फोर्ड फ्रीस्टाईल इन्शुरन्स

Get Instant Policy in Minutes*

Third-party premium has changed from 1st June. Renew now

फोर्ड फ्रीस्टाईलसाठी इन्शुरन्स खरेदी किंवा रिन्यू करा

फोर्ड फ्रीस्टाईल ही एक कॉम्पॅक्ट युटीलिटी वेहिकल आहे जिने भारताचे हॅचबॅक सेगमेंट कमी काळातच काबीज केले आणि मिड-रेंज कार ग्राहकांकडून भरपूर पसंती मिळवली. भारतामध्ये फोर्ड फ्रीस्टाईल हिच्या एडव्हान्स्ड स्पेसिफिकेशन्स आणि मजबूत एसयूव्ही लूक्स मुळे खूपच लोकप्रिय झाली. फोर्ड फ्रीस्टाईल मध्ये अत्यंत शक्तिशाली इंजिन आहे आणि एपीआर म्हणजेच एक्टीव्ह रोलओव्हर प्रिव्हेंशन देखील आहे ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर कमालीचा कन्ट्रोल अनुभवता येतो. एबीएस आणि ईबीडी (इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन) सारखे फीचर्स देखील आहेत ज्यामुळे अवघड वळणाच्या रस्त्यांवर उत्तम पकड मिळते आणि ब्रेक कन्ट्रोलही वाढतो.

तुमच्याकडे जर फोर्ड फ्रीस्टाईल आहे किंवा तुम्ही याचे नवीन मॉडेल विकत घेण्याच्या विचारात असाल, तर भारतामध्ये कायद्याला धरून रस्त्यावर गाडी चालवण्यासाठी तुमच्याकडे एक वैध फोर्ड फ्रीस्टाईल इन्शुरन्स पॉलिसी असणे अनिवार्य आहे. अन्यथा मोटर वेहिकल एक्ट, 1988 तुम्हाला भरघोस दंड भरावा लागू शकतो.

तरी, बाजारात अनेक कार इन्शुरन्स कंपन्या आहेत, त्यामधून एक निवडणे जिकिरीचे ठरते. त्यामुळे, योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्ही सर्व कंपन्यांच्या फीचर्स आणि फायद्यांची व्यवस्थित माहिती घेणे आवश्यक आहे.

फोर्ड फ्रीस्टाईल कार इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते

डिजिटचा फोर्ड फ्रीस्टाईल कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

फोर्ड फ्रीस्टाईल साठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

आगीमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

नैसर्गिक आपत्तिमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

थर्ड पार्टीच्या गाडीला झालेले नुकसान

×

थर्ड पार्टीच्या मालमत्तेला झालेले नुकसान

×

पर्सनल एक्सिडेंट कव्हर

×

थर्ड पार्टी व्यक्तिला झालेली इजा/मृत्यू

×

तुमची कार चोरीला गेल्यास

×

डोअस्टेप पिक-अप एंड ड्रॉप

×

तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करा

×

कस्टमाइज्ड एड-ऑन्स सह एक्स्ट्रा प्रोटेक्शन

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रीहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स मधला फरक याबद्दल आणखीन जाणून घ्या

मी क्लेम कसा फाईल करू शकतो?

एकदा तुम्ही आमचा कार इन्शुरन्स प्लॅन विकत घेतला किंवा रिन्यू केलंत की तुम्ही निश्चिंत होऊ शकता, कारण आमच्याकडे 3 सोप्या स्टेप्स मध्ये पूर्ण पणे डिजिटल अशी क्लेम प्रोसेस आहे.

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.

स्टेप 2

सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवरून एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेस ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.

डिजीट इन्शुरन्स क्लेम्स किती काळात सेटल केले जातात? तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा प्रश्न सर्वात पहिले यायला हवा. तुमचे अभिनंदन, तुम्ही हे करता आहात. डिजीट इन्शुरन्स रिपोर्ट कार्ड वाचा

फोर्ड फ्रीस्टाईल इन्शुरन्ससाठी डिजीटचीच निवड का करावी?

फोर्ड फ्रीस्टाईल इन्शुरन्सची तुलनात्मक किंमत ऑफर करण्यासोबतच डिजीट इन्शुरन्स कंपनी त्यांच्या पॉलिसी होल्डर्सना इतर अनेक फायदे देखील देते. चला तर बघूया हे कोणकोणते फायदे आहेत!

1. प्रॉडक्ट्सची विस्तृत रेंज

डिजीट तुम्हाला कर इन्शुरन्सच्या विस्तृत रेंज मधून निवडण्याची संधी देतो, जसे -

  • थर्ड पार्टी कार इन्शुरन्स पॉलिसी

भारतामध्ये रस्त्यावर कार चालवताना थर्ड पार्टी कार इन्शुरन्स असणे अनिवार्य आहे. या पॉलिसी अंतर्गत जेव्हा तुमच्या कार मुळे थर्ड पार्टी व्यक्ती, मालमत्ता किंवा कारला अपघात होतो, तेव्हा तुमच्या वतीने थर्ड पार्टीसाठीच्या आर्थिक लायबिलिटीची काळजी घेतो. त्याचप्रमाणे, अशा अपघातांमध्ये उद्भवणाऱ्या कायदेशीर बाबींची देखील डिजीट काळजी घेतो.

  • कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स

एक कॉम्प्रिहेन्सिव्ह फोर्ड फ्रीस्टाईल कार इन्शुरन्स तुम्हाला स्वतःच्या कारच्या आणि त्याचबरोबर थर्ड पार्टीच्या नुकसानापासून देखील सुरक्षा प्रदान करते. तसेच, या पॉलिसी अंतर्गत एखाद्या इन्शुरन्स होल्डरचा अपघातामध्ये मृत्यू झाला किंवा त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आले तर त्याला पर्सनल एक्सिडेंट कव्हर देखील मिळते.

2. असंख्य नेटवर्क गॅरेजेस

डिजीटची देशभरात 6000+ नेटवर्क गॅरेजेस उपलब्ध आहेत. डिजीट कडून फोर्ड फ्रीस्टाईलसाठी कार इन्शुरन्स घेतल्यामुळे, तुम्हाला यापैकी कोणत्याही नेटवर्क गॅरेजेस मध्ये कॅशलेस ऑप्शन सह अगदी प्रोफेशनल रिपेअर्स आणि रिप्लेसमेंट सर्व्हिस मिळते.

3. असंख्य एड-ऑन बेनिफिट्स

जर तुम्ही डिजीटचा कॉम्प्रिहेन्सिव्ह फोर्ड फ्रीस्टाईल इन्शुरन्स घेतला, तर तुम्हाला खालील अनेक एड-ऑन बेनिफिट्सचा लाभ घेता येईल- 

  • रोडसाईड असिस्टंस
  • कन्ज्यूमेबल कव्हरेज
  • झिरो डेप्रीसिएशन कव्हर 
  • रिटर्न टू इन्व्हॉइस कव्हर
  • इंजिन प्रोटेक्शन कव्हर

तुम्हाला फोर्ड फ्रीस्टाईल इन्शुरन्सच्या किमतीसह अगदी किरकोळ जास्तीचे पैसे भरून या एड-ऑन्सचा लाभ घेता येऊ शकतो.

4. नो-क्लेम बोनस

प्रत्येक क्लेम-फ्री वर्षासाठी तुम्हाला अतिरिक्त फायदे मिळतात. वास्तविक पाहता, फोर्ड फ्रीस्टाईल इन्शुरन्सच्या रिन्युअलच्या वेळेस तुमच्या प्रीमियम वरती डिजीट 50% पर्यंतचे डिस्काउंट ऑफर करतो. इन्शुररची किती वर्षे क्लेम-फ्री आहेत यावर डिस्काउंटची ही टक्केवारी अवलंबून असते.

5. आयडीव्ही कस्टमायझेशन

तुम्ही तुमच्या फोर्ड फ्रीस्टाईल इन्शुरन्सची आयडीव्ही कस्टमाइज करू शकता. यामुळे तुम्ही, तुमच्या कारचे नुकसान झाल्यास किंवा टी चोरीला गेल्यास तुम्हाला किती रक्कम मिळेल हे जाणून घेऊ शकता.

6. सर्वाधिक क्लेम सेटलमेंट रेशिओ

डिजीटचा सर्वाधिक क्लेम रेशिओ 96% इतका आहे. तुम्ही जर डिजीटकडून फोर्ड फ्रीस्टाईल कार इन्शुरन्स खरेदी केलात तर तुम्ही 7 मिनिटांमध्ये पूर्ण होणाऱ्या स्मार्ट फोन एनेबल्ड क्लेम प्रोसेसचा लाभ घेऊ शकता.

त्याच बरोबर, तुम्ही तुमची कार इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाईन खरेदी किंवा रिन्यू करू शकता. कार इन्शुरन्सच्या किमतीसंबंधी सर्व माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच, डिजीट तुम्हाला 24x7 कस्टमर सपोर्टची हमी देतो जो तुम्हाला आणीबाणीच्या काळामध्ये अत्यंत मदतगार ठरतो.

फोर्ड फ्रीस्टाईलसाठी कार इन्शुरन्स खरेदी करणे का गरजेचे आहे?

कोणतीही कार खरेदी केल्यावर त्यासाठी कार इन्शुरन्स खरेदी करणे अनिवार्य आहे. कार इन्शुरन्स तुम्हाला बचतीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करू शकतो. चला बघूया कसे?

तुम्हाला कायद्याच्या नियमांत राहून कार चालवण्यास मदत करते: भारतामध्ये जर तुम्ही इन्शुरन्स नसलेली कार रस्त्यावर चालवत असाल तर हा एक कायदेशीर अपराध आहे. पहिल्यांदा हा नियम तोडल्याबद्दल ₹2000 इतका दंड भरावा लागू शकतो आणि/किंवा तीन महिन्यांसाठी अटक होऊ शकते. पुन्हा हा नियम तोडल्यास ₹4000 इतका दंड भरावा लागू शकतो आणि तीन महिन्यांसाठी अटक होऊ शकते. तसेच तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स देखील रद्द केला जाऊ शकतो.

इन्शुरन्स नसताना कार चालवल्याबद्दlचे दंड याबद्दल आणखीन जाणून घ्या.

  • थर्ड पार्टी लायबिलिटी पासून तुम्हाला सुरक्षा देण्यासाठी: भारतामध्ये थर्ड पार्टी कार इन्शुरन्स असणे बंधनकारक आहे. यामुळे तुम्हाला लीगल कम्प्लायंस पूर्ण करता येतो आणि तसेच थर्ड पार्टी क्लेम देखील कव्हर केले जातात. या पॉलिसी अतर्गत, तुम्ही जबाबदार असलेल्या थर्ड पार्टी मालमत्तेच्या नुकसानासाठी इन्शुरर तुमच्या वतीने थर्ड पार्टीला क्लेमची रक्कम पे करतो. कधी कधी ही रक्कम खूप जास्त असू शकते, त्यामुळे अशा वेळेस थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे कधी ही श्रेयस्कर ठरते.
  • कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी अंतर्गत तुमच्या कारला सुरक्षित करणे: कॉम्प्रिहेन्सिव्ह कर इन्शुरन्स अंतर्गत तुमच्या कारला अपघात किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित दुर्घटनेमुळे झालेले नुकसान कव्हर केले जाते. तुमची थर्ड पार्टी लायबिलिटी देखील या पॉलिसी अंतर्गत कव्हर केली जाते.
  • एड-ऑन्स सह आणखीन उत्तम सुरक्षा: तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन सोबत तुम्ही त्या विशिष्ट एड-ऑनची किंमत देऊन त्याचा लाभ घेऊ शकता. एड-ऑन्स तुम्हाला काही विशिष्ट परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी तयार केले आहेत. जसे की रिटर्न टू इन्व्हॉइस या एड-ऑन मुळे तुम्हाला क्लेम केल्यावर कारची संपूर्ण किंमत परत मिळते. इंजिन प्रोटेक्शन, ब्रेकडाऊन असिस्टंस ई. इतर एड-ऑन्सही आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या कारचे कव्हरेज वाढवू शकता.

कार इन्शुरन्स कॅल्क्युलेटर बद्दल आणखीन जाणून घ्या.

फोर्ड फ्रीस्टाईल बद्दल आणखीन जाणून घ्या

होय, अगदी बरोबर! जेव्हा तरुण पिढी एखादी हॅचबॅक खरेदी करण्याचा विचार करते तेव्हा त्यांना कोणता चांगला पर्याय मिळत नाही. याचे कारण आहे की बाजारात अनेक कार्स आहेत ज्या एका फॅमिलीसाठी अगदी सूटेबल आहेत परंतु तरुण पिढीला साजेशी हॅचबॅक बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे तरुण पिढीच्या गरजा आणि अपेक्षांवर खरी उतरू शकेल अशी फिगोसारखी दिसणारी पॉवर 100 होर्सेस इतकी पावर असणारी कार फोर्डने बाजारात आणली. या कारची एक्स-शोरूम किंमत ₹. 5.82 पासून सुरु होते.

तुम्ही फोर्ड फ्रीस्टाईल का खरेदी करावी?

  • लूक्स लाईक अ बीस्ट: तुम्ही या कारकडे बघितलंत तर कदाचित तुम्ही कन्फ्यूज व्हाल कारण ही एका मोठ्या फोर्ड फिगो सारखीच दिसते. होय, ही एक क्रॉसहॅच आहे! ही फॅमिली हॅचबॅकचीच पुढची रेंज आहे जिचा ग्राउंड क्लीअरन्स वाढवलेला आहे आणि बाहेरून एसयूव्ही सारखे मजबूत कम्पोनंट्स दिलेले आहेत. रूफ रेलिंग, खालच्या बाजूला क्लेडिंग आणि संपूर्ण बॉडी भोवती स्कफ प्लेट्स, या सर्व गोष्टी मिळून या कारला बीस्ट सारखा लूक देतात.

गनमेटल कलरच्या एलॉय व्हील्स या कारच्या पर्सनॅलिटीला अगदी साजेसे दिसतात. बोनेट एका शार्प कट ग्रील मागे सेट केलेले आहे. सुबक असे बम्पर त्याच्या एंग्यूलर सी-शेप फॉग लॅम्प एन्क्लोजर्स याला एक एग्रेसिव्ह लूक देतात. हेडलॅम्प्सवरील स्मोक इफेक्ट या कारला आणखीनच आकर्षक बनवतात.

  • मोठी बूट स्पेस: या कर मध्ये सेगमेंट लीडिंग बूट स्पेस आहे. जर तुम्ही लॉंग ड्राईव्हला जाण्याचा प्लॅन करत असाल तर या जागेत भरपूर सामान मावते. ही छोट्या कारला पर्यायी कार ठरते.
  • स्टायलिश कॅबिन: फोर्ड फ्रीस्टाईलचे इंटिरियर अगदीच आकर्षक रंगांनी डिझाईन केले आहे. या कार मध्ये आतल्या बाजूला चॉकलेट ब्राऊन आणि ब्लॅक कलरचे कॉम्बिनेशन दिले आहे जे बेज कलरचे प्लास्टिक डॅशबोर्डचे इंटिरियर देणाऱ्या हिच्या कॉम्पिटिटर्स पेक्षा जास्त प्रीमियम लूक देते. नवीन स्टिअरिंग व्हील मध्ये माउंटेड कन्ट्रोल्स आहेत. सेंटर कन्सोल मधील भरपूर जागा आणि मोठ्या डोअर बिन्स मुळे ही कार हिच्या रायव्हल्सपेक्षा उठून दिसते. यामध्ये 6.5 इंचाचे टचस्क्रीन इन्फोसिस्टम आहे जे एपलकार प्ले आणि एंड्रॉइड ऑटोला सपोर्ट करते.
  • सुरक्षा: फोर्डसाठी सुरक्षा सर्वतोपरी आहे, यामध्ये काही शंका नाही. या कारमध्ये 6 एअरबॅग्स, ट्रॅक्शन कन्ट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, एन्टी-रोलओव्हर प्रोटेक्शन, स्पीड-सेन्सिंग डोअर लॉक्स, आणि अतिरिक्त सुरक्षेसाठी रिअर पार्किंग सेन्सर्स देखील दिले आहेत.
  • सुखद ड्रायव्हिंग: पेट्रोल व्हेरियंटसाठी या कार मध्ये 1.2 लिटरचे 3 सिलेंडरचे इंजिन आहे. आणि डीझेल व्हेरियंट साठी 1.5 लिटरचे इंजिन आहे. दोन्हीही इंजिन फ्री-रीव्हिंग इंजिन्स आहेत, जे 6000 आरपीएम (रेव्होल्युशन्स प्रति मिनिट) देण्याइतके सक्षम आहेत. जाड टायर्स, रिटर्न्ड ससपेन्शंस, रिफाइन्ड गिअर बॉक्स, सुप्रीम ब्रेक्स, उत्तम क्लच एक्शन्स, हे सर्व फीचर्स एकत्र येऊन फोर्ड कडून मिळालेल्या सुखद ड्रायव्हिंगच्या हमीची फ्रीस्टाईल मॉडेल मध्ये देखील पूर्तता होईल याची खात्री देतात.

फ्रीस्टाईलचे व्हेरियंट्स

व्हेरियंटचे नाव व्हेरियंटची किंमत (मुंबई मध्ये, शहराप्रमाणे किंमत बदलू शकते)
फ्रीस्टाईल टायटॅनियम 1.2 टी-आय-व्हीसीटी ₹ 8.58 लाख
फ्रीस्टाईल टायटॅनियम प्लस 1.2 टी-आय-व्हीसीटी ₹ 8.99 लाख
फ्रीस्टाईल फ्लेअर एडिशन 1.2 टी-आय-व्हीसीटी ₹ 9.33 लाख
फ्रीस्टाईल टायटॅनियम 1.5 टीडीसीआय ₹ 10.02 लाख
फ्रीस्टाईल टायटॅनियम प्लस 1.5 टीडीसीआय ₹ 10.44 लाख
फ्रीस्टाईल फ्लेअर एडिशन 1.5 टीडीसीआय ₹ 10.79 लाख

[1]

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

थर्ड पार्टी डॅमेज साठी डिजीट जास्तीत जास्त किती कव्हरेज देऊ शकते?

पर्सनल डॅमेजसाठी डिजीट अनलिमिटेड लायबिलिटी कव्हर देतो आणि मालमत्ता किंवा कारच्या डॅमेजसाठी ₹ 7.5 चे कव्हरेज देतो.

मी जर नवीन कार घेतली तर माझा एनसीबी म्हणजेच नो क्लेम बोनस वैध राहील का?

होय, जरी तुम्ही नवीन कार खरेदी केलीत, तरी तुम्ही तुमच्या जुन्या कार पलिसी अंतर्गत साठलेल्या नो-क्लेम बोनसचा लाभ घेऊ शकता.