झिरो डेप्रीसिएशन कार इन्शुरन्स

Get Instant Policy in Minutes*

Third-party premium has changed from 1st June. Renew now

झिरो डेप्रिसिएशन कार इन्शुरन्स म्हणजे काय?

झिरो डेप्रिसिएशन कार इन्शुरन्स ही एक व्यापक कार इन्शुरन्स पॉलिसी आहे, ज्यामध्ये झिरो डेप्रिसिएशन अ‍ॅड-ऑन कव्हर समाविष्ट आहे. याचा अर्थ असा की कार इन्शुरन्स दाव्यांदरम्यान तुमची कार तिच्या सामान्य डेप्रिसिएशन पासून स्वतंत्र असेल.

सोप्या भाषेत सांगायचं तर झिरो डेप्रिसिएशन कव्हरशिवाय, सर्व इन्शुरन्स कंपन्या तुमच्या कारच्या भागांवर डेप्रिसिएशन भरतात आणि त्यामुळे डेप्रिसिएशन रक्कम वजा केल्यानंतरच तुम्हाला तुमचा क्लेम  देतात. अ‍ॅड-ऑनसह, कोणतेही डेप्रिसिएशन वजा केला जात नाही आणि दाव्यांदरम्यान तुम्हाला अधिक पैसे मिळतात.

डेप्रिसिएशन म्हणजे काय?

डेप्रिसिएशन म्हणजे तुम्ही कार घेतल्यावर जितका कालावधी होतो त्याप्रमाणे कारची नैसर्गिक झीज होत जाते परिणामी किमंतीवर सुद्धा परिणाम होतो. तुमची कार जितकी जुनी तितकी तिची डेप्रिसिएशन तितका जास्त.

डेप्रिसिएशन कसा मोजला जातो?

इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) नुसार, खाली दिलेले डेप्रिसिएशन दर आहेत, ज्याच्या आधारे तुमच्या कारचे एकूण डेप्रिसिएशन मोजले जाते:

  • रबर, नायलॉन आणि प्लास्टिकचे भाग आणि बॅटरी: 50%
  • फायबर ग्लास घटक: 30%
  • लाकडी भाग: पहिल्या वर्षी 5%, दुसऱ्या वर्षी 10%, आणि अनुक्रमे.

वाहनांमधील डेप्रीसिएशन%

वाहनाचे वय (खरेदीनंतर) डेप्रीसिएशन %
6 महिन्यांपेक्षा कमी 5%
6 महिन्यांपेक्षा जास्त परंतु 1 वर्षापेक्षा कमी 15%
1 वर्षापेक्षा जास्त परंतु 2 वर्षांपेक्षा कमी 20%
2 वर्षांपेक्षा जास्त परंतु 3 वर्षांपेक्षा कमी 30%
3 वर्षांपेक्षा जास्त परंतु 4 वर्षांपेक्षा कमी 40%
4 वर्षांपेक्षा जास्त परंतु 5 वर्षांपेक्षा कमी 50%

वाहनांमधील डेप्रीसिएशन% (धातूचे भाग)

वाहनाचे वय (खरेदीनंतर) डेप्रीसिएशन %
6 महिन्यांपेक्षा कमी Nil
6 महिन्यांपेक्षा जास्त परंतु 1 वर्षापेक्षा कमी 5%
1 वर्षापेक्षा जास्त परंतु 2 वर्षांपेक्षा कमी 10%
2 वर्षांपेक्षा जास्त परंतु 3 वर्षांपेक्षा कमी 15%
3 वर्षांपेक्षा जास्त परंतु 4 वर्षांपेक्षा कमी 25%
4 वर्षांपेक्षा जास्त परंतु 5 वर्षांपेक्षा कमी 35%
5 वर्षांपेक्षा जास्त परंतु 10 वर्षांपेक्षा कमी 40%
10 वर्षांपेक्षा जास्त 50%

झिरो डेप्रिसिएशन कार इन्शुरन्स अ‍ॅडऑनचे फायदे

पैसे वाचवा

झिरो डेप्रिसिएशन अ‍ॅड ऑन असल्‍याने तुम्‍हाला इन्शुरन्सचा क्लेम  करायचा असल्‍यास तुमच्‍या खिशातून अधिकचे  पैसे काढावे लागणार नाहीत, कारण झिरो डेप अ‍ॅडऑन नसल्‍यास गाडीच्या भागांचे डेप्रिसिएशन खर्च आपल्यालाच द्यावे लागते परंतु झिरो डेप अ‍ॅडॉनसह, तुमची ही काळजी इन्शुरन्स कंपनीवर आपण सोपवता.

उच्च हक्काची रक्कम मिळवा

झिरो डेप्रिसिएशन अ‍ॅड-ऑनसह तुमची कार सुरक्षित करणे म्हणजे तुमच्या कारच्या पार्ट्सवरील डेप्रिसिएशन  मोजला जाणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला दाव्यांदरम्यान जास्त रक्कम मिळेल.

मनाची शांतता

झिरो डेप्रिसिएशन अ‍ॅडऑनची निवड केल्याने दाव्यांदरम्यान तुम्हाला खिशातून अनावश्यक अधिक खर्च करावा लागणार नाही याची खात्री बाळगा! आणि तुमच्या दुर्दैवी काळात कोणीतरी तुमची पाठराखण करेल याची शाश्वती किती समाधानकारक आहे हे वेगळं सांगायला नको.

झिरो डेप्रिसिएशन अ‍ॅडॉनमध्ये काय समाविष्ट नाही?

ड्रायव्हर लायसन्सशिवाय वाहन चालवणे

तुमच्याकडे वैध कार परवाना नसल्यास तुम्ही झिरो डेप्रिसिएशन अ‍ॅडऑनचे फायदे प्राप्त करण्यासाठी लागू होणार नाही.

5 वर्षांपेक्षा जुन्या कार

दुर्दैवाने, तुमची कार पाच वर्षांपेक्षा जुनी असल्यास झिरो डेप्रिसिएशन अ‍ॅडऑन निवडला जाऊ शकत नाही.

मद्यपान करून वाहन चालवणे

ड्रग्ज किंवा अल्कोहोलच्या प्रभावाखाली वाहन चालवणाऱ्यांना दाव्यांच्या दरम्यान झिरो-डेप्रिसिएशन कव्हरचा लाभ मिळण्यापासून वगळण्यात आले आहे.

अनिवार्य वजावट

झिरो डेप्रिसिएशन कव्हर तुमच्या अनिवार्य वजावटी (असल्यास) रक्कम तुमच्या कार इन्शुरन्स योजनेमध्ये समाविष्ट करत नाही.

मेकॅनिकल ब्रेकडाउन

एक मानक नियमानुसार, झिरो डेप्रिसिएशन कव्हर यांत्रिक बिघाड किंवा तुमच्या कारच्या सामान्य बिघाडाची रक्कम कव्हर करत नाही.

इंजिन ऑइलची किंमत

अ‍ॅडॉन इंजिन ऑइल, क्लच ऑइल, कूलंट इत्यादी खर्चांसाठी कव्हर करत नाही.

झिरो डेप्रिसिएशन अ‍ॅडॉन कव्हरची किंमत किती असेल?

साधारणपणे, तुमच्या सर्वसमावेशक पॉलिसीमध्ये झिरो डेप्रिसिएशन अ‍ॅडऑन कव्हर निवडण्याची किंमत तुमच्या सर्वसमावेशक कार इन्शुरन्स प्रीमियमच्या तुलनेत अंदाजे अतिरिक्त 15% असेल.

जेव्हा तुम्ही तुमच्या कारच्या एकूण संरक्षणासाठी फक्त 15% अतिरिक्त प्रीमियम भरत असाल, तेव्हा ते पूर्णपणे फायदेशीर आहे कारण तुम्ही दाव्यांदरम्यान बचत कराल ती रक्कम अ‍ॅडऑनच्या खर्चापेक्षा खूप जास्त असेल.

 

याबद्दल अधिक जाणून घ्या: 

 

तुमच्या झिरो डेप्रिसिएशन कार इन्शुरन्स प्रीमियमवर कोणते घटक परिणाम करतात?

तुमच्या झिरो डेप्रिसिएशन अ‍ॅडऑन कव्हरच्या प्रीमियमवर परिणाम करणारे घटक खालीलप्रमाणे :

तुमच्या कारचे वय

झिरो डेप्रिसिएशन अ‍ॅडऑन तुमच्या कारच्या खरेदीपासूनचा कालावधी आणि त्याच्या पार्ट्सशी थेट संबंधित आहे, त्यामुळे अ‍ॅडऑन कव्हरसाठी प्रीमियम ठरवताना कारचे वय(खरेदीनंतर)  किती आहे ही माहिती ठेवा.

तुमच्या कारचे मॉडेल

कार इन्शुरन्स मध्ये , तुमच्या कारच्या मॉडेलनुसार त्यातील भागांची किंमत ठरत असल्याने या माहितीचा प्रीमियम रक्कमेवर थेट प्रभाव पडतो.

तुमच्या कारचे स्थान

प्रत्येक शहर आणि त्यानुसार वाहतुकीच्या समस्या वेगळ्या आहेत,  म्हणून, कार इन्शुरन्स साठी , तुमचा प्रीमियम-तुम्ही तुमची कार ज्या शहरात चालवत आहात त्यावर अवलंबून असतो.

झिरो डेप कार इन्शुरन्स हा स्टँडअलोन सर्वसमावेशक कार इन्शुरन्स पॉलिसीपेक्षा चांगला का आहे?

तुमच्या कारचे सर्व संभाव्य नुकसानांपासून संरक्षण करण्यासाठी एक स्वतंत्र सर्वसमावेशक पॉलिसी हा एक उत्तम मार्ग आहे यात शंका नाही. तथापि, दाव्यांदरम्यान- तुम्हाला तरीही तुमच्या कारच्या भागांच्या डेप्रिसिएशनचे पैसे द्यावे लागतात. मात्र जर का आपण सर्वसमावेशक कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये झिरो डेप्रिसिएशन अ‍ॅडऑन कव्हरची निवड केली असेल तर दाव्यांदरम्यान तुमच्या कारच्या डेप्रिसिएशन खर्चासाठी पैसे देखील कंपनीकडून देण्यात येतात.

झिरो डेप्रिसिएशन आणि सर्वसमावेशक कार इन्शुरन्स यातील फरक

झिरो डेप्रिसिएशन कार इन्शुरन्स सर्वसमावेशक कार इन्शुरन्स
नेमका अर्थ काय? झिरो डेप्रिसिएशन कव्हर हे पर्यायी अ‍ॅडऑन आहे जे तुम्ही तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये निवडू शकता. तुमच्या प्लॅनमध्ये हे अ‍ॅडऑन असल्‍याने तुमचा दाव्यांदरम्यान तुमच्या कारच्या अवमूल्यनासाठी शुल्क आकारले जाणार नाही आणि म्हणून, दाव्यांच्या दरम्यान तुमच्या कारच्या भागांच्या डेप्रिसिएशन किंमतीसाठी तुम्‍ही जबाबदार राहणार नाही. सर्वसमावेशक कार इन्शुरन्स पॉलिसी मध्ये तुमच्या कारचे स्वतःचे नुकसान आणि तृतीय-पक्षाचे नुकसान कव्हर होते. या प्रकारची पॉलिसी पुढे विस्तृत कव्हरेजसाठी कस्टमाइझ केली जाऊ शकते.
प्रीमियम या अ‍ॅडऑनची निवड केल्यावर, तुमचा सर्वसमावेशक कार इन्शुरन्स प्रीमियम अंदाजे 15% ने वाढेल. स्टँडअलोन सर्वसमावेशक कार इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम अ‍ॅडऑनसह सर्वसमावेशक कार इन्शुरन्स पॉलिसीपेक्षा कमी असतो.
अवमूल्यनाची किंमत झिरो डेप्रिसिएशन अ‍ॅडऑन असण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या कार क्लेमच्या दाव्यांदरम्यान डेप्रिसिएशन किंमत भरण्याची गरज नाही. सर्वसमावेशक कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये, कार इन्शुरन्सच्या दाव्यांदरम्यान तुम्हाला तुमच्या कारच्या पार्ट्सच्या अवमूल्यनाच्या खर्चासाठी पैसे द्यावे लागतील.
कारचे वय पाच वर्षांपेक्षा (खरेदीनंतरचा कालावधी) कमी जुन्या सर्व कारसाठी झिरो डेप्रिसिएशन अ‍ॅडॉन निवडले जाऊ शकते. पंधरा वर्षांपेक्षा (खरेदीनंतरचा कालावधी) कमी वयाच्या सर्व कारसाठी सर्वसमावेशक कार इन्शुरन्स पॉलिसी निवडली जाऊ शकते.
आपण किती बचत करता? तुम्ही जास्त प्रीमियम भरत असताना, तुमची दीर्घकालीन बचत जास्त असते कारण तुम्हाला दाव्यांच्या दरम्यान तुमच्या कारच्या डेप्रीसिएशन खर्चाची भरपाई करण्याची आवश्यकता नसते. तुमच्याकडे फक्त बचत आहे ती अतिरिक्त प्रीमियम आहे जी तुम्ही अ‍ॅडऑन्सची निवड न करून वाचवता

क्लेम सेटल करताना झिरो डेप्रीसिएशन कव्हरची भूमिका

दाव्यांच्या दरम्यान झिरो डेप्रीसिएशन कव्हरची मुख्य भूमिका म्हणजे बचत. उदाहरणार्थ जर तुमची एकूण दाव्याची देय रक्कम 20,000 रुपये असेल आणि तुमच्या कारच्या पार्ट डेप्रिसिएशनची एकूण किंमत 6,000 रुपये असेल आणि आपल्याकडे झिरो डेप्रीसिएशन कव्हर नसेल  तर इन्शुरन्स कंपनी केवळ  14,000 रुपये खर्च  करण्यासाठीच जबाबदार असेल. तथापि, जर तुमच्याकडे झिरो डेप्रीसिएशन कव्हर असेल, तर तुम्हाला तुमच्या दाव्याची रक्कम म्हणून संपूर्ण 20,000 रुपये मिळतील.

झिरो डेप्रीसिएशन बद्दल महत्त्वाचे मुद्दे

  • झिरो डेप्रीसिएशन अ‍ॅडऑन कव्हर फक्त खरेदीनंतर पाच वर्षापेक्षा कमी कालावधी झालेल्या जुन्या कारसाठी लागू आहे.
  • झिरो डेप्रीसिएशन केवळ दाव्यांदरम्यान तुमच्या कारच्या पार्ट डेप्रिसिएशनच्या खर्चासाठी कव्हर करते आणि तुमच्या अनिवार्य वजावटीसाठी कव्हर करत नाही.
  • पाच वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कारसाठी झिरो डेप्रीसिएशन अ‍ॅडऑन कव्हर निवडले जाऊ शकत नाही.

झिरो डेप्रिसिएशन कव्हरची निवड कोणी करावी?

  • तुम्‍ही लवकरच नवीन कार खरेदी करण्‍याचा विचार करत असल्‍यास, तुमच्‍या सर्वसमावेशक कार इन्शुरन्स पॉलिसीमध्‍ये झिरो डेप्रिसिएशन कव्‍हरची निवड करणे फायद्याचे ठरेल. आम्ही जाणतो की, तुम्ही तुमच्या नवीन कारसाठी आधीच भरपूर खर्च करत आहात, मात्र योग्य अ‍ॅड-ऑन्ससह इन्शुरन्ससाठी  थोडा अधिक खर्च हा खर्च नसून गुंतवणूक ठरेल.
  • जर तुम्ही नुकतीच नवीन कार खरेदी केली असेल किंवा तुमची कार 5 वर्षांपेक्षा कमी जुनी असेल तर तुमच्या सर्वसमावेशक कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये झिरो डेप्रीसिएशन कव्हर निवडणे तुम्हाला तुमच्या कार इन्शुरन्स दाव्यांमध्ये बचत करण्यात मदत करेल. कारण, तुमच्या कारच्या डेप्रीसिएशन किंमत कालांतराने वाढत जाईल परंतु, झिरो डेप्रीसिएशन इन्शुरन्स सह तुम्हाला दाव्यांच्या दरम्यान ही अतिरिक्त किंमत मोजावी लागणार नाही याची खात्री होते!

कार इन्शुरन्समधील झिरो डेप्रीसिएशन कव्हरबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी 5 वर्षांनंतर झिरो डेप्रीसिएशन कार इन्शुरन्स मिळवू शकतो का?

नाही, तुमची कार 5 वर्षांपेक्षा कमी जुनी असेल तरच तुम्ही तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये झिरो घसारा अ‍ॅड ऑनची निवड करू शकता.

मला 3 वर्षांनी झिरो डेप्रीसिएशन कार इन्शुरन्स मिळू शकतो का?

होय, जोपर्यंत तुमची कार 5  वर्षांपेक्षा कमी आहे - तुम्ही तुमच्या सर्वसमावेशक कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये झिरो घसारा अ‍ॅड-ऑन निवडू शकता.

दाव्यांच्या संख्येवर काही निर्बंध आहे का? झिरो-डेप इन्शुरन्स पॉलिसीचा क्लेम सेटलमेंट प्रक्रियेवर कसा परिणाम होतो?

नाही, जोपर्यंत एकूण दाव्यांची रक्कम तुमच्या इन्शुरन्सच्या रकमेपर्यंत आहे तोपर्यंत दाव्यांच्या संख्येवर मर्यादा नाही. तुमच्या प्लॅनचा एक भाग म्हणून झिरो डेप्रीसिएशन अ‍ॅड-ऑन असल्‍याने क्लेम सेटलमेंट दरम्यान, तुमच्‍या कारच्‍या डेप्रीसिएशन च्या किमंतीसह तुमच्‍या संपूर्ण क्लेमची रक्कम मिळते.

झिरो डेप्रीसिएशन कव्हर सर्वसमावेशक कव्हरपेक्षा वेगळे आहे का?

होय, झिरो घसारा कव्हर हे एक अ‍ॅड-ऑन आहे जे तुम्ही तुमच्या सर्वसमावेशक पॉलिसीमध्ये निवडू शकता तर सर्वसमावेशक कव्हर हे तुमच्या स्टँडर्ड कार पॉलिसीशिवाय तृतीय-पक्ष आणि स्वतःचे नुकसान दोन्ही कव्हर करते. इतर कव्हर्समध्ये तुम्ही अ‍ॅड-ऑन अशा झिरो डेप्रीसिएशन कव्हरची निवड करून तुमच्या कव्हरेजची पातळी आणखी कस्टमाइझ करू शकता.

झिरो अवमूल्यन कव्हर फक्त नवीन कारसाठी लागू आहे का?

होय, झिरो घसारा कव्हर फक्त नवीन किंवा 5 वर्षांपेक्षा कमी जुन्या कारसाठी लागू आहे.