इलेक्ट्रिक बाईक इन्शुरन्स म्हणजे काय?
इलेक्ट्रिक बाईक इन्शुरन्स हा एक प्रकारचा मोटार इन्शुरन्स आहे जो विजेवर चालणाऱ्या टू-व्हीलरचे संभाव्य हानी आणि नुकसानीपासून संरक्षण करतो, जे अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा आग लागल्यास होऊ शकते.
इ-बाईक्स किंवा इलेक्ट्रिक टू-व्हीलर असंही नाव असलेल्या इलेक्ट्रिक बाईक्स पर्यावरणस्नेही आणि (बहुधा!) नेहमीच्या बाईक्सना आवाजमुक्त पर्याय म्हणून रस्त्यावर अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत.
नेहमीच्या टू-व्हिलर वाहनांना इंधन म्हणून जसे पेट्रोल लागते, तसेच या वाहनांनाही (महाकाय स्मार्टफोनप्रमाणे) विजेने चार्ज करावे लागते.
इलेक्ट्रिक टू-व्हीलर ही अजूनही भारतात एक नवीन संकल्पना आहे परंतु आपल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी बाईक इन्शुरन्स पॉलिसी घेणे नियमित इंधनावर चालणाऱ्या बाईकसाठी वापरल्या जाणाऱ्या या प्रक्रियेपेक्षा फारसे वेगळे नाही.
आपण इलेक्ट्रिक बाईक इन्शुरन्स का खरेदी करावा?
आपल्या प्रिय नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे काय होऊ शकते याचा आपण कधीही अंदाज लावू शकत नाही. इलेक्ट्रिक बाईक उद्योग अजूनही उदयास येत आहे, आणि नियम आणि कायदे अद्याप ठामपणे स्थापित केले गेले नाहीत, परंतु ई-बाईक खूप महाग आहेत.
यामध्ये बरेच जटिल तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिकल आणि यांत्रिक भाग देखील आहेत जे आपल्याला कोणत्याही वेळी त्रास देऊ शकतात. तर, इतर कोणत्याही वाहनाप्रमाणे, इन्शुरन्स असणे दुर्दैवी घटनेत एक उत्तम तारणहार असू शकते आणि कोणतीही चिंता न करता आपल्याला चालविण्यास मदत करू शकते.
तसेच मोटार वाहन कायद्यानुसार किमान थर्ड पार्टी टू-व्हीलर इन्शुरन्स असणे बंधनकारक आहे.
डिजिटच्या इलेक्ट्रिक बाईक इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते?
इलेक्ट्रिक टू व्हीलर इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर
टू-व्हीलर इन्शुरन्स प्रीमियम हा किलोवॅट क्षमता, मेक, मॉडेल आणि वय यासारख्या अनेक घटकांवर आधारित असतात.
किलोवॅट क्षमतेच्या टू-व्हीलर्स (के.डब्ल्यू.) |
एक वर्षाच्या पॉलिसीसाठी प्रीमियम दर |
दीर्घकालीन पॉलिसीसाठी प्रीमियम * दर |
3 किलोवॅटपेक्षा जास्त नाही |
₹457 |
₹2,466 |
3 किलोवॅटपेक्षा जास्त परंतु 7 किलोवॅटपेक्षा जास्त नाही |
₹609 |
₹3,273 |
7 किलोवॅटपेक्षा जास्त परंतु 16 किलोवॅटपेक्षा जास्त नाही |
₹1,161 |
₹6,260 |
16 किलोवॅटपेक्षा जास्त |
₹2,383 |
₹12,849 |
* दीर्घकालीन पॉलिसी म्हणजे नवीन खासगी टू-व्हीलरसाठी 5 वर्षांची पॉलिसी. (स्रोत – आयआरडीएआय)
काय कव्हर केले नाही ?
आपल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय समाविष्ट नाही हे जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे, जेणेकरून आपण क्लेम केल्यावर आश्चर्य वाटणार नाही. अशा काही परिस्थितींविषयीची माहिती येथे देण्यात आली आहे:
डिजिटचा इलेक्ट्रिक बाईक इन्शुरन्स का निवडावा?
आपला बाईक इन्शुरन्स फक्त अतिशय सोप्या क्लेमच्या प्रक्रियेसहच येत नाही, तर कॅशलेस सेटलमेंट निवडण्याचा पर्याय देखील यात आहे.
क्लेम कसा करावा?
आपण आमच्याबरोबर आपला इलेक्ट्रिक टू-व्हीलर इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा नूतनीकरण केल्यानंतर, आपल्याला गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून जायची गरज नाही कारण आमच्याकडे 3-स्टेप, पूर्णपणे डिजिटल क्लेम प्रक्रिया आहे!
स्टेप 1
फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. फॉर्म भरायचे नाहीत.
स्टेप 2
आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर सेल्फ-इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. मार्गदर्शित टप्प्याटप्प्यांच्या प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाच्या नुकसानाबद्दल माहिती दया.
स्टेप 3
आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी आपण निवडू इच्छित असलेली दुरुस्तीची पद्धत निवडा.