झिरो डिप्रिसिएशन टू व्हिलर इन्शुरन्स
हा मानवी स्वभाव आहे की, आपल्याला आवडत असलेल्या गोष्टी सुरक्षित राहाव्या अशी प्रत्येकाची इच्छा असते. विशेषतः आपल्या बाईकच्या बाबतीत प्रत्येकजण थोडा अधिक भावनिक असतो, कल्पना करा की असे काहीतरी आहे जे आपल्या सर्वात आवडत्या गोष्टी नेहमी नव्यासारख्या राहतील याची खात्री करून देतात.
जादू नक्कीच घडत नाही पण आमच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्समध्ये झिरो डिप्रिसिएशन नावाची एक गोष्ट आहे जी वेगळी किमया करू शकते.
तुमची बाईक नेहमी ठणठणीत ठेवण्यासाठी, तुमच्या बाईकची स्वतःची अँटी-एजिंग क्रीम आम्ही घेऊन आलो आहोत, नाही कळलं? मग खालील माहिती सविस्तर वाचा..
झिरो डिप्रिसिएशन बाईक इन्शुरन्स म्हणजे काय?
झिरो डिप्रिसिएशन म्हणजे काय हे स्पष्ट करण्यापूर्वी, प्रथम डिप्रिसिएशन म्हणजे काय ते जाणून घेऊ. डिप्रिसिएशन म्हणजे तुमची बाईक जुनी झाल्यावर तिचे मूल्य कमी होणे. जर तुम्ही नवी बाईक 1 लाख रुपयांना घेतली असेल आणि त्याची किंमत आता 50,000 रु इतकी झाली असेल . तर 50,000 हे तुम्ही बाईकचे केलेले डिप्रिसिएशन आहे.परंतु जर तुमच्याकडे तुमच्या बाईकसाठी झिरो डेप इन्शुरन्स असेल, तर इन्शुरन्स कंपनी बदलून टाकल्या जाणार्या भागांची जवळजवळ संपूर्ण किंमत देतील आणि डिप्रिसिएशन म्हणून काहीही कापले जाणार नाही. सोप्या शब्दात, झिरो-डिप्रिसिएशन कव्हर असणे म्हणजे तुमच्या इन्शुरन्स कंपनीच्या दृष्टीने, तुमची बाईक नव्यासारखी चांगली राहील.
तपासा: वेगवेगळ्या ॲड-ऑन्ससह प्रीमियमची गणना करण्यासाठी बाईक इन्शुरन्स कॅल्क्युलेटर वापरा
दुचाकी वाहनांमध्ये डिप्रिसिएशन
वाहनाचे वय |
% डिप्रिसिएशन |
6 महिन्यांपेक्षा जास्त नाही |
5% |
6 महिन्यांपेक्षा जास्त परंतु 1 वर्षापेक्षा जास्त नाही |
15% |
1 वर्षापेक्षा जास्त परंतु 2 वर्षांपेक्षा जास्त नाही |
20% |
2 वर्षापेक्षा जास्त परंतु 3 वर्षांपेक्षा जास्त नाही |
30% |
3 वर्षापेक्षा जास्त परंतु 4 वर्षांपेक्षा जास्त नाही |
40% |
4 वर्षापेक्षा जास्त परंतु 5 वर्षांपेक्षा जास्त नाही |
50% |
तुलना करा: झिरो डेप कव्हरसह आणि त्याशिवाय बाईक इन्शुरन्स
|
झिरो डेप कव्हरसह बाईक इन्शुरन्स |
झिरो डेप कव्हरशिवाय बाईक इन्शुरन्स |
झिरो डेप कव्हरसह बाईक इन्शुरन्स |
रक्कम जास्त आहे कारण क्लेमच्या पेमेंटच्या वेळी डिप्रिसिएशन विचारात घेतला जात नाही |
तुमची दुचाकी म्हणून रक्कम कमी आहे आणि त्याच्या पार्ट्सचे अवमूल्यन देखील मोजले जाते. |
पार्ट्सचं डिप्रिसिएशन |
कव्हर केलेले |
कव्हर केलेले नाही |
दुचाकीचे वय |
या ॲडऑनसह, तुमच्या दुचाकीच्या वयावर कोणताही परिणाम होत नाही कारण डिप्रिसिएशन मोजले जात नाही. |
डिप्रिसिएशन दर हा तुमची दुचाकी किती जुनी आहे यावर आधारित आहे. |
टू व्हीलर पार्ट्सवर लागू होणारे डिप्रिसिएशन दर
टू व्हीलर पार्ट्स |
डिप्रिसिएशन दर (टक्केवारी) |
नायलॉन/रबर/टायर आणि ट्यूब/प्लास्टिकचे भाग/बॅटरी |
50% |
फायबर/काचेचे साहित्य |
30% |
इतर सर्व काचेचे बनलेले भाग |
Nil |
झिरो डिप्रिसिएशन बाईक इन्शुरन्सबद्दल अधिक माहिती
काय समाविष्ट आहे?
- बाईकच्या भागांसाठी डिप्रीसिएशन: नायलॉन, रबर, फायबरग्लास आणि प्लास्टिकचे भाग.
- जोपर्यंत तुमचा बाईक इन्शुरन्स व्हॅलिड आहे तोपर्यंत तुमचे शून्य- डिप्रिसिएशन कव्हर तुमच्या सर्व बाईक इन्शुरन्स क्लेम्सवर लागू आहे.
- तुमच्याकडे सध्या शून्य डिप्रिसिएशन कव्हर नसल्यास, तुम्ही ते तुमच्या नूतनीकरणादरम्यान देखील समाविष्ट करू शकता.
काय वगळले आहे?
- हे कव्हर 5 वर्षांपेक्षा जास्त जुन्या बाईकसाठी लागू नाही
- बाईकची झीज किंवा यांत्रिक बिघाडांमुळे तुमच्या बाईकचे किंवा तिच्या पार्ट्सचे नुकसान भरून निघत नाही.
- हे तुमच्या बाईकचे टायर, बाय फ्युएल किट आणि गॅस किट कव्हर करत नाही
झिरो डिप्रिसिएशन बाईक इन्शुरन्सचे फायदे
- बाईक इन्शुरन्सच्या क्लेमदरम्यान तुमची बचत वाढवा कारण तुम्ही तुमच्या खिशातून जास्त खर्च करणार नाही.
- तुमची संपूर्ण क्लेमची रक्कम (कम्प्लसरी डिडक्शननंतर) मिळाल्यामुळे तुम्हाला फायदा होईल, कारण तुमची इन्शुरन्स कंपनी तुमच्या क्लेमच्या रकमेतून तुमचे डिप्रिसिएशन यापुढे वजा करणार नाही.
- तुमच्या नवीन बाईकसाठी आणि त्याच्या सुट्या भागांसाठी संरक्षणाचा एक थर म्हणून कार्य करते