यामाहा बाईक इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी/नूतनीकरण करा
यामाहा बाईक इन्शुरन्समध्ये काय कव्हर्ड आहे
काय कव्हर्ड नाही
आपल्या टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय कव्हर्ड नाही हे जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे, जेणेकरून आपण क्लेम केल्यावर आश्चर्य वाटणार नाही. अशा काही परिस्थिती येथे आहेत :
तुम्ही डिजिटचा यामाहा बाईक इन्शुरन्स का खरेदी करावा?
यामाहा इन्शुरन्स प्लॅन्स जे आपल्या गरजा भागवतात
थर्ड पार्टी
कॉम्प्रिहेन्सिव्ह
अपघातामुळे स्वत:च्या टू-व्हीलरचे हानी/नुकसान |
×
|
✔
|
आग लागल्यास स्वत:च्या टू-व्हीलरचे हानी/नुकसान |
×
|
✔
|
नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीत स्वत:च्या टू-व्हीलरचे हानी/नुकसान |
×
|
✔
|
थर्ड पार्टी व्हेईकलचे नुकसान |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी प्रॉपर्टीचे नुकसान |
✔
|
✔
|
वैयक्तिक अपघात कव्हर |
✔
|
✔
|
थर्ड-पार्टी व्यक्तीला दुखापत/मृत्यू |
✔
|
✔
|
आपल्या स्कूटरची किंवा बाईकची चोरी |
×
|
✔
|
आपले आय.डी.व्ही(IDV) कस्टमाइज करा |
×
|
✔
|
कस्टमाइज्ड ॲड-ऑन्ससह अतिरिक्त संरक्षण |
×
|
✔
|
क्लेम कसा करावा?
आपण आमचा टू व्हीलर इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा नूतनीकरण केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप, पूर्णपणे डिजिटल क्लेम्सची प्रक्रिया आहे!
स्टेप 1
फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. फॉर्म भरायचे नाहीत.
स्टेप 2
आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर सेल्फ-इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. सांगितलेल्या टप्प्यांच्या प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाच्या नुकसानाविषयीची माहिती भरा.
स्टेप 3
आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत निवडा म्हणजे आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस.
डिजिटचे इन्शुरन्स क्लेम्स किती लवकर सेटल केले जातात?
आपली इन्शुरन्स कंपनी स्विच करताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात आला पाहिजे. तुम्ही तसा विचार करताय ही चांगली गोष्ट आहे!
डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचायामाहा मोटर कंपनी: निर्मात्याबद्दलची आपल्यासाठी आवश्यक असलेली माहिती
यामाहा ही 1995 साली स्थापन झालेली मोटारसायकलींची जपानी उत्पादक कंपनी आहे. याचे मुख्यालय जपानमधील शिझुओका येथे आहे. भारतात, यामाहाने 1985 मध्ये संयुक्त उपक्रम म्हणून काम सुरू केले. आज, कंपनी हरियाणा, उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू येथे असलेले तीन उत्पादन प्रकल्प चालविते.
यामाहाचा ग्राहकाभिमुख दृष्टिकोन हे त्याच्या यशाचे प्राथमिक कारण आहे. देशभरात 500 हून अधिक डिलर्स असलेल्या यामाहा ग्राहक स्पोर्ट्स बाईक्स, सुपरबाइक्स, स्ट्रीट बाईक आणि स्कूटरमधून निवड करू शकतात.
भारतात उपलब्ध असलेल्या काही लोकप्रिय यामाहा मॉडेल्स येथे आहेत.
• यामाहा YZF R15 V3
• यामाहा MT 15
• यामाहा FZ S V3
• यामाहा फॅसिनो
• यामाहा FZ25
यामाहाच्या रेंजमध्ये प्रीमियम, महागड्या बाईक्स आणि त्याचबरोबर अधिक स्वस्त लाइन-अपचा समावेश आहे. बाईकच्या किंमतीची पर्वा न करता, योग्य यामाहा बाईक इन्शुरन्स प्लॅन निवडणे आवश्यक आहे.
अशा प्लॅन्समुळे आपल्याला रस्ते अपघातांच्या बाबतीत आपल्या वाहनामुळे किंवा तृतीय पक्षाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे उद्भवणारी आर्थिक लायॅबिलिटी टाळता येऊ शकते.
भारतात यामाहा बाईक्स इतक्या लोकप्रिय का आहेत?
प्रामुख्याने खालील कारणांमुळे यामाहा बाईक्सने देशातील अव्वल स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे.
• उत्पादनांची विस्तृत श्रेणी - इतर अनेक कंपन्यांपेक्षा भिन्न, यामाहा क्वचित चालवणाऱ्या आणि नियमित बाईक चालवणाऱ्यांनाही सेवा पुरवते. अशा विविध प्रकारच्या वाहनांच्या ऑफर्समुळे, किमतींमध्येही लक्षणीय फरक दिसून येतो. आपली आवड, बजेट आणि गरजांनुसार आपण आपल्यासाठी सर्वात योग्य अशी बाईक किंवा स्कूटर खरेदी करण्यास मोकळे आहात.
• परफॉर्मन्स-ओरिएंटेड बाईक्स - यामाहाची प्रत्येक बाईक हमखास उच्च परफॉर्मन्ससह येते. इंजिनची घन क्षमता, हाताळणी, सस्पेन्शन आणि वाहनाचे इतर प्रमुख भाग आपल्याला सर्वोत्तम रायडिंगचा अनुभव प्रदान करताना टिकण्यासाठी तयार केले जातात.
• श्रेष्ठ ग्राहक सेवा - यामाहा हा एक जागतिक ब्रँड आहे ज्याला योग्य प्रतिष्ठा आहे. अशा प्रकारे, कंपनी अव्वल दर्जाच्या ग्राहक सेवा प्रदान करते. छोट्या प्रश्नांचे निराकरण करण्यापासून ते आपल्याला बाइकबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत करण्यापर्यंत, यामाहाच्या ग्राहक सेवांमुळे आपल्याला असे वाटते की आपण जगभरातील यामाहा कुटुंबातील एक मौल्यवान सदस्य आहात.
यामाहा बाईक्स भारतीय लोकांसाठी कशामुळे इष्ट आहेत हे आता आपल्याला माहीत आहे, त्यामुळे अशा मौल्यवान वस्तूचे रक्षण कसे करायचे हेदेखील आपण ठरवायला हवे.
जेव्हा आपण त्यासाठी इन्शुरन्स कव्हर खरेदी करता तेव्हाच आपली बाईक (आणि त्यातली आपली गुंतवणूक) खऱ्या अर्थाने सुरक्षित असते.
यामाहा इन्शुरन्स पॉलिसी का खरेदी करावी ?
बाईकर्सनी वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगली तरी कोणत्याही वेळी प्रलयंकारी अपघात घडू शकतात. खरंतर, 2016 च्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की रस्ते अपघातातील एकूण मृत्यूंपैकी बाईक/स्कूटर रायडर्सचा वाटा सुमारे 25% आहे. (2)
अशी बाईक इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणे आवश्यक का आहे याची काही कारणे येथे आहेत:
• भारतीय कायद्यानुसार अनिवार्य - आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे, मोटार वाहन कायदा, 1988 मध्ये मूलभूत थर्ड-पार्टी लायॅबिलिटी इन्शुरन्स कव्हरशिवाय कोणतीही मोटार वाहन भारतीय रस्त्यावर धावू शकत नाहीत. त्यामुळे या किमान संरक्षणाचा लाभ घेताना बाईक मालकांना खरोखरच पर्याय नसतो. जर आपण किमान वैध थर्ड पार्टी लायॅबिलिटी इन्शुरन्स पॉलिसीशिवाय यामाहा बाईक चालवताना आढळलात, तर आपल्याला वाहतूक दंड 2000 रुपये आणि 4000 रुपये जर रिपीट असेल तर इतका ठोठावला जाईल.
• कायदेशीर लायॅबिलिटीपासून संरक्षण - जर आपली बाईक एखाद्या अपघातात सामील असेल आणि एखाद्या मालमत्तेचे किंवा व्यक्तीला नुकसान किंवा दुखापत केली असेल तर थर्ड-पार्टी यामाहा बाईक इन्शुरन्स प्लॅन बाधित पक्षाला महत्त्वपूर्ण आर्थिक सहाय्य देतात. जर आपण इन्शुरन्सशिवाय असाल, तर थर्डपार्टीला होणाऱ्या नुकसानीबद्दल आपल्याला कायदेशीररीत्या जबाबदार धरले जाते.
• चोरीपासून संरक्षण - इन्शुरन्स कंपनी केवळ आपल्या यामाहा वाहनाचे अपघाती नुकसानीपासून संरक्षण करत नाहीत तर संपूर्ण नुकसान किंवा चोरीच्या बाबतीत महत्त्वपूर्ण मोबदला देखील देतात. या पैशातून, आपण मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन न करता, रिप्लेसमेंट बाइक शोधू शकता.
• स्वत:च्या नुकसानीच्या दुरुस्तीसाठी रीएम्बर्समेंट- अपघातांमुळे केवळ त्रयस्थ पक्षाच्या मालमत्तेचे किंवा व्यक्तीचे नुकसान होत नाही. आपल्या स्वत: च्या बाईकचे नुकसान देखील बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात असू शकते. थर्ड पार्टी लायबिलिटी पॉलिसीधारक स्वत:च्या वेहिकलच्या दुरुस्तीचा खर्च वसूल करण्यासाठी त्यांच्या इन्शुरन्स प्लॅनचा क्लेम करू शकत नाहीत. तथापि, कॉम्प्रिहेन्सिव्ह यामाहा इन्शुरन्स प्लॅनद्वारे, आपल्याला अशी मदत देखील मिळू शकते.
• मृत्यू/अपंगत्वासाठी एकरकमी पैसे देणे - जर बाईक अपघातामुळे पॉलिसीधारकाचा मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आले तर बाइक इन्शुरन्स पॉलिसी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना वैयक्तिक अपघात ॲड-ऑन कव्हर अंतर्गत आर्थिक मदत देऊ शकतात, ज्यामुळे त्यांना त्यांचे जीवनमान टिकवून ठेवण्यास मदत होते.
आपण आपला यामाहा इन्शुरन्स प्रीमियम कसा कमी करू शकता?
आपल्या बाईकसाठी इन्शुरन्स अनिवार्य आहे. तथापि, आपल्याकडे आवश्यक आर्थिक पाठबळ असल्यासच आपण सर्वोत्तम कव्हरेज निवडू शकता. जर आपल्याकडे आर्थिक चणचण असेल, तर आपण आपल्या प्रीमियमचे ओझे कमी करण्यासाठी खालील युक्त्या वापरू शकता –
• आपल्या एन.सी.बी(NCB) ला आपल्या वतीने काम करू द्या - नो क्लेम बोनस ((NCB) बेनिफिट हा सर्वात सोयीस्कर मार्ग आहे ज्याद्वारे आपण बाईक इन्शुरन्स पॉलिसीसाठी प्रीमियम पेमेंट कमी करू शकता. आपल्या प्रीमियमवरील एन.सी.बी. सवलतीचा आनंद घेण्यासाठी, आपली इन्शुरन्स कंपनी आपल्याला लाभ देईल याची खात्री करा. तसेच, क्लेम उपस्थित करण्याची शक्यता कमी करण्यासाठी आणि परिणामी एन.सी.बी च्या फायद्यांचा आनंद घेण्यासाठी रस्त्यावर आपली यामाहा बाईक काळजीपूर्वक चालविण्याचा प्रयत्न करा.
• व्हॉलेंटरी डिडक्टीबलची निवड करा - इन्शुरन्स प्रदात्याद्वारे कम्प्लसरी डीडक्टीबल सेट केले जाते. आपण यात काही म्हणू शकत नाही. तथापि, आपण एखाद्या पॉलिसीमधून आपल्या प्रीमियमचे ओझे आणखी कमी करण्याचा विचार करीत असल्यास, आपण व्हॉलेंटरी डीडक्टीबलची सुविधा निवडू शकता. जेव्हा आपण व्हॉलेंटरी डीडक्टीबलची निवड करता, तेव्हा इन्शुरन्स कंपनी प्लॅनसाठी देय असलेल्या आपला प्रीमियम देखील लक्षणीयरित्या कमी करते.
• इन्शुरन्स कंपन्यांशी थेट करार करा - मध्यस्थ किंवा ब्रोकरकडून कव्हर खरेदी करण्यासाठी आपल्याला अधिक खर्च करावा लागेल कारण ते शुल्क अकारतील. त्यामुळे ब्रोकरकडून पॉलिसी खरेदी करण्यापेक्षा थेट इन्शुरन्स कंपनीशी संपर्क साधा. हे केवळ आपल्याला कमी किंमतीत पॉलिसींचा लाभ घेण्यासच मदत करत नाही तर सर्वात योग्य उत्पादन निवडताना आपल्याला माहितीपूर्ण निर्णय घेण्यात पण मदत करेल.
• आवश्यकतेनुसारच ॲड-ऑन्स खरेदी करा- कॉम्प्रिहेन्सिव्ह यामाहा बाईक इन्शुरन्स पॉलिसीमध्ये सामान्यत: बहुतेक परिस्थितीनसाठी सर्वांगीण आर्थिक संरक्षण समाविष्ट असते. आपल्या प्लॅनमध्ये कोणताही सारासार विचार न करता केवळ रायडर्सचा समावेश केल्याने आपल्याला खरोखरच कोणतीही सुरक्षितता न जोडता पॉलिसीच्या प्रीमियममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.
लक्षात ठेवा, आपल्या मौल्यवान बाईकसाठी इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना, आपण विमाकंपनीच्या प्रतिष्ठेसह, ते ऑफर केलेल्या कव्हरचा विचार केला पाहिजे. टू-व्हीलर अपघातांच्या वेळी आर्थिक संरक्षणाची हमी द्यायची असेल तर कमीत कमी खर्चिक पॉलिसी निवडू नका.
अनेकदा, व्यक्ती देऊ केलेल्या कव्हरच्या मर्यादेबद्दल पूर्णपणे समाधानी न राहता इन्शुरन्स प्लॅन ठेवू शकतात. अशा परिस्थितीत पॉलिसीधारकांना एका इन्शुरन्स कंपनीकडून दुसऱ्या इन्शुरन्स कंपनीकडे जाण्याची मुभा देण्याची तरतूद कंपन्यांकडे असते.
आपण शिफ्टच्या विचारात असणारे विद्यमान पॉलिसीहोल्डर असाल किंवा नवीन बाईक मालक जो सर्वोत्तम प्रदाता निवडण्याचा प्रयत्न करीत आहे तर बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी एक चांगला पर्याय म्हणजे डिजिट. डिजिटचे टू-व्हीलर इन्शुरन्स प्लॅन आपल्या यामाहा बाईकच्या नुकसानीमुळे उद्भवणाऱ्या आर्थिक लायॅबिलिटीपासून लवचिक, परवडणारे आणि त्रास-मुक्त संरक्षण सुनिश्चित करतात.
आपण विचार करत आहात का की डिजिटचा का? डिजिटची ऑफर खास का आहे हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती वाचा.
यामाहा टू-व्हीलर इन्शुरन्ससाठी डिजिटची निवड करण्यामागची कारणे?
भारतात टू-व्हीलर्ससाठी इन्शुरन्स पॉलिसी देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. आपल्या यामाहा बाईकसाठी उत्कृष्ट आर्थिक संरक्षण मिळविण्याचा प्रयत्न करताना आपण डिजिटच्या पॉलिसिसचा विचार का केला पाहिजे याची काही कारणे खाली सूचीबद्ध आहेत -
टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीच्या विविध प्रकारांची उपलब्धता- डिजिट त्यांच्या टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत अनेक पर्याय ऑफर करते, यामध्ये समाविष्ट आहे-
• a) थर्ड पार्टी लायॅबिलिटी टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी - या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये आपल्या टू-व्हीलरमुळे कोणत्याही थर्ड-पार्टी वाहन, मालमत्ता किंवा व्यक्तीच्या नुकसानीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीचा समावेश आहे.
• b) कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी - ही एक सर्वांगीण संरक्षण प्लॅन आहे, जी अपघातांमुळे स्वत:चे नुकसान आणि थर्ड-पार्टी नुकसान दोन्हीसाठी संरक्षण देते. याव्यतिरिक्त, अशा यामाहा मोटार इन्शुरन्स पॉलिसीमुळे आपल्याला आग, चोरी किंवा नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींमुळे नुकसान झाल्यास आर्थिक लाभाचा क्लेम करण्याची मदत मिळते.
शिवाय, डिजिट यामाहा टू-व्हीलर मालकांसाठी ओन डॅमेज बाईक इन्शुरन्स देखील ऑफर करते. सप्टेंबर 2018 नंतर आपण आपले वाहन खरेदी केले असेल तर आपण या कव्हरचा लाभ घेऊ शकता. ही पॉलिसी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स कव्हरचे फायदे प्रदान करते आणि थर्ड-पार्टीच्या लायॅबिलिटीसाठी संरक्षण देते.
• 1,000 पेक्षा जास्त नेटवर्क गॅरेजेस - जास्त संख्येने नेटवर्क गॅरेजेसची उपलब्धता आपल्याला आपल्या स्थानाबद्दल चिंता न करता, आपल्या बाईकसाठी अधिक सहजतेने कॅशलेस दुरुस्ती करण्यास मदत करते. डिजिटचे देशभरात 1000 हून अधिक नेटवर्क गॅरेज आहेत. त्यामुळेच, भारतात आपल्या बाईकला कोठेही अपघात झाला असला तरी, आपल्याला कदाचित जवळपास नेटवर्क गॅरेज सापडेल.
• पेपरलेस खरेदी आणि आपल्या इन्शुरन्स पॉलिसीचे नूतनीकरण - डिजिट आपल्याला त्रास-मुक्त आणि सुव्यवस्थित प्रक्रियेनंतर यामाहा इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करण्यास मदत करते. आमच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन प्रारंभ करा आणि बाईक इन्शुरन्स प्लॅन्समध्ये नेव्हिगेट करा. उपलब्ध असलेल्या विविध प्रकारांची तुलना करा आणि सर्वात योग्य खरेदी करा. व्यवहाराची शेवटची पायरी म्हणजे पॉलिसी कव्हरेज सुरू करण्यासाठी ऑनलाइन प्रीमियम भरणे. नूतनीकरणाची प्रक्रिया ही तितकीच सोपी आहे. आपल्या पॉलिसीचे तपशील ऑनलाइन भरा, वार्षिक प्रीमियम भरा आणि आपल्या स्कूटर किंवा बाईकवर अखंडित कव्हरचा लाभ घ्या.
• विविध प्रकारच्या ॲड-ऑन्ससह आपल्या यामाहा टू-व्हीलरसाठी अधिक चांगले संरक्षण मिळवा - जर कंपनीकडून एखादी विशिष्ट टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी अपुरी वाटत असेल तर आपण ॲड-ऑन कव्हरद्वारे अतिरिक्त संरक्षणाचा लाभ घेऊन त्यातील काही बाबी मुक्तपणे बदलू शकता. डिजिट अनेक उपयुक्त ॲड-ऑन्स ऑफर करतो, त्यापैकी प्रत्येक इन्शुरन्स संरक्षणात लक्षणीय सुधारणा करू शकतो. उपलब्ध असलेल्यांपैकी काहींमध्ये हे समाविष्ट आहे:
• a) झिरो डिप्रिसिएशन कव्हर
• b) रिटर्न टू इनव्हॉईस कव्हर
• c) कनझ्यूमेबल कव्हर
• d) इंजिन आणि गिअर प्रोटेक्शन कव्हर
• e) ब्रेकडाउन असिस्टन्स
टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीमधून जास्तीत जास्त फायदे मिळविण्यासाठी काळजीपूर्वक विचार करा आणि निवडा.
• सर्वोत्तम ग्राहक सेवा - यामाहा इन्शुरन्स प्लॅन निवडताना, आपण इन्शुरन्स कंपनीच्या विक्रीनंतरच्या सेवेच्या गुणवत्तेकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. सुदैवाने डिजिटची कस्टमर केअर सिस्टिम ही भारतातील बहुतांश स्पर्धकांपेक्षा सरस आहे. 24*7 उपलब्ध, पॉलिसीधारक त्यांच्या कव्हरेजबद्दल चौकशी करण्यासाठी कंपनीच्या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करू शकतात. याव्यतिरिक्त, आपल्याला क्लेम दाखल करणे आणि सेटलमेंट प्रक्रियेबद्दल शंका असल्यास प्रतिनिधीचा सल्ला घ्या.
• नो क्लेम बोनस (NCB) बेनिफिट्स मिळवा - आम्ही समजतो की आपण यामाहा बाईक रस्त्यावर चालवताना अत्यंत काळजी घ्याल. म्हणून, त्याबद्दल आपल्याला बक्षीस देण्यासाठी, डिजिट नो क्लेम बोनस बेनिफिट्स वाढवते जे आपल्याला प्रत्येक सलग नॉन-क्लेम वर्षासाठी आपल्या इन्शुरन्स पॉलिसी प्रीमियमवर सूट मिळविण्यास मदत करते. आपण 50% पर्यंत एन.सी.बी चा लाभ घेऊ शकता आणि आपली इन्शुरन्स पॉलिसी अधिक परवडणारी बनवू शकता!
• प्रभावी क्लेम प्रक्रिया आणि जास्त सेटलमेंटचे प्रमाण –डिजिट एक सुव्यवस्थित ऑनलाइन क्लेम सेटलमेंट प्रक्रिया प्रदान करते. आमच्या स्मार्टफोनने सेल्फ- इन्स्पेक्शन सक्षम केल्याने आपण दीर्घ-वेळ लागणारे क्लेमच्या प्रक्रियेचा त्रास टाळण्यास आणि आपले क्लेम सहजपणे सेटल करू शकाल. शिवाय, क्लेम सेटलमेंट प्रमाणामध्ये इन्शुरन्स कंपनीला प्राप्त झालेल्या क्लेम्सची तुलना विशिष्ट वर्षात निकाली काढलेल्या एकूण क्लेम्सच्या तुलनेत दर्शविली जाते. जास्त प्रमाण हे त्रास-मुक्त आणि सोयीस्कर सेटलमेंट दर्शवितात आणि त्याउलट. डिजिटच्या जास्त क्लेम सेटलमेंटच्या प्रमाणासह आपण आपला क्लेम नाकारला जाण्याची शक्यता कमी करू शकता.
भारतातील यामाहा बाईक इन्शुरन्स पॉलिसीबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Two Wheeler Insurance for Yamaha Bike models