भारतात नवजात बाळासाठी पासपोर्टसाठी अर्ज करताना लागणारे विविध टप्पे समजून घेण्यापूर्वी, या कागदपत्रांमध्ये काय समाविष्ट आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम पालकांना लहान मुलांच्या पासपोर्टसाठी वयाची मर्यादा माहित असणे गरजेचे आहे. अर्ज करताना तुमचे मूल चार वर्षांपेक्षा लहान असल्यास ती/तो हे कागदपत्रे मिळविण्यास पात्र आहे. त्यांच्यावतीने केवळ पालक किंवा कायदेशीर पालकच यासाठी अर्ज करू शकतात.
भारतात नवजात बाळाच्या पासपोर्टसाठी अर्ज करताना ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रियेचा समावेश आहे. यासाठी तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रक्रियेची निवड करू शकता. खाली ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रक्रिया नमूद केल्या आहेत.
नवजात मुलांच्या पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करा
जर तुम्ही तुमच्या नवजात बाळाच्या पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा निर्णय घेतला असेल तर पुढील सर्व स्टेप्सचे अनुसरण करणे गरजेचे आहे -
स्टेप 1: पासपोर्ट सेवा केंद्राच्या वेबसाइट ला भेट द्या.
स्टेप 2: अचूक माहिती देऊन या पोर्टलवर खाते नोंदवा. तुमच्या इमेल आयडीवर पाठवलेल्या लिंकचा वापर करून तुमच्या खात्याची वैधता व्हेरीफाय करा.
स्टेप 3: तुमच्या क्रेडेन्शियल्ससह या पीएसके खात्यावर लॉग इन करा.
स्टेप 4: ऑनलाइन पासपोर्ट अर्जातील पर्याय 1 किंवा पर्याय 2 मधून निवडा. पहिला पर्याय ऑनलाइन फॉर्म भरण्याची परवानगी देतो, तर दुसरा पर्याय तुम्हाला हा फॉर्म डाउनलोड करण्याची आणि तुमच्या मोकळ्या वेळेत भरण्याची परवानगी देतो.
स्टेप 5: पर्याय 1 अंतर्गत तुम्ही थेट ऑनलाइन फॉर्म सबमिट करू शकता. तुम्ही पर्याय 2 निवडल्यास, तुम्हाला भरलेला फॉर्म XML स्वरूपात सेव्ह करणे गरजेचे आहे. त्यानंतर ज्या विभागात तुम्ही पर्याय 2 पर्याय निवडला त्याच विभागात अपलोड करा.
स्टेप 6: संबंधित अर्जाची फी भरा आणि स्लॉट बुक करा.
लहान मुलांच्या ऑनलाइन पासपोर्टची प्रक्रिया अशी पूर्ण होते.
मात्र, जर हे तुम्हाला हे शक्य नसेल तर, सरकार ऑफलाइन अर्जांना देखील परवानगी देते.
नवजात बाळांच्या पासपोर्टसाठी ऑफलाइन अर्ज करा
प्रौढांच्या पासपोर्टच्या बाबतीत सर्व पासपोर्ट सेवा केंद्रे वॉक-इन अर्जांना परवानगी देत नसली तरी अल्पवयीन आणि लहान मुलांच्या पासपोर्टसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. तर पुढील आहे ऑफलाइन प्रक्रिया -
स्टेप 1: तुमच्या संबंधित पासपोर्ट सेवा केंद्र / पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र / पासपोर्ट कार्यालयाला भेट द्या.
स्टेप 2: संबंधित तपशीलांसह अर्जाचा फॉर्म भरा.
स्टेप 3: भरलेल्या फॉर्मसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.
स्टेप 4: लहान मुलांचा पासपोर्ट अर्ज पूर्ण करण्यासाठी लागू फी भरा.
आता लहान मुलांच्या पासपोर्टसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा हे तुम्हाला माहित आहे, तर आता तुम्हाला ही कार्यपद्धत पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध कागदपत्रांची देखील माहिती असणे आवश्यक आहे.