भारतामध्ये होम इन्शुरन्स पोर्ट करा: फायदे आणि ट्रान्स्फर कसे कराल?
हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलिटी म्हणजे काय?
हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलिटी ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे तुम्ही तुमची सध्याची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी तुमच्या पसंतीच्या दुसऱ्या इन्शुरन्स कंपनीकडे हस्तांतरित करू शकता. ज्याप्रमाणे तुम्ही एका मोबाईलचे सिमकार्ड पोर्ट करता अगदी त्याचप्रमाणे इन्शुरन्ससुद्धा स्विच करू शकता!
तथापि, याला केवळ विमा कंपनी शिफ्ट केली असं समजू नका. हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलिटीचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही केवळ एका चांगल्या योजनेत इन्शुरन्स पॉलिसी हस्तांतरित करत नाही तर तुमचा प्रतीक्षा कालावधी आणि नो क्लेम बोनस देखील हस्तांतरित केला जातो.जेणेकरून तुम्हाला तुमचा प्रतीक्षा कालावधी अगदी सुरुवातीपासून सुरू करण्याची किंवा तुमचा बोनस गमावण्याची वेळ येणार नाही.
आपली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी डिजिटवर का पोर्ट करा?
सोपी ऑनलाइन प्रक्रिया – हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याच्या प्रक्रियेपासून ते क्लेम करण्यापर्यंत सगळे पेपरलेस, सोपे, झटपट आणि त्रासमुक्त! हार्ड कॉपी नाही, अगदी क्लेम्ससाठीही!
वय-आधारित किंवा झोन-आधारित को-पेमेंट नाही - आमचा हेल्थ इन्शुरन्स वय-आधारित किंवा झोन-आधारित कोपेमेंटसह येत नाही. याचा अर्थ असा की, हेल्थ इन्शुरन्सच्या क्लेम्सदरम्यान, आपल्याला आपल्या खिशातून काहीही देण्याची आवश्यकता नाही.
खोलीच्या भाड्यावर बंधन नाही – आम्ही मानतो की प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. त्यामुळेच आम्ही खोलीभाड्यावर बंधन ठेवले नाही. आपल्याला आवडेल अशी कोणतीही हॉस्पिटल रूम निवडा.
एस.आय वॉलेट बेनिफिट - जर आपण पॉलिसीच्या कालावधीत आपली सम इन्शुअर्ड संपवलीत, तर आम्ही ती तुमच्यासाठी पुन्हा भरतो.
कोणत्याही रुग्णालयात उपचार घ्या - कॅशलेस उपचारांसाठी भारतातील आमच्या 10500+ नेटवर्क रुग्णालयांपैकी एकाची निवड करा किंवा रीएम्बर्समेंटचा पर्याय निवडा.
वेलनेस बेनिफिट्स- टॉप-रेटेड हेल्थ आणि वेलनेस पार्टनर्सच्या सहकार्याने डिजिट ॲपवर अनन्य वेलनेस बेनिफिट्स मिळवा.
माझी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी डिजिटवर पोर्ट करण्याची प्रक्रिया काय आहे?
- स्टेप 1: डिजिट हेल्थच्या वर दिलेल्या पोर्टवर क्लिक करा
- स्टेप 2: तुमचे नाव आणि मोबाईल नंबर ऑनलाइन एंटर करा.
- स्टेप 3: बस! बाकीचे आमच्यावर सोडा! तुम्हाला ४८ तासांच्या आत आमचे तज्ज्ञ संपर्क साधतील जे तुम्हाला तुमचा आरोग्य विमा यशस्वीपणे पोर्ट करण्यात मदत करतील.
डिजिटसह हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलिटीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:
- तुमचे सध्याच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे शेड्यूल तुमच्या सध्याच्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून घ्यायला हवे
- ओळखपत्र
- उर्वरित तपशील, जसे की तुमच्याविषयीची वैद्यकीय माहिती आणि क्लेम संदर्भातील माहिती तुमच्याकडून फोनद्वारे घेतली जाईल.
तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी मध्ये तुम्ही काय काय पोर्ट करू शकता?
इन्शुरन्सचा लाभ घेणारे सगळे सदस्य
सध्याच्या इन्शुरन्सची रक्कम
तुमचा जमा झालेला संचयी बोनस
तुम्ही इन्शुरन्स काढताना सांगितलेल्या आजारासाठीचा प्रतीक्षा कालावधी
तुमचा विशिष्ट रोग प्रतीक्षा कालावधी
हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करतानाचे पॉलिसीहोल्डरचे (म्हणजेच तुमचे!) हक्क
आयआरडीएआयनुसार, प्रत्येक पॉलिसीधारकाला त्याची पॉलिसी (वैयक्तिक आणि कौटुंबिक दोन्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींना लागू) एका सामान्य किंवा विशेष हेल्थ इन्शुरन्स देणाऱ्या कंपनीकडून दुसऱ्या इन्शुरन्स कंपनीकडे पोर्ट करण्याचा अधिकार आहे.
आयआरडीएआय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नवीन हेल्थ इन्शुरन्स देणारी कंपनी पॉलिसीधारकाला आधीच्या हेल्थ इन्शुरन्समध्ये उल्लेख करण्यात आलेली किमान विमा रक्कम देण्यास बांधील आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पॉलिसीधारकांच्या आधीच्या इन्शुरन्सचा प्रतीक्षा कालावधी होऊन गेला असेल तर इन्शुरन्सचे त्यानुसार मिळणारे लाभ प्रदान करण्यास जिथे पोर्ट करण्यात आलंय ती नवीन हेल्थ इन्शुरन्स कंपनी बांधील आहे. याचाच अर्थ हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलिटीमध्ये- एखाद्याला त्यांचा जमा केलेला नो क्लेम बोनस आणि प्रतीक्षा कालावधीदेखील हस्तांतरित करता येतो.
आयआरडीएआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, संबंधित हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी यशस्वीरित्या हस्तांतरित केली गेली आहे का याची खात्री करणे ही नवीन आणि जुन्या इन्शुरन्स कंपनीचीही जबाबदारी आहे.
आयआरडीएआय द्वारा सेट केलेले हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबलिटीसंबंधी नियम - तुमच्यासाठी सोप्या पद्धतीने खाली मांडण्यात आले आहेत
तुम्ही तुमची इन्शुरन्स पॉलिसी फक्त तशाच प्रकारच्या दुसऱ्या पॉलिसीमध्ये पोर्ट करू शकता. याचा अर्थ तुम्ही स्विच करताना कव्हरेज, योजना किंवा पॉलिसीचा प्रकार पूर्णपणे बदलू शकत नाही.
इन्शुरन्स कंपन्यांचं वर्गीकरण सामान्यतः लाईफ इन्शुरन्स कंपन्या किंवा सामान्य इन्शुरन्स कंपन्या असं केलं जातं.. जेव्हा तुम्ही पोर्ट करता, तेव्हा तुम्ही समान प्रकारच्या कंपनीकडे पोर्ट करत आहात की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे, डीजीट ही एक सामान्य विमा कंपनी आहे.
जर तुम्ही तुमचा हेल्थ इन्शुरन्स पोर्ट करू इच्छित असाल, तर तुम्हाला नुतनीकरणादरम्यान पोर्ट करावे लागेल आणि तुम्ही या दरम्यान पॉलिसीचा कालावधी लॅप्स करू शकत नाही. कारण यामुळे तुमचा पोर्टचा प्रस्ताव नाकारला जाऊ शकतो.
कोणतीही गोष्ट योग्य रित्या बंद करणं आवश्यक आहे. त्यामुळेच तुम्ही तुमची पॉलिसी पोर्ट करण्याची योजना करत आहात हे तुमच्या सध्याच्या इन्शुरन्स कंपनीला कळवणे आवश्यक आहे. ही माहिती लेखी स्वरूपात सांगण्याची गरज आहे.तुमच्या पॉलिसीचे नुतनीकरण होण्याच्या किमान ४५ दिवस आधी आपण आपल्या सध्याच्या इन्शुरन्स कंपनीला याबाबत कळवावे.
एकदा तुम्ही तुमचे काम पूर्ण केल्यावर आणि तुमच्या सध्याच्या विमा कंपनीला कळवले की, तुमचा आरोग्य विमा पोर्ट करण्याची तुमची विनंती मान्य करण्यासाठी त्यांच्याकडे तीन दिवसाचा कालावधी असतो.
आयआरडीएआयच्या नियमांनुसार, कोणतीही इन्शुरन्स कंपनी (तुमची सध्याची किंवा इन्शुरन्स पोर्ट करत असलेली नवी कंपनीसुद्धा) तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी पोर्ट करण्याच्या प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारू शकत नाही.
कोणत्याही लाईफ इन्शुरन्सचा प्रीमियम हा इन्शुरन्स कंपनी वेगवेगळ्या घटकांच्या आधारे ठरवते. कारण प्रत्येक इन्शुरन्स कंपनीच्या वेगवेगळ्या सेवा आणि लाभ असतात. तुमच्या सध्याच्या इन्शुरन्स कंपनीकडून तुमच्या पुढच्या इन्शुरन्स हप्त्यात बदल केले जाऊ शकतात.
तुमची हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलिटी प्रक्रिया सुरू असताना तुम्हाला अतिरिक्त वाढीव कालावधी मिळण्याची परवानगी आहे. याचाच अर्थ तुमची जुनी पॉलिसी किती दिवस सक्रिय होती त्यानुसार तुमचा हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम आकारला जाईल.
तुमची पॉलिसी पोर्ट करताना तुम्ही तुमच्या इन्शुरन्स रक्कम वाढवण्याचा पर्याय निवडू शकता. तथापि, ते तुमच्या नवीन हेल्थ इन्शुरन्स कंपनीने मंजूर करायला हवे.
तुम्ही तुमच्या पूर्वीच्या इन्शुरन्स कंपनीपेक्षा वेगळ्या प्रतीक्षा कालावधीसह येणारे नवीन कव्हरेज निवडले नसल्यास सामान्यतः, तुमची पॉलिसी पोर्ट करताना प्रतीक्षा कालावधी प्रभावित होत नाही. उदाहरणार्थ- विशिष्ट आजारांसाठी किंवा आधीपासून असलेल्या रोगांच्या खर्चासाठी तुमचा प्रतीक्षा कालावधी प्रभावित होणार नाही. कारण तो हेल्थ इन्शुरन्सच्या योजनांचा भाग आहे. तथापि, जर तुम्ही आत्ताच पोर्टिंग दरम्यान मॅटर्निटी कव्हर निवडले असेल तर तुम्हाला तुमच्या नवीन इन्शुरन्स कंपनीकडे त्यासाठी प्रतीक्षा कालावधी पूर्ण करावा लागेल.
तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुम्ही कधी पोर्ट करावी?
जेव्हा तुम्ही तुमच्या सध्याच्या हेल्थ इन्श्युरन्स प्रोव्हायडरच्या सेवा असमाधानकारक असतील.
तुमचा सध्याचा हेल्थ इन्शुरन्स, त्याची सेवा, वार्षिक प्रीमियम किंमत किंवा योजना तुमच्यासाठी आणि तुमच्या आरोग्यसेवा गरजांसाठी योग्य नसल्यास या प्रकरणात, जेव्हा नुतनीकरणाची वेळ येते (आदर्शपणे, तुमच्या सध्याच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीच्या कालबाह्य तारखेच्या किमान ४५ दिवस आधी) तुम्ही तुमच्या पर्यायांचे मूल्यमापन करू शकता आणि तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीला तुमच्यासाठी आणि तुमच्या अपेक्षांसाठी योग्य वाटणारी योजना आणि इन्शुरन्स कंपनीकडे पोर्ट करू शकता. .
जेव्हा मार्केट मध्ये इतर अनेक चांगले प्लॅन्स उपलब्ध आहेत.
तुमची सध्याची हेल्थ इन्शुरन्स कंपनी उत्तम आहे.मात्र तरीही तुम्हाला तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आवश्यक असलेले मौल्यवान फायदे मिळत नाहीत.अशा परिस्थितीत तुम्ही पोर्ट करु शकता. उदाहरणार्थ, कदाचित तुम्ही तुमच्या पालकांसाठी आयुष लाभ किंवा स्वतःसाठी मॅटर्निटी कव्हर शोधत असाल, परंतु तुमची सध्याची हेल्थ इन्शुरन्स कंपनी तुम्हाला हवे तसे कव्हर देत नाही.अशा प्रकरणात, किमान तीन इन्शुरन्स कंपन्यांकडून तुम्ही कोणत्या प्रकारचे फायदे शोधत आहात याचे मूल्यांकन करा आणि नंतर तुमचा विश्वास असलेल्या कंपनीकडे तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी पोर्ट करा.
मात्र तुमच्या सध्याच्या पॉलिसीच्या शेवटच्या तारखेच्या ४५ दिवस आधी तुम्ही ही प्रक्रिया सुरू केली आहे का ? हे एकदा तपासून बघा. जेणेकरून तुमची पोर्टेबिलिटी प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल.
जेव्हा तुम्हाला एका अशा हेल्थ इन्श्युरन्सशी जोडलं जावसं वाटतं जे डिजिटल आहे.
तुमच्याकडे दीर्घकाळापासून हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे. मात्र तुमची सध्याची इन्शुरन्स कंपनी डिजिटल फ्रेंडली किंवा कॉन्टॅक्टलेस असेल तर अशावेळी तुमचा हेल्थ इन्शुरन्स डिजिटल हेल्थ इन्शुरन्स पर्यायावर पोर्ट करा जेणेकरून तुम्हाला पुन्हा त्याच समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
तुमचे हेल्थ इन्श्युरन्स पोर्ट करण्याआधी माहिती असायला हव्यात अशा 3 गोष्टी
1. तुमच्या सध्याच्या पॉलिसीच्या एक्सपायरी डेट वर लक्ष असू द्या.
प्रत्येक गोष्टीसाठी वेळ महत्त्वाची असते. हेल्थ इन्शुरन्स पोर्टिंगच्या बाबतीत तर हे अगदी खरे आहे. लक्षात ठेवण्यासारख्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे तुम्ही तुमच्या हेल्थ इन्शुरन्स नुतनीकरणाच्या वेळीच तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी पोर्ट करू शकता.
आणखी महत्त्वाची बाब म्हणजे, जर तुम्हाला ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करायची असेल तर तुम्हाला तुमच्या सध्याच्या इन्शुरन्स कंपनीला किमान ४५ दिवस अगोदर कळवणे आवश्यक आहे. एकदा तुमची पॉलिसी कालबाह्य झाली की तुम्ही दुसऱ्या कंपनीकडे पोर्ट करू शकत नाही.
2. रिजेक्शन टाळण्यासाठी तुमच्या नवीन हेल्थ इन्श्युरन्स प्रोव्हायडरशी प्रामाणिक रहा.
कोणत्याही नात्यात पारदर्शकता असणं महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे, तुमच्या नवीन हेल्थ इन्शुरन्स कंपनीशी तुमचे व्यवहार सुरू करताना, भविष्यात कोणताही नकार किंवा समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या क्लेमच्या इतिहासाबद्दल आणि वैद्यकीय इतिहासाबद्दल त्यांच्याशी प्रामाणिक राहा.
3. हे लक्षात असू द्या की कधी कधी छोटे छोटे प्लॅन्स देखील वेगवेगळ्या बेनिफिट्ससह मिळू शकतात.
तुम्ही एकसारख्याच हेल्थ इन्शुरन्स योजनेसाठी पोर्टिंग करत असल्यास, लक्षात ठेवा की समान प्लॅनससहीत अजूनही वेगवेगळे फायदे विमाधारकाला मिळतात.
उदाहरणार्थ, वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांची खोली भाड्याची मर्यादा वेगळी असेल (किंवा खोलीचे भाडे कॅपिंग अजिबात नसेल!). त्यामुळे प्रत्येक गोष्ट तशीच राहील असे गृहीत न धरता तुम्ही प्रत्येक फायद्याबद्दल काळजीपूर्वक वाचा याची खात्री करा!
तुमचे हेल्थ इन्श्युरन्स पोर्ट करण्याचे काय काय फायदे आणि तोटे आहेत?
फायदे | तोटे |
---|---|
सातत्य - तुमची हेल्थ इन्शुरन्स योजना पोर्ट करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला कोणतेही फायदे सोडण्याची गरज नाही. उदाहरणार्थ: जर तुमच्या नवीन हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा विशिष्ट रोगांसाठी ३-वर्षांचा प्रतीक्षा कालावधी असेल आणि तुमची आधीची योजना २ वर्षांसाठी असेल - तर तुम्हाला त्या विशिष्ट रोगांसाठी दावा करण्यासाठी आणखी एक वर्ष प्रतीक्षा करावी लागेल, उलट नवीन योजना घेत असल्यास तुम्हाला पुन्हा प्रतीक्षा कालावधी सुरू करावा लागेल! | तुम्ही केवळ नुतनीकरणादरम्यानच पोर्ट करू शकता - तुमच्या आरोग्य विमा पॉलिसीचे नूतनीकरण करण्याची वेळ आल्यावरच तुम्ही तुमचा हेल्थ इन्शुरन्स पोर्ट करू शकता. सूचना:जर तुम्हाला तुमचा हेल्थ इन्शुरन्स पोर्ट करायचा असेल, तर तुमच्या नुतनीकरणाच्या २-महिने आधी पर्याय शोधा. मूल्यमापन सुरू करा जेणेकरून तुमच्या हातात निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ असेल आणि नंतर हेल्थ इन्शुरन्स पोर्ट करण्यासाठी अर्ज करा. |
तुमचा नो क्लेम बोनस ठेवा - तुमचा हेल्थ इन्शुरन्स पोर्ट करण्याचा एक फायदा असा आहे की तुम्हाला तुमचा नो क्लेम बोनस सोडण्याची गरज नाही. तो तुमच्या नवीन हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये जोडला जाईल. | तुमच्या प्लॅनमध्ये मर्यादित बदल - तुम्ही तुमची आरोग्य विमा योजना समान फायद्यांसह एका चांगल्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडे पोर्ट करू शकता. प्लॅन आणि कव्हरेजमध्ये अधिक बदल किंवा सानुकूलित करण्यासाठी - तुमचा हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम आणि त्याच्याशी संलग्न अटी आणि नियमानुसार तपासून पाहा. |
इन्शुरन्स कंपनीत बदल करूनही तुमचा प्रतीक्षा कालावधी प्रभावित होत नाही - वर नमूद केल्याप्रमाणे, पोर्टिंग करताना तुम्हाला सतत लाभ मिळत असल्याने, तुम्ही तुमचा आरोग्य विमा पोर्ट करता तेव्हा तुमच्या प्रतीक्षा कालावधीवर परिणाम होत नाही. तुम्ही तुमच्या मागील आरोग्य विमा प्रदात्यासोबत किती वेळ पूर्ण केला आहे यावर आधारित तुमचा कालावधी ठरतो. | तुमच्या आधीच्या प्लॅनच्या तुलनेत तुम्हाला विस्तृत कव्हरेज हवे असल्यास जास्त प्रीमियम भरण्याची तयारी ठेवा, जर तुम्ही ठरवले असेल की तुम्हाला तुमच्या आधीच्या इन्शुरन्स कंपनीच्या योजनेपेक्षा खूप वेगळी योजना आणि जास्त कव्हरेजची योजना हवी आहे, तर तुमचा प्रीमियम देखील त्यानुसार भिन्न असू शकतो. |
भारतामधील हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबलिटीबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
पॉलिसीहोल्डर पोर्टेबलिटीसाठी कधी अर्ज करू शकतो?
हेल्थ इन्श्युरन्स रिन्युअल ड्यू डेटच्या 60 दिवस आधी तुम्ही पोर्टेबलिटीसाठी अर्ज करू शकता.
मी पोर्ट केल्यावर माझ्या वेटिंग पिरियडवर काही परिणाम होतो का?
नाही, पोर्ट करण्याचा हा फायदा आहे की जरी तुम्ही नवीन हेल्थ इन्श्युरन्स मध्ये पोर्ट केले तरी तुमचा वेटिंग पिरिअड पुन्हा शून्यावर येत नाही, म्हणजेच तुम्हाला तुमचा वेटिंग पिरिअड पुन्हा नव्याने सुरु करण्याची गरज पडत नाही.
तुम्ही तुमची हेल्थ पॉलिसी पोर्ट केल्यानंतर तुमचे काही नुकसान होते का?
नाही, पोर्टेबलिटीची संपूर्ण प्रोसेसच अशी आहे की जेणेकरून जमा झालेल्या क्यूमिलेटिव्ह बोनसचे, आणि पार केलेल्या वेटिंग पिरिअडच्या रकमेचे असे कोणतेही नुकसान होणार नाही.
तुम्ही तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करण्याचा विचार कधी करायला हवा?
जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीपेक्षा चांगली हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी उपलब्ध आहे जी आणखीन चांगले बेनिफिट्स देते, तेव्हा पुढच्या रिन्युअल पिरिअडदरम्यान तुम्ही तुमची पॉलिसी पोर्ट करण्याचा विचार करू शकता.
हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करताना कोणत्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात?
हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करताना लोकांना येणाऱ्या अडचणींपैकी सर्वात सामान्य अडचण म्हणजे रिजेक्शनची शक्यता. प्रत्येक हेल्थ इन्श्युरन्स प्रोव्हायडरला पोर्टेबलिटीची रिक्वेस्ट रिजेक्ट किंवा अॅक्सेप्ट करण्याचे स्वातंत्र्य आहे, यामुळे असे होऊ शकते. साधारणतः तुमची क्लेम्स हिस्ट्री, तुम्ही दिलेल्या मेडिकल डीटेल्स, इन्श्युर्ड मेम्बर्सचे वय आणि इतर पॅरामीटर्सच्या आधारे ते हा निर्णय घेतात.
तुम्ही निवडलेली हेल्थ इन्श्युरन्स कंपनी तुमची पोर्टेबलिटीची रिक्वेस्ट रिजेक्ट करू शकते का?
होय, प्रत्येक हेल्थ इन्श्युरन्स कंपनीला कोणतीही पोर्टेबलिटीची रिक्वेस्ट रिजेक्ट किंवा अॅक्सेप्ट करण्याचा हक्क आहे. तरी, सर्वात जेनुईन केसेस मध्ये आणि विशेषतः नो क्लेम्स हिस्ट्री असलेल्या कस्टमर्सच्या बाबतीत, त्यांची पोर्टेबलिटीची रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली जाते. 😊
मी हेल्थ इन्श्युरन्स कधी ही पोर्ट करू शकतो का?
नाही, जेव्हा तुमच्या सध्याची पॉलिसीच्या रिन्युअलची वेळ येते तेव्हांच तुम्ही तुमचे हेल्थ इन्श्युरन्स पोर्ट करू शकता. आम्ही असे सुचवतो की तुमची सध्याची हेल्थ पॉलिसी एक्स्पायर होण्याच्या किमान 45 दिवस आधी तुम्ही ती पोर्ट करावी.
मी माझे हेल्थ इन्श्युरन्स वर्षाच्या मध्येच पोर्ट करू शकतो का?
नाही, जेव्हा तुमच्या सध्याची पॉलिसीच्या रिन्युअलची वेळ येते तेव्हांच तुमचे हेल्थ इन्श्युरन्स पोर्ट केले जाऊ शकते. तुम्ही योग्य वेळी पोर्ट करताय याची खात्री करण्यासाठी तुमच्या सध्याच्या पॉलिसीच्या एक्स्पायरी डेटच्या किमान 45 दिवस आधी पोर्टेबलिटी साठी अर्ज करा.
माझी हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबलिटीची रिक्वेस्ट रिजेक्ट झाली तर काय होते आणि का रिक्वेस्ट रिजेक्ट का होते?
जर तुमची पोर्टेबलिटीची रिक्वेस्ट रिजेक्ट झाली असेल तर तुम्ही तुमच्या इंश्युररला त्याचे कारण विचारू शकता आणि काही दुरुस्ती करता येईल का असे ही विचारू शकता. हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबलिटीची रिजेक्शन्सची सामान्य कारणे म्हणजे मेडिकल हिस्ट्री किंवा क्लेम हिस्ट्रीबद्दल अपूर्ण किंवा चुकीच्या दिलेल्या डीटेल्स, पोर्टेबलिटीची रिक्वेस्ट वेळेत पूर्ण न केल्यास, किंवा तुमची सध्याची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट साठी अर्ज करण्याधीच एक्स्पायर झाली आहे.
हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करताना पॉलिसीहोल्डरचे वय महत्त्वाचे असते का?
होय, इतर कोणत्याही हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी प्रमाणे - तुमचे वय महत्त्वाचे असते. जेवढे तुमचे वय जास्त असेल तेवढा कदाचित प्रीमिअम देखील जास्त असेल.
माझा प्लॅन पोर्ट करण्याऐवजी मी दोन वेगवेगळ्या हेल्थ इंश्युरन्स प्रोव्हायडरकडून हेल्थ इन्श्युरन्स विकत घेऊ शकतो का?
होय, आपण हे करू शकता. तरी, आम्ही तुम्हाला एका आणखीन चांगल्या प्लॅन साठी सुपर टॉप-अप घेण्याबद्दल सुचवू, ज्यामध्ये तुमच्या सध्याच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीपेक्षा वरचढ कव्हरेज असेल.
लोक त्यांचे हेल्थ इन्श्युरन्स का पोर्ट करतात?
बरेच लोक त्यांच्या सध्याच्या इन्श्युररच्या सेवेशी म्हणजेच सर्व्हिसेस किंवा रिन्युअलच्या वेळी वाढवण्यात आलेल्या प्रीमिअममुळे असमाधानी असल्याने, किंवा ते कमी प्रीमिअम आणि भरपूर बेनिफिट्स असलेला आणखीन चांगला पर्याय शोधत असल्यामुळेत्यांचा हेल्थ इन्श्युरन्स पोर्ट करून घेतात.
पोर्ट करण्याऐवजी मी माझ्या सध्याच्या हेल्थ इन्श्युरन्स प्रोव्हायडरसोबतच फक्त माझा प्लॅन बदलून घेऊ शकतो का?
होय, आपण हे करू शकता 😊जनरली, सध्याचे हेल्थ इन्श्युरन्स रिन्यू करताना त्यामधील प्लॅन आणि कव्हरेज मध्ये बदल करता येऊ शकतात. तरी, इंश्युरर प्रमाणे नियम वेगवेगळे असू शकतात, त्यामुळे त्याबद्दल तुमच्या इन्श्युरन्स प्रोव्हायडरशी चेक करा.