रॉयल एनफील्ड बुलेट इन्शुरन्स

रॉयल एनफील्ड बुलेट बाईक इन्शुरन्सचा प्रीमियम त्वरित तपासा

Third-party premium has changed from 1st June. Renew now

रॉयल एनफील्ड बुलेट इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी/नूतनीकरण करा

पहिली रॉयल एनफिल्ड बुलेट घेण्याचा विचार करत आहात? 60 ते 70 वर्षांपूर्वी जी मजा या गाडीत होती ती अजूनही आहे का या बाबत साशंक आहात?

बरं, चला तर मग चर्चा करून समजून घेऊया की प्रत्येक रॉयल एनफिल्ड अजूनही दमदार आहे का; इन्शुरन्स पॉलिसींद्वारे अधिक चांगल्या प्रकारे कशी संरक्षित केली जाऊ शकते आणि अशा पॉलिसींद्वारे ऑफर केलेले फायदे काय आहेत.

आज रॉयल एनफिल्ड, एक ब्रँड म्हणून, जगातील सर्वात जास्त काळ काम करणारी मोटारसायकल उत्पादक म्हणून उभी असल्याने ती सर्वोच्च दर्जाची असल्याचे विधान करते. 1901 पासून उत्पादनाची सुरुवात केलेले त्यांचे बुलेट हे मॉडेल जगातील सर्वात जास्त काळ प्रदर्शन करणारे मोटरसायकलचे डिझाइन आहे.

मजबूत डिझाइनसह 4 स्ट्रोक इंजिनच्या सामर्थ्यासाठी ओळखले जाणारे हे मॉडेल 1931 साली अस्तित्वात आले. सुरुवातीला बुलेट 350 सीसी आणि 500सीसी  मध्ये लॉन्च करण्यात आली होती, परंतु नंतर 1933 मध्ये 250सीसी  प्रकार देखील सादर करण्यात आला. रेअर एन्डचा भाग कडक बनवल्यामुळे रायडरसाठी स्प्रिंगवाली उंचवटा देणारी सीट आवश्यक आहे. ब्रिटीश सैन्याने त्यांच्या सेवेत 350 सीसी  प्रकार सादर करत दुसऱ्या महायुद्धात त्याच्या वापराने मोठे यश संपादित केले.

मात्र  लोकप्रिय म्हणीप्रमाणे - मोठ्या सामर्थ्यासोबत मोठी जबाबदारी येते. म्हणूनच तुमची बाईक विविध आर्थिक दायित्वांपासून संरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी, तुमच्यासाठी रॉयल एनफील्ड बुलेटची इन्शुरन्स पॉलिसी घेणे महत्त्वाचे आहे.

तसेच, आता मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत बाईक इन्शुरन्स पॉलिसी घेणे देखील अनिवार्य आहे. किमान थर्ड पार्टी लायबिलिटी टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीशिवाय जर तुम्ही बाईक चालवताना आढळलात तर तुमच्याकडून ट्रॅफिक दंड म्हणून रू. 2000 आणि वारंवार गुन्ह्यासाठी रू.4000 असा दंड आकारला जाऊ शकतो. .

रॉयल एनफील्ड बुलेट इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले आहे

तुम्ही डिजिटचाच रॉयल एनफील्ड बुलेट इन्शुरन्स का खरेदी करावा?

रॉयल एनफील्ड बुलेटसाठी इन्शुरन्स पॉलिसीचे प्रकार

थर्ड पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वत:च्या टू-व्हिलरचे नुकसान/दुरुस्ती

×

आगीमुळे स्वत:च्या टू-व्हिलरचेनुकसान/दुरुस्ती

×

नैसर्गिक आपत्तीमुळे स्वत:च्या टू-व्हिलरचे नुकसान/दुरुस्ती

×

थर्ड पार्टीच्या वाहनाचे नुकसान

×

थर्ड पार्टीच्या मालमत्तेचे नुकसान

×

वैयक्तिक अपघात कव्हर

×

थर्ड पार्टी व्यक्तीला दुखापत/मृत्यू

×

तुमच्या बाईक किंवा स्कूटरची चोरी

×

तुमच्या वाहनाचा आयडीव्ही(IDV) कस्टमाइझ करा

×

कस्टमाइझ्ड अ‍ॅड ऑन्ससह एक्स्ट्रा संरक्षण

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी टू व्हीलर इन्शुरन्समधील फरकाबद्दल अधिक जाणून घ्या

क्लेम कसा दाखल करायचा?

आमची टू व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केल्यानंतर किंवा नूतनीकरण केल्यानंतर तुम्ही तणावमुक्त राहता कारण केवळ 3 स्टेप्समध्ये पूर्ण होणारी पूर्णपणे डिजिटल अशी आमची क्लेम्सची प्रक्रिया आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणतेही फॉर्म भरायचे नाहीत.

स्टेप 2

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर स्वयं-तपासणीसाठी लिंक मिळवा. आपल्याला मार्गदर्शित केलेल्या स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे स्मार्टफोनवरून आपल्या वाहनाच्या नुकसानाविषयीची माहिती द्या.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे दुरुस्तीसाठी तुम्हाला रिएम्बर्समेंट हवंय की कॅशलेस पद्धत हवीय यापैकी एकाची निवड करायची आहे.

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने निकाली काढले जातात? तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा पहिला प्रश्न यायला हवा. तुम्ही तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे! डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा

रॉयल एनफील्ड बुलेट: हेरिटेजचा परिचय

भारतात, स्वातंत्र्योत्तर काळातही, रॉयल एनफिल्ड आणि त्याचे बुलेट आयकॉन राहिले आहेत. भारतीय बाइकर्समध्ये रॉयल एनफिल्ड बुलेटच्या लोकप्रियतेला हातभार लावणारी अनेक कारणे आहेत. उदाहरणार्थ:

  • सामान्यतः रॉयल एनफिल्ड बुलेट्सची सध्याची बॅच त्याच्या 21व्या शतकातील इंजिनसह त्याच्या इंजिन क्षमतेनुसार 30 ते 40 kmpl च्या दरम्यान मायलेज देते.
  • 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून आणि त्याच शतकाच्या उत्तरार्धात एक स्वतंत्र क्रूझिंग आयकॉन बनलेल्या या मॉडेलसाठी मोटरसायकल चालवणाऱ्या उत्साही भारतीयांच्या मनात एक विशेष स्थान आहे. रॉयल एनफिल्ड बुलेट ही एकमेव  मोटारसायकल होती जी देशभरातील पोलीस दल आणि संरक्षण दल असे दोन्ही ठिकाणी वापरली गेली होती; हे त्याचे प्रसिद्ध पराक्रम आणि प्रतिष्ठित मूल्य होते.
  • आधुनिक तंत्रज्ञानाच्या आगमनाने, रॉयल एनफिल्डच्या मागणीत घट झाल्याने कंपनीला त्यांच्या या आयकॉनमध्ये सुधारणा करण्यास भाग पाडले. आधुनिक बुलेट त्यांच्या पूर्ववर्ती सारख्याच डिझाइनचा अभिमान बाळगते आणि त्याची मेनफ्रेम अजूनही जुन्यासारखीच आहे. मात्र वजन कमी करणे, ट्विन-स्पार्क आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या परिचयामुळे रॉयल एनफिल्ड बुलेटमध्ये आता नवे रक्त सळसळत आहे. 

अनेक तांत्रिक सुधारणांसह बनवलेले बुलेट हे मूल्यवान मशीन आहे ज्यावर खर्च केलेल्या प्रत्येक रुपयाची किंमत आहे. म्हणूनच अपघातात खराब झालेल्या बुलेटचा कोणताही भाग बदलून किंवा दुरुस्त करण्याशी संबंधित खर्च देखील तुमच्या खिशाला भारी पडू शकतो.

त्याहिशोबाने या सौंदर्यवतीच्या सुज्ञ मालकांनी बुलेट इन्शुरन्सची किंमत तपासली पाहिजे आणि शक्य तितक्या लवकर त्यासाठी अर्ज करावा.

इन्शुरन्स पॉलिसी म्हटल्यावर आर्थिक सुरक्षेचा मुद्दा सगळ्यात पहिले डोक्यात येत असला  तरी, मालकांनी या लेखाची उर्वरित भाग वाचवणे तितकेच महत्त्वाचे आहे. ते डिजीटमधून घेणाऱ्या त्यांच्या रॉयल एनफिल्ड बुलेट इन्शुरन्स पॉलिसीवरील बहुमूल्य फायद्यांवर प्रकाश टाकू शकतात.

रॉयल एनफील्ड बुलेट इन्शुरन्ससाठी डिजिटचीच निवड का करावी?

या मशीन्सचा वारसा समजून घेतल्यास, प्रत्येक मालकाला शक्य तितक्या सर्व प्रकारे त्यांची राइड जतन करण्याची इच्छा असते यात आश्चर्य वाटण्यासारखे नाही. डिजीट ही इच्छा समजून घेतो आणि या दुचाकीस्वारांबद्दलच्या प्रेमाचाही आदर करतो. परिणामी, डिजिटच्या बुलेट इन्शुरन्सचे फायदे खाली अधोरेखित केले आहेत:

भारतात अनेक नेटवर्क गॅरेजेस

रॉयल एनफिल्ड बुलेट हे एक मोटारसायकल मॉडेल म्हणून वेगळे आहे जे देशभरातील प्रवास आणि मोहिमांसाठी वापरले गेले आणि अजूनही वापरले जाते. लांब पल्ल्याच्या पर्यटनासाठीचे हे  गो-टू मशीन असल्याने, अपघाताच्या बाबतीत यांत्रिक बॅकअप ही अत्यावश्यक गरज आहे. तुमच्या बाईकचे अपघाती नुकसान झाल्यास भारतातील 1,000पेक्षा जास्त गॅरेजमध्ये डिजिट कॅशलेस दुरुस्तीची सुविधा देते.

रॉयल एनफील्ड बाईक इन्शुरन्स पॉलिसीचे प्रकार

डिजिटद्वारे ऑफर केलेल्या काही इन्शुरन्स पॉलिसी आहेत. काही पुढे नमूद केल्या आहेत. तुम्ही तुमच्या रॉयल एनफील्ड बुलेट इन्शुरन्स पॉलिसीसाठी कोणतीही निवड करू शकता:

  • थर्ड-पार्टी टू-व्हीलर इन्शुरन्स - प्रत्येक मोटारसायकलसाठी 1988च्या मोटार वाहन कायद्यानुसार थर्ड पार्टी दायित्व कव्हर असणे अनिवार्य आहे. अपघात झाल्यास, या पॉलिसीअंतर्गत अपघातात झालेले थर्ड पार्टीचे नुकसान भरून काढतात. यामध्ये एखाद्या व्यक्तीला इजा, मालमत्तेचे किंवा वाहनाचे नुकसान इत्यादींचा समावेश आहे. तुम्ही लक्षात ठेवा, ही पॉलिसी तुमच्या रॉयल एनफील्ड बुलेटच्या नुकसानीसाठी कोणतीही भरपाई देत नाही.
  • कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हीलर इन्शुरन्स - या पॉलिसीअंतर्गत थर्ड पार्टी तसेच तुमच्या बाईक असे दोघांनाही आर्थिक संरक्षण दिले जाते हे नावावरून अगदी समजण्यासारखे आहे. तुम्ही या पॉलिसीचा लाभ घेतल्यास, तुमच्या रॉयल एनफील्ड बुलेटला झालेल्या कोणत्याही अपघाती नुकसानासाठी देशात अनिवार्य असलेल्या नेहमीच्या थर्ड पार्टी लायबिलिटी इन्शुरन्ससह भरपाईचा क्लेम करू शकता. या पॉलिसीमध्ये आग, चोरी, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती इत्यादींमुळे झालेल्या नुकसानीच्या घटनांचाही समावेश होतो. 

तसेच ज्यांनी सप्टेंबर 2018 नंतर त्यांची बुलेट खरेदी केली आहे ते त्यांच्या वाहनांसाठी त्यांच्या ओन डॅमेज बाईक इन्शुरन्स संरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. या बुलेट इन्शुरन्स  पॉलिसी थर्ड पार्टी लायॅबलिटी लाभांशिवाय कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसीचे फायदे देतात.

ऑनलाइन खरेदी आणि नूतनीकरण

सोय, तत्परता आणि तुलना करण्याची सोपी पद्धत यांचा ऑनलाइन खरेदी आणि नूतनीकरणाच्या फायद्यांमध्ये समावेश होतो. डिजीटद्वारे ऑफर केलेल्या विविध पॉलिसींची तुलना करणे आणि योग्य पॉलिसी निवडणे ऑनलाइन खूप सोपे आहे. याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या रॉयल एनफील्ड बुलेटसाठी काही मिनिटांतच ऑनलाइन इन्शुरन्स खरेदी देखील करू शकता.

जलद डिजिटल क्लेम सेटलमेंट पद्धत

बर्‍याच इन्शुरन्स क्लेम्ससाठी लागू असलेल्या लांबलचक प्रक्रियेच्या विपरीत, डिजीट जलद क्लेम फाइलिंग तसेच सुलभ सेटलमेंट ऑफर करते. तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही ऑनलाइनही क्लेम करू शकता. स्मार्टफोनवरील स्वयं-तपासणी सुविधा वेळेची बचत करण्यास मदत करते. तसेच डिजीटच्या क्लेम सेटलमेंटचा उच्च दर क्लेम नाकारण्याची कमी शक्यता दर्शवितो.

नो क्लेम बोनसचा (NCB) लाभ

तुम्ही तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीवर क्लेम न केल्यास, डिजीट अशा संस्थांपैकी एक आहे जी पॉलिसीच्या नूतनीकरणावेळी प्रीमियमवर सूट मिळवण्याची संधी देते. नो क्लेम बोनसच्या लाभाअंतर्गत, तुम्ही तुमच्या नूतनीकरण प्रीमियमवर 50% पर्यंत एनसीबी (NCB) डिस्काउंट जमा फायदे मिळवू शकता. जर तुम्ही तुमचा इन्शुरन्स प्रदाता डिजीटमध्ये बदलत असाल तर तुम्ही बुलेट इन्शुरन्सचा हा लाभ ऑनलाइन देखील घेऊ शकता.

कार्यक्षम 24x7 ग्राहक सेवा

डिजिट प्रीमियम ग्राहक सेवा देते, जी क्लेम्स दाखल करण्यासाठी 24X7 उपलब्ध असते. शिवाय, ग्राहक सेवा सेवा राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी देखील उपलब्ध आहे. तुमचा बुलेट बाईक इन्शुरन्सचा क्लेम दाखल करण्यासाठी तुम्ही क्लेम ऑनलाइन दाखल करू शकता किंवा टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता.

कस्टमाइझ करण्यायोग्य इन्शुर्ड डिक्लेर्ड व्हॅल्यू (IDV)

आयडीव्ही (IDV) ही तुमच्या रॉयल एनफील्ड बुलेटच्या एकूण तोटा किंवा चोरीच्या विरूद्ध इन्शुरन्स काढलेली रक्कम आहे. तुमच्या मोटारसायकलच्या विक्रीच्या किमतीतून तुमच्या टू-व्हिलरचे डिप्रिसिएशन वजा करून मोजले जाते. जर तुम्ही डिजिटद्वारे ऑफर केलेल्या इन्शुरन्स पॉलिसींचा लाभ घेत असाल तर ही रक्कम कस्टमाइझ केली जाऊ शकते. जास्त आयडीव्हीसाठी जाण्याचा सल्ला दिला जातो कारण ते अपघाताच्या बाबतीत उद्भवू शकणारे सर्व खर्च प्रभावीपणे कव्हर करू शकते.

असंख्य अ‍ॅड ऑन कव्हर्स

बुलेटसाठी थर्ड-पार्टी इन्शुरन्सवर हे ऑफर केले जात नसले तरी, तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर खरेदी केल्यास अनेक अ‍ॅड ऑन्सची देखील निवड करू शकता. हे अ‍ॅड-ऑन खाली सूचीबद्ध असून त्यांचा लाभ घेतल्याने तुमची बुलेट कोणत्याही अपघातापासून आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असल्याचे सुनिश्चित केले जाऊ शकते:

  • रिटर्न टू इन्व्हॉइस इन्शुरन्स कव्हर
  • झिरो डिप्रिसिएशन कव्हर
  • ब्रेकडाउन असिस्टन्स
  • इंजिन आणि गियर प्रोटेक्शन पॉलिसी
  • कंझ्युमेबल कव्हर

तुम्ही विविध प्रकारचे कव्हर तपासले पाहिजे आणि तुमच्या बुलेट इन्शुरन्स पॉलिसीसाठी योग्य वाटेल त्याची निवड करावी.

दुचाकी चालवणाऱ्या उत्साही मंडळींची आवड समजत, डिजीट अभिमानाने इन्शुरन्स पॉलिसीज ऑफर करते जे तुमच्या बाइकचे पूर्णपणे संरक्षण करतात.

रॉयल एनफील्ड बुलेट - प्रकार आणि एक्स-शोरूम किंमत

प्रकार एक्स-शोरूम किंमत(शहरानुसार बदलू शकते)
बुलेट 350 एबीएस, 40 केएमपीएल, 346 सीसी ₹ 121,381
बुलेट 350 इएस एबीएस, 40 केएमपीएल, 346 सीसी ₹ 135,613
बुलेट 500 एबीएस, 30 केएमपीएल, 499 सीसी ₹ 175,180

भारतातील रॉयल एनफील्ड बुलेट इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी ऑनलाइन इन्शुरन्स खरेदी केल्यास माझ्या मोटारसायकलची तपासणी कशी केली जाईल?

जोपर्यंत तुम्ही आधीचा इन्शुरन्स संपण्यापूर्वी इन्शुरन्ससाठी अर्ज करता, तोपर्यंत कोणतीही तपासणी होणार नाही.

बाईक इन्शुरन्ससाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक तपशील कोणते आहेत?

बाईक इन्शुरन्ससाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची यादी पुढे दिली आहे:

  • बाईकची नोंदणी आणि चेसिस क्रमांक आणि उत्पादनाची तारीख.
  • ठिकाण आणि खरेदीची तारीख.
  • आधीच्या पॉलिसीचा तपशील (तुम्ही नूतनीकरण करत असल्यास)
  • एनसीबी (NCB) तपशील (आपल्याकडे पूर्वीचे कोणतेही NCB असल्यास)
  • नाव, फोन नंबर आणि ईमेल आयडीसह तुमचा वैयक्तिक तपशील.

मी माझे थर्ड पार्टी लायॅबलिटी कव्हर कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरमध्ये अपग्रेड करू शकतो का?

होय, जेव्हा तुम्ही तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीचे नूतनीकरण करता तेव्हा तुम्ही तुमचे थर्ड पार्टी लायॅबलिटी कव्हर अपग्रेड करू शकता.