न्यू बाईक इन्शुरन्सबद्दल सविस्तर माहिती
अखेर ती टू-व्हीलर मिळाली का ? आम्हाला त्याबद्दल आनंद आहे! परंतु एक तज्ञ म्हणून, आम्हाला तुम्हाला हे सांगायचे आहे की आपण त्याच्या संरक्षणाबद्दलदेखील विचार करावा. हे खूप सोपे आहे, आपण केवळ त्याचा इन्शुरन्स काढून त्याचे संरक्षण करू शकता आणि आम्ही इथे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आहोत.
पहिली गोष्ट म्हणजे, बाईक इन्शुरन्सचे साधारणत: दोन प्रकार असतात, कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स आणि थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स.
भारतात बाईक इन्शुरन्सचे नवे प्लॅन्स
बाईक इन्शुरन्स पॉलिसी निवडताना आयडीव्ही चे महत्त्व
आयडीव्ही - इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू, म्हणजे जर आपली बाईक पूर्णपणे खराब झाली किंवा चोरीला गेली असेल, तर आपली इन्शुरन्स कंपनी आपल्याला देत असलेली जास्तीत जास्त अशी रक्कम. आम्हाला माहित आहे की कमी प्रीमियम आमिष दाखवते परंतु यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आर्थिक फायदा होणार नाही. त्यामुळेच आपण नेहमीच आपल्याला ऑफर केल्या जाणाऱ्या केवळ प्रीमियमचीच नाही आयडीव्हीचीही तपासणी केली पाहिजे .
आम्ही सुचवितो की आपण जास्त आयडीव्ही निवडा, आपल्याला माहित आहे का? आपल्या बाईकचे एकूण नुकसान झाल्यास, जास्त आयडीव्हीमुळे जास्त रिएम्बर्समेंट मिळते.
डिजिटमध्ये, आम्ही आपल्याला आपल्या आवडीनुसार आपला आयडीव्ही कस्टमाइझ करण्याची सुविधा देतो कारण आपण कोणत्याही तडजोडीशिवाय योग्य निर्णय घ्यावा, अशी आमची इच्छा आहे.
न्यू बाईक इन्शुरन्स खरेदी करताना विचारात घेण्यासारख्या गोष्टी
आपल्या नव्या बाईकसाठी बाईक इन्शुरन्स खरेदी करताना अनेक बाबी लक्षात ठेवाव्या लागतात. त्यांच्याकडे लक्ष दिल्यास हे सुनिश्चित होईल की आपण कव्हरची आदर्श पातळी मिळवाल. यापैकी काही घटक खाली दिले आहेत:
डिलरकडून न्यू बाईक इन्शुरन्स खरेदी करणे ही चांगली कल्पना आहे का?
बऱ्याच लोकांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन योग्य इन्शुरन्स कंपनी शोधण्यात ऊर्जा वाया घालवायची नसते. त्यांना त्याबाबतीत पलायनवादी भूमिका घ्यायची सवय असते. त्यामुळे बहुतांश मालक त्यांच्या बाईक विक्रेत्यांनी देऊ केलेली इन्शुरन्स पॉलिसीच घेतात. त्यामुळे वेळेची बचत होते आणि अर्थातच ती सोयीचीही आहे! पण हे करणे योग्य आहे का ? आपण आपल्या डिलरकडून पॉलिसी खरेदी करण्याचा विचार केल्यास काय चूक होऊ शकते ते पाहूया.
ऑनलाइन न्यू बाईक इन्शुरन्स कसा खरेदी करावा?
स्टेप 1 - बाईक इन्शुरन्स पेजवर जा, आपल्या वाहनाची उत्पादक कंपनी, मॉडेल, व्हेरियंट, रजिस्ट्रेशन डेट (नवीन बाईक निवडा) इत्यादी माहिती भरा. ‘गेट कोट' वर क्लिक करा आणि आपल्या प्लॅनची निवड करा.
स्टेप 2 - थर्ड पार्टी लायॅबिलिटी ओन्ली किंवा स्टँडर्ड पॅकेज (कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स) यापैकी एकाची निवड करा.
स्टेप 3 - आपल्या मागील नो क्लेम बोनसबद्दल आम्हाला तपशील द्या.
स्टेप 4 – आपल्याला आपल्या प्रीमियमच्या रकमेविषयीची माहिती मिळेल. जर आपण स्टँडर्ड प्लॅन निवडला असेल तर आपण ॲड-ऑन निवडून, आयडीव्ही सेट करून ते पुढे कस्टमाइझ करू शकता. आपल्याला पुढील पेजवर अंतिम प्रीमियम दिसेल.