हेल्थ इन्शुरन्समध्ये क्रिटिकल इलनेस फायदे
क्रिटिकल इलनेस कव्हर हा आपल्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅन मध्ये समाविष्ट केलेला किंवा आपल्या इन्शुरर आणि निवडलेल्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅनच्या प्रकारावर अवलंबून अॅड-ऑन कव्हरद्वारे उपलब्ध केलेला हेल्थ इन्शुरन्स फायदा आहे.
हेच आपल्याला विशिष्ट क्रिटिकल इलनेसपासून संरक्षण देते; कॅन्सर, फुफ्फुस किंवा यकृत निकामी होणे, अर्धांगवायू आणि इतर अनेक क्रिटिकल इलनेस हे सर्वात सामान्य आहेत. डिजिटमध्ये, क्रिटिकल इलनेस फायदे सध्या आमच्या सर्व हेल्थ इन्शुरन्स प्लॅनमध्ये डिफॉल्टद्वारे समाविष्ट आहे, ज्यात शून्य अतिरिक्त खर्च आहे.
क्रिटिकल इलनेस म्हणजे काय?
क्रिटिकल इलनेस ही गंभीर मेडिकल परिस्थिती आहे जी एखाद्या व्यक्तीच्या हेल्थवर, जीवनशैलीवर आणि अर्थव्यवस्थेवर महत्त्वपूर्ण आणि खोलवर परिणाम करते. कॅन्सर, स्क्लेरोसिस, कोमा, हृदय विकार, अर्धांगवायू इत्यादी आजारांची काही उदाहरणे आहेत.
दुर्दैवाने, आता हे एकदम सामान्य झाले आहे की आपण बऱ्याचदा कॅन्सरच्या प्रकरणांबद्दल वाचतो आणि ऐकतो, आणि जे केवळ काळानुरूप वाढते आहे. मग ती आपल्या ओळखीची व्यक्ती असो, किंवा आपण पेपरमध्ये वाचलेला लेख किंवा पोस्ट असो किंवा इंटरनेट; कॅन्सर सारखे क्रिटिकल इलनेस आणि हृदयाची गंभीर स्थिती, यकृत निकामी होणे, फुफ्फुस निकामी होणे इत्यादी अनेकांच्या जीवनाचा एक दु:खद भाग बनला आहे.
याचा परिणाम केवळ तब्येत आणि कल्याणावरच होत नाही, तर त्याच्या आर्थिक स्थितीवरही होतो. सुदैवाने, तथापि, आज हेल्थ इन्शुरन्स या खर्चांचे किफायतशीर पद्धतीने व्यवस्थापन करण्यास मदत करू शकतो जेणेकरून आपण किंवा आपल्या प्रियजनांना सहजपणे चांगले हेल्थ आणि कल्याण सुनिश्चित करता येईल.
डिजिटचे क्रिटिकल इलनेस फायदे म्हणजे काय?
क्रिटिकल इलनेस फायदा हा एक हेल्थकेअर फायदा आहे जो जेव्हा आपल्याला किंवा आपल्या प्रिय व्यक्तीस गंभीर आजाराचे निदान आणि उपचार केला जातो तेव्हा मेडिकल खर्च कव्हर करण्यास मदत करतो.
हेल्थ इन्शुरन्समध्ये, हा लाभ मोठ्या प्रमाणात अॅड-ऑन म्हणून प्रदान केला जातो जो अतिरिक्त खर्चासह हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना निवडला जाऊ शकतो.
तथापि, डिजिटद्वारे हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीत, आम्ही आमच्या सर्व हेल्थ इन्शुरन्स प्लॅनमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह फायदा म्हणून हा फायदा प्रदान करतो. कारण, आजार अचानक उद्भवतात आणि जेव्हा ते येतात तेव्हा आपल्याला स्वतला ही तरतूद केली असल्याने स्वतचा अभिमान वाटेल!
याव्यतिरिक्त, आमच्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅन मध्ये एक विशेष, अतिरिक्त 25% सम इनशूअर्डचा फायदा देखील आहे जो आपली सम इनशूअर्ड संपले आहे अशा परिस्थितीत वापरला जाऊ शकतो, विशेषत: हॉस्पिटलायझेशनसाठी आणि क्रिटिकल इलनेस मुळे उद्भवणाऱ्या उपचारांच्या खर्चासाठी समर्पित आहे.
क्रिटिकल इलनेस फायद्यामध्ये काय समाविष्ट आहे?
आपल्या हेल्थ इन्शुरन्समधील क्रिटिकल इलनेस फायदा हॉस्पिटलायझेशनपूर्वी आणि नंतरच्या सर्व खर्च कव्हर करेल; यात निदान, उपचार ते हॉस्पिटलायझेशन नंतरच्या खर्च या सर्व गोष्टींचा समावेश आहे.
महत्वाचे: कोविड 19 हेल्थ इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे याबद्दल अधिक जाणून घ्या
क्रिटिकल इलनेस फायद्यानंतर्गत येणारे आजार कोणते आहेत?
डिजिटमध्ये, क्रिटिकल इलनेस फायद्यानंतर्गत समाविष्ट असलेल्या आजार आणि रोगांची यादी खालीलप्रमाणे आहे:
प्रवर्ग | क्रिटिकल इलनेस |
---|---|
घातकता | विशिष्ट तीव्रतेचा कॅन्सर |
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी सिस्टम | हृदस्नायु रोधांग, ओपन हार्ट रिप्लेसमेंट किंवा हार्ट व्हॉल्व्हची दुरुस्ती, महाधमनीसाठी शस्त्रक्रिया, प्राथमिक (इडिओपॅथिक) पल्मोनरी हायपरटेन्शन, ओपन चेस्ट सीएबीजी(CABG) |
प्रमुख अवयव प्रत्यारोपण | शेवटच्या टप्प्यातील यकृताचा निकामीपणा, शेवटच्या टप्प्यातील फुफ्फुसाचा निकामीपणा, मूत्रपिंड निकामी होण्यामुळे नियमित डायलिसिसची आवश्यकता, प्रमुख अवयव / अस्थिमज्जा प्रत्यारोपण |
मज्जासंस्था | एपॅलिक सिंड्रोम, सौम्य ब्रेन ट्यूमर, विशिष्ट तीव्रतेचा कोमा, मोठ्या प्रमाणात डोक्यावर आघात, हातपायाचा कायमचा अर्धांगवायू, कायमस्वरूपी लक्षणांसह मोटर न्यूरॉन रोग, कायमस्वरूपी लक्षणांसह मल्टीपल स्क्लेरोसिस |
इतर | स्वतंत्र अस्तित्वाचे नुकसान, एप्लास्टिक अशक्तपणा |
हेल्थ इन्शुरन्समध्ये क्रिटिकल इलनेस फायदा का महत्वाचा आहे?
याचे सोपे, सरळ उत्तर म्हणजे, कोणत्याही क्रिटिकल इलनेसच्या बाबतीत उद्भवू शकणाऱ्या भरमसाठ मेडिकल खर्चापासून आपल्या कष्टाने कमावलेल्या बचतीचे रक्षण करणे. अचानक घडलेल्या घडामोडींना सामोरे जात असताना, वित्त हा एक मोठा अडथळा ठरतो.
उदाहरणार्थ, स्तनाच्या कॅन्सरच्या उपचारांसाठी वापरले जाणारे कॅन्सरचे औषध हर्सेप्टिन घ्या. एका कुपीसाठी किमान रु.75,000 ते एक रु. 1 लाख रुपये खर्च येऊ शकतो आणि रुग्णाला उपचारासाठी 6 ते 17 कुपी लागतात. शस्त्रक्रियेचा खर्च सहा आकड्यात जाऊ शकतो, परंतु हॉस्पिटलायझेशनपूर्वी, हॉस्पिटलायझेशन नंतर, औषधांचा खर्च एकत्रितपणे आपल्या खिशाला मोठे भोक पाडू शकतो. अशा परिस्थितीत पुरेशा कव्हरेजसह क्रिटिकल इलनेस फायदा उपयोगी पडेल.
डिजिटद्वारे क्रिटिकल इलनेस फायद्याबद्दल जाणून घेण्यासारख्या इतर गोष्टी?
आम्ही पारदर्शकतेवर विश्वास ठेवतो आणि म्हणूनच आम्ही आपल्याला सुरुवातीपासूनच क्रिटिकल इलनेस फायद्याबद्दल सर्व काही माहिती करून देऊ इच्छितो. डिजिटच्या क्रिटिकल इलनेस फायद्याच्या संदर्भात काही अटी येथे आहेत:
कोणताही क्रिटिकल इलनेस किंवा त्यासाठी लागणारी शस्त्रक्रिया जर तुम्हाला आयुष्यात पहिल्यांदाच होत असेल तर ती कव्हर केली जाईल.
आपल्या क्रिटिकल इलनेस फायदा कव्हरसह कोणत्याही फायद्यासाठी पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेपासून 30 दिवसांचा वेटिंग पिरीयड आहे.
क्रिटिकल इलनेस हा आधीपासून अस्तित्वात असलेल्या स्थितीमुळे किंवा आजारामुळे उद्भवणारा परिणाम असू नये.
दारू, तंबाखू आणि अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारा कोणताही आजार कव्हर केला जाणार नाही.
युद्ध, दहशतवाद किंवा लष्करी कारवायांमुळे होणारा कोणताही आजार कव्हर केला जाणार नाही.
एचआयव्ही/एड्स चा या फायद्यात समावेश नाही.
क्रिटिकल इलनेस फायद्यासाठी कलेम कसा करावा?
रीएमबर्समेंट क्लेम्स – हॉस्पिटलायझेशन नंतर दोन दिवसांच्या आत आम्हाला 1800-258-4242 वर कळवा किंवा healthclaims@godigit.com येथे आम्हाला ईमेल करा आणि आम्ही आपल्याला एक लिंक पाठवू जिथे आपण रिमेमबर्समेंटची प्रक्रिया करण्यासाठी आपल्या हॉस्पिटलची बिले आणि सर्व संबंधित दस्तऐवज अपलोड करू शकता.
कॅशलेस क्लेम्स - नेटवर्क हॉस्पिटल निवडा. आपण येथे नेटवर्क हॉस्पिटल्सची संपूर्ण यादी शोधू शकता. हॉस्पिटल हेल्पडेस्कवर ई-हेल्थ कार्ड दाखवा आणि कॅशलेस रिक्वेस्ट फॉर्मची विचारणा करा. जर सर्व काही योग्य असेल तर आपल्या क्लेम्सवर तेव्हा आणि तेथे प्रक्रिया केली जाईल.
संपण्याच्या आधीची नोट
आपल्यासाठी भविष्यात काय आहे हे आपल्याला कधीच माहित नसते. परंतु भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण नेहमीच योग्य वेळी कृती करू शकता. एका शहाण्या माणसाने म्हटल्याप्रमाणे, 'ए स्टीच इन टाइम सेव्स नाइन'.
मी पाच वर्षांचा असल्याप्रमाणे समजावून सांगा.
आम्ही इन्शुरन्स इतका सोपा बनवत आहोत की आता 5 वर्षांच्या मुलांनाही ते समजू शकतं.
हिवाळ्याची आल्हाददायक सकाळ आहे. टीना थंड हवामानाचा आनंद घेण्याचे ठरवते, जॅकेट घालते आणि फिरायला बाहेर पडते. काही मिनिटांनी थंडी बर्फ वृष्टित बदलते! आता, टीना पुरेशा कव्हर शिवाय धोकादायक हवामानात अडकली आहे – तिच्या मनात येते की तिने तिचा उबदार कोट, टोपी आणि हातमोजे सोबत आणले असते तर. पण अनपेक्षित गोष्टीसाठी ती तयार नव्हती. क्रिटिकल इलनेसचे कव्हर या अनपेक्षित घडणाऱ्या घटनांपासून आपल्याला वाचवते.