झिरो डेप्रीसिएशन कार इन्शुरन्स
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
सपोर्ट
closeआमचा WhatsApp नंबर कॉलसाठी वापरला जाऊ शकत नाही. हा फक्त चॅट नंबर आहे.
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
झिरो डेप्रिसिएशन कार इन्शुरन्स ही एक व्यापक कार इन्शुरन्स पॉलिसी आहे, ज्यामध्ये झिरो डेप्रिसिएशन अॅड-ऑन कव्हर समाविष्ट आहे. याचा अर्थ असा की कार इन्शुरन्स दाव्यांदरम्यान तुमची कार तिच्या सामान्य डेप्रिसिएशन पासून स्वतंत्र असेल.
सोप्या भाषेत सांगायचं तर झिरो डेप्रिसिएशन कव्हरशिवाय, सर्व इन्शुरन्स कंपन्या तुमच्या कारच्या भागांवर डेप्रिसिएशन भरतात आणि त्यामुळे डेप्रिसिएशन रक्कम वजा केल्यानंतरच तुम्हाला तुमचा क्लेम देतात. अॅड-ऑनसह, कोणतेही डेप्रिसिएशन वजा केला जात नाही आणि दाव्यांदरम्यान तुम्हाला अधिक पैसे मिळतात.
डेप्रिसिएशन म्हणजे तुम्ही कार घेतल्यावर जितका कालावधी होतो त्याप्रमाणे कारची नैसर्गिक झीज होत जाते परिणामी किमंतीवर सुद्धा परिणाम होतो. तुमची कार जितकी जुनी तितकी तिची डेप्रिसिएशन तितका जास्त.
इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) नुसार, खाली दिलेले डेप्रिसिएशन दर आहेत, ज्याच्या आधारे तुमच्या कारचे एकूण डेप्रिसिएशन मोजले जाते:
वाहनाचे वय (खरेदीनंतर) |
डेप्रीसिएशन % |
6 महिन्यांपेक्षा कमी |
5% |
6 महिन्यांपेक्षा जास्त परंतु 1 वर्षापेक्षा कमी |
15% |
1 वर्षापेक्षा जास्त परंतु 2 वर्षांपेक्षा कमी |
20% |
2 वर्षांपेक्षा जास्त परंतु 3 वर्षांपेक्षा कमी |
30% |
3 वर्षांपेक्षा जास्त परंतु 4 वर्षांपेक्षा कमी |
40% |
4 वर्षांपेक्षा जास्त परंतु 5 वर्षांपेक्षा कमी |
50% |
वाहनाचे वय (खरेदीनंतर) |
डेप्रीसिएशन % |
6 महिन्यांपेक्षा कमी |
Nil |
6 महिन्यांपेक्षा जास्त परंतु 1 वर्षापेक्षा कमी |
5% |
1 वर्षापेक्षा जास्त परंतु 2 वर्षांपेक्षा कमी |
10% |
2 वर्षांपेक्षा जास्त परंतु 3 वर्षांपेक्षा कमी |
15% |
3 वर्षांपेक्षा जास्त परंतु 4 वर्षांपेक्षा कमी |
25% |
4 वर्षांपेक्षा जास्त परंतु 5 वर्षांपेक्षा कमी |
35% |
5 वर्षांपेक्षा जास्त परंतु 10 वर्षांपेक्षा कमी |
40% |
10 वर्षांपेक्षा जास्त |
50% |
साधारणपणे, तुमच्या सर्वसमावेशक पॉलिसीमध्ये झिरो डेप्रिसिएशन अॅडऑन कव्हर निवडण्याची किंमत तुमच्या सर्वसमावेशक कार इन्शुरन्स प्रीमियमच्या तुलनेत अंदाजे अतिरिक्त 15% असेल.
जेव्हा तुम्ही तुमच्या कारच्या एकूण संरक्षणासाठी फक्त 15% अतिरिक्त प्रीमियम भरत असाल, तेव्हा ते पूर्णपणे फायदेशीर आहे कारण तुम्ही दाव्यांदरम्यान बचत कराल ती रक्कम अॅडऑनच्या खर्चापेक्षा खूप जास्त असेल.
याबद्दल अधिक जाणून घ्या:
तुमच्या झिरो डेप्रिसिएशन अॅडऑन कव्हरच्या प्रीमियमवर परिणाम करणारे घटक खालीलप्रमाणे :
तुमच्या कारचे सर्व संभाव्य नुकसानांपासून संरक्षण करण्यासाठी एक स्वतंत्र सर्वसमावेशक पॉलिसी हा एक उत्तम मार्ग आहे यात शंका नाही. तथापि, दाव्यांदरम्यान- तुम्हाला तरीही तुमच्या कारच्या भागांच्या डेप्रिसिएशनचे पैसे द्यावे लागतात. मात्र जर का आपण सर्वसमावेशक कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये झिरो डेप्रिसिएशन अॅडऑन कव्हरची निवड केली असेल तर दाव्यांदरम्यान तुमच्या कारच्या डेप्रिसिएशन खर्चासाठी पैसे देखील कंपनीकडून देण्यात येतात.
|
झिरो डेप्रिसिएशन कार इन्शुरन्स |
सर्वसमावेशक कार इन्शुरन्स |
नेमका अर्थ काय? |
झिरो डेप्रिसिएशन कव्हर हे पर्यायी अॅडऑन आहे जे तुम्ही तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये निवडू शकता. तुमच्या प्लॅनमध्ये हे अॅडऑन असल्याने तुमचा दाव्यांदरम्यान तुमच्या कारच्या अवमूल्यनासाठी शुल्क आकारले जाणार नाही आणि म्हणून, दाव्यांच्या दरम्यान तुमच्या कारच्या भागांच्या डेप्रिसिएशन किंमतीसाठी तुम्ही जबाबदार राहणार नाही. |
सर्वसमावेशक कार इन्शुरन्स पॉलिसी मध्ये तुमच्या कारचे स्वतःचे नुकसान आणि तृतीय-पक्षाचे नुकसान कव्हर होते. या प्रकारची पॉलिसी पुढे विस्तृत कव्हरेजसाठी कस्टमाइझ केली जाऊ शकते. |
प्रीमियम |
या अॅडऑनची निवड केल्यावर, तुमचा सर्वसमावेशक कार इन्शुरन्स प्रीमियम अंदाजे 15% ने वाढेल. |
स्टँडअलोन सर्वसमावेशक कार इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम अॅडऑनसह सर्वसमावेशक कार इन्शुरन्स पॉलिसीपेक्षा कमी असतो. |
अवमूल्यनाची किंमत |
झिरो डेप्रिसिएशन अॅडऑन असण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या कार क्लेमच्या दाव्यांदरम्यान डेप्रिसिएशन किंमत भरण्याची गरज नाही. |
सर्वसमावेशक कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये, कार इन्शुरन्सच्या दाव्यांदरम्यान तुम्हाला तुमच्या कारच्या पार्ट्सच्या अवमूल्यनाच्या खर्चासाठी पैसे द्यावे लागतील. |
कारचे वय |
पाच वर्षांपेक्षा (खरेदीनंतरचा कालावधी) कमी जुन्या सर्व कारसाठी झिरो डेप्रिसिएशन अॅडॉन निवडले जाऊ शकते. |
पंधरा वर्षांपेक्षा (खरेदीनंतरचा कालावधी) कमी वयाच्या सर्व कारसाठी सर्वसमावेशक कार इन्शुरन्स पॉलिसी निवडली जाऊ शकते. |
आपण किती बचत करता? |
तुम्ही जास्त प्रीमियम भरत असताना, तुमची दीर्घकालीन बचत जास्त असते कारण तुम्हाला दाव्यांच्या दरम्यान तुमच्या कारच्या डेप्रीसिएशन खर्चाची भरपाई करण्याची आवश्यकता नसते. |
तुमच्याकडे फक्त बचत आहे ती अतिरिक्त प्रीमियम आहे जी तुम्ही अॅडऑन्सची निवड न करून वाचवता |
दाव्यांच्या दरम्यान झिरो डेप्रीसिएशन कव्हरची मुख्य भूमिका म्हणजे बचत. उदाहरणार्थ जर तुमची एकूण दाव्याची देय रक्कम 20,000 रुपये असेल आणि तुमच्या कारच्या पार्ट डेप्रिसिएशनची एकूण किंमत 6,000 रुपये असेल आणि आपल्याकडे झिरो डेप्रीसिएशन कव्हर नसेल तर इन्शुरन्स कंपनी केवळ 14,000 रुपये खर्च करण्यासाठीच जबाबदार असेल. तथापि, जर तुमच्याकडे झिरो डेप्रीसिएशन कव्हर असेल, तर तुम्हाला तुमच्या दाव्याची रक्कम म्हणून संपूर्ण 20,000 रुपये मिळतील.