इलेक्ट्रिक बाइक इन्शुरन्स

ऑनलाइन त्वरित बाईक इन्शुरन्सच्या किमतीविषयीची माहिती मिळवा

Third-party premium has changed from 1st June. Renew now

इलेक्ट्रिक बाईक इन्शुरन्स म्हणजे काय?

इलेक्ट्रिक बाईक इन्शुरन्स हा एक प्रकारचा मोटार इन्शुरन्स आहे जो विजेवर चालणाऱ्या टू-व्हीलरचे संभाव्य हानी आणि नुकसानीपासून संरक्षण करतो, जे अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा आग लागल्यास होऊ शकते.

इ-बाईक्स किंवा इलेक्ट्रिक टू-व्हीलर असंही नाव असलेल्या इलेक्ट्रिक बाईक्स पर्यावरणस्नेही आणि (बहुधा!) नेहमीच्या बाईक्सना आवाजमुक्त पर्याय म्हणून रस्त्यावर अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत.

नेहमीच्या टू-व्हिलर वाहनांना इंधन म्हणून जसे पेट्रोल लागते, तसेच या वाहनांनाही (महाकाय स्मार्टफोनप्रमाणे) विजेने चार्ज करावे लागते.

इलेक्ट्रिक टू-व्हीलर ही अजूनही भारतात एक नवीन संकल्पना आहे परंतु  आपल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी बाईक इन्शुरन्स पॉलिसी घेणे नियमित इंधनावर चालणाऱ्या बाईकसाठी वापरल्या जाणाऱ्या या प्रक्रियेपेक्षा फारसे वेगळे नाही.

 

आपण इलेक्ट्रिक बाईक इन्शुरन्स का खरेदी करावा?

आपल्या प्रिय नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे काय होऊ शकते याचा आपण कधीही अंदाज लावू शकत नाही. इलेक्ट्रिक बाईक उद्योग अजूनही उदयास येत आहे, आणि नियम आणि कायदे अद्याप ठामपणे स्थापित केले गेले नाहीत, परंतु ई-बाईक खूप महाग आहेत.

यामध्ये बरेच जटिल तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिकल आणि यांत्रिक भाग देखील आहेत जे आपल्याला कोणत्याही वेळी त्रास देऊ शकतात. तर, इतर कोणत्याही वाहनाप्रमाणे, इन्शुरन्स असणे दुर्दैवी घटनेत एक उत्तम तारणहार असू शकते आणि कोणतीही चिंता न करता आपल्याला चालविण्यास मदत करू शकते.

तसेच मोटार वाहन कायद्यानुसार किमान थर्ड पार्टी टू-व्हीलर इन्शुरन्स असणे बंधनकारक आहे.

 

डिजिटच्या इलेक्ट्रिक बाईक इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते?

इलेक्ट्रिक टू व्हीलर इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर

टू-व्हीलर इन्शुरन्स प्रीमियम हा किलोवॅट क्षमता, मेक, मॉडेल आणि वय यासारख्या अनेक घटकांवर आधारित असतात.

 

किलोवॅट क्षमतेच्या टू-व्हीलर्स (के.डब्ल्यू.) एक वर्षाच्या पॉलिसीसाठी प्रीमियम दर दीर्घकालीन पॉलिसीसाठी प्रीमियम * दर
3 किलोवॅटपेक्षा जास्त नाही ₹457 ₹2,466
3 किलोवॅटपेक्षा जास्त परंतु 7 किलोवॅटपेक्षा जास्त नाही ₹609 ₹3,273
7 किलोवॅटपेक्षा जास्त परंतु 16 किलोवॅटपेक्षा जास्त नाही ₹1,161 ₹6,260
16 किलोवॅटपेक्षा जास्त ₹2,383 ₹12,849

* दीर्घकालीन पॉलिसी म्हणजे नवीन खासगी टू-व्हीलरसाठी 5 वर्षांची पॉलिसी. (स्रोत – आयआरडीएआय)

 

काय कव्हर केले नाही ?

आपल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय समाविष्ट नाही हे जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे, जेणेकरून आपण क्लेम केल्यावर आश्चर्य वाटणार नाही. अशा काही परिस्थितींविषयीची माहिती येथे देण्यात आली आहे:

 

थर्ड-पार्टी पॉलिसी धारकासाठी स्वत: चे नुकसान

थर्ड-पार्टी किंवा लायॅबिलिटी ओन्ली बाईक पॉलिसीच्या बाबतीत, स्वत: च्या वाहनाचे नुकसान कव्हर केले जाणार नाही.

 

मद्यपान करून प्रवास करणे किंवा लायसन्स शिवाय प्रवास करणे

आपण मद्यधुंद अवस्थेत किंवा वैध टू-व्हिलर व्हेईकल लायसन्सशिवाय प्रवास करत आहात अशा परिस्थितीत आपला इलेक्ट्रिक बाईक इन्शुरन्स आपल्यासाठी कव्हर करणार नाही.

 

वैध ड्रायव्हिंग लायसन्स धारकाशिवाय वाहन चालविणे

जर आपल्याकडे लर्निंग लायसन्स असेल आणि आपण मागच्या सीटवर वैध लायसन्स-होल्डरशिवाय आपली टू-व्हीलर चालवत असाल तर अशा परिस्थितीत आपला क्लेम कव्हर केला जाणार नाही.

 

परिणामी नुकसान

जे नुकसान अपघाताचा थेट परिणाम नाही (उदा. अपघातानंतर, जर खराब झालेल्या टू-व्हीलरचा चुकीचा वापर केला जात असेल आणि इंजिन खराब झाले असेल तर ते कॉन्सिक्वेन्शिअल  डॅमेजेस मानले जाते आणि ते कव्हर केले जाणार नाही)

 

निष्काळजीपणा दाखवणे

तुम्ही वाहनाच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा दाखवला (उदा. पुरात टू-व्हीलर चालविण्यामुळे होणारे नुकसान, ज्याची शिफारस निर्मात्याच्या ड्रायव्हिंग मॅन्युअलनुसार केली जात नाही, ते कव्हर केले जाणार नाही)

 

ॲड-ऑन्स खरेदी केले नाही

काही परिस्थिती ॲड-ऑन्समध्ये कव्हर केल्या जातात. आपण ते ॲड-ऑन खरेदी केले नसल्यास, संबंधित परिस्थिती कव्हर केली जाणार नाही.

 

डिजिटचा इलेक्ट्रिक बाईक इन्शुरन्स का निवडावा?

क्लेम कसा करावा?

आपण आमच्याबरोबर आपला इलेक्ट्रिक टू-व्हीलर इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा नूतनीकरण केल्यानंतर, आपल्याला गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून जायची गरज नाही कारण आमच्याकडे 3-स्टेप, पूर्णपणे डिजिटल क्लेम प्रक्रिया आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. फॉर्म भरायचे नाहीत.

स्टेप 2

आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर सेल्फ-इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. मार्गदर्शित टप्प्याटप्प्यांच्या प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाच्या नुकसानाबद्दल माहिती दया.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी आपण निवडू इच्छित असलेली दुरुस्तीची पद्धत निवडा.

भारतातील इलेक्ट्रिक बाईक इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

भारतात इलेक्ट्रॉनिक बाईकचा इन्शुरन्स आवश्यक आहे का?

Electronic Bike in India?)

जेव्हा इ-बाईक्स पहिल्यांदा सादर करण्यात आल्या, तेव्हा 250 वॅटच्या श्रेणीत येणाऱ्या आणि जास्तीत जास्त 25 कि.मी प्रतितास वेग असलेल्या कोणत्याही बाईकची नोंदणी किंवा इन्शुरन्स काढण्याची आवश्यकता नव्हती. मात्र, अलीकडे इलेक्ट्रॉनिक बाईक्सचा समावेश मोटार वाहन कायद्याअंतर्गत करण्याची अधिकाऱ्यांची योजना आहे.

याचा अर्थ असा होईल की, इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सच्या मालकांना इंधनावर आधारित टू-व्हीलरसाठी नोंदणी, इन्शुरन्स असणे, हेल्मेट घालणे इत्यादी सर्व नियमांचे समान पालन करावे लागेल.

 

कोणत्या प्रकारचा बाईक इन्शुरन्स सर्वोत्तम आहे?

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स हा सामान्यत: सर्व प्रकारच्या टू-व्हीलर इन्शुरन्ससाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो कारण तो अधिक व्यापक कव्हरेजसह येतो. शिवाय, इलेक्ट्रिक बाईक्स किंचित अधिक महाग आहेत हे लक्षात घेता - अशी शिफारस केली जाते की आपण अशा इन्शुरन्सची निवड करावी जो आपल्या बाईकला पूर्णपणे कव्हर करु शकेल.

आपल्या इलेक्ट्रिक बाईकसाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स अनिवार्य असलेल्या थर्ड-पार्टी लायॅबिलिटी इन्शुरन्स कव्हरेजचे बेनिफिट प्रदान करेल, तसेच ओन डॅमेजेस (स्वत:चे नुकसान) आणि डिजिटसह उपलब्ध एक किंवा अधिक ॲड-ऑन कव्हरची निवड करून आपण जोडू इच्छित असलेल्या इतर कोणत्याही गोष्टीस कव्हर करेल.  


A comprehensive insurance for your electric bike will cover the mandatory third-party liability Insurance coverage benefits, plus own damages, and anything else you may want to add by opting for one or more add-on covers available with Digit.