही तर मोटार/ सौर पॅनेल्स किंवा बॅटरीवर चालतात.
ऑटो रिक्षा इन्शुरन्स घेणे अनिवार्य आहे का?
होय, भारतातील मोटार वाहन अधिनियमाप्रमाणे सर्व वाहनांसाठी किमान लायॅबिलिटी ओन्ली पॉलिसी घेणे सक्तीचे आहे. त्याशिवाय भारतात ऑटो रिक्षा चालवणे बेकायदेशीर आहे.
परंतु जर ऑटो रिक्षा हे तुमच्या उत्पन्नाचे किंवा व्यवसायाचे प्रमुख साधन असेल तर स्टँडर्ड पॅकेज पॉलिसी घेणे जास्त योग्य आहे कारण त्यात फक्त थर्ड पार्टीला तुमच्या ऑटो रिक्षामुळे झालेले नुकसानच कव्हर केले जात नाही तर तुमच्या स्वतःच्या वाहनाला आणि मालक-चालकाला झालेले नुकसानही कव्हर होते.
ऑटो रिक्षा इन्शुरन्स घेणे/रिन्यू करणे महत्त्वाचे का आहे?
- तुमच्या दैनंदिन व्यवसायाचे कोणत्याही लहान किंवा मोठ्या आपघातामुळे, टक्कर किंवा अगदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानापासून रक्षण करण्यासाठी.
- तुमचे स्वतःचे थर्ड पार्टी लायॅबिलिटीज आणि कटकटींपासून रक्षण करण्यासाठी; शिवाय भारतात कायद्याने प्रत्येक व्हेहिकलची किमान थर्ड पार्टी पॉलिसी असणे आवश्यक आहे.
- तुमच्या प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी. तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑटोरिक्षा इन्शुरन्स घेऊन प्रवाशांसाठीही कव्हर मिळवू शकता. त्यामुळे तुमची रिक्षा आणि प्रवासी दोन्हींना रक्षण मिळेल.
नेहमीच्या मोटार इन्शुरन्सपेक्षा ऑटो रिक्षा इन्शुरन्स कसा वेगळा आहे ?
दोन्हींमधला मुख्य फरक हा आहे की रिक्षा मुख्यतः व्यवसायासाठी वापरली जाते आणि तिच्यात दररोज अनेक प्रवासी बसतात. शिवाय इतर कमर्शियल व्हेईकल इन्शुरन्सपेक्षाही ऑटो इन्शुरन्स वेगळा आहे कारण रिक्षा आकाराने लहान असल्याने जोखीमही कमी असते. त्यामुळेच तुम्हाला आढळेल की ट्रक किंवा बसपेक्षा ऑटो रिक्षासाठी कमर्शियल व्हेईकल इन्शुरन्स बराच स्वस्त असतो.
माझ्या ऑटो रिक्षासाठी योग्य कमर्शियल व्हेईकल इन्शुरन्स मी कसा निवडू ?
अलिकडे उपलब्ध असलेले पर्याय पाहता साधा, वाजवी किंमतीचा, सर्व परिस्थितीत तुमचे आणि तुमच्या व्यवसायाचे रक्षण करणारा आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे अगदी लवकरात लवकर क्लेम्स निकालात काढणारा असा इन्शुरन्स निवडणे महत्त्वाचे आहे. इन्शुरन्स म्हटले की तेच तर महत्त्वाचे असते !
तुमच्या तीनचाकीसाठी योग्य तो इन्शुरन्स निवडण्यासाठी इथे काही उपयुक्त माहिती दिली आहे:
- राइट इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू (आयडीव्ही) : आयडीव्ही म्हणजे तुम्हाला इन्शुअर करायची असलेली ऑटोची उत्पादकाने ठरवलेली विक्री किंमत (डिप्रिसिएशन सहित). तुमचा प्रीमियम त्यावर अवलंबून असतो. तुम्ही तुमच्या ऑटो रिक्षासाठी ऑनलाइन इन्शुरन्स शोधत असाल तर आयडीव्ही बरोबर असल्याची खात्री करून घ्या.
- सेवेचा लाभ: 24x7 ग्राहक सपोर्ट, कॅशलेस गॅरेजेसचे विशाल नेटवर्क वगैरे गोष्टींचादेखील विचार करा. गरजेच्या वेळी या सेवा फार महत्त्वाच्या असतात.
- ॲड-ऑन्सचा आढावा घ्या: तुमच्या तिचाकीसाठी योग्य ऑटो रिक्षा इन्शुरन्स निवडताना कोणते ॲड-ऑन्स उपलब्ध आहेत ते नीट पहा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळेल..
- क्लेम प्रक्रियेचा वेग: इन्शुरन्सचा हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. वेगाने क्लेम्स सेटल करणारी कंपनी निवडा.
- सर्वोत्तम व्हॅल्यू: प्रीमियमची योग्य रक्कम ते विक्री-पश्चात सेवा आणि क्लेम सेटलमेन्ट ते ॲड-ऑन्स या सर्वांचा विचार करून तुम्हाला ज्याची ज्याची जरूर लागेल असे तुम्हाला वाटेल ते सर्व योग्य त्या किमतीत देणारा इन्शुरन्स निवडा.
ऑनलाइन ऑटो रिक्षा इन्शुरन्सच्या रकमेची तुलना करून पाहा
सर्वात स्वस्त असलेला ऑटो रिक्षा इन्शुरन्स घेण्याचा मोह होणे साहजिक आहे. पण जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या ऑटो रिक्षा इन्शुरन्सच्या किंमतीची तुलना करता तेव्हा उपलब्ध सेवा आणि क्लेम सेटलमेंटचा कालावधी अशा गोष्टींचा विचार करा.
या महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करणे तुमच्या तीनचाकीचे आणि तुमच्या व्यवसायाचे सर्व विपरीत परिस्थितींपासून रक्षण करण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे:
- उपलब्ध सेवा: संकटसमयी उत्तम सेवा फारच महत्त्वाच्या असतात. प्रत्येक कंपनी देत असलेल्या सेवांचे नीट मूल्यमापन करा आणि मगच योग्य ती निवड करा. डिजिट 24*7 ग्राहक केअर सपोर्ट, २५००+ गॅरजेसमध्ये कॅशलेस सुविधा आणि इतर अनेक सुविधा देते.
- लद क्लेम सेटलमेंट: इन्शुरन्स घेण्याचा मूळ हेतू हा असतो की तुमचा क्लेम सेटल व्हावा! म्हणूनच जलद क्लेम्स सेटल करण्याचे आश्वासन देणारी इन्शुरन्स कंपनी निवडा. डिजिटचे ९६ % क्लेम्स ३० दिवसांच्या आत सेटल केले जातात. त्याशिवाय आमची पॉलिसी आहे झीरो हार्ड कॉपीची. अर्थातच आम्हाला फक्त सॉफ्ट कॉपीजच लागतात. सारे काही कागदपत्रविरहित, जलद आणि बिनत्रासाचे आहे.
- तुमचा आयडीव्ही तपासा: ऑनलाइन उपलब्ध असलेले बऱ्याच ऑटो इन्शुरन्स पॉलिसीचा आयडीव्ही (इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू), किंवा उत्पादकाची विक्री किंमत बरीच कमी असते. आयडीव्हीनुसार प्रीमियम ठरत असतो. सेटलमेंटच्या वेळी तुम्हाला योग्य तो क्लेम मिळणेही त्यावरच अवलंबून असते. कधी चोरी किंवा नुकसान झालेच तर त्यावेळी तुमची आयडीव्ही कमी/चुकीची असल्याचे कळावे असे व्हावे असे कुणालाही वाटत नाही! डिजिट तुम्हाला ऑनलाइन कमर्शियल व्हेईकल इन्शुरन्स पॉलिसी घेताना तुमची आयडीव्ही नक्की करण्याचा पर्याय देते.
- सर्वोत्तम मूल्य: सरतेशेवटी असा ऑटो इन्शुरन्स निवडा ज्यात तुम्हाला योग्य किंमत, सेवा आणि अर्थातच जलद क्लेम्स हे सर्व मिळेल !
ऑटो रिक्षा इन्शुरन्स प्रीमियमवर परिणाम करणारे घटक
खालील घटकांचा तुमच्या ऑटो रिक्षाच्या इन्शुरन्स प्रीमियमवर परिणाम होतो
- वाहनाचे मॉडेल, इंजिन आणि उत्पादक कंपनी: कोणत्याही मोटार इन्शुरन्ससाठी वाहनाचे मॉडेल, उत्पादक कंपनी आणि इंजिन योग्य इन्शुरन्स प्रीमियम ठरवण्यासाठी फार महत्त्वाचे असतात. त्यामुळे तुमच्या ऑटो रिक्षाचा इन्शुरन्स मुख्यतः तुमच्या रिक्षाच्या मॉडेल आणि उत्पादक कंपनी, इंधनाचा प्रकार, उत्पादनाचे वर्ष, अतिरिक्त वैशिष्ट्ये इत्यादींवर अवलंबून असेल.
- स्थळ: तुमचा इन्शुरन्स प्रीमियम किती असेल ते बऱ्याच अंशी तुम्ही कोणत्या जागी तुमची रिक्षा रजिस्टर करता आणि चालवता आहात यावर अवलंबून असते. खूप रहदारी, जास्त गुन्हे आणि आपघातांचे प्रमाण असलेल्या महानगरांपेक्षा तुलनेने सुरक्षित आणि लहान शहरांमध्ये प्रीमियम कमी असेल.
- नो-क्लेम बोनस: तुमच्याकडे आधीपासूनच ऑटो रिक्षा इन्शुरन्स असेल आणि तुम्ही सध्या ती रिन्यू करू पाहत असाल किंवा नव्या इन्शुअररच्या शोधत असाल तर तर तुमचा एनसीबी (नो क्लेम बोनस) देखील विचारात घेतला जाईल. त्यामुळे तुम्हाला प्रीमियमवर सूट मिळेल! नो-क्लेम बोनसचा अर्थ आहे की तुमच्या ऑटो रिक्षाने मागील पॉलिसी टर्ममध्ये एकही क्लेम केलेला नाही.
- इन्शुरन्स प्लॅनचा प्रकार: तुमची ऑटो रिक्षा असो किंवा अन्य कोणतेही कमर्शियल व्हेईकल, त्यांच्यासाठी साधारणपणे दोन प्रकारचे इन्शुरन्स असतात. तुम्ही कोणत्या प्रकारचा प्लॅन घेत आहात यावर तुमचा इन्शुरन्स प्रीमियम किती असेल ते अवलंबून असते. सक्तीच्या असलेल्या लायॅबिलिटी ओन्ली प्लॅनचा प्रीमियम कमी असतो. त्यात फक्त थर्ड पार्टीला झालेले नुकसान कव्हर केले जाते. याउलट स्टँडर्ड पॅकेज पॉलिसीचा प्रीमियम जास्त असतो. पण त्यात आपल्या स्वतःच्या रिक्षाला आणि मालक-चलकला झालेले नुकसानदेखील कव्हर केले जाते.
ऑटो रिक्षा इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मला डिजिटचा ऑटो रिक्षा इन्शुरन्स ऑनलाइन घेता येईल का ?
होय, नक्कीच. तुम्ही फक्त ७० २६०० २४०० या नंबरवर व्हॉट्स् ॲपवर मेसेज करा आणि आम्ही खास तुमच्यासाठी ई-ऑटोरिक्षा इन्शुरन्सचा प्लॅन कस्टमाइझ करू.
लायॅबिलिटी ओन्ली ऑटो रिक्षा पॉलिसी आणि स्टँडर्ड ऑटो रिक्षा पॉलिसी या दोन्हींमधे काय फरक आहे?
लायॅबिलिटी ओन्ली ऑटो रिक्षा पॉलिसीमध्ये फक्त तुमच्या ऑटो रिक्षामुळे एखाद्या थर्ड पार्टी व्यक्तीचे, वाहनाचे किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास ते कव्हर केले जाते. त्याउलट स्टँडर्ड पॅकेज ऑटो रिक्षा पॉलिसी थर्ड पार्टी आणि तुम्ही स्वतः, दोघांचेही नुकसान कव्हर केले जाते. उदा. अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या ऑटो रिक्षाचे झालेले नुकसान.
नुकसान झाल्यास माझी ऑटो रिक्षा मी कुठे दुरस्त करून घ्यावी?
तुम्ही आमच्याकडे तुमची ऑटो रिक्षा पॉलिसी ॲक्टिव्हेट केली असेल तर भारतभर पसरलेल्या आमच्या १४००+ गॅरेजेसपैकी कुठेही तुम्ही हे करू शकता. किंवा तुम्ही तुमच्या सोयीने एखाद्या दुसऱ्या गॅरेजमधे तुमची रिक्षा दुरुस्त करून त्याचा आमच्याकडून परतावा मिळवू शकता. आमचे गॅरेजेसचे नेटवर्क पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑटो रिक्षा इन्शुरन्समध्ये प्रवाश्यांसाठीही कव्हर असते का?
प्रवासी हे थर्ड पार्टी समजले जातात त्यामुळे लायॅबिलिटी ओन्ली पॉलिसी आणि स्टँडर्ड पॉलिसी या दोन्हीमधे ते कव्हर केले जातात.
माझ्या कंपनीमध्ये १०० ऑटो रिक्षा आहेत. त्या सर्वांचा इन्शुरन्स मला डिजिटच्या ऑटो रिक्षा इन्शुरन्सद्वारे घेत येईल का?
हो, तुम्ही आमच्याकडून कितीही ऑटो रिक्षांचा इन्शुरन्स घेऊ शकता, त्यांच्या संख्येवर कोणतीही कमाल मर्यादा नाही.
माझ्या ऑटो रिक्षाला अपघात झाल्यास मी काय करायला हवे ?
लगेचच आम्हाला १८००-१०३-४४४८ वर फोन करा आणि पुढे काय करायचे ते आम्ही तुम्हाला सांगू.