ऑटो रिक्षा इन्शुरन्स

usp icon

Affordable

Premium

usp icon

Zero Paperwork

Required

usp icon

24*7 Claims

Support

Get Instant Policy in Minutes*

I agree to the Terms & Conditions

Don’t have Reg num?
It’s a brand new vehicle
background-illustration

ऑटो रिक्षा इन्शुरन्स म्हणजे काय?

नावावरूनच लक्षात येईल की ऑटो रिक्षा इन्शुरन्स हा खास भारतातल्या तीन चाकी रिक्षांना संरक्षण देण्यासाठी, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन बनवलेला कमर्शियल व्हेईकल इन्शुरन्स आहे. सर्व ऑटो रिक्षा मालकांसाठी थर्ड पार्टी आर्थिक जबाबदाऱ्यांपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी किमान थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे अनिवार्य आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑटो रिक्षा पॉलिसी असणे तर फारच चांगले. कारण त्याने अपघात, टक्कर, नैसर्गिक आपत्ती, आग किंवा तत्सम दुर्दैवी घटनांमुळे स्वतःचे झालेले नुकसानही कव्हर होते. 

डिजिट इन्शुरन्स कडे रिक्षा मालकांसाठी या दोन्ही प्रकारच्या पॉलिसी परवडण्याजोग्या आणि कस्टमाईज्ड प्रीमियम किमतीत उपलब्ध आहेत.

Read More

ऑटो रिक्षा इन्शुरन्स का घ्यायला हवा?

डिजिटचाच ऑटो रिक्षा इन्शुरन्स का?

आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपीसारखं वागवतो, कसं ते पहा…

तुमच्या व्हेईकलचा आयडीव्ही कस्टमाईझ करा

तुमच्या व्हेईकलचा आयडीव्ही कस्टमाईझ करा

आम्ही तुम्हाला तुमच्या वाहनाचा आयडीव्ही तुमच्या आवडीप्रमाणे कस्टमाईझ करू देतो!

24*7 सपोर्ट

24*7 सपोर्ट

राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशीसुद्धा 24*7 कॉल सेवा

अति-जलद क्लेम्स

अति-जलद क्लेम्स

स्मार्टफोन एनेबल्ड सेल्फ-इन्स्पेक्शन प्रक्रियेसाठी लागतात फक्त काही मिनिटे!

ऑटो रिक्षा इन्शुरन्समध्ये कशा-कशाचा समावेश असतो?

अपघात

अपघात

अपघातामुळे तुमच्या रिक्षाला झालेले नुकसान.

चोरी

चोरी

तुमच्या ऑटो रिक्षाचे चोरीमुळे झालेले नुकसान.

आग

आग

तुमच्या ऑटो रिक्षाचे आगीमुळे झालेले नुकसान.

नैसर्गिक आपत्ती

नैसर्गिक आपत्ती

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या ऑटो रिक्षाला झालेले नुकसान.

वैयक्तिक अपघात

वैयक्तिक अपघात

तुमच्या ऑटो रिक्षाला झालेल्या आपघातामुळे तुम्हाला अथवा ती चलवणाऱ्या ड्रायव्हरला इजा झाल्यास अथवा मृत्यू आल्यास.

थर्ड पार्टी लॉसेस

थर्ड पार्टी लॉसेस

तुमच्या ऑटो रिक्षामुळे कोणतीही थर्ड पार्टी (इतर व्यक्तीला) अथवा त्यांच्या प्रवाशांना झालेले नुकसान.

बंद पडलेले व्हेहिकल टो करणे

बंद पडलेले व्हेहिकल टो करणे

ऑटो रिक्षा टो करून घेऊन जात असताना तिला झालेले कोणतेही नुकसान.

यात कशाचा समावेश नसतो ?

तुमच्या ऑटो रिक्षा इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कशाचा समावेश नसतो  हे  माहिती असणेदेखील महत्त्वाचे आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा क्लेम करता तेव्हा तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसण्याची वेळ  येणाऱ नाही. इथे  ज्या गोष्टी पॉलिसीमध्ये कव्हर होत नाही अशा काही परिस्थितींविषयी माहिती दिली आहे:

थर्ड पार्टी पॉलिसीधारकाचे स्वतःचे नुकसान

थर्ड पार्टी लायॅबिलिटी ओन्ली पॉलिसी असल्यास स्वतःच्या वाहनाला झालेले नुकसान त्यात कव्हर होत नाही.

नशेत किंवा लायसन्सशिवाय गाडी चालवणे

जर इन्शुरन्स असलेल्या ऑटो रिक्षाचा मालक-चालक नशेत असला किंवा वैध लायसन्सशिवाय गाडी चालवताना आढळला तर

निष्काळजीपणा कारणीभूत

मालक-चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेले नुकसान (उदा. पूर आलेला असतानाही रिक्षा चालवणे)

परिणामी नुकसान

कोणताही अपघात/नैसर्गिक आपत्ती इ.चा थेट परिणाम न होता झालेले नुकसान

डिजिटच्या ऑटो रिक्षा इन्शुरन्सची ठळक वैशिष्ट्ये

ठळक वैशिष्ट्ये

डिजिटचा फायदा

क्लेम प्रक्रिया

कागदपत्रे विरहित क्लेम्स

ग्राहक सपोर्ट

24x7 सपोर्ट

अतिरिक्त कव्हरेज

पीए कव्हर्स, वैधानिक जबाबदारी कव्हर, विशेष एक्सक्लयूजन्स, अनिवार्य वजावटी इ.

थर्ड पार्टीचे नुकसान

वैयक्तिक नुकसानाची अमर्यादित जबाबदारी, मालमत्ता किंवा वाहनाला नुकसान झाल्यास ७.५ लाखांपर्यंत भरपाई

ऑटो रिक्षा इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार

तुमच्या तीनचाकीच्या(थ्री व्हिलर) गरजांवर अवलंबून आमच्या दोन पॉलिसी आहेत. परंतु जोखीम आणि कोणत्याही कमर्शियल वाहनाच्या वापराची वारंवारता लक्षात घेता स्टँडर्ड पॅकेज पॉलिसी घेणे जास्त चांगले. त्यामुळे तुमची रिक्षा आणि मालक-चालक दोन्हींना आर्थिक सुरक्षा मिळेल.

केवळ जबाबदारी

स्टँडर्ड पॅकेज

×

क्लेम कसा कराल?

Report Card

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात ?

तुम्ही तुमची इन्शुरन्स कंपनी बदलू पाहत असाल तर हा प्रश्न सर्वात आधी तुमच्या मनात आला पाहिजे. तुम्ही अगदी योग्य तेच करता आहात!

डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा

आमचे ग्राहक आमच्याबद्दल काय सांगतात

विकास थाप्पा

डिजिट इन्शुरन्सकडे केलेल्या माझ्या व्हेईकलच्या इन्शुरन्स क्लेमची प्रक्रिया हा एक आश्चर्यकारक अनुभव होता. ते अतिशय ग्राहकस्नेही असून उपयुक्त तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्षात न भेटताच माझ्या क्लेम २४ तासांतच निकालात निघाला. माझे फोन ग्राहक सेवा केंद्रांनी व्यवस्थित हाताळले. श्री. रामराजू कोंढाणा यांनी माझी केस फार उत्तम प्रकारे हाताळली, त्यांचा विशेष उल्लेख करायला हवा.

विक्रांत पराशर

खरोखर एक उत्कृष्ट इन्शुरन्स कंपनी आणि त्यांनी जाहीर केलेले आयडीव्ही  मूल्यही सर्वाधिक आहे. कर्मचारी अतिशय नम्र आहेत आणि मी त्यांच्यावर अतिशय खुश आहे. उवेस फारखून यांचे विशेष कौतुक करायला हवे कारण त्यांनी मला वेळेत वेगवेगळ्या ऑफर्स आणि लाभांची माहिती दिली, ज्यामुळे मी डिजिट इन्शुरन्सकडूनच पॉलिसी घ्यायचे ठरवले आणि आता किंमत आणि सेवा यांच्याशी निगडीत अनेक कारणांमुळे मी आणखीन एका वाहनाची पॉलिसीदेखील डिजिट इन्शुरन्सकडूनच घ्यायचे ठरवले आहे.

सिद्धार्थ मूर्ती

गो-डिजिटकडून माझा चौथा व्हेईकल इन्शुरन्स घेण्याचा अनुभव अतिशय चांगला होता. कु. पुनम देवी यांनी पॉलिसी चांगल्या प्रकारे समजावून सांगितली. तसेच त्यांना ग्राहकाकडून काय अपेक्षा आहेत तेही माहिती होते. माझ्या गरजांप्रमाणे त्यांनी मला किंमत कोट केली. ऑनलाइन पैसे भरणेही अगदी बिनत्रासाचे होते. हे इतक्या वेगाने करून घेतल्याबद्दल पुनम यांचे विशेष आभार. ग्राहक संबंध टीम दिवसेंदिवस अधिक चांगली होत जाईल अशी आशा आहे!! चीयर्स.

Show more

ऑटो रिक्षा इन्शुरन्सबद्दल अधिक माहिती करून घ्या

ऑटो रिक्षा इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न