Third-party premium has changed from 1st June. Renew now
कमर्शिअल व्हॅन इन्शुरन्स म्हणजे काय?
कमर्शिअल व्हॅन इन्शुरन्स हा व्यावसायिक वाहन (कमर्शिअल व्हेईकल) इन्शुरन्स पॉलिसीचा एक प्रकार आहे जो व्यावसायिकरित्या वापरल्या जाणार्या व्हॅनचा खर्च कव्हर करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. जसे की स्कूल व्हॅन, खाजगी व्हॅन आणि इतर व्हॅन ज्या प्रवासी किंवा वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वापरल्या जातात.
मूलभूत, कायद्याद्वारे अनिवार्य केलेल्या थर्ड -पार्टी लायॅबलिटी पॉलिसीमध्ये तृतीय-पक्षाची (थर्ड - पार्टी लायॅबलिटी कव्हर करण्यात मदत होते; कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हॅन इन्शुरन्स पॉलिसी स्वतःचे नुकसान आणि हानी भरून काढण्यास मदत करते.
कव्हर केलेल्या कमर्शिअल व्हॅनचे प्रकार:
- स्कूल व्हॅन: शाळांच्या मालकीच्या असलेल्या आणि विद्यार्थी आणि शिक्षकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या व्हॅन, आमच्या व्हॅन इन्शुरन्सचा भाग म्हणून कव्हर केल्या जाऊ शकतात.
- सार्वजनिक व्हॅन: सार्वजनिक वाहतुकीच्या उद्देशाने वापरल्या जाणार्या व्हॅनदेखील कव्हर केल्या जाऊ शकतात.
- खाजगी व्हॅन: प्रवासी वाहून नेण्यासाठी किंवा व्यावसायिक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणार्या व्हॅनसाठीही इन्शुरन्स कव्हर दिले जाते .
- इतर व्यावसायिक व्हॅन्स: व्यावसायिक आणि इतर कामकाजासाठी वापरल्या जाणार्या इतर सर्व व्हॅन्ससाठी कव्हर मिळू शकते.
मी कमर्शिअल व्हॅन इन्शुरन्स का खरेदी करावा?
- कायद्याचे पालन करा: मोटार वाहन कायद्यानुसार, व्हॅनसह सर्व वाहनांसाठी किमान थर्ड पार्टी व्हेईकल इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. अन्यथा, तुम्हाला मोठा दंड आकारला जाऊ शकतो !
- अनपेक्षित नुकसानांपासून संरक्षण: थर्ड-पार्टी व्हॅन इन्शुरन्स तुम्हाला फक्त कायदेशीररित्या कव्हर करेल आणि तृतीय-पक्षाच्या नुकसानासाठी, एक कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हॅन इन्शुरन्स तुमच्या स्वतःच्या व्हॅनचे नुकसान आणि अचानक उद्भवू शकणार्या नुकसानांपासून संरक्षण करण्यासदेखील मदत करेल.
- व्हॅन मालक-ड्रायव्हरसाठी कव्हर: तुमचा थर्ड-पार्टी व्हॅन इन्शुरन्स असो किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हॅन इन्शुरन्स तुमचा कमर्शिअल व्हॅन इन्शुरन्ससुद्धा व्हॅनच्या मालक-ड्रायव्हरसाठी दुर्दैवी परिस्थितीसाठी कव्हर देईल.
- प्रवासी संरक्षण: कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हॅन इन्शुरन्ससह, तुम्ही तुमच्या व्हॅनमध्ये प्रवास करत असलेल्या कोणत्याही प्रवाश्यांसाठी संरक्षणाचा पर्यायसुद्धा निवडू शकता.
डिजिटचा कमर्शिअल व्हॅन इन्शुरन्स का निवडावा?
कमर्शिअल व्हॅन इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते ?
काय कव्हर केलेले नाही ?
तुमच्या कमर्शिअल व्हॅन इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय समाविष्ट नाही(कव्हर केलेले नाही) हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुम्ही क्लेम करताना तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार नाही. येथे अशा काही परिस्थितींविषयीची माहिती पुढे दिली आहे :
तुम्ही तुमच्या व्हॅनसाठी फक्त थर्ड-पार्टी कमर्शिअल व्हॅन इन्शुरन्स घेतला असेल, तर स्वतःचे नुकसान आणि हानी भरून काढली जाणार नाही.
क्लेमदरम्यान, चालक-मालक वैध ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय किंवा दारूच्या प्रभावाखाली कमर्शिअल व्हॅन चालवत असल्याचे आढळल्यास, कमर्शिअल व्हॅन कव्हर केली जाणार नाही.
निष्काळजीपणा केल्यामुळे कमर्शिअल व्हॅनचे झालेले कोणतेही नुकसान किंवा हानी भरून काढली जाणार नाही.
अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा आग यांचा थेट परिणाम नसलेले कोणतेही नुकसान किंवा हानी कव्हर केली जाऊ शकत नाही.
डिजिटच्या कमर्शिअल व्हॅन इन्शुरन्सची प्रमुख वैशिष्ट्ये
मुख्य वैशिष्ट्ये | डिजिट लाभ |
---|---|
क्लेम प्रक्रिया | पेपरलेस क्लेम्स |
कस्टमर सपोर्ट | 24x7 सपोर्ट |
अतिरिक्त कव्हरेज | पीए कव्हर, लिगल लायॅबलिटी कव्हर , स्पेशल एक्सक्ल्यूजन्स आणि कम्पल्सरी डिडक्टीबल्स, इत्यादी |
थर्ड -पार्टीचे नुकसान | वैयक्तिक नुकसानासाठी अनलिमिटेड लायॅॅबलिटी, मालमत्ता/वाहनाचे ७.५ लाखांपर्यंतचे नुकसान |
कमर्शिअल व्हॅन इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार11
तुमच्या कमर्शिअल व्हॅनचा इन्शुरन्स उतरवण्याच्या प्रकारावर आधारित, आमच्याकडे निवडण्यासाठी प्रामुख्याने दोन योजना आहेत.
लायॅबलिटी ओन्ली | स्टँडर्ड पॅकेज |
कोणत्याही तृतीय-पक्ष व्यक्ती किंवा मालमत्तेला तुमच्या कमर्शिअल व्हॅनमुळे होणारे नुकसान. |
|
तुमच्या कमर्शिअल व्हॅनमुळे तृतीय-पक्षाच्या वाहनाला झालेले नुकसान |
|
नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी किंवा अपघातामुळे स्वतःच्या कमर्शिअल व्हॅनचे नुकसान किंवा हानी. |
|
कमर्शिअल व्हॅन मालक-चालकाची इजा/मृत्यूIf the owner-driver doesn’t already have a Personal Accident Cover from before |
|
Get Quote | Get Quote |
क्लेम कसा करायचा?
आम्हाला १८००-२५८-५९५६ वर कॉल करा किंवा hello@godigit.com वर ईमेल करा
आमची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पॉलिसी क्रमांक, अपघाताचे ठिकाण, अपघाताची तारीख आणि वेळ आणि विमाधारक/कॉलरचा संपर्क क्रमांक यासारखी तुमची माहिती तुमच्या जवळ ठेवा.
भारतातील ऑनलाइन कमर्शिअल व्हॅन इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मी माझ्या व्हॅनसह माझ्या सर्व व्यावसायिक वाहनांसाठी एकाच पॉलिसीमध्ये इन्शुरन्स काढू शकतो का ?
नाही, तुम्ही असे करू शकत नाही. व्यावसायिक वाहनांसह प्रत्येक वाहनाला त्यांच्या वाहनांसाठी प्रत्येकी एक पॉलिसी असणे आवश्यक आहे. तथापि, तुम्ही काय करू शकता ते म्हणजे तुमच्या सर्व वाहनांसाठी कमी खर्चात कस्टमाइझ पॅकेज मिळवा. अधिक जाणून घेण्यासाठी व्हॉट्स ॲपद्वारे आमच्याशी संपर्क साधा.
डिजिटच्या व्हॅन इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत कोणत्या प्रकारच्या व्हॅनचा समावेश होतो ?
व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणार्या सर्व प्रकारच्या व्हॅन (शाळा, खाजगी टूर इ.) आमच्या कमर्शिअल व्हॅन इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत समाविष्ट केल्या जाऊ शकतात, जसे की मारुती इको आणि मारुती सुझुकी ओम्नी इतर व्हॅन आणि मिनी बस.
प्रवाश्यांनाही व्हॅन इन्शुरन्समध्ये संरक्षण दिले जाते का?
होय, जर तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह कमर्शिअल व्हॅन इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करायचं ठरवलं, तर तुम्ही तुमच्या प्रवाश्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रवासी कव्ह देखील निवडू शकता.
ऑनलाइन व्हॅन इन्शुरन्स खरेदी करण्याचे फायदे काय आहेत ?
तंत्रज्ञानामुळे, तुम्ही आता व्हॅन इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करू शकता. हे अनेक फायद्यांसह येते जसे की कोणतीही कागदपत्र नाहीत, तुम्हाला एजंटला भेटण्याची गरज नसल्यामुळे हे कमी वेळ घेणारे आहे आणि ते तुलनेने स्वस्तदेखील आहे!
कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स पॉलिसीसह एका व्हॅनचा इन्शुरन्स काढण्यासाठी किती खर्च येईल?
हे प्रामुख्याने तुम्हाला कोणत्या प्रकारच्या व्हॅनचा इन्शुरन्स काढायचा आहे, ती व्हॅन किती जुनी आहे, ती तुम्ही कोणत्या शहरात चालवता आणि तुम्ही निवडलेल्या इन्शुरन्स पॉलिसीचा प्रकार काय आहे यावर अवलंबून असते. तुमच्या व्हॅनसाठी संभाव्य व्हॅन इन्शुरन्स प्रीमियम तपासण्यासाठी, तुमची माहिती इथे भरा.