होम लोन इएमआय कॅल्क्युलेटर
लोन रक्कम
कार्यकाळ (वर्ष)
व्याज दर (पी.ए.)
होम लोन इएमआय कॅल्क्युलेटर म्हणजे आहे?
होम लोन इएमआय कॅल्क्युलेटर नावा प्रमाणेच आहे. हे एक ऑनलाइन साधन आहे, जे कर्जदारांना मूळ रक्कम, परतफेडीचा कार्यकाळ आणि व्याज दर विचारात घेऊन होम लोनमधून त्यांचे इएमआय निश्चित करण्यास मदत करते.
आपल्याला नेमके किती आणि कोणाकडून लोन घ्यायचे आहे हे माहित असताना, आपल्याला असे कॅल्क्युलेटर वापरण्याची गरजेचे आहे. असे केल्याने आपण या लोनच्या परिणामी इएमआय सह आरामदायक आहात याची खात्री होईल.
आपण कॅलक्युलेटर शिवाय आपल्या होम लोनच्या इएमआय ची गणना देखील करू शकता, परंतु असे करणे गुंतागुंतीचे आहे आणि परिणामी चुका होऊ शकतात.
तथापि, होम लोनच्या कॅल्क्युलेटरचा नेमका वापर समजून घेण्यापूर्वी, आपल्याला अशा लोनची खालील वैशिष्ट्ये माहित असणे आवश्यक आहे.
होम लोन इएमआय काय आहे?
जेव्हा आपण लोन देणाऱ्या संस्थेकडून कर्ज घेता, तेव्हा आपल्याला ते निर्धारित वेळेत फेडावे लागते हे स्वाभाविक आहे. होम लोन्सही या बाबतीत वेगळे नाही.
होम लोन्सही या बाबतीत वेगळे नाही. म्हणूनच, होम लोनचा इमआय किंवा समान मासिक हप्ते म्हणजे आपल्या चालू लोनची परतफेड करण्यासाठी आपण दर महा आपल्या सावकारास भरणे आवश्यक असलेल्या निश्चित आर्थिक रकमेचा संदर्भ आहे.
होम लोनचा इएमआय मुख्यत्वे तीन घटकांवर अवलंबून असतो.
- लोनची मुळ रक्कम (आपण किती लोन घेता)
- लागू असलेला व्याजदर (सावकाराने आकारल्याप्रमाणे)
- लोनचा कार्यकाळ (विहित कालावधी ज्यामध्ये आपल्याला व्याजासह मुळ रक्कमेची परतफेड करावी लागेल)
होम लोनसाठी या तीन घटकांबद्दल आपल्याला सर्व काही माहित असणे आवश्यक आहे.
होम लोन आणि होम लोन इएमआय चे घटक:
लोनची मूळ रक्कम
होम लोन मुळ रक्कम म्हणजे आपल्या मालमत्तेच्या किंमतीचा भाग जो बँका किंवा एनबीएफसी वित्तपुरवठा करतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये, हे आपल्या घराच्या किंमतीच्या 80% ते 90% दरम्यान असते.
उदाहरणार्थ, जर आपण 1 कोटी रुपयांचे घर खरेदी केले तर आपण सावकराकडून 80 लाख रुपये किंवा 90 लाख रुपयांपर्यंत होम लोन म्हणून घेऊ शकता. उरलेला भाग आपण संबंधित घराच्या मालकीसाठी डाउन पेमेंट म्हणून उचलला पाहिजे.
होम लोनच्या इएमआय कॅल्क्युलेटरचा वापर करताना लोनची मुळ रक्कम हा एक महत्त्वाचा घटक आहे. उधार घेतलेल्या लोनच्या जास्त रकमेमुळे आपला इएमआय वाढतो आणि त्या उलट होते.
होम लोनचे व्याज दर
बँका प्रत्येक होम लोनवर ठराविक व्याजदर आकारतात. हा दर आपल्याला केवळ होम लोनच्या मुळ रक्कमेपलीकडे किती रक्कम भरावी लागेल हे निर्धारित करतो. व्याजाची गणना दोन पैकी एका प्रकारे केली जाऊ शकते - सोपी किंवा संमिश्र.
होम लोनसाठी भारतीय सावकार चक्रवाढ गणनेवर अवलंबून असतात आणि आपण किती व्याज देण्यास जबाबदार आहात हे ठरवतात.
कर्जाचा कार्यकाळ
कार्यकाळ म्हणजे ज्या कालावधीत आपण आपल्या होम लोनची परतफेड व्याजासह केली पाहिजे.
होम लोनचे स्वरूप मोठे असल्याने त्याचा कार्यकाळही मोठा असतो. आपल्या सावकारावर अवलंबून, जास्तीत जास्त कार्यकाळ 20 ते 30 वर्षांच्या श्रेणीत असू शकतो.
तथापि, आपण आपल्या सोयीनुसार कमी कालावधी निवडू शकता.
इएमआय गणनेत, आपल्याला असे दिसेल की परतफेडीचा कार्यकाळ वाढवल्यास आपल्या मासिक परतफेड दायित्वात घट होते.
त्यामुळे कॅलक्युलेटरने दाखवल्याप्रमाणे जर आपल्या निवडलेल्या लोनचा इएमआय खूप जास्त वाटत असेल तर आपण कार्यकाळ वाढवून पुन्हा तपासू शकता.
होम लोन इएमआय गणनेचे सूत्र काय आहे?
होम लोनच्या इएमआय कॅल्क्युलेटरमुळे गोष्टी नक्कीच सोप्या होतात, परंतु आपण स्वत: देखील आपला इएमआय ची गणना करू शकता.
तथापि, हे करण्यासाठी, आपल्याला अचूक इएमआय गणना सूत्र माहित असणे आवश्यक आहे.
हे बघा!
इएमआय = {P x R x (1+R)^N} / {(1 + R)^N – 1}
त्याला फारसा अर्थ नाही ना? बरं, समीकरणाचे घटक समजून घेण्याचा प्रयत्न करूया!
येथे P म्हणजे कर्जाची मुळ रक्कम आणि R म्हणजे 100 ने विभागलेला व्याजदर. N म्हणजे आपल्याला भराव्या लागणाऱ्या इएमआय चा क्रमांक. उदाहरणार्थ, जर आपल्या लोनचा कार्यकाळ 10 वर्षांचा असेल तर N 120 असेल.
गणना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया:
अरुण 20 वर्षांच्या मुदतीसाठी 12% व्याजदराने होम लोन म्हणून 50 लाख रुपये उधार घेतो. या लोनचा इएमआय किती असेल?
वरील सूत्रात मूल्ये घातल्यास आपल्याला मिळते –
इएमआय = रु.{5000000 x 0.12 x (1 + 0.12)^240} / {(1 + 0.12)^240-1}
इएमआय = Rs.55,054
आपण पाहू शकता, अशी गणना गुंतागुंतीची आणि वेळखाऊ असते.
होम लोन कॅल्क्युलेटर वापरल्यामुळे या किचकट प्रक्रियेतून आपली मुक्तता होण्यास मदत होते, म्हणूनच बहुतेक कर्जदार या साधनांचा फायदा घेतात.
होम लोन इएमआय कॅल्क्युलेटर वापरण्याचे फायदे
आपण आपल्या इएमआय ची मॅन्युअली गणना करण्यापेक्षा इएमआय कॅल्क्युलेटर चा वापर का केला पाहिजे याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत, विशेषत: हाऊसिंग क्रेडिटसारख्या दीर्घकालीन लोनचा व्यवहार करताना.
- त्वरित गणना - जेव्हा आपला इएमआय निश्चित करण्याची वेळ येते तेव्हा कॅल्क्युलेटर वापरणे नेहमीच वेगवान असते. आपल्याला फक्त विशिष्ट क्षेत्रांमध्ये संबंधित तपशील एंटर करावे लागतील आणि आपल्याला क्षणार्धात परिणाम मिळतील.
- त्रुटीरहित गणना - मॅन्युअल गणनांप्रमाणे, होम लोनच्या इएमआय कॅल्क्युलेटरचा वापर केल्यास नेहमीच अचूक परिणाम मिळतील. इएमआय मॅन्युअली गणना केल्याने नेहमीच त्रुटींना जागा राहते. या प्रकरणात, एक छोटीशी चूक देखील या क्रेडिटपासून मासिक दायित्वांच्या आपला अंदाज बिघडवू शकते.
- लोनच्या परतफेडीचे नियोजन करण्यास मदत करते - घरासाठी लोन घेण्यापूर्वी आपण कॅल्क्युलेटर वापरत असल्याने आपण आपले इएमआय निश्चित केल्यानंतर आपल्या आर्थिक नियोजनाचे प्रभावीपणे नियोजन करू शकता. शिवाय, आपल्याला परवडणारी इएमआय रक्कम मिळविण्यासाठी आपण विविध घटकांमध्ये बदल करू शकता. इएमआय कमी करण्यासाठी कॅलक्युलेटरवर आपली मूळ रक्कम कमी करण्याचा किंवा परतफेडीचा कालावधी वाढविण्याचा प्रयत्न करा.
- विनामूल्य अमर्याद गणना - आपण आपल्या इच्छेनुसार कितीतरी वेळा इएमआय कॅल्क्युलेटर वापरू शकता - ते देखील पूर्णपणे विनामूल्य. यामुळे ऑफर केलेल्या विविध होम लोनची तुलना करण्यासाठी असे कॅलक्युलेटर आदर्श साधन बनतात.
होम लोन अमोर्टायझेशन शेड्यूल म्हणजे काय?
होम लोनचे शेड्यूल म्हणजे मासिक इएमआय ची एका तक्त्यात विभागणी. इएमआय ची रक्कम आणि महिन्यासह, तक्त्यात हप्त्यांचे मुळ रक्कम आणि व्याज घटकांमध्ये विभाजन देखील दाखवलेले असते. इएमआय ची रक्कम दरमहिन्याला सारखीच असली तरी परतफेड जसजशी वाढत जाते तसतसे मुळ रक्कम आणि व्याजाचे प्रमाण बदलत जाते.
अमोर्टायझेशन शेड्यूलचा अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या इएमआय पेमेंटच्या पहिल्या सहामाहीत प्रत्येक हप्त्यातील मूळ भागापेक्षा व्याजाचा हिस्सा जास्त असतो. तथापि, कर्ज परतफेडीच्या शेवटी, व्याजाचा भाग कमी असतो, तर मुळ रक्कम आपल्या इएमआय चा बहुसंख्य भाग असतो.
म्हणूनच, अमोर्टायझेशन शेड्यूलसह, आपण अद्याप किती इएमआय शिल्लक आहेत हे तपासू शकता. आपण लोनसाठी शिल्लक असलेले आपले एकूण व्याज आणि एकूण मूळ दायित्व देखील निश्चित करू शकता.
होम लोन इएमआयचे प्रकार
भारतात आपण होम लोनच्या बाबतीत तीन वेगवेगळ्या प्रकारच्या इएमआय भरण्याच्या पद्धतीमधून निवड करू शकता. हे आहेत:
- प्री इएमआय - होम लोनसाठी प्री इएमआय प्रचलित आहे जिथे आपल्याला एकाच पेआऊटद्वारे संपूर्ण कर्जाची रक्कम अजून मिळाली नसते. त्याऐवजी, आपला सावकार नियमित अंतराने कमी रक्कम वितरित करतो. विकासाधीन मालमत्ता खरेदी करू इच्छिणाऱ्या किंवा स्वत:चे घर बांधू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी हा पर्याय उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, आपला पहिला इएमआय भरणे आणि होम लोनचे संपूर्ण वितरण दरम्यानचा कालावधी दोन वर्षांपर्यंत असू शकतो. मधल्या कालावधीत पडणाऱ्या मोठ्या अंतरात परतफेडीचा एक प्रकार म्हणून प्री इएमआय हे कार्य करण्यासाठी रचना केली गेली आहे.
- ट्रांशे इएमआय – होम लोनच्या इएमआय च्या या प्रकारात आपल्याला फक्त कमीत कमी व्याजाची रक्कम भरावी लागेल. तथापि, संपूर्ण मूळ रक्कम प्राप्त करण्यापूर्वी आपण पूर्ण ईएमआय भरणे देखील निवडू शकता. व्याजासह मूळ भाग भरून आपण संबंधित होम लोनची मूळ थकबाकी प्रभावीपणे कमी करू शकता. असे केल्यास लोनचा कालावधीही कमी होऊ शकतो.
- वेगवान इएमआय पेमेंट्स – होम लोनचा परतफेडीचा कार्यकाळ दीर्घ असतो, म्हणून आपण या कालावधीत आपल्या उत्पन्नात वाढीची अपेक्षा करू शकता. वाढत्या उत्पन्नासह, परतफेड जलद गतीने पूर्ण करण्यासाठी आपण जास्त इएमआय देखील देऊ शकता. म्हणूनच, जर आपल्याकडे अतिरिक्त रोकड किंवा बोनस उपलब्ध असेल तर त्वरित परतफेड केल्यास कर्जावरील कार्यकाळ आणि व्याज पेमेंट्स कमी होऊ शकतात.
आता आपल्याला होम लोनच्या परतफेडीच्या पर्यायांबद्दल अधिक माहिती आहे, होम लोनच्या कागदपत्र कार्यपद्धतीबद्दल आपल्याला सर्व काही माहित असणे आवश्यक आहे.
होम लोन घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज आहे?
आपला होम लोनचा अर्ज पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या सावकराकडे काही कागदपत्रे सादर करावी लागतील. होम लोनसाठी आवश्यक काही कागदपत्रे खाली सूचीबद्ध आहेत:
● भरलेला होम लोनचा अर्ज.
● ओळखपत्र पुरावा- पासपोर्ट, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स हे ओळखीचे स्वीकार्य पुरावे आहेत.
● पासपोर्ट साइज फोटो
● वयाचा पुरावा - जन्म दाखला, पॅन कार्ड, पासपोर्ट, बँक पासबुक, आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स हे आपल्या वयाचे वैध पुरावे आहेत.
● पत्त्याचा पुरावा - बँक पासबुक, आधार कार्ड, युटिलिटी बिल आणि मतदार ओळखपत्र ही काही कागदपत्रे आहेत ज्यांची छायाप्रत आपण या संदर्भात देऊ शकता.
पगारदार व्यक्तींच्या उत्पन्नाची कागदपत्रे
- सध्याच्या एम्प्लॉयर कडून पत्र
- फॉर्म 16
- मागच्या दोन महिन्याच्या पे-स्लिप्स
- गेल्या 3 वर्षांपासून आयटी परतावा
- पदोन्नती किंवा वेतनवाढ पत्र
स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींच्या उत्पन्नाची कागदपत्रे
- मागच्या तीन वर्षाचे आयटीआर
- व्यवसायासाठी नफा आणि तोटा विवरण आणि ताळेबंद
- व्यवसाय परवाना तपशील
- व्यवसाय पत्ता पुरावा
- मागच्या 6 महिन्यांचे बँक खाते विवरण
- डॉक्टर, सल्लागार आणि इतरांसाठी, प्रोफेशनल प्रॅक्टिसचा परवाना सादर करणे देखील अनिवार्य आहे.
मालमत्तेची कागदपत्रे
- घर बांधण्यासाठी लोन घेत असाल तर आपल्या घराच्या बांधकामाच्या खर्चाचा सविस्तर अंदाज
- आपल्या बिल्डरकडून एनओसी
- रेडी-टू-मूव्ह मालमत्तांसाठी, आपल्याला भोगवटा प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे
- बिल्डर/ मालकाकडून मूळ विक्री करार किंवा विक्रीचा शिक्का मारलेला करार
- मालमत्ता कराची पावती
- फ्लॅट खरेदीच्या बाबतीत इमारतीच्या आराखड्याची प्रत
- मालमत्तेच्या डाऊन पेमेंटच्या पावत्या
- विक्रेते किंवा बिल्डरला देय असल्याचे सिद्ध करणारे बँक विवरण किंवा पावती
आपल्या सावकारानुसार, आवश्यकता बदलू शकतात. तथापि, वरील यादी बहुतेक कागदपत्रांचे द्योतक आहे, जी आपल्याला अशी सुरक्षित कर्ज घेताना सादर करण्याची गरज असू शकते.
होम लोन टॅक्स लाभ
होम लोनचा इएमआय लक्षणीय असतो, म्हणूनच भारत सरकार अशा लोनची परतफेड करणाऱ्या कर्जदारांसाठी काही कर सवलती देतात.
या कर्जदारांसाठी सात प्रकारची करसवलत आहे:
होम लोनच्या व्याज पेमेंट्स वरील कर वजावट - कलम 24 अंतर्गत, आपण होम लोनचे व्याज फेडत असाल तर आपण आपल्या वार्षिक कर पेमेंट्स मधून 2 लाख रुपयांपर्यंत कर वजावटीचा क्लेम करू शकता. जास्तीत जास्त बचतीचा लाभ घेण्यासाठी वार्षिक व्याज पेमेंट्स रु.2 लाख इतकी किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
बांधकाम सुरू असलेल्या मालमत्तांवरील कर वजावट - एखादी मालमत्ता विकसित होत असताना आपण वजावटीचा क्लेम करू शकत नाही, परंतु आपल्याला आपले घर पूर्ण झाल्यानंतर पाच समान हप्त्यांद्वारे या वजावटींचा क्लेम करण्याची परवानगी आहे. तथापि, परवानगी दिलेली कमाल वजावट रु.2 लाखांपर्यंत मर्यादित आहे.
मुळ रक्कम परतफेड वजावट - कलम 80 सी अंतर्गत, आपण गृहकर्जाच्या मूळ परतफेडीवर देखील कर वजावटीचा क्लेम करू शकता. या श्रेणीअंतर्गत जास्तीत जास्त वार्षिक सवलत फक्त 1.5 लाख रुपयांपर्यंत मर्यादित आहे.
नोंदणी आणि मुद्रांक शुल्कासाठी वजावट – होम लोनचे ग्राहक मालमत्तेच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क शुल्कावर देखील कर वजावटीस पात्र आहेत. कलम 80 सी अंतर्गत आपण आपले कर दायित्व 1.5 लाख रुपयांपर्यंत कमी करू शकता. तथापि, ही एकरकमी वजावट आहे, जी करदात्याद्वारे हे शुल्क घेतल्याच्या वर्षीच लागू होते.
जॉइंट होम लोन कर वजावट - जर आपण कुटुंबातील इतर सदस्यासोबत संयुक्तरित्या होम लोन घेत असाल तर प्रत्येक कर्जदाराला त्याच कर्जाच्या व्याजाच्या पेमेंटवर 2 लाख रुपये आणि मुळ रक्कम पेमेंटवर 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वजावट मिळते.
कलम 80 ईईए वजावट - जर आपले होम लोन 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 दरम्यान मंजूर झाले असेल आणि आपल्या मालमत्तेचे स्टॅम्प मूल्य 45 लाख रुपयांपर्यंत मर्यादित असेल तर आपण या तरतुदीचा लाभ घेऊ शकता. या कलमाद्वारे आपण एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त वजावटीचा क्लेम करू शकता.
कलम 80 ईई वजावट - या कलमांतर्गत होम लोन घेणारे खालील निकषांची पूर्तता केल्यास वर्षाला रु.50000 पर्यंत अतिरिक्त कर सवलती मिळण्यास पात्र आहेत:
- 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 या कालावधीत लोन घेतले.
- लोनची रक्कम रु.35 लाख इतकी किंवा त्यापेक्षा कमी आहे.
- मालमत्तेचे मूल्य रु.50 लाख इतके किंवा त्यापेक्षा कमी आहे.
- कर्जदाराकडे इतर कोणतीही मालमत्ता नाही.
या तरतुदींमुळे होम लोनच्या परतफेडीचा बोजा लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होईल.
तरीही, आपण विशिष्ट सावकार किंवा ऑफर निवडण्यापूर्वी, आपण होम लोन इएमआय कॅल्क्युलेटर वापरत आहात याची खात्री करा. हे आपल्याला परतफेड करताना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यास मदत करेल.